जितकी मोठी स्वप्ने, तितके मोठे यश!… (प्रेरणादायी)

आपल्यापैकी प्रत्येकाचं कोणतं ना कोणतं स्वप्न असतंच.

आपण सारे जगतोच ते मुळी आपल्या स्वप्नातल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी…….

स्वप्न, मग ते काहीही असेल, छानसा टुमदार बंगला, अंगणातुन दिसणारा निळाशार समुद्र, नारळी पोफळीने सजलेली बाग, वाऱ्याच्या वेगाने धावणारी महागडी चकचकीत ऑडी किंवा बीएमड्ब्ल्यु, महीन्याला अमुकेक रक्कम खात्याला जमा व्हायलाच हवी अशी आर्थिक सुरक्षितता, युरोप-अमेरिका दर्शनवारीची तीव्र इच्छा, नाहीच जमले तर किमान आयुष्यात एकदा सिंगापुर – मलेशिया तरी अनुभवण्याची अनामिक ओढ.

आपल्या अवतीभवती अशा अनेक यशस्वी व्यक्ती असतात की फटाफट यशाच्या शिड्या सर करुन नव्या नव्या उंची गाठतात.

झपाटल्यासारखं काम करतात, स्वप्न जगतात आणि सत्त्यात आ्णतात.

आणि काही दुर्दैवी जीव ती पुर्ण झाली नाहीत (आणि होणारही नाहीत) या दुःखात आपलं संपुर्ण आयुष्य स्वप्नांची ओझी वाहताना थकुन जातात. असे का घडते?

सहजासहजी न उलगडणाऱ्या ह्या यक्षप्रश्नाचं उत्तर रॉबर्ट कियोसोकी नावाचा जपानी अमेरिकन फार अचुकपणे देतो.

थोड्या कडक शब्दांतच तो म्हणतो, की स्वप्न पहायला पैसे लागत नाहीत पण माणसांची मनं एवढी दरिद्री असतात की ती अवघड, मोठी, आवाक्याबाहेरची (समजुन) स्वप्न मनापासुन पहातंच नाहीत.

अहो, नुसता कल्पनाविलास करायला सुद्धा मोठं क्रिएटिव्ह माईंड हवं.

सुदैवाने परमेश्वराने ती ठेव प्रत्येकालाच दिलीय पण वास्तवतेला, परिस्थीतीलाच बंधन मानुन आपणच आपल्या अद्वितीय आणि निसर्गदत्त कल्पनाशक्तीचा गळा घोटतो.

यशस्वी माणसं जिद्दी असतात, कल्पनेच्या आकाशात, स्वप्नाचे पंख लावुन उ्त्तुंग भराऱ्या मारत बिनधास्त संचार करतात.

जग हसेल, नावं ठेवेल, असे मानुन ते उड्डाण थांबवत नाहीत.

झोपेत (आणि जागृत अवस्थेतही) ते स्वप्न पाहतात, कल्पनांतच रमतात, आवडत्या गोष्टी मनात घोळवतात, प्रचंड परीश्रम करतात, इतके करतात की शेवटी नियती हार मानते आणि त्यांच्या जिद्दीला कंटाळुन त्यांच्या स्वप्नाला सत्य बनवते.

नेपोलियन हील, डब्लु. क्लेमेंट स्टोन अशा दिग्गज आणि मातब्बर मंडळीपासुन अगदी अलिकडच्या ‘द सिक्रेट’ फेम ह्रोंन्डा बार्ने पर्यंत सगळेजण यशस्वी होण्यासाठी तीन सोप्या पायर्‍या असल्याचं मानतात.

१) कल्पना करा –ज्या मरण्याच्या आधी पुर्ण व्हायलाच हव्या अशा इच्छांचा शांतपणे विचार करा, त्या विस्तृतपणे लिहुन काढा.

उदा. स्वतःचा अलिशान बंगला, एक करोड रुपये, कार, बाईकवरुन हिमालयाची सफर, देशविदेशातील भटकंती, निरोगी जीवन, परीवारतुन प्रेम, निखळ मैत्री..

दररोज थोडावेळ तरी कल्पनांमध्ये हरवुन जायला हवे, दिवास्वप्न पाहीले पाहीजे.

२) विश्वास बाळगा –विश्वास बाळगा, तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर खऱ्या होणार आहेत, किंबुहना, हि तुमची इच्छा पुर्ण झालीये असं फील करा आणि त्याबद्दल ब्रह्मांडाला ‘थॅंक यु’ म्हणा.

इथेच आकर्षणाचा नियम काम सुरु करतो.

नेहमीच आनंदानं काठोकाठ भरलेले असणे, शक्यच नसतं, आजुबाजुहुन बर्‍या वाईट घटनांचे प्रतिसाद आपल्यावर आदळत असतात, कधी मध्येच निराशा आणि आळशीपणा डोके वर काढतात.

अशा वेळी जेव्हा केव्हा तुम्हाला सकारात्मक उर्जेची गरज असेल तेव्हा, डोळे बंद करा, आणि भुतकाळात तुम्ही प्राप्त केलेल्या यशाला आठवा, तुम्हाला गर्व वाटेल अशा सर्व एचिव्हमेंटसना वारंवार आठवा, मनात घोळवा, त्या सुखद आठवणीत रममाण व्हा.

दररोज करावयाच्या छोट्या छोट्या कृतींचा प्लान बनवा, योजना बनवली आणि त्यावर अंमल केला की आनंद होतो.

३) प्राप्त करा. –जेवढं तीव्र आकर्षण असेल तेवढा जलद रिझल्ट मिळेल. गोष्टी मनासारख्या घडतीलच, पण लागलाच थोडा वेळ तर उतावीळ व्हायचं नाही….

जगाला ओरडुन सांगायचं…. खेळ संपलेला नाही कारण, अजुन मी जिंकलेलो नाही.

तुम्हाला जिम केरी माहितीये? तोच तो, हॉलीवुडचा फेमस हिरो, ‘द मास्क’ वाला…

त्याची स्ट्रगलींग पिरेड मधली एक घटना खुप इंट्रेस्टींग आणि शिकण्यासारखी आहे.

ओपेरा विफ्रेडच्या टॉक शो मध्ये जिम केरी ला बोलवलं होतं, तेव्हा त्यानं आपलं आयुष्य सर्वांसमोर खुलं केलं होतं.

जिम केरी एका सफाई कर्मचार्‍याचा मुलगा होता, तो एका अतिशय गरीब घरात जन्मला होता, भाड्याच्या घरात राहण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे, म्हणुन किराया देऊन एका खटारा कार मध्ये राहायचा. पोटभर खायची भ्रांत असायची, पण अशा बिकट परिस्थीतीतही त्याने एक भव्य स्वप्न पाहीले, हॉलीवुड एक्टर बनण्याचे स्वप्न.

पुर्ण मन लावुन त्या्ने प्रयत्न चालु केले आणि त्याच्या करीअरचा श्रीगणेशा झाला. बारा-तेरा चित्रपटात त्याला छोटे-मोठे रोल मिळाले पण त्याचे समाधान होत नव्हते.

मग एकदा, वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी, त्याने एक करोड डॉलर रकमेचा चेक लिहला, आणि स्वतःच्या पाकीटात ठेवला.

रोज उठुन तो त्या चेककडे पाहायचा, खुष व्हायचा, त्याकडे पाहुन त्याला आगळीवेगळी शक्ति मिळायची, मग तो संपुर्ण उर्जेने काम करायचा आणि फक्त पाच वर्षांनी त्याला “डंब आणि डंबर” नावाच्या मुव्हीसाठी त्याला साईन केले गेले, आणि त्याबद्द्ल त्याला एक चेक मिळाला, रक्कम – फक्त एक कोटी डॉलर्स..

आयुष्य म्हणजे निवड करणे. जिम केरीने, परिस्थीतीने खचुन जाण्यापेक्षा, भव्य-दिव्य, मोठे, स्वप्न पाहण्याची निवड केली आणि ते प्रत्यक्षात जगुनही दाखवले.

हेच ब्रुसलीने केलं, हेच जॅक कॅनफिल्डन केलं, अगदी शाहरुख खान पासुन, रणवीर कपुर आणि अनुष्का चोप्रा पर्यंत सगळेच आकर्षणाच्या नियमाचा फायदा झाल्याचं सांगतात!…

त्यांनी चांगल्या विचारांची निवड केली.

स्वप्न साध्य करण्यासाठी एक गोष्ट करणं, अत्यंत आवश्यक आहे,

आभारपत्रिका – रोज रात्री झोपण्याआधी, दिवसभरात घडलेल्या चांगल्या घटनांची उजळणी करायची आणि त्याबद्दल मनपासुन देवाला ‘थॅंक यु’ म्हणायचे……… आयुष्य म्हणजे निवड करणे.

एकतर तुमचं मन ओझ्यानं दबलेलं ‘भारी’ असेल, किंवा आनंदाने उडणारं, हलक्या पिसासारखं ‘आभारी’ असेल!..

एक तर तुम्ही ‘ग्रेटफुल’ असता नाहीतर ग्रेट ‘फुल’ असता…… निवड तुमची आहे.

मान्य आहे रोजच आपल्यासमोर ताणतणावाचे प्रसंग येतात पण प्रॉब्लेम समोर ‘गिव्हअप’ करायचं का ‘गेट अप’ करायचं……निवड तुमची आहे.

चिंता करायची की चिंतन करायचं…… निवड तुमची आहे.

पढे लिखे होनेसे अच्छा है,
पढते लिखते रहना,

अनपढ वो नही है, जो पढ नही पाते है,
बल्की अनपढ वो है, जो आगे बढ नही पाते है,

परिस्थितीला दोष देऊन रडत बसायचं? का मनस्थिती प्रसन्न ठेवुन हसतं खेळत राहायचं…….. निवड तुमची आहे.

धन्यवाद!…

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “जितकी मोठी स्वप्ने, तितके मोठे यश!… (प्रेरणादायी)”

  1. आजच्या ताण तणावाच्या परिस्थितीत मनाला उभारी देण्यासाठी, एक वेगळा दृष्टीकोन, दिशा देण्यासाठी आपले हे रोजचेच लेख महत्वाची भूमिका निभावतात म्हणूनच मनाचे talks टीम ला या अनोख्या उपक्रमाबद्दल खुप खुप शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय