Psycho- ती…. तिकडे दिसतेय मला!!!

सटक-फटक, खटक-सटक….. खर्र खर्र सटक…. फटक, पाऊस धो धो धुवांधार, मी, कंडक्टर आणि ड्राइवर तिघेचजण बस मध्ये मी ऑफ साईडला म्हणजे ड्राइव्हरच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या मागच्या सीटवर बसलो होतो, कंडक्टर सुद्धा माझ्या मागच्या सीटवर बसला होता, काळामिट्ट अंधार आणि पावसाच्या धुवांधार सरी, घाट वळणं आणि हेड लाईट्स चा प्रखर झोत समोरच्या पावसाच्या पडद्यावर आणि फ्रंट ग्लासवर होत असणारा वायपरचा सटक-फटक, खटक-सटक, सारखा रिदमिक आवाज, माझी जाणीव सुन्न, का कोणास ठाऊक एकदम बधिरता आली होती.

बस मधले निळे दिवे भयाण वाटत होते, मी निश्चल बसलो होतो आणि कधी त्या वायपरच्या रिदम मध्ये मी गुंग झालो हे समजलेच नाही, एकटक नजर त्या वायपरवर….. एका लयीत फिरत होते काचेवरून, म्हणजे एका क्षणात थेंबांची गर्दी काचेवर आणि दुसऱ्या क्षणाला काच स्वच्छ, खूप धुरकट वातावरण झालं होत म्हणजे पहाट आणि रात्रीची सीमा होती त्यामुळे धुकं होत का पाऊस हेच समजेनासं झालं होत,

पण एकंदरीत सुन्न….. बस चा आवाज आणि सटक-फटक व्हायपरचा आवाज, माझी नजर काचेवर स्थिर म्हणजे मलाच समजत नव्हतं बहुतेक काय झालं होत ते मला, पण काचेवरचं पाणी साफ झालं की काचेवर एक लांब वाट दिसायची आणि त्यावर ती चालताना, पाणी आलं काचेवर की दृश्य गायब, कदाचित सातत्य नसल्याने दृश्य नीट दिसत नव्हतं, हळू हळू पाऊस गर्द/घनदाट झाला आणि स्वच्छ काचेवरच ते दृश्य पाणेरी काचेवर ठळक व्हायला लागलं, मला व्हायपर दिसेनासे झाले हळू हळू आणि मला ते चित्र म्हणजे थ्री डायमेन्शनल हलतंबोलतं चित्र अगदी स्पष्ट दिसायला लागलं.

नयनरम्य वाट होती ती अगदी म्हणजे डोंगरावर जाणारी, हळू हळू चढणारी, अजुनबाजूला घनदाट झाडी असणारी वाट, आणि त्याववरुन जाणारी ती, लांब केसांचा दाट शेपटा, अगदी गजगामिनी, मी बघतच राहिलो, झपझप पावलं पडत होती तिची आणि माझी नजर पळत होती तिच्या मागे, तिला पुढून बघण्याची उत्सुकता लागली होती, तिचा चेहेरा बघायचा होता, मागून माझ्या ओळखीची वाटत होती कदाचित, तिला कसलच भान नसावं, इकडे तिकडे बघतच नव्हती ती, काहीतरी मनात ठरवून ती त्या वाटेवरून चालली होती, काहीतरी मनात असणार तिच्या, गोंधळलेली वाटत होती, मी नजरेनी तिच्या मागावर होतो, काहीतरी अघटित घडणार होतं कदाचित, ती झपाझपा चालत होती ,काहीतरी मनात खळबळ होती तिच्या, चित्र जरा स्पष्ट झालं, जरा साईड हुन चेहरा दिसला मला, गालावर अश्रुंचे सुकलेले पाट दिसत होते, काहीतरी भयंकर होतं तिच्या मनात, मी हाका मारायचा प्रयत्न केला तिला, पण माझे शब्दच पोहचत नव्हते तिच्यापर्यँत, मला पळत जाऊन तिला थांबवावंसं वाटत होत मी काहीच करू शकत नव्हतो, असहाय्य झालो होतो आणि असह्य ही, चित्र अजून स्पष्ट झालं मला तिच्या जाणिवेतली कुजबुज ऐकू आली, कोणीतरी विश्वासघात केला होता तिचा, खूप कंटाळली होती जीवनाला…..

अहो थांबा थांबा….. असं करू नका, मोकळ्या डोंगरमाथ्यवर पोहचली होती ती…. दाट झाडी विरळ झाली होती, ती भ्रमिष्टासारखी डोंगरकड्याच्या दिशेने पावलं टाकत होती….. मी ओरडलो वाचावा तिला, ड्राइवर बस घ्या त्या वाटेवर….. तिला वाचावा….. फास्ट फास्ट अजून फास्ट ….. ती वाट दिसत होती पण आमची बस नव्हती त्या वाटेवर…….

काय करू मी? मी खूपच बैचैन झालो, बघत होतो पण काही करू शकत नव्हतो, चित्र स्पष्ट झालं अजून, तिचा पदर हवेत फडकताना बघितला आणि ती दिसेनाशी झाली, आता फक्त उजाड डोंगरमाथ्याचं चित्र दिसत होत बाकी काही नाही……

मी धावलो तिच्यामागे…… पण मी आहे तिकडेच होतो…… माझे डोळे सत्ताड उघडे पडलेले आणि प्राणहीन…… आणि बॅकग्राऊंडला त्या वायपरचा आवाज सटक-फटक, खटक-सटक आणि मोकळा डोंगरमाथा…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय