गणपती बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया.

गणपती म्हणजे विद्येचा अधिपती. गणपती म्हणजे कलेची देवता. जगात अस्तित्वात असणाऱ्या एकूण १४ विद्या आणि ६४ कलांचा हा स्वामी म्हणजे गणपती.

संगीत, नृत्य, वादन याप्रमाणेच व्यवस्थापन व नियोजन या देखील कलाच आहेत. या कलांचा सुयोग्य वापर करुन आपण आपल्या नोकरी – व्यवसायात यशस्वी होत असतो. पण एक अतिशय महत्वाच असणारं नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन.

चला तर मग या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सणातून आणि गणपती बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया.

कालावधी :

गणपतीच्या सणाचा कालावधी ठरलेला असतो. सगळ्यांकडे जरी एकाच दिवशी गणरायांच आगमन होत असलं तरीही निर्गमन मात्र वेगवेगळ्या दिवशी असतं.

अगदी दीड दिवसांपासून ते ११ दिवसांपर्यंत असा हा कालावधी असतो. प्रत्येक व्यक्ती आवडीनुसार म्हणा किंवा ऐपतीनुसार हा कालावधी ठरवत असते.

आर्थिक नियोजनामध्येही कालावधी खूप महत्वाचा असतो. मग ती गुंतवणूक (Investment) असो वा कर्ज (loan) दोन्हीमध्येही कालावधी आधीच ठरलेला असतो.

शिस्तबद्धता:

हा सण आपल्याला शिस्तबद्धता शिकवतो. गणपतीच्या सणाच्या दिवसांत प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध होत असते.

अगदी गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेपासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम व प्रक्रिया आहे. आपण आपल्याही नकळत ही प्रक्रिया पूर्ण करत असतो. पूजा, नैवेद्य, आरती, प्रसाद अशा गोष्टी नेहमी क्रमानेच होत असतात.

आर्थिक नियोजन करतानाही जमा-खर्चाचा ताळेबंद लावणे खूप आवश्यक आहे. कारण याशिवाय आर्थिक नियोजन करताच येणार नाही.

यासाठी स्वतःला शिस्त लावून जमा-खर्चाचा हिशोब लिहिणे, अनावश्यक खर्च टाळणे अशा गोष्टी खूप आवश्यक आहेत.

टिमवर्क:

गणपतीचा सण हा नक्कीच एकट्याने साजरा केला जात नाही. यासाठी अगदी सजावटापासून विसर्जनापर्यंत कुटुंबातील सगळेजणच एकत्रीत मेहनत घेत असतात.

आर्थिक नियोजन करताना जर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रीतपणे मिळून केलं तर प्रत्येकाच्या ज्ञानाचा, अनुभवांचा फायदा संपूर्ण कुटुंबाला मिळू शकतो.

गणेशाची देहयष्टी व आर्थिक नियोजन:

आपल्या लाडक्या गणेशाच्या देहयष्टीचा अभ्यास केल्यावर त्यातून किती मोलाचा संदेश आपल्याला मिळतो हे सहज लक्षात येतं.

या संदेशाची आपल्या आर्थिक नियोजनाशी सांगड घातल्यावर, “आर्थिक नियोजन कशासाठी करायचं?” या प्रश्नाचं उत्तर मिळतं.

गजाननाचं मोठ डोकं:

यामध्ये या बुद्धीच्या देवतेकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे कितीही संकटे आली तरी हार मानू नका.

प्रत्येक गोष्टीला पर्याय असतोच. ज्याप्रमाणे गणेशाला हत्तीचं तोंड पर्यायी म्हणून बसविण्यात आले, त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन करताना जर काही अडचणी आल्या तर त्यालाही पर्याय उपलब्ध असतात. त्याचा विचार जरुर करावा.

उदाहरणार्थ मोठ्या गुंतवणूकीसाठी बाजूला पैसे काही कारणांमुळे खर्च करावे लागले तर त्याला पर्याय म्हणून एखादी छोटी गुंतवणूक करावी. अथवा म्युच्युअल फंड्स, शेअर्स यांचा पारंपारिक गुंतवणूकीला पर्याय म्हणून विचार करायला नक्कीच हरकत नाही.

फक्त योग्य ती काळजी घेऊन व तज्ञांच्या मार्गदर्शनानेच ही गुंतवणूक करावी. याशिवाय अनेकदा मोठ्या गुंतवणूकीतून मोठा फायदा मिळतो. परंतु त्यासाठी काही प्रमाणात धोका पत्करायची तयारी हवी. अर्थात धोका पत्करतानाही त्यामागे मोठा विचार, सखोल अभ्यास व नियोजन करणे गरजेचे आहे.

गणपती बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया.

गणपतीचे बारीक डोळे:

गुंतवणूक करताना सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करुनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

आपली गुंतवणूक करण्याची आर्थिक क्षमता तपासून ती निश्चित करुन त्यासाठी उपलब्ध असणारे सर्व पर्याय शोधणे, ही सुयोग्य गुंतवणूकीची पहिली पायरी आहे.

तसे करताना सर्वप्रकारे योग्य ती काळजी घेणे, त्यासंदर्भातील शासनाचे धोरण, कायदे, फॉर्ममधील नियम व अटी याचा बारकाईने अभ्यास करावा. उदाहरणार्थ विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड, इत्यादींबद्दल बोलायच तर त्यामध्ये काही नियम व अटी या संदिग्ध असतात.

तर काही वेळा काही नियम व अटी वरवर पहाता आपल्याला फारशा महत्वाच्या वाटत नाहीत.

प्रत्यक्षात जेव्हा या कंपन्यांमधून क्लेम नाकारला जातो तेव्हा या नियम व अटींचा बारीक अर्थ लक्षात येतो. पण तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते व गुंतवणूक फुकट गेलेली असते. त्यामुळे गुंतवणूक करताना ती प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करुनच करावी.

गणपतीचे मोठे कान:

गणपतीचे मोठ डोकं सांगतं मोठा विचार करा, बारीक डोकं सांगत बारकाईने अभास करा तर मोठे कान सांगतात लक्षपूर्वक ऐका.

याचाच अर्थ आपल्या आजूबाजूला, भोवताली घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवा.

अनेकदा निव्वळ आपल्या देशातच नाही तर जगात घडणाऱ्या अनेक घटनांचा परिणाम देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होत असतो.

अशावेळी आपल्या गुंतवणूकीवर होणारा परिणाम, गुंतवणूकीच्या संधी इत्यादीसाठी जगात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवल्यास भविष्यामध्ये ते फायद्याचं ठरेल यात शंकाच नाही.

त्यामुळे, ‘एकदा गुंतवणूक केली की काम झालं’ असा विचार करुन चालत नाही. तर त्याबद्दल नियमित माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

गजाननाची सोंड:

गजाननाची सोंड पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी ती स्विकारता आली पाहिजे.

त्याचप्रमाणे कधीकधी आर्थिक नियोजनाचं गणित बिघडतं व नुकसान सोसावं लागतं. परंतु त्याही परिस्थितीत जे आहे ते स्विकारुन यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येइल याचं नियोजन करण आवश्यक असतं.

त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीही शांतपणे व संयमाने हाताळली तर त्यातून लवकर बाहेर पडता येतं.

मोदक:

आता सर्वात शेवटी आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि गणेशालाही प्रीय असणारे ‘मोदक’. गणपतीची पूजा व आरती झाल्यावर प्रसाद म्हणून मिळणारे श्रींचे आवडते गोड मोदक न आवडणारं क्वचितच कोणी असेल.

परंतु हा गोड प्रसाद मिळविण्यासाठी पूजा व आरती होइपर्यंत थांबाव लागतं.

यातून पुरेशा संयमानंतर गोड फळ नक्की मिळतं ही शिकवण मिळते.

याचाच अर्थ झटपट परतावा मिळवून देणाऱ्या फसव्या गुंतवणूकीवर विश्वास न ठेवता योग्य त्या कालावधीत परंतु खात्रीशीर परतावा देणाऱ्या विश्वसनीय गुंतवणूकींचा पर्याय निवडल्यास परताव्याची गोड फळे नक्कीच मिळतील.

सौजन्य :www.arthasakshar.com


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय