मॅराडोनाच्या खेळाला उतरती कळा केव्हा आणि का लागली?

आयुष्याची दोन टोकं अनुभवलेला हा देव प्रसिद्धी आणि यशाची हवा डोक्यात जाऊन वाईट संगतीला, व्यसनांना जवळ केल्यावर होणाऱ्या आपल्याच ऱ्हासाचं मूर्तिमंत उदाहरण ठरला. यापासून काय शिकायचं तर यश, पैसा मिळाला तरी पुढची वाटचाल करताना समतोल राखणं महत्त्वाचं.

फुटबॉल ह्या खेळाचा इतिहास लिहायचा झाला तर दोन टप्प्यात लिहावा लागेल. ३२ वर्षापूर्वी वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या इंग्लंड आणि अर्जेंटिना ह्यांच्या आधीचा इतिहास आणि दुसरा त्या नंतरचा इतिहास कारण ह्या सामन्याने फुटबॉल खेळाच्या इतिहासाची पानं पूर्णपणे बदलली ती पाच मिनिटाच्या खेळात.

जेव्हा पूर्ण जग हा सामना बघत होतं तेव्हा चांगलं – वाईट, सुंदर – घाणेरडा, अप्रतिम – फसवणूक अश्या सगळ्याच अनुभूती जगाने त्या काही मिनटांच्या खेळात अनुभवल्या.

ह्या अनुभूती जगाला करवून देणारा खेळाडू होता अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू डिएगो आर्मंडो मॅराडोना

मॅराडोना
फुटबॉल मैदानावर छोटा मॅराडोना

अर्जेंटिना चा हा सुपरस्टार खेळाडू आजही जगातील सगळ्या पत्रकार, ह्या खेळातील विशेषज्ञ तसेच त्याच्या समवयस्क आणि आत्ताच्या पिढीतील खेळाडूंकडून पण एक सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो.

फिफा च्या २० व्या शतकातील सर्वकालिक महान खेळाडूंमध्ये ब्राझील च्या पेले सोबत अर्जेंटिना च्या डिएगो आर्मंडो माराडोनाचं नाव घेतलं जातं.

मॅराडोना चं लक्ष्य, त्याचं खेळातील पदलालित्य, खेळाची जाण तसेच खेळताना इतर खेळाडूंना दिलेल्या संधी तसेच फुटबॉल वरील त्याचं नियंत्रण आणि त्याच्यावर असलेली त्याची पकड ह्या सगळ्या गोष्टी, जेमतेम ५ फुट ५ इंच उंचीचा माराडोना ज्या चपळतेने करायचा ते बघणं म्हणजे साक्षात देवाचा वरदहस्त लाभलेला खेळाडू बघणं.

त्याच्या कमी उंचीमुळे त्याचं सेंटर ऑफ ग्राव्हिटी कमी उंचीवर होतं ह्यामुळेच फुटबॉल च्या बॉल ला लिलया हाताळण्याचं त्याचं कसब इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा सर्वोत्तम होतं.

डिएगो आर्मंडो मॅराडोना चा जन्म ३० ऑक्टोबर १९६० ला अर्जेंटिनाच्या ब्युनेस आयर्सला झाला. अतिशय गरीब परीस्थितीत त्याचं बालपण गेलं.

त्याचे वडील हे साधे कामगार होते. तीन बहिणीनंतर झालेलं हे चौथ आपत्य त्या नंतरही दोन भावंड जन्माला आली.

पाच भावडांच्या अतिशय गरीब घरात जन्माला आलेला माराडोना एक दिवस आयुष्यात इतके पैसे आणि प्रसिद्धी कमावेल हे तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं.

पण नियतीच्या मनात वेगळं होतं. लहानपणीच वयाच्या तिसऱ्या वर्षी माराडोना ला त्याच्या भावाने फुटबॉल भेट दिला.

हा फुटबॉल म्हणजे मॅराडोना चा जीव की प्राण झाला तो शेवटपर्यंत. उठता, बसता ते रात्री झोपेत पण माराडोना त्यात रमलेला असायचा.

नीट व्यवस्थित धावण्या आगोदर माराडोना फुटबॉल सोबत अनेक क्लुपत्या करायला शिकला होता. वयाची ८ वर्ष होईपर्यंत माराडोना फुटबॉल खेळायला शिकला होता.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं माराडोनाचं फुटबॉल वरील नियंत्रण अर्जेंटिना च्या ज्युनिअर टीम च्या कोचच्या लक्षात आलं त्यांनी लगेच माराडोनाला टीम मध्ये संधी दिली.

त्या नंतर मॅराडोनाचं आयुष्य फुटबॉल ने बदललं ते कायमचं.

ह्या टीम ने १९७२ मध्ये सलग १४० गेम जिंकले आणि त्याच वर्षीचा ज्युनिअर किताब ही ह्याच टीमला मिळाला आणि ह्याचं सर्व श्रेय जाते ते माराडोना च्या जादुई फुटबॉल खेळण्याला.

ह्यासाठी माराडोनाला १० नंबरची जर्सी देण्यात आली जो नंबर फुटबॉल स्टार पेलेच्या जर्सीचा होता.

सगळ्यात कमी वयात मॅराडोना ने देशाच्या ज्युनिअर टीम मध्ये आपलं नाव जोडलं. १९८२ च्या वर्ल्ड कप मध्ये माराडोना फारशी चमक दाखवू शकला नाही.

पण त्याचा चाहतावर्ग वाढत होता. माराडोना च्या जादुई खेळाने सगळ्यांना भारावून टाकलं होतं. बार्सिलोना ह्या क्लब ने माराडोनाच्या क्लब सोबत खेळण्यासाठी प्रचंड असे ७.७ मिलियन अमेरिकन डॉलर मोजले.

फुटबॉल इतिहासातील हा एखाद्या खेळाडूसाठी केला जाणार सगळ्यात मोठा सौदा ठरला.

माराडोनाचं वय तेव्हा अवघं २१ वर्ष होतं. कमी वयात प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मॅराडोना ला मिळाली.

अतिशय गरिबीतून अचानक हाती लागलेला पैसा त्याच्यासोबत अनेक वाईट गोष्टीही घेऊन आला. ह्यातच मॅराडोना ने कोकेन ची चव चाखली आणि त्याचं व्यसनात रुपांतर व्हायला वेळ लागला नाही.

१९८६ चा वर्ल्ड कप माराडोनाला दैवत्व देऊन गेला.

वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या इंग्लंड आणि अर्जेंटिनाचा सामना संस्मरणीय ठरला तो माराडोना च्या दोन गोलमुळे.

ह्या स्पर्धेला इंग्लंड आणि अर्जेंटिना मध्ये झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे एकमकांचे उट्टे काढण्याचा चंग दोन्ही संघांनी बांधला होता.

पहिल्या गोलच्या वेळी माराडोना च्या हाताला लागून फुटबॉल इंग्लंडच्या जाळ्यात शिरला.

फुटबॉल ला हात लावणे हे खरे तर ह्या खेळात चूक मानली गेली आहे पण रेफ्री नी हा गोल अर्जेंटिनाला बहाल केला. त्यावेळी बोलताना माराडोना म्हणाला होता, “ह्या गोल मध्ये माझं थोडं डोकं आणि देवाचा थोडा हात आहे” म्हणून ह्या गोल ला “ह्यांड ऑफ गॉड” असं म्हंटल गेलं.

२२ ऑगस्ट २००५ ला माराडोना ने आपण मुद्दामून हा बॉल हाताने जाळ्यात ढकलल्याचा खुलासा केला. हा गोल फिफा च्या इतिहासातील सगळ्यात लाज वाटावी असा आणि नियमांची पायमल्ली केलेला गोल म्हणून प्रसिद्ध झाला.

ह्या नंतर मात्र ४ मिनिटांच्या अवधीत माराडोना ने जो गोल केला त्या गोल ला “गोल ऑफ द सेंच्युरी” हा किताब २००२ साली फिफा ने दिला.

माराडोना ला आपल्या बाजूमध्ये फुटबॉलचं नियंत्रण मिळालं.

त्याने एकट्याने ११ वेळा बॉलला स्पर्श करत इंग्लंड च्या पाच खेळाडूंना चकवत इंग्लंडच्या जाळीकडे धाव घेतली.

शेवटी त्यांचा गोलकीपर पीटर शिल्टन ह्याला चकवत माराडोनाने डाव्या पायाने मारलेला फुटबॉल जाळ्यात अडकला तेव्हा पूर्ण जगाने खेळाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोल बघितला होता.

म्हणूनच त्या काही मिनिटांच्या खेळामध्ये फुटबॉल खेळाचे अनेक नियम ते फुटबॉल खेळातील अजरामर गोल असं सगळच बदलून गेलं. म्हणून आज फुटबॉल चा इतिहास ह्या स्पर्धेच्या आधीचा आणि ह्या नंतरचा असा सांगितला जातो.

१९८२ नंतर माराडोनाचा खेळ बहरत असला तरी त्याचं व्यसन त्याला निराशेच्या गर्तेत ढकलत होतं.

त्याचा ‘स्व’ त्याच्या खेळापेक्षा मोठा होऊ लागला. माराडोना दिवसेंदिवस अतिशय उर्मट होऊ लागला. त्याच्या बार्सिलोना कल्बला ही त्याचे चटके बसायला लागले.

पण माराडोना ने त्याच्या बळावर बार्सिलोनाला त्या वर्षीच जेतेपद मिळवून दिलं. बार्सिलोना ने माराडोना ला १२ मिलियन अमेरिकन डॉलर ला नापोली क्लबला विकलं.

१९८८ पर्यंत माराडोना ने नापोली क्लब मधून खेळताना आपल्या खेळाचा करिष्मा दाखवून दिला. ह्या कल्बसाठी सर्वाधिक ११५ गोल त्याने केले.

पण माराडोनाचं व्यक्तिगत आयुष्य मात्र डळमळीत व्हायला लागलं होतं. कोकेनचं व्यसन त्याला आतून पोखरत होतं.

मॅराडोना
डोपिंग चाचणीत दोषी आढळेल मॅराडोना

१९९० च्या वर्षी माराडोना ने पुन्हा अर्जेंटिनाचं नेतृत्व वर्ल्ड कप मध्ये केलं पण आपल्या लौकिकाला साजेसा खेळ माराडोना करू शकला नाही.

एकेकाळी अशक्य वाटणारे गोल केलेला देव आज पेनल्टी किक वर साधे गोल करायला ही कमी पडू लागला.

अर्जेंटिना जर्मनी कडून ह्या वेळेस पराभूत झाली. माराडोनाला पराभवाला आणि चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं.

त्यातच माराडोनाची व्यसनाधिनता वाढत जात होती. त्याचे परिणाम आता दिसायला लागले होते. त्याचं वजन वाढत गेलं आणि चपळाई कमी होत गेली.

खेळाकडे दुर्लक्ष झालं. १७ मार्च १९९१ ला माराडोना उत्तेजकद्रव्य चाचणीत दोषी आढळला. कोकेनचे अंश त्याच्या रक्तात मिळाले. १५ महिन्यांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली.

एकेकाळी दैवत्व प्राप्त झालेला हा देव आता लोकांच्या नजरेतून उतरला होता. कोकेनला सोडण्यात माराडोना पुन्हा एकदा अपयशी ठरला.

१९९४ च्या वर्ल्ड कप मधील उत्तेजक द्रव्य चाचणीत माराडोना पुन्हा एकदा अपयशी ठरला. अस्ताला जात असलेलं वैभव माराडोनाला दिसत होतं.

चाहत्यांना ही एकेकाळी डोक्यावर घेतलेल्या खेळाडूची फुटबॉल खेळातून अशी पीछेहाट चटका लावून जात होती. पण नशेच्या आहारी गेलेला देव पाण्याखाली गेला तो कायमचा.

तिसऱ्यांदा माराडोना उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. ह्या नंतर मात्र वयाच्या ३६ वर्षी त्याने पुन्हा एकदा ह्या सगळ्यातून बाहेर येऊन फुटबॉल साठी कसून सराव केला पण तोवर कोकेन ने त्याच्या शरीराची आतून वाट लावली होती.

सगळ्याला कंटाळून माराडोना ने ऑक्टोबर १९९७ ला फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर केली.

एकेकाळी गरिबीची झळ सोसलेला डिएगो आर्मंडो मॅराडोना फुटबॉल चा सम्राट झाला. ज्या गोष्टींची स्वप्न कधी बघितली नव्हती त्या गोष्टी त्याच्या पायाशी लोळत होत्या पण अचानक मिळालेला पैसा आणि प्रसिद्धी ह्याचा ताळमेळ राखायला मात्र डिएगो आर्मंडो मॅराडोना हरला.

एकेकाळी देव असलेला हा स्टार फुटबॉलपटू त्याच्याच तेजात उध्वस्थ झाला. डिएगो आर्मंडो माराडोनाचं आयुष्य आपल्या प्रत्येकासाठी एक धडा आहे.

आयुष्याची दोन टोकं अनुभवलेला हा देव प्रसिद्धी आणि यशाची हवा डोक्यात जाऊन वाईट संगतीला, व्यसनांना जवळ केल्यावर होणाऱ्या आपल्याच ऱ्हासाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून नेहमीच लक्षात राहील.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय