Psycho – चित्रातली ती….

ती माझ्या मनात ठसली पक्की, म्हणजे ठसण्यासारखीच होती, कातीव ठाशीव आणि भरीव असा तिचा बांधा आणि त्यापेक्षा आकर्षक हुकमी आव्हान देणारे तिचे डोळे माझ्या जाणिवेत पक्के रुजले आणि मी घरी आलो आणि ठरवलं हिलाच माउंटवर चितारायंच, माझ्या मनातलं तिचं चित्र…. माझ्या भावनांमधून उमटलेलं तिचं चित्र…. मला भावणारं माझ्या जवळचं…

मला चित्र काढायला एकांत लागतो खूप म्हणूनच मी माझ्या गावाबाहेरच्या छोट्याश्या बंगलीवजा घरात जाऊन चित्रात रमत असतो, सकाळीच घरातून निघाल्यावर ही समजली, स्वारी आता काही दोन दिवस घरी येणार नाही, कारण माझं चित्रकलेचं वेड तिला चांगलंच ठाऊक आहे…..

माउंटवर पहिला ब्रश ठेवला आणि का कोणास ठाऊक माझी जाणीव थरारली, असं काय वेगळं होतं त्यादिवशी कोणास ठाऊक, पण काहीतरी अचंबित घडणार आहे असं वाटायला लागलं पहिल्याच ब्रशच्या फटकाऱ्यात, मला तिला आठवायलाच लागत नव्हतं…. इतकी ती माझ्या जवळ जणू माझ्या अंतरंगात माझ्या ओळखीची झाली होती, मी फक्त तिला एकदाच बघितलं होतं. एसटी स्टॅण्डवर त्यादिवशी, उभी होती एकटी, आणि मी मोहीतच झालो, तिचा बांधा आणि तिचं रूप मी बघतच राहिलो, मलाच माझी लाज वाटली इतक्यावेळ तिच्याकडे मी एकटक बघत होतो म्हणून…..

तिचं लक्ष नव्हतं कदाचित, कशाततरी गुंग असल्यासारखी वाटत होती, म्हणजे कसल्यातरी विचारात, घाई घाईनी निघून गेली मागून तिच्या चालीकडे मी बघतच राहिलो…… गरीब वाटत होती पण निसर्गानी सौंदर्याचं देणं भरभरून दिलं होतं.

कदाचित माझी वासना किंचित माझ्या जाणिवेत डोकावत होती त्यावेळेस, मी मान झटकली आणि तिच्या केसांपासून सुरवात केली, तिचे दाट लांबसडक केस माझ्या डोळ्यासमोर आले माझा हात झटझट माऊण्टवरून फिरू लागला आणि मला तो सुगंध आला तिच्या केसांचा मी श्वास फुलवून तो गंध माझ्या श्वासात भरून घेतला…… तिच्या केसावरुन नजरच हटत नव्हती. माझा ब्रश जादू झाल्यासारखा फिरत होता जणू तो सुद्धा जिवंत झाला होता तिच्या चित्राला स्पर्श करण्याकरता. किती वेळ गेला कोणास ठाऊक पण बाहेर अंधार पडल्यासारखा वाटला.

येताना मी नेहमी डबा घेऊन येतो म्हणजे ही मला तशी सोय करून देत असते. मी थांबलो जरा. जरा दम घेतला आणि पाय मोकळे करून येऊया म्हणून जरा बाहेर आलो. शांत बसलो पायऱ्यांवर. सिगरेटचे चार कश मारले धूर छातीत भरून घेतला. सुस्कारा सोडून आत आलो परत, चित्रा समोर आलो, अरे…. मी चक्रावलोच, म्हणजे केसांचं वळण बदललं कसं काय तिच्या….. मी भांबावलो मी असं काढलं होत का? मी तिला आठवायला लागलो, म्हणजे मी बघितलं त्यावेळेस तिच्या केसांचं वळण, मी काढलेलं वळण आणि आताचं मी बघत असलेल वळण ह्यात जमीन अस्मानाचा फरक जाणवला मला, मी दचकलो….. बेसिन मध्ये जाऊन पाण्याचा शिपकर मारला तोंडावर.

असं कस झालं असावं? सकाळी पहाटेच उठलो आणि आलो स्टुडिओत, चित्र निर्जीव वाटत होतं. तिचा केसांचा भांग मी काढलेला तसाच वाटत होता, मी मनाची समजूत काढली कालचा नक्कीच भास असणार, मी परत रंग तयार केले आज चेहरा पूर्ण करायचा, कामाला लागलो अगदी तन्मयतेने, तिच्या चेहऱ्याची रेषा न् रेषा माझ्या जाणिवेत ठसलेली होती, मी हुबेहूब चेहरा काढला होता लांबून जाऊन बघितलं, माझ्यावरच खुश झालो, माझ्या पोट्रेटवर अनेक जण खुश असायचे, मला अभिमान आहे त्याचा, चला चेहरा तर झाला, मला तिचा बांधा आठवला आणि मनात चलबिचल झाली, ती आपली असायला हवी होती असे मनात विचार आले, मी चहा घेतला उशीर झाला होता, अंघोळ करून घेतली, मी परत थक्क झालो, चेहऱ्याचा कोन कसा काय बदलला? आव्हान देणारा चेहरा असा तिरस्कारयुक्त का वाटतोय? कालचाच प्रकार… मी बघतच राहिलो एकटक.

घरी जावंस वाटलं, मी चित्रावर पातळ कापड टाकून घरी निघून आलो. हिला सुद्धा आश्चर्य वाटलं. संध्याकाळी परत निघालो. आल्याआल्या आतुरतेने कापड काढलं, चित्र तसंच…. मी काढलेलं होतं तसं, पण एक फरक होता चित्रात, तिच्या चेहऱ्याच्या मागे धूसर चेहरा दिसत होता कोणाचा तरी, मी धसकलो मनातून, काहीतरी अघटित घडतंय हे जाणवलं, मी घाईघाईने पॅलेट आणि ब्रश घेतला रंग मिसळले आणि तिचा बांधा मला आवडणारा उतरवू लागलो माउंटवर. जणू तिच्या बांध्याचा तिच्या शरीराच्या प्रत्येक कणाकणांचा स्पर्श मला होत होता. जणू ते शरीर रोमांचित झाले होते माझ्या ब्रशच्या स्पर्शाने.

किती वेळ गेला समजलंच नाही रात्रीचे बारा वाजून गेले बहुतेक, माझ्या डोळ्यावर झापड आली जबरदस्त आणि मी तिकडेच आडवा झालो तिच्या समोर, रात्री कसल्या तरी आवाजाने जाग आली. कसली तरी चाहूल, मी उठलो घाई घाईत. असं कधी झालं नव्हतं. मी जरा घाबरलो…. दिवा लावला आणि मी थिजलोच तिथल्यातिथे…… जणू जाणीवा बधिर झाल्या सर्व. ते चित्र…. ते चित्र काहीतरी वेगळंच भासू लागलं मला…… तिच्या चेहऱ्यामागे असणारा चेहरा स्पष्ट जाणवू लागला होता म्हणजे दिसत होता एक साधारण चेहरा. सजीव चेहरा….. जणू माझ्याकडेच बघत होता मी नजर चोरली त्या चेहऱ्यापासून. हे कोणी काढलं? मी थरारलो. बाहेरच्या हॉल मध्ये येऊन बसलो…. काय करावं ते सुचत नव्हतं, तो चेहरा माझ्याकडे भयंकर नजरेनी बघत होता, तिचा कोण होता तो?

सकाळी हळूच मी आत आलो. माझं धैर्यच होत नव्हतं खरं तर…. आत मध्ये आलो. चित्र निर्जीव. काहीच नाही. मग रात्रीचा भास होता का? मी बघतच राहिलो, माझ्या कलाकृतीकडे आणि तिच्या शरीराकडे तिच्या उठावांकडे, खोलगटपणाकडे तिची कमनीय अंगकाठी माझ्या ब्रशच्या स्पर्शानी रोमांचित झालेली मला जाणवत होती.

डोळे, माझा जीव की प्राण, मी सावकाश कुशलतेने, माझ्या जाणिवेतले तिचे डोळे जिवंत केले आणि मी स्वतःवरच खुश झालो. माझ्या कडे जणू ती त्या आव्हनांनी बघत होती. तिच्या नजरेत ते आव्हान होतं. मी रोमांचित झालो. ती जणू समोर जिवंत झाली. मी चित्रावरून तिच्या शरीरावरुन हलकेच हात फिरवून पहिला. तिच्या डोळ्यात मला आनंद दिसला…. मी भान हरपून गेलो काय करतोय तेच मला समजत नव्हतं. इतक्यात झटका बसल्यासारखा मी त्या चित्रापासून लांब झालो.

परत तोच चेहरा तिच्या मागे विडी ओढणारा भेसूर पुरुष कोणीतरी माझ्याकडे खाऊ की गिळू ह्या नजरेने बघत होता. मी गांगरलो मला त्याची नजर सहन होत नव्हती. ती नजर चित्रातून जणू जिवंत होऊन बाहेर आली होती. मी स्टुडिओत जमिनीवरच पडलो होतो. ही कशी काय आली कोणास ठाऊक. हिला काहीच समजत नव्हतं. मी किंचाळत होतो असा निरोप एका गावकऱ्यानी हिला दिला.

मला उठवलं हिने आधार देऊन, चित्र झालं का? किती त्रास करून घेता ह्यापायी, जेवलात तरी का? का डबा तसाच ठेवलाय? मी उठता उठता तिच्या कडे म्हणजे चित्राकडे बघितलं, ती माझ्याकडे आव्हानात्मक नजरेनी बघत होती…… अजूनही


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय