पायावरून गेलेल्या रेल्वेला हरवून जिंकलेली अरुणिमा सिन्हा

बिली ओशन चं When going get’s tough, tough get’s going हे गाणं ऐकलं की अनेकदा मनात यायचं की असं कोणी असेल का? जेव्हा एवरेस्ट सर करणारी अरुणिमा सिन्हा पहिली अशी स्त्री बनली जिचा एखादा अवयव शरीरापासून विलग केला आहे तेव्हा मात्र असं कोणीतरी आहे ह्यावर नुसता विश्वास नाही तर तिच्याबद्दल अभिमान दुणावला.

अरुणिमा सिन्हाचं आयुष्य म्हणजे जिद्द, कर्तुत्व, पराक्रम, आशावाद, अशक्य कोटीतील स्वप्न बघून ती सत्यात अनुभवण्याची गाथा आहे. २१ मे २०१३ रोजी अरुणिमाने जगातील सर्वोच्च एवरेस्ट शिखर पार केलं आणि पूर्ण जगात ती एक अध्याय बनली. अरुणिमा ने आजवर एवरेस्ट (आशिया), किलीमंजारो (आफ्रिका), एल्ब्रस (युरोप), कोसीउस्झाको (ऑस्ट्रेलिया), एकोनगुवा (अर्जेंटिना), कारस्टेनझ पायरामिड (इंडोनेशिया) ही सहा शिखरं सर केली आहेत. नुकतीच तिने आपलं लक्ष्य ठरवलं आहे ते म्हणजे अंटार्कटिका येथील विन्सन मासेफ डोंगर रांगेतील माउंट विन्सन हे शिखर. ह्या साहसी मोहिमेवर ती सध्या मार्गक्रमण करत आहे.

विन्सन मासेफ ही २१ किलोमीटर लांब आणि १३ किमी रुंद असा प्रचंड डोंगररांग असून त्यावरील माउंट विन्सन हे सगळ्यात उंच शिखर अंटार्कटिका ह्या खंडामधील आहे. ह्याची उंची ४८९२ मीटर (१६,०५० फुट) असून हे शिखर दक्षिण ध्रुवापासून १२०० किमीवर आहे. अरुणिमा सिन्हा आपल्या सोबत भारताचा तिरंगा घेऊन गेली आहे. जेव्हा ती ह्या शिखराच्या टोकावर पोहचेल तेव्हा त्या टोकावर फडकवणार आहे. आजवर जगातील मोजक्या लोकांनी जगातील सात खंडातील सात शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. अरुणिमा सिन्हाचं स्वप्न तेच आहे. कोण आहे ही अरुणिमा सिन्हा जिच्या दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे जगातील सगळी आव्हान फिकी पडत आहेत.

अरुणिमा सिन्हा भारताच्या व्हॉलीबॉल संघातील एक खेळाडू होती. १२ एप्रिल २०११ ला पद्मावती एक्सप्रेस मधून लखनऊ मधून दिल्ली इकडे सी.आय.एस.एफ. च्या भरतीसाठी परीक्षा द्यायला जात असताना चोरांनी तिच्या अंगावरील सोन्याची चेन आणि बॅग हुसकावून घ्यायचा प्रयत्न केला. ह्या झटापटीत अरुणिमाला त्यांनी ट्रेन बाहेर ढकललं. अरुणिमा बाजूच्या रेल्वे रुळांवर पडली. तिकडून उठण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या ट्रेन खाली तिचा एक पाय सापडला. तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं पण तिला आपल्या एका पायाला मुकावं लागलं. तिला कृत्रिम पाय बसवला गेला. ह्यातून सावरते तोच पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिलाच अपराधी केलं. अरुणिमा ने ह्याला विरोध करत न्यायालयीन लढा दिला. अलाहाबाद हाय कोर्टाने पोलिसांची चौकशी दोषी ठरवताना अरुणिमा ला पाच लाखांची मदत देण्याचं रेल्वे प्रशासनाला सांगितलं. पण इकडे अरुणिमा ने आपल्या गेलेल्या पायाला आपली ढाल बनवलं. क्रिकेटर युवराज सिंग ने कंसर ला दिलेल्या लढ्यापासून स्फूर्ती घेत तिने आपल्या पुढे लक्ष ठेवलं ते म्हणजे जगातील सगळ्यात उंच शिखार माउंट एवरेस्ट वर आपल्या एका पायाशिवाय चढाई करण्याच.

तिला कोणाची दया नको होती. सहानभूती ने बघणारे डोळे नको होते तर जिद्दीने सन्मान करणारा आणि एक सामान्य स्त्री ला मिळणारा मान हवा होता. प्रवास सोप्पा नव्हता पण अरुणिमाच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नव्हता. नेहरू इन्स्टीट्युट ऑफ माउंटेनिअरिंग मधून उंच शिखर पार करण्यासाठी लागणारं प्रशिक्षण तिने घेतलं. हेंड्रिक पाल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने माउंट एवरेस्ट वर चढाई सुरु केली. १७ तासाच्या खडतर चढाईत असे अनेक क्षण आले की मोहीम आता सोडावी लागते असं वाटू लागलं. एका वेळेला तर तिला इतका घाम यायला लागला की आपला कृत्रिम पाय त्यामुळे निखळतो की काय असं वाटायला लागलं. पण अश्या परिस्थितीतही तिने चढाई सुरु ठेवली. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर

I would not have climbed Mount Everest if I had not met with the accident. Though I lost my leg in the incident, it made me much stronger. When I was going through a tough time, I remembered my mother’s words who told me that when on the edge, look behind and see how much you have climbed and you will realize that you are only one step away from your destination.

२१ मे २०१३ ला सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी तिने जगातील सगळ्यात उंच शिखरावर तिरंगा फडकावला. ह्या शिखरावर पोहचण्यासाठी तिने ५२ दिवस घेतले. एवरेस्ट च्या शिखरावर तिने त्याचे आभार मानताना काही शब्द एका कपड्यात गुंडाळून तिथल्या बर्फाखाली दबून ठेवले. त्यात तिने लिहिलं होतं

It was my tribute to Shankara Bhagawan and Swami Vivekananda who has been an inspiration throughout my life

तिच्या ह्या अभूतपूर्व पराक्रमासाठी भारत सरकारने तिला २०१५ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. ह्या शिवाय शिखर चढाई ह्या साहसी खेळासाठी देण्यात येणाऱ्या सर्वोच्च अश्या तेनसिंग नोर्गे पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आलं. ह्या नंतर ही अरुणिमा तिकडेच थांबली नाही. आपल्याला पुरस्कारातून मिळणारे सगळे पैसे तिने सामाजिक कार्यासाठी दान केले. तिने स्वतःची स्पोर्ट्स एकेडमी सुरु केली जिकडे दिव्यांग आणि गरिबांना फुकट प्रशिक्षण घेता येते. ह्या एकेडमी ला शहीद चंद्र शेखर विकलांग एकेडमी असं म्हंटल जाते. ह्याशिवाय तिच्या “Born again in the Mountain” ह्या पुस्तकाच प्रकाशन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी केलं आहे.

अरुणिमा चा हा प्रवास इकडे संपत नाही तर सुरूच आहे. दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःचा पाय गमावल्यावर रडत न बसता, सहानभूती ची आस न धरताही आयुष्याने आपल्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी दिली आहे असं मानून आपल्या शल्ल्याला तिने आपल्या स्वप्नात परावर्तीत केलं. त्या स्वप्नातील ध्येयाचा नुसता पाठलाग नाही केला तर ती ते जगली. सगळ्या जगाने जे अशक्य म्हंटल ते तिने करून दाखवलं. त्या नंतर त्या प्रसिद्धीची, त्या यशाची, त्या पैश्याची हवा आणि माज आपल्या डोक्यात जाऊ न देता आपल्या देशासाठी, समाजासाठी असलेल ऋण तिने आपल्या वागणुकीतून परत फेडलं असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. अरुणिमा सिन्हा म्हणजे दुर्गाशक्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. स्त्री काय करू शकते ह्याचा प्रत्यय अरुणिमा चं आयुष्य जवळून पाहिल्यावर पदोपदी येत राहतो. म्हणून म्हणतात न “When going get’s tough, tough get’s going” हे सार्थ करणारी अरुणिमा सिन्हा मला नेहमीच आदर्श आहे आणि राहील. तिच्या पुढील मोहिमेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. भारताचा तिरंगा पुन्हा एकदा माउंट विन्सन वर अरुणिमा जेव्हा फडकवेल तेव्हा १२० कोटी भारतियांच्या स्वप्नांना तिने बळ दिलेलं असेल. ऑल दी बेस्ट अरुणिमा……

विन्सन मासेफ ही २१ किलोमीटर लांब आणि १३ किमी रुंद असा प्रचंड डोंगररांग असून त्यावरील माउंट विन्सन हे सगळ्यात उंच शिखर अंटार्कटिका ह्या खंडामधील आहे. ह्याची उंची ४८९२ मीटर (१६,०५० फुट) असून हे शिखर दक्षिण ध्रुवापासून १२०० किमीवर आहे. अरुणिमा सिन्हा आपल्या सोबत भारताचा तिरंगा घेऊन गेली आहे. जेव्हा ती ह्या शिखराच्या टोकावर पोहचेल तेव्हा त्या टोकावर फडकवणार आहे. आजवर जगातील मोजक्या लोकांनी जगातील सात खंडातील सात शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. अरुणिमा सिन्हा च स्वप्न तेच आहे. कोण आहे ही अरुणिमा सिन्हा जिच्या दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे जगातील सगळी आव्हान फिकी पडत आहेत.

अरुणिमा सिन्हा भारताच्या व्हॉलीबॉल संघातील एक खेळाडू होती. १२ एप्रिल २०११ ला पद्मावती एक्सप्रेस मधून लखनऊ मधून दिल्ली इकडे सी.आय.एस.एफ. च्या भरतीसाठी परीक्षा द्यायला जात असताना चोरांनी तिच्या अंगावरील सोन्याची चेन आणि ब्याग हुसकावून घ्यायचा प्रयत्न केला. ह्या झटापटीत अरुणिमा ला त्यांनी ट्रेन बाहेर ढकललं. अरुणिमा बाजूच्या रेल्वे रुळांवर पडली. तिकडून उठण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या ट्रेन खाली तिचा एक पाय सापडला. तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं पण तिला आपल्या एका पायाला मुकावं लागलं. तिला कृत्रिम पाय बसवला गेला. ह्यातून सावरते तोच पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिलाच अपराधी केलं. अरुणिमा ने ह्याला विरोध करत न्यायालयीन लढा दिला. अलाहाबाद हाय कोर्टाने पोलिसांची चौकशी दोषी ठरवताना अरुणिमा ला पाच लाखांची मदत देण्याच रेल्वे प्रशासनाला सांगितलं. पण इकडे अरुणिमा ने आपल्या गेलेल्या पायाला आपली ढाल बनवलं. क्रिकेटर युवराज सिंग ने क्यांसर ला दिलेल्या लढ्यापासून स्फूर्ती घेत तिने आपल्या पुढे लक्ष ठेवलं ते म्हणजे जगातील सगळ्यात उंच शिखार माउंट एवरेस्ट वर आपल्या एका पायाशिवाय चढाई करण्याच.

तिला कोणाची दया नको होती. सहानभूती ने बघणारे डोळे नको होते तर जिद्दीने सन्मान करणारा आणि एक सामान्य स्त्री ला मिळणारा मान हवा होता. प्रवास सोप्पा नव्हता पण अरुणिमा च्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नव्हता. नेहरू इन्स्टीट्युट ऑफ माउंटेनिअरिंग मधून उंच शिखर पार करण्यासाठी लागणार प्रशिक्षण तिने घेतलं. हेंड्रिक पाल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने माउंट एवरेस्ट वर चढाई सुरु केली. १७ तासाच्या खडतर चढाईत असे अनेक क्षण आले की मोहीम आता सोडावी लागते असं वाटू लागलं. एका वेळेला तर तिला इतका घाम यायला लागला की आपला कृत्रिम पाय त्यामुळे निखळतो की काय अस वाटायला लागलं. पण अश्या परिस्थितीत ही तिने चढाई सुरु ठेवली. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर

I would not have climbed Mount Everest if I had not met with the accident. Though I lost my leg in the incident, it made me much stronger. When I was going through a tough time, I remembered my mother’s words who told me that when on the edge, look behind and see how much you have climbed and you will realize that you are only one step away from your destination.

२१ मे २०१३ ला सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी तिने जगातील सगळ्यात उंच शिखरावर तिरंगा फडकावला. ह्या शिखरावर पोहचण्यासाठी तिने ५२ दिवस घेतले. एवरेस्ट च्या शिखरावर तिने त्याचे आभार मानताना काही शब्द एका कपड्यात गुंडाळून तिथल्या बर्फाखाली दबून ठेवले. त्यात तिने लिहिलं होतं

It was my tribute to Shankara Bhagawan, and Swami Vivekananda who has been an inspiration throughout my life.

तिच्या ह्या अभूतपूर्व पराक्रमासाठी भारत सरकारने तिला २०१५ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. ह्या शिवाय शिखर चढाई ह्या साहसी खेळासाठी देण्यात येणाऱ्या सर्वोच्च अश्या तेनसिंग नोर्गे पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आलं. ह्या नंतर ही अरुणिमा तिकडेच थांबली नाही. आपल्याला पुरस्कारातून मिळणारे सगळे पैसे तिने सामाजिक कार्यासाठी दान केले. तिने स्वतःची स्पोर्ट्स एकेडमी सुरु केली जिकडे दिव्यांग आणि गरिबांना फुकट प्रशिक्षण घेता येते. ह्या एकेडमी ला शहीद चंद्र शेखर विकलांग एकेडमी असं म्हंटल जाते. ह्याशिवाय तिच्या “Born again in the Mountain” ह्या पुस्तकाच प्रकाशन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी केलं आहे.

अरुणिमा चा हा प्रवास इकडे संपत नाही तर सुरूच आहे. दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःचा पाय गमावल्यावर रडत न बसता, सहानभूती ची आस न धरता ही आयुष्याने आपल्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी दिली आहे अस मानून आपल्या शल्याला तिने आपल्या स्वप्नात परावर्तीत केलं. त्या स्वप्नातील ध्येयाचा नुसता पाठलाग नाही केला तर ती ते जगली. सगळ्या जगाने जे अशक्य म्हंटल ते तिने करून दाखवलं. त्या नंतर त्या प्रसिद्धीची, त्या यशाची, त्या पैश्याची हवा आणि माज आपल्या डोक्यात जाऊ न देता तिने आपल्या देशासाठी, समाजासाठी असलेल ऋण तिने आपल्या वागणुकीतून परत फेडलं अस म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. अरुणिमा सिन्हा म्हणजे दुर्गाशक्ती च मूर्तिमंत उदाहरण आहे. स्त्री काय करू शकते ह्याचा प्रत्यय अरुणिमा च आयुष्य जवळून पाहिल्यावर पदोपदी येत राहतो. म्हणून म्हणतात न “When going get’s tough, tough get’s going” हे सार्थ करणारी अरुणिमा सिन्हा मला नेहमीच आदर्श आहे आणि राहील. तिच्या पुढील मोहिमेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. भारताचा तिरंगा पुन्हा एकदा माउंट विन्सन वर अरुणिमा जेव्हा फडकवेल तेव्हा १२० कोटी भारतियांच्या स्वप्नांना तिने बळ दिलेलं असेल. ऑल दी बेस्ट अरुणिमा……
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय