एक भेट: लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा – अत्युच्च समाधान…

२०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेला हॉल, इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी चे सगळे विद्यार्थी अगदी शिस्तीने मांडी घालून बसलेले. लाईट नसल्याने सगळे पंखे जागेवर थांबलेले. घामाच्या धारा आणि अंगाची लाही होत असताना फक्त समोरचा वक्ता आपल्याला काहीतरी वेगळ सांगतो आहे म्हणून अगदी सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत ते सगळे ४०० डोळे आपल्याकडे एका विश्वासक, आश्चर्यचकित आणि कुठेतरी काहीतरी मनात शिरते आहे म्हणून आपल्याकडे तब्बल १ तासापेक्षा जास्त वेळ बघत असताना त्या संपूर्ण बाल श्रोत्यांना जागेवर खिळवून ठेवण्याच समाधान किती अविस्मरणीय असू शकते. ह्याचा अनुभव मी दोन दिवसांपूर्वी घेतला. बरं हे सगळं मुंबई / पुण्यात नाही तर अश्या एका दुर्गम ठिकाणी जो भाग अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे.

बाबा आमटे ह्यांच्या महारोगी सेवा समिती ह्या संस्थेने चालू केलेला लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा इथे. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे तसेच इथल्या अनेक लोकांच्या परिश्रमातून बाबा आमटेंनी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचं एका वटवृक्षात रुपांतर झालं आहे. आजही त्याच सेवाधार्मातून इथल्या आदिवासी समाजासाठी पूर्ण आमटे कुटुंब कार्यरत आहे. इथली आश्रम शाळा १९७६ पासून ज्ञान देण्याच कार्य इथल्या दुर्गम भागात करत आहे. ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी इथे शिक्षण घेत असून इथल्या विद्यार्थांनी प्रतिकूल परीस्थितीतून शैक्षणिक शेत्रात यशाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. नक्कीच ह्यामागे आमटे कुटुंबियांची निरंतर सेवा, इथल्या शिक्षकांची मेहनत आणि त्या विद्यार्थ्यांची शिकण्याची ओढ कारणीभूत आहे.

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा

अश्या एका सन्माननीय शाळेत आपल्याला बोलण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी एक पुरस्कार होता. आपण ज्यांना आदर्श मानतो अश्या व्यक्तीमत्वांच्या कार्यात आपण जोडले जाणे ही भावनाच माझ्यासाठी एक वेगळं समाधान होतं. विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेला हॉल २०० पेक्षा जास्ती विद्यार्थी त्यासोबत त्या शाळेचे मुख्याधापक आणि पूर्ण शिक्षक वर्ग समोर बसून आपण जे बोलत आहोत ते जागेवरून न हलता अगदी तल्लीन होऊन ऐकत राहतात तेव्हा १०२० की.मी पेक्षा जास्त अंतर कापून तिकडे जाण्याचं सार्थक फक्त दोन क्षणात होते. जेव्हा आपलं बोलून झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट कितीतरी वेळ तसाच सुरु राहतो आणि विज्ञाना सारख्या विषयावर ह्या बाळगोपाळांशी गप्पा मारताना त्यांच्या मनात विज्ञानाची ओढ निर्माण होते हे ह्या उपक्रमाचं फलित. कार्यक्रम संपल्यावर पण व्होयेजर १ कुठे गेलं? ते पृथ्वी सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणमुळे सूर्यावर जाऊन आपटत का नाही? अश्या प्रश्नांनी आपण त्या बालमनात पोहचल्याचं समाधान सगळ्यात जास्ती आहे

ह्या शाळेसाठी जवळपास १४० पुस्तक शाळेच्या ग्रंथालयासाठी देताना मिळालेलं समाधान शब्दात व्यक्त करू शकत नाही. लाखो रुपये भरून मार्कांच्या शर्यतीत आपला पाल्य किती हुशार हे दाखवण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या पालकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मुलांनी कमावलेल्या शैक्षणिक यशाची किंमत कळणार नाही. हुशार मुलांना कोणीही शिकवेल पण हेमलकसा सारख्या दुर्गम भागात जाऊन त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या शिक्षकांचा आदर मला थोडा जास्तच आहे. म्हणून अगदी साधेपणाने ज्ञान देण्याचं पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना माझा नमस्कार.

आपल्याला आदर्श असणाऱ्या व्यक्तींच्या कार्याशी जोडताना मिळालेला हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. ह्यासाठी अगदी कोणताही किंतु मनात न ठेवता आरती आमटे – मानकर हिने मला ह्यासाठी गाईड केलं. तर शाळेची पूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या समीक्षा गोडसे हिने मला तिकडे बोलण्याची संधी दिली. इकडे कसं जावं विचारात असताना माझ्या “तुझ्याशिवाय” ह्या पुस्तकाची सहलेखिका रीमा रोहन ने मला मदत केली. कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी अनिकेत आमटे आणि समीक्षा दोघांनीही वेळात वेळ काढून कार्यक्रम आणि माझ्याबद्दल जाणून घेतलं. ह्या शाळेचे मुख्याधापक विलास तळवेकर ह्यांनी शाळेच्या वेळापत्रकातून माझ्या कार्यक्रमासाठी शाळेचा वेळ दिला. त्यासोबत इकडे विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षिका ज्योती तळवेकर ह्यांनीही अगदी आवर्जून विज्ञानाच्या अनेक गोष्टींवर चर्चा केली. इथे राहणाऱ्या आश्रमशाळेतील मुलींसोबत ही संध्याकाळी मंदिरांच विज्ञान ह्या बद्दल चर्चा करण्याची संधी मला मिळाली. इकडे राहण्याची सगळी व्यवस्था सचिन मुक्कावार ह्यांनी नुसत्या फोनवरून केली. ह्या सगळ्यांचे मनापासून आभार.

हे सगळं करताना आपल्याला आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्वांची भेट होऊ शकली नाही ह्याच शल्य टोचत होतं. पण म्हणतात न जेव्हा तुमची इच्छाशक्ती उत्तुंग असते तेव्हा तो पण काहीतरी जुळवून आणतो. मुंबईला परतत असताना मुंबई हवाईतळावर डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे ह्यांची अनौपचारिक भेट झाली. अगदी १०-१५ मिनिटे त्यांच्याशी सविस्तर बोललो. मी आत्ताच हेमलकसा वरून मुंबईत परतत आहे असं सांगताच त्यांनी मी केलेल्या त्या छोट्या कार्यक्रमाची पूर्ण माहिती घेतली. माझी दोन्ही पुस्तके त्यांना भेट दिली. त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने माझ्या सारख्या एका साध्या माणसाची एकदम आपुलकीने चौकशी केली. पुन्हा हेमलकसा ला येण्याचं निमंत्रण ही त्यांनी दिलं.

फेसबुक च्या माध्यमातून लिहिताना सोप्प्या भाषेतून विज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी काहीतरी करावं हा विचार मनात सतत घोळत होता. फेसबुक पलीकडे एक विश्व आहे. समाजाच्या, विकासाच्या कोसो लांब असणाऱ्या ह्या विद्यार्थ्याच्या मनात विज्ञानाची गोडी उत्पन्न करणाच्या उद्देशाने आपण त्यांच्याशी हितगुज करण्याची इच्छा मनात होती. आज हे सगळं घडून आलं हा अनुभव माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. अजून पर्यंत ते क्षण मनात ताजे आहेत. ह्या भेटीने काय मिळालं असेल तर अत्युच्च समाधान.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय