इनपुट – प्रोसेस – आउटपुट यावर चालणारं आपल्या मनाचं कम्प्युटर

मित्रांनो,

तुम्हाला माहितीये?

मन आणि कॉम्पूटर दोघांमध्ये खुप साम्ये आहेत. दोघेही प्रचंड शक्तीशाली आहेत, बुद्धीमान आहेत.

दोघांमध्ये अफाट स्मरणशक्ती आहे. तसेच कल्पनाशक्तीही आहे.

यांचा नीट वापर केल्यास प्रचंड सर्जनात्मक काम यांच्याकडुन काम करवुन घेता येते.

यांचा नीट वापर न केल्यास प्रचंड संहार आणि विध्वंसही घडवुन आणला जावु शकतो.

एवढचं नाही तर दोघांची कार्यपद्धतीही एकदम सेम टु सेम आहे.

जसं की कॉम्पुटरचा एखादा प्रोग्रॅम लिहताना तो असा लिहावा लागतो.


इनपुट – प्रोसेस – आउटपुट

अगदी असंचं माणसाच्या मनाचंही आहे,

कॉम्पूटर यंत्र असल्यामुळे आपलं काम चोख करतो, पण फारच थोडी माणसं आपलं डोक्यातल्या कॉम्पुटरचा नीट वापर करताना दिसतात.

आपल्या आजुबाजुला असे बरेचशे कॉम्पुटर बिघडलेले दिसतात.

गंमत म्हणुन त्यांच्यातले काही प्रकार सांगतो,


इनपुट वाईट, म्हणुन आउटपुट शुन्य

हे कॉम्पुटर तुम्हाला सदानकदा टी. व्ही समोर दिसतील, वेड्यावाकड्या संदर्भहीन बातम्या, वर्षानुवर्ष तिथल्यातिथे रेंगाळणार्‍या सिरीअली, हातात स्मार्टफोन मोबाईल असल्यास गेम्स, पॉर्न यांच्या जाळ्यात अडकुन पडतील.

काही कॉम्पुटर गावात राहणारे असतील तर चौकाचौकात पानपट्ट्यावर घोळका करुन एखाद्याची टर उडवताना दिसतील.

आपल्यापेक्षा पूढे गेलेल्या लोकांचा मनोमन द्वेष करताना दिसतील,

फेसबुक, सोशल मिडीयावर कट्टर कार्यकर्ते बनुन गरळ ओकताना दिसतील,

कधी हताश निराश होवुन स्वतःच्या नशीबाला कोसताना दिसतील,

मुळचे हे मॉडेल तल्लख बुद्धीचे आणि प्रचंड उर्जा असलेल्या कॉन्फीगरेशन असलेले होते.

पण योग्य इनपुट न मिळाल्याने यांच्या आयूष्याचे वाटोळे होते, आणि शेवटी यांना भंगारच्या दुकानात जावे लागते.


इनपुट नाही, प्रोसेस नाही, फक्त आऊट्पुट आहे.

 • म्हणजे मला सगळे काही माहित आहे, मला सगळे कळते,
 • हे कॉम्पूटर समोरच्याला नेमकं काय म्हणायचयं, हे समजुन घेण्याआधीच प्रतिक्रिया द्यायला उतावीळ असतात, इथेच त्यांचा घात होतो.
 • ह्यांच्या आजुबाजुला असलेले लोक ह्यांना आणि ह्यांच्या निरर्थक बडबडीला टाळु लागतात.

इनपुट आहे, पण आऊट्पुट नाही, कारण प्रोसेसर बिघडलाय.

 • हे कॉम्पूटर शांतपणे ऐकल्याचा आव आणतात, पण ऐकतात आणि सोडुन देतात!
 • विचारांना आपल्या आत खोलवार रुजु देत नाहीत, चिंतन नाही, मंथन नाही.
 • हे तसे निरुपद्रवी प्राणी असतात, पण आहेत तिथल्या तिथे घुटमळत राहतात, कसलीही भव्य स्वप्ने नसल्यामुळे कुठल्याही कामात स्वतःला झोकुन द्यायला यांना जमत नाही.
 • चौकटी मोडुन संघर्ष करण्याची यांना भीती असते.
 • एखादा चांगला प्रोग्रॅम यांचं आयुष्य बदलवण्यासाठी पुरेसा असतो.

व्हायरस, बग्ज आणि लॅग्ज यांच्यामुळे स्लो झालेले कॉम्पुटर

 • हे कॉम्पुटर पुर्णपणे व्यसनांच्या आहारी गेलेले असतात.
 • चहा, दारु, सिगरेट, सुपारी, अतिखाणे, अतिवासना, अतिबडबड, सोशलमिडीयाचा अतिवापर, अतिभांडण, निराशा ह्यापैकी कोणाताही एक व्हायरस, कोणत्याही चांगल्या आणि उत्तम सिस्टीमची वाट लावायला पुरेसा आणि सक्षम असतो.
 • ह्यावर फॉर्मॅटींग हाच एकमेव आणि जालीम उपाय शिल्लक राहतो.
 • ध्यान आणि अध्यात्मिकता हेच सर्वोत्कूष्ट फॉर्मॅटींग आहे.

उत्तम इनपुट, उत्तम प्रोसेस, अतिउत्तम आउट्पुट

 • हे तुम्ही आणि आम्ही!
 • उत्तम पुस्तके वाचतात, मनाची आणि शरीराची काळजी घेतात,
 • पेरलं तेच उगवतं हा आकर्षणाचा नियम ह्यांना माहित असतो.
 • नियमित प्रयत्नपुर्वक कृतीने जगाला थक्क करणार्‍या अचिव्हमेंटस करुन दाखवतात.
 • जिकडेतिकडे ह्यांचा बोलबाला असतो.

विनोदाचा भाग सोडा.

आपण ही नकळत आपल्या मनावर एक प्रोग्रॅमिंग करुन घेतलेली असते.

जसं की,

“मी हा असा आहे!”

“हे मी सहज करु शकतो.”

“नाही, हे मला जमण्यासारखं नाही, हे खुप अवघड आहे.”

“ही तर माझ्यासाठी अशक्य कोटीतील गोष्ट आहे.”

“ही माझी विकनेस आहे.”

“पॉझीटीव्ह विचारांचा परिणाम माझ्यावर थोडावेळ टिकतो, पुन्हा मी मुळपदावर येतो.”

“माझं ना, असं आहे, ‘कळतयं पण वळत नाही,’”

“मी प्लानिंग मोठमोठी करतो, शेवटी तोंडावर आपटतो.”

“मी आरंभशुर आहे. सुरुवात जोरदार करतो आणि शेवटी ढेपाळतो.”

वगैरे, वगैरे!

अजुन तुम्हाला हवी ती वाक्ये एड करा.

पण आनंदाची गोष्ट ही आहे की, हे म्हणणारे, स्वतःशी ठरवणारे खरे तुम्ही असे नाहीत.

त्या हत्तीच्या पायात बांधलेल्या साखळीसारख्या ह्या फक्त समजुती आहेत.

खरे तुम्ही तर वेगळेच आहात.

तुम्ही अनंत, अमर्याद आणि महाप्रचंड शक्तीचा स्त्रोत सोबत घेऊन जन्माला आला आहात.

त्या शक्तीला जागृत करा,

त्या शक्तीला अनुभवा,

शक्तीशाली असल्याचं नाटक करा,

आणि जग तुमच्यापुढे झुकत आहे, याचा तुम्हाला प्रत्यय येईल.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय