अवकाशाची स्वप्नं प्रत्यक्षात जगणारी जळगावची अनिमा पाटील – साबळे

आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक स्वप्नं बघतो. त्यांचा पाठलाग करतो. पण सगळीच सत्यात येतात असं होत नाही. आपण थांबतो. वाटतं वय झालं, आता वेळ नाही, जमणार नाही, कोणी मदत करत नाही. पण ह्या पलीकडे स्वप्न बघून त्याचा पाठलाग करणारे थोडेच असतात. महाराष्ट्रातल्या जळगाव मधून एका छोट्या शाळेत शिक्षण घेताना ७ वर्षाच्या अनिमा ने अवकाशात भरारी घेण्याची स्वप्न बघितलं. एका पुस्तकांच्या प्रदर्शनात अमेरिका आणि रशिया च्या अवकाशयात्रीचे फोटो असलेलं एक पुस्तक हाताला लागलं आणि अनिमा ने ते बघताच आपल्या आयुष्याचं लक्ष्य ठरवलं. त्याच काळात भारताचे राकेश शर्मा रशियन रॉकेट मधून अवकाशात जाऊन आले होते. तेच अनिमा चा आदर्श ठरले. एक दिवस मी पण असाच सूट घालून ह्या अवकाशात विहार करेल असं अनिमाने नक्की केलं. सगळे नातेवाईक शिकून काय करणार? पुढे जाऊन तर लग्न करून संसार थाटायचा आहे असं बोलत असताना अनिमा ने आपल्या स्वप्नांची साथ सोडली नाही.

अवकाशाला गवसणी घालण्यासाठी गरज होती ती पायलट बनण्याची म्हणून अनिमा ने फायटर पायलट बनण्याचा निश्चय केला. त्याकाळी हे क्षेत्र महिलांना खुले नव्हतं तसेच अजून एक अडचण तिच्यासमोर होती ती म्हणजे स्त्री म्हणून नाही तर तिच्या डोळ्याचं व्हिजन हे २०-२० नव्हतं. अनिमा ची सगळी स्वप्नं एका क्षणात तुटली. पुढे काय करावं हे कळत नसताना घरच्या लोकांनी लग्नासाठी तयारी सुरु केली होती. वडिलांनी जळगाव सोडून दुसऱ्या शहरात जायला नकार दिला. पण तिच्या आईने आपल्या मुलीच्या पुढच्या शिक्षणासाठी तिला मदत केली. तरीही वडिलांनी अट घातली की एखादं चांगल स्थळ आलं तर लग्न करावं लागेल. अनिमा ने मास्टर इन कॉम्प्यूटर एप्लिकेशन मधून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. कॉलेज मध्ये तिला एक वर्ष सिनियर असणाऱ्या दिनेशला घरच्यांच्या संमतीने अनिमाने आपला जोडीदार म्हणून निवडलं.

लग्नानंतर अनिमा आणि दिनेश मुंबईत येऊन जॉब करू लागले. मुंबई मधून त्यांना अमेरिकेत जायची संधी मिळाली. मार्च २००० मध्ये अनिमा अमेरिकेत आल्यावर आपला सॉफ्टवेअर मधला जॉब करीत असताना अनिमा च्या मनात असलेलं स्वप्न तिला शांत झोप लागू देतं नव्हतं. आकाशाला गवसणी घालण्याचं जे स्वप्न तिने लहानपणी बघितलं ते कुठेतरी अजूनही सतत तिला अस्वस्थ करत होतं. आपल्या घराच्या जवळच नासाचं एक केंद्र तिला दिसलं आणि पुन्हा तिच्या स्वप्नाला नवीन धुमारे फुटले. आपला जॉब करत अनिमा ने एरोस्पेस इंजिनिअरींग ला प्रवेश घेतला. तेव्हा अनिमा ३ वर्षाच्या एका बाळाची आई झाली होती. कोणीही हे वाचताना अचंबित होईल की एक ३ वर्षाच्या मुलाची आई कॉलेजला जात होती. पण सकाळी ४ ला उठून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत अनिमाने आपलं शिक्षण पुन्हा सुरु केलं. कॉलेज चालू असताना तिने नासा आणि लॉकहिड मार्टिन मध्ये नोकरीसाठी अर्ज देणं सुरु ठेवलं होत. पण अमेरिकन नागरिक नसल्याने तिला तिकडे प्रवेश मिळाला नाही. पण तिने हार मानली नाही. तिच्या शब्दात

It is okay to go slow but giving up is never an option if you want to fulfill your dreams.

तिचं मास्टर होईपर्यंत अनिमा दुसऱ्या बाळाची आई झाली होती. एक आई, बायको, नोकरी करणारी स्त्री आणि एक विद्यार्थी अश्या सगळ्या भूमिकेतून वावरताना तिने आपलं शिक्षण चांगल्या मार्काने पूर्ण केलं. २०१० मध्ये तिचं शिक्षण संपल आणि तिने नासा मध्ये काम करण्यासाठी पुन्हा अर्ज करणं सुरु केलं. तिच्या प्रयत्नांना २०१२ मध्ये यश आलं जेव्हा नासा मधून केपलर मिशन साठी प्रिंसिपल इंजिनिअर म्हणून तिची निवड झाली. त्यावेळेस अनिमाला अमेरीकेचं नागरिकत्व ही मिळालं. अनिमा ने ह्या जॉब सोबत नासा आणि केपलर मिशन बद्दल माहिती सांगायला सुरवात केली. थोड्याच दिवसात अनिमा तिथल्या मुलींसाठी रोल मॉडेल ठरली. अनिमाची नासाच्या दोन एनेलॉग मिशनसाठी कमांडर म्हणून निवड झाली. चंद्र, मंगळ किंवा इतर कोणत्या ग्रहावर अंतराळवीर कसे राहतील? त्यांना कोणत्या अडचणी येतील ह्याच्या अभ्यासासाठी झालेल्या मिशन मध्ये अनिमाची निवड झाली होती.

NASA’s Human Exploration and Research Analog in 2015 and a Martian analog at the Mars Desert Research Station in 2018.

अश्या प्रकारच्या मोहिमेत समावेश होणे हे अंतराळवीर बनण्याच्या दृष्टीने पहिली पायरी मानली जाते. अनिमा ने नासा मध्ये काम करताना अगदी ६ जी पर्यंतच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला आहे. जो अंतराळवीर बनणाऱ्या लोकांसाठी गरजेचा मानला जाते. त्या प्रभावात काम अचूकपणे करता येण्यासाठी शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागत असतो. ह्या सर्वात अनिमा उत्तीर्ण झाली आहे. आपलं लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणाच्या दृष्टीने तिने अजून एक पाउल पुढे टाकलेलं आहे.

‘flying’ Anima’s Name-tag and Phone in Zero-Gravity🙃

अनिमा अंतराळात जेव्हा भरारी घेईल तेव्हा ती अंतराळात जाणारी जगातील पहिली मराठी स्त्री असेल. जळगाव सारख्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबातून असलेल्या अनिमा ने वयाच्या सातव्या वर्षी बघितलेल्या एका स्वप्नाचा पाठलाग सुरु ठेवला. घरच्यांचा विरोध पत्करून आपल्या आईच्या मदतीमुळे अनिमा ने आपलं शिक्षण पूर्ण केलं. नुसतचं पूर्ण केलं नाही तर ते पूर्ण झाल्यावर एक सामान्य कौटुंबिक आयुष्य जगताना पण त्या स्वप्नाची कास तिने सोडली नाही. वय झालं, वेळ निघून गेली असा विचार न करता आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे शक्य होईल ते अगदी प्रतिकूल परिस्थितीत ती करत गेली. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आपलं स्वप्न ही आपण जगू शकतो जे अनिमा ने भारतातील सगळ्याच स्त्रियांना आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिलं आहे. जेव्हा गोष्टी आपल्याला मनापासून करायच्या असतात तेव्हा काही अशक्य नाही हे अनिमा ने सिद्ध केलं. भारतातील एका छोट्या शहरातून एका मराठमोळ्या सामान्य कुटुंबातून पुढे येत आपल्या स्वप्नांचा पाठलाग जगातील अवकाश संशोधनात सर्वोच्च असणाऱ्या संस्थेत, जिकडे काम करणे हेच मुळी एक स्वप्न असते तिथे काम करून वयाच्या चाळीशीत आणि दोन मुलांची आई असूनपण आकाशात जाण्याची स्वप्न प्रत्यक्षात जगणाऱ्या दुर्गाशक्ती अनिमा पाटील- साबळे ह्यांना माझा दंडवत.

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “अवकाशाची स्वप्नं प्रत्यक्षात जगणारी जळगावची अनिमा पाटील – साबळे”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय