चला, उंच उडुया! Do Fly

मित्रांनो, आपल्या आयुष्यात कसले ना कसले प्रॉब्लेम्स असतात, कोणाची मनासारखी कमाई होत नाही, कोणाला आरोग्याच्या तक्रारी असतात, कोणी नातेसंबंधाच्या गुंत्यात अडकलेला असतो, कोणी मुलांच्या भविष्याच्या चिंतेने त्रस्त असतात…. So Just Do Fly….

असे वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त झालेले लोक जेव्हा प्रश्न विचारतात, की तुमची भव्य दिव्य स्वप्नं ठिक आहे हो, आधी आमच्या समस्यामधुन आम्हाला मुक्त करा, मग लॉ ऑफ अट्रेक्शनचे प्रवचन द्या.

मित्रांनो, काही जणांचे प्रश्न, काही वेळा, खरोखर मला निरुत्तर करुन जातात, मला माहितीये, दुसर्‍यांना उपदेश देणे तितकेच सोपे असते, जितके प्रत्यक्ष परिस्थीती हाताळणे, आव्हानांना सामोरे जाणे अवघड असते.

पण मला हा ठाम विश्वासही असतो की, कठिणातल्या कठीण आणि जटीलातल्या जटील, जगातल्या एकोणएक, सगळ्या सगळ्या समस्यांवर मार्ग निघेल तो फक्त आणि फक्त पॉझीटीव्ह एटीट्युड ठेवुनच.

आपल्या ग्रुपमधल्या एका ताईंनी फोन करुन त्यांच्या समस्या शेअर केल्या. मी त्यांना एका शब्दातच उत्तर देईन. Do Fly! उंच उडा, बदतर परिस्थितीपासुन, धोके आणि त्रास देणार्‍या माणसांपासुन, परेशान करणार्‍या विचारांपासुन, उंच उडा….

माझ्यावर विश्वास ठेवा, हे सोपे आहे आणि तुम्ही हे करु शकता. Just Do Fly!

Do fly – ह्या पाच अक्षरांमध्ये सर्व समस्यांचे समाधान दडलेले आहे.

१) D – Divide and Rule

समजा, तुम्ही समस्यांच्या चक्रव्युहात अडकला आहात, तेव्हा तुम्ही गोंधळुन जाणं, तुम्हाला कमकुवत बनवतं. सर्वात आधी, समस्यांना कागदावर उतरवा, आणि एकेक समस्येचे उत्तर स्वतंत्रपणे शोधा, अनेक आघाड्यांवर लढताना दमछाक होते, पण शत्रुला एकेकटे खिंडीत गाठा आणि त्याला ठेचुन काढा.

उदा.
१) माझा जोडीदार माझी कसलीच काळजी करत नाही. घरातले सदस्य माझ्या कष्टांची किंमत करत नाहीत, जाण ठेवत नाहीत. माझी मुलं माझं ऐकत नाहीत.

त्याने मला काय फरक पडतो, कोणी माझ्यावर प्रेम करो की न करो, मी स्वतःवर प्रेम करण्यापासुन मला कोण रोखु शकेल? दुसरे कसे वागतील, यावर माझं नियंत्रण नाही, पण मी आनंदी राहु का दुःखी यावर माझं नियंत्रण नक्की आहे.

२) माझ्याजवळ पुरेसे पैसे नाहीत.

पण मला हे समजले ही खुप आनंदाची गोष्ट आहे, आता खुप पैसा मिळवण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झालेली आहे, ती तीव्र इच्छा माझ्यासाठी इंधन म्हणून काम करणार आहे, ज्यामुळे माझ्यात प्रचंड उर्जा निर्माण झालेली आहे, ज्याच्या बळावर मला हवी ती रक्कम मी आकर्षित करु शकतो.

२) O – One thing

आपला प्रॉब्लेम हा त्रासदायक नसतो, नको त्या वेळी नको ती गोष्ट आठवणे आणि आपण स्वतःला हेल्पलेस, आगतिक फील करतो, हा खरा प्रॉब्लेम आहे.

ह्यावर एक जालीम उपाय आहे. एका वेळी एकाच कामावर फोकस करा. कोणतही काम करताना शंभर टक्के एकाग्र होवुन काम करा.

उदा. खेळताना आपण एकाग्र होऊन नाही खेळलो तर आपण सहज हरतो, मित्रांनो, आयुष्याचंही असंचं आहे.

म्हणुन जेवताना फक्त जेवा, कामाच्या ठिकाणी फक्त काम करा, गाडी चालवताना फक्त गाडी चालवण्याचा आनंद घ्या, गाणी ऐकताना त्यात हरवुन जा, घरातल्यांशी बोलताना फक्त आणि फक्त हसीमजाक करा, वाचताना फक्त वाचा.

३) F – Feedback

रोजचा फिडबॅक घ्यायला विसरु नका, बंद डोळ्याने जी काही स्वप्ने पाहत आहात, त्या दिशेने तुम्ही आज पाऊल टाकलेत का? रोज रात्री, ह्या सगळ्या प्रश्नांवर स्वतःकडुन फीडबॅक घ्यायला विसरु नका.

दररोज झोपण्याआधी आजची जशीच्या तशी उजळणी आणि उद्याचे नियोजन माणसाला खुप लवकर खुप मोठ्या उंचीवर घेऊन जायला प्रचंड मदत करते.

४) L – Let it go

जाने भी दो यारो, टेंशन को मारो गोली!

का तीच ती जुनी दुखणी उगाळत बसायचं, का तीच ती रडगाणं गाऊन आयुष्य नासवुन घ्यायचं, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याची चर्चा करुन का शब्दांचे बुडबुडे सोडुन, ब्लडप्रेशर वाढवुन घ्यायचं. लेट गो,

अरे! मारो गोळी टेंशन को, चिल मारा, हसा, नाचा, गा, बागडा, कारण तुम्ही टेंशन घेऊन काही उखडु शकत नाहीत, पण आनंदी होण्याचं नाटक कराल, तर काही क्षणात तुम्हाला आनंदाचा झरा गवसेल.

५) Y – Yes, I can do it!

ज्या लोकांना लवकरात लवकर आपलं आयुष्य बदलायचं आहे, त्यांना मी वापरलेला एक हुकुमी उपाय सांगत आहे. ज्यामुळे माझं आयुष्य तीनशे साठ अंशाने बदललं, मला खात्री आहे, तुमचंही आयुष्य नक्की बदलेल.

आरशासमोर उभं रहा, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालुन एक मस्त स्माईल द्या, आरशातल्या व्यक्तिला एक फ्लाईंग किस द्या. स्वतःशी बोला.

“मी आनंदी आहे.”
“मी शक्तीशाली आहे.”
“मी श्रीमंत आहे.”
“मी निरोगी आहे.”
“मी मला हवे ते सर्व सहज प्राप्त करु शकतो.”
“मी कृतज्ञ आहे.”
“सगळे माझ्यावर प्रेम करतात, मी सर्वांवर प्रेम करतो.”

शेवटी स्वतःला मिठी मारायल्या, स्वतःलाच कुरवळायला, आणि स्वतःवर प्रेम करायला, अजिबात विसरु नका.

ही छोटीशी कृती तुमच्या आनंदात आणि आत्मविश्वासात चक्रवाढ व्याजाने भर टाकेल.

तुमच्या सगळ्या समस्यांचा तुम्ही पॉझीटीव्ह एटीटुयडने चुरा करुन फुंकुन उडवुन लावाल, अशा शुभेच्छांसह,

मनःपुर्वक आभार!

लेखक मोटिव्हेशन संदर्भात व्हाट्सअप वरती विविध कोर्सेस घेतात. त्यासाठी अभिप्रायातून त्यांना सम्पर्क करता येईल.

वाचण्यासारखे आणखी काही…..

आकर्षणाचा नियम काम करावा यासाठी जगण्याचं सुत्र!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय