वाचा हॉलीवुडचा कथाकार सिडने शेल्डन च्या आयुष्याची प्रेरणादायी कथा

खुप कमी, मोजकी पुस्तकं असतात, की हातात पडल्याक्षणी भुरळ घालतात, अंतर्मनाचा ठाव घेतात, कधी आपण त्या गोष्टीत एकरुप, अगदी गुंग होऊन जातो, कळतच नाही!

जणु आपण ते नुसतं पुस्तक वाचत नसतो, तर आपण त्या व्यक्तीचं आयुष्यच जगत असतो, अगदी असचं एक पुस्तक हाती आलं.

तो हॉलीवुडचा प्रख्यात कथाकार, पटकथाकार, होता.

अनेक यशस्वी नाटक, चित्रपट, लिहणारा सुप्रसिद्ध एक लेखक, निर्माता, दिग्दर्शक होता.

त्याने आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कादंबर्‍या लिहुन अक्षरशः जगाला वेड लावले,

आणि चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटाशी स्पर्धा असताना, त्याला सर्वोत्कृष्ट कथेसाठी ऑस्कर एवॉर्ड मिळाला,

त्याने बनवलेल्या टी. व्ही. सिरीअल्स लोकांनी डोक्यावर घेतल्या,

त्याने आपल्यासाठी लिहावे, म्हणुन मोठमोठ्या स्टुडीओ मालकांनी त्याच्या घरासमोर रांगा लावल्या,

लेखकांना अपमानास्पद वागणुक दिली जात होती त्या काळात ह्या माणसाने दर्जेदार पटकथेची ताकत जगाला दाखवुन दिली!..

गोष्ट सांगण्याची आणि लोकांना खिळवुन ठेवण्याची असामान्य शैली लाभलेला सिडने शेल्डन!

हॉलीवुडच्या चाहत्यांना आणि अमेरिकन इंग्लीश कादंबर्‍या वाचणार्‍यांना हे नाव परिचयाचं असेल.

‘द अदर साईड ऑफ मी’ नावाचं पुस्तक हे सिडने नी स्वतःच्या ओघवत्या भाषेत लिहलेलं, स्वतःचं आत्मकथन आहे.

हा प्रवास आहे, एका निराश आणि अपयशी मुलाचा!

आत्महत्या करणार्‍या, नैराश्याच्या गर्तेत भटकत असताना, प्रचंड दुःखाचे, अपमानाचे, डोंगर पचवुन हॉलीवुडला आणि अख्ख्या युरोप अमेरीकेला वेड लावणार्‍या एका कलंदर माणसाचा!

अगदी चित्रपटाला शोभेल, अशीच काहीशी थरारक, काहीशी प्रेरणादायी आणि प्रचंड उत्कंठावर्धक स्टोरी आहे सिडने शेल्डनच्या आयुष्याची!..

वर्ष १९३४! अमेरीका महामंदीची झळ सोसत आहे.

चौदा वर्षाचा हा पोरगा एका मेडीकल दुकानात हेल्पर आहे, आईवडील घटस्फोटाच्या उंबरठ्यावर, घरात सतत भांडणं आणि आर्थिक तंगी!

हा सतत अपयशी, कसलंही ध्येय नसलेला, लढण्याआधी हत्यार खाली टाकुन, शरण जाणारा, मुळात काही करण्याची, भव्यदिव्य जगण्याची इच्छाच नसलेला एक मुलगा!

एके दिवशी तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो, आणि झोपेच्या गोळ्या चोरतो, तो आत्महत्या करणार इतक्यात योगायोगाने त्याचे वडील त्याच्या बंद खोलीचे दार उघडतात आणि त्याच्यासोबत एका इव्हनिंग वॉकला जातात.

बोलता बोलता त्याच्या मनात स्वप्नाचं बीज पेरतात.

एका भव्य दिव्य स्वप्नाचं बीज! एक प्रचंड यशस्वी लेखक होण्याचं बीज!

योगायोगाने ते बीज त्याच्या मनात रुजतं, आईवडीलांना शिकागोला ठेऊन तो न्युयॉर्कला येतो.

ते स्वप्न उराशी बाळगत, अपयशाचे अपमानाचे कित्येक कटु आणि जहरी घोट गिळत राहतो.

लेखक बनण्यासाठी आलेल्या ह्या तरूणाला पहिला जॉब मिळतो, नाट्यगृहाच्या डोअरकिपरचा!

तो मनापासुन जीव तोडुन कथा लिहत राहतो,

निर्मात्यांकडे आणि स्टुडीओचे खेटे घालत राहतो

कोणीही त्याची दखल घेत नाही

हा खंबीर मनाने पदोपदी मिळालेले नकार पचवत राहतो,

निराश होत नाही, लिहित राहतो, लिहित राहतो, लिहित राहतो….

आणि तोपर्यंत लिहीत राहतो, जोपर्यंत नियती त्याच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडत नाही.

फक्त पाच वर्षात त्याची कमाई महीना चार डॉलर्सपासुन चार लाख डॉलर्सपर्यंत पोहचते.

जे निर्माते त्याला अपॉईंटमेंट नाकारतात, तेच सिडने शेल्डनला अपॉईंटमेंट मागु लागतात.

ज्या हॉटेलचे जेवणाचे बिल भरण्यासाठी सिडनेकडे पैसे नसतात, त्याच ‘हॉटेल सार्डी’मध्ये सिडनेच्या यशाच्या दिमाखदार पार्ट्या साजर्‍या होत्यात.

आपलं एकतरी नाटक लागावं अशी लाखो लोकांची इच्छा असते, त्या ब्रॉडवे थिएटरचा सिडने हमखास यशस्वी नाटकं लिहणारा, बेताज बादशहा बनतो.

रंकापासुन राव बनवणारा हा चित्तथररक प्रवास!

ह्यात अनेक वळणे आहेत,

सिडने शेल्डनला पाठीच्या मणक्याचं अतित्रासदायक, असह्य करणारं दुखणं आहे.

लिहण्यात ते कितीतरी वेळा व्यत्यय आणतं!..

त्याची नजर कमजोर आहे, म्हणुन त्याला सैन्यात भरती होता येत नाही.

आणि हे कमी म्हणुन की काय, सिडने कितीतरी वेळेस डिप्रेशनमध्ये जातो, इतका की कित्येकदा त्याला मानस-उपचार तज्ञाकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात.

पण प्रत्येक वेळी तो स्वतःला पुन्हा सावरण्यात यशस्वी होतो.

आयुष्याने दिलेल्या प्रत्येक धक्क्याचा वापर तो स्वतःला पैलु पाडण्यासाठी करतो, आणि म्हणुणच तो हिर्‍यासारखा झळकु लागतो.

ह्या प्रवासात काही लोकांनी सिडने शेल्डनची कसी टर उडवली, अपमान केला, आणि कसे फसवले ह्याचेही उल्लेख आहेत,

पण त्यापेक्षा जास्त या वाटेवर कितीतरी लोकांनी सिडनेला मदत केली, प्रेम दिले त्यांचे जास्त उल्लेख आहेत.

पेईंग गेस्ट म्हणुन राहत असताना जेवणाचे आणि भाड्याचे पैसे देऊ शकत नसताना, स्वतः अत्यंत अर्थिक अडचणीत असताना आग्रहाने खाऊ घालणारी आईसारखी ममता करणारी ग्रेस सेडेल!

आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करणारे, आणि आपल्या मुलामध्ये आत्मविश्वास भरणारे, सिडनेचे आईवडील नटाली आणि ओटो!

छोटा भाऊ रिचर्ड, सिडनेवर विश्वास दाखवणारा त्याचा पहिला जिवलग मित्र बेन रॉबर्ट्स, सिडनेला व्यावसायिक संधी देणारा डोअर श्कॅरी, सिडनेमधली प्रतिभा ओळखुन त्याला उत्तुंग उंचीवर पोहचवणारा कॅरी ग्रॅंट!

एक प्रकारे ही हॉलीवुडच्या चाळीस वर्षांची यशोगाथा आहे, ह्यात क्रमाक्रमाने अनेक पात्रे आपल्याला भेटत राहतात.

सिडनेच्या भाषेत, त्याच्या आयुष्याची लिफ्ट हिंदोळे घेत, खाली वर, वर खाली करत राहते, आणि….

तो रंगवुन रंगवुन सांगत असलेल्या गोष्टीचा नकळत आपणही भाग बनतो. त्यांच्या घडामोडीत आपणही भारवुन रंगुन जातो.

पुस्तक वाचुन संपतं, पण तो प्रभाव आणि सिडने शेल्डनच्या संघर्षाची नशा काही केल्या संपत नाही, ती तशीच मनात रेंगाळत राहते.

मनात खोलवर रुजुन बसते, प्रेरणा देत राहते,

सोबत आपल्या आतमध्येही एका जिद्दी सिडने शेल्डनला जन्म देते.

आणि हेच या पुस्तकाचे यश आहे.

धन्यवाद आणि मनःपुर्वक आभार!

सिडने शेल्डन आयुष्यावरील मराठी अनुवादित पुस्तक

वाचनकट्टा...
वाचनकट्टा प्रेरणादायक आत्मकथांचा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय