रॉबर्ट मॅनरी – स्वप्नांच्या सफारीवरचा खराखुरा खलाशी ! एक प्रेरणादायी कहाणी

तारीख – २४ मे १९६५

त्या दिवशी एक वेगळ्याच प्रकारची छोटीशी, पिटुकली, बोट फालमाऊथ ह्या ठिकाणी मॅसुच्युसेटस समुद्रकिनार्‍यावरुन इतर महाकाय बोटींच्या ताफ्यातुन निसटली आणि मोकळ्या समुद्रात घुसली.

त्या बोटीवर रॉबर्ट मॅनरी हा एकटाच होता.

कोण होता हा रॉबर्ट मॅनरी? आणि आपली लाकडाची रंगबेरंगी, पण विलक्षण देखणी बोट घेऊन तो कोणत्या प्रवासावर निघाला होता?

ह्या प्रवासावर निघण्यापुर्वी, रॉबर्ट मॅनरी हा तुमच्या आमच्यासारखाच एक सामान्य मनुष्य होता.

अठ्ठेचाळीस वर्षाचा रॉबर्ट एका साप्ताहीकाच्या कंपनीत उपसंपादक होता, जगाला एवढीच काय ती त्याची ओळख होती!

गेली दहा वर्ष, ‘द प्लेन डिलर’ च्या आपल्या ऑफीसमध्ये बसुन लेखांच्या प्रती तपासण्याच्या त्याच त्या कामाचा त्याला मनस्वी कंटाळा आला होता.

आयुष्यातला रस टिकवायचा असेल तर काहीतरी अचाट, अफाट आणि साहसी केले पाहीजे हे त्याने ठरवले, आणि नुसतेच ठरवले नाही, तर अगदी ठामपणे ठरविले.

एके दिवशी आपल्या चांगल्या पगाराच्या सुरक्षित नौकरीवर पाणी सोडुन तो बाजारात गेला,

त्या संध्याकाळी त्याने, सर्वप्रथम जलपर्यटन शास्त्रावरील एक पुस्तक खरेदी केले.

त्यासोबतच त्याने बोट बनवण्यासाठी लागणारे साहित्य, तारे बघुन अंतर आणि दिशा ठरवता येणारा कोनमापक असे साहित्य खरेदी केले.

साहित्य घेऊन तो आपल्या घराच्या समोर आला आणि डोअर बेल वाजवली, त्याची पत्नी व्हर्जिनीया, रोजच्याप्रमाणे त्याची वाट बघत होती.

ते साहित्य पाहुन तिने विचारले, “कुठे?”

तो गालातल्या गालात हसत म्हणाला,”इंग्लडला!”

तिला वाटले, तो मस्करी करत आहे, कारण अमेरीकेहुन इंग्लडला कोणी जेमतेम १३ फुट लांब असलेल्या बोटीने जाण्याचा विचार करेल का?

एका माणसाने, हाताने वल्हवत अमेरीका-इंग्लड हे अंतर पार करण्याचा विचार करणं, म्हणजे हा वेडेपणा ठरला असता.

पण तिला माहित नव्हते, की तिचा नवरा ह्या विचाराने वेडा झाला आहे.

आश्चर्याची गोष्ट हीच की, तिने जीवापाड प्रेम असलेल्या पतीला कसलाही विरोध केला नाही, उलट त्याला पुर्ण पाठिंबा दिला.

संपुर्ण अटलांटीक महासागर तो आपल्या पिटुकल्या बोटीने पार करणार होता.

आतापर्यंत असले धाडस कोणीही केले नव्हते, ज्यांनी केले ते अनुभव सांगायला शिल्लक राहीले नव्हते.

लोकांनी रॉबर्टला मुर्खात काढले, मित्रांनी, नातेवाईकांनी, हितचिंतकांनी नानाप्रकारे त्याचं मन वळवण्याच्या, त्याला हा प्रवास करण्यापासुन रोखण्याचा, परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

पण रॉबर्ट ठाम होता.

“मी हे करु शकतो, आणि मी हे करणारच!” त्याच्या डोळ्यात एक स्वप्न जन्म घेत होते.

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न या म्हणीप्रमाणे, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, पण रॉबर्टने माघार घेतली नाही. इतक्या दुरच्या प्रवासासाठी लागणारी सुबक, सुरेख बोट त्याला ओल्ड टाऊन कॅने कंपनीने बनवुन दिली.

त्या बोटीला रॉबर्टने टिंकरबेले नाव दिले.

आणि आपल्या ह्या लाडक्या बोटीसह चोवीस मे ह्या तारखेला रॉबर्ट आपल्या आयुष्यातल्या रोमांचकारी, अविस्मरणीय यात्रेवर निघाला.

त्याची पत्नी व्हर्जीनियाने त्याला जड मनाने निरोप दिला आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना केली.

इकडे रॉबर्टची सहल त्याच्या अपेक्षेपेक्षा आल्हाददयक आणि सुगम्य ठरली.

मोठमोठ्या मालवाहु जहाजांनी आपल्या छोट्याशा बोटीला धडक देऊ नये यासाठी त्याने कित्येक रात्री झोपेविना चिंताजनक अवस्थेत घालविल्या.

अनेक आठवडे बोटीवर राहील्याने अन्न बेचव लागु लागले.

सतत एकट्यानेच प्रवास केल्याने त्याला दृष्टीभ्रम होवु लागले. खरे काय आणि खोटे काय तेच कळेना.

तीन वेळा तर त्याचे सुकाणु मोडले, वारा नसल्याने त्याची बोट अनेकदा एका जागी अडकुन बसली.

समुद्राच्या तुफान वादळामुळे तो बोटीवरुन थेट पाण्यात पडायचा, आणि कमरेभोवती बांधलेल्या दोरीमुळेच केवळ पाण्यातुन आपल्या बोटीवर तो येऊ शकायचा.

एकाकी रात्री, त्या खवळलेल्या भयावह महासागरात, अगदी एकटा असताना, तो जेव्हा सुकाणुचा दांडा हातात धरुन उभा असायचा, तेव्हा त्याच्या मनात काय चाललेलं असायचं?

तो कल्पना करायचा, की तो इंग्लडच्या किनार्‍यावर पोहचला आहे, आणि त्याचे जंगी स्वागत होत आहे.

त्या जीवघेण्या प्रवासात तो मनाने एका चांगल्या हॉटेलात पोहोचलेला असायचा, आणि छानपैकी पोट भरुन रुचकर जेवणावर ताव मारायचा.

कल्पनाविश्वामध्येच त्याने ह्या साहसी सफारीवर एक पुस्तकही लिहले होते आणि असोसिएटेड प्रेस क्लबमधले सहकारी त्याचं कौतुक करत आहेत, अशी चित्र तो मनःपटलावर रंगवायचा.

आणि अष्ठ्याहत्तर दिवसांच्या प्रदिर्घ प्रवासानंतर तो दिवस उजडलाच,

फॉलमाऊथ टु फॉलमाऊथ ही जर्नी पुर्ण झाली.

टिंकरबेले इंग्लड्च्या फॉलमाऊथ बंदरावर पोहचली, पण तिथे असे दृश्य होते, जे रॉबर्टच्या स्वप्नांपेक्षा कितीतरी पट अधिक भव्य दिव्य आणि प्रचंड मोठे होते, ज्याची रॉबर्टने स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

टिंकरबेलेच्या स्वागतासाठी तिथे तीनशे नावा एकत्र आल्या होत्या, त्यांनी भोंगे वाजवुन रॉबर्टच्या साहसी प्रवासाला मानवंदना दिली.

एका साध्या हाताने वल्हवायच्या बोटीने एक माणुस अमेरीका इंग्लड हे अंतर पार करतोय, बघता बघता ही बातमी वार्‍यासारखी जगभर पसरली होती.

रॉबर्टचं स्वागत करायला तब्बल चाळीस हजार लोकांचा समुदाय जमला होता. जल्लोषात त्यांनी रॉबर्ट स्वागत केले.

अचानकच रॉबर्ट मॅनरी एक वीरपुरुष ठरला आणि त्याच्या साहसी प्रवासाची कहाणी जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली.

त्याला आनंदाने ह्या प्रवासावर जाण्यासाठी सहमती देणारी त्याची शुर पत्नी व्हर्जिनिया त्याच्या स्वागतासाठी विमानाने आली होती.

आपल्या पतीला त्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा, त्याचे स्वप्न साकार व्हावे, म्हणुन त्याला हवे तेवढे स्वातंत्र्य बहाल करण्याचे धैर्य तिच्याजवळ होते.

आपल्या ह्या अनोख्या सफारीतल्या अनुभवांवर रॉबर्ट मॅनरीने पुस्तक लिहले, टिंकरबेले!

जगावेगळं काहीतरी करुन दाखवणार्‍या लोकांच्या जगात हे पुस्तक अजरामर झाले आहे.

लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्वलायजेशन आणि करेज ह्यांनी खच्चुन भरलेली ही गोष्ट!

वेड्या माणसाची वेडी स्वप्नं, प्रत्यक्षात कशी येतात हे सांगणारी, एक चामत्कारिक गोष्ट!

आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, मग ती कितीही अशक्य कोटीतील असतील तरी पुर्ण होतील, हे ओरडुन ओरडून सांगणारी ही गोष्ट!

प्रवास कितीही जीवघेणा, कंटाळवाणा आणि भयंकर अवघड असला तरी वल्हवत रहा, वल्हवत रहा, म्हणजे ‘सेल ऑन’ ‘सेल ऑन’ असा संदेश देणारी ही खरीखुरी गोष्ट!

रॉबर्ट मॅनरीसारखं स्वप्नं पाहण्याचं धाडस तुमच्यामध्ये आहे का?

‘टिंकरबेले’ प्रमाणे तुमची अशी काही जगावेगळी, वेडी स्वप्नं आहेत का?

कमेंटबॉक्समध्ये लिहुन व्यक्त व्हा! मला तुम्हाला शुभेच्छा द्यायला आवडेल.

लेख आवडल्यास लाईक करायला विसरु नका.

तुमचा प्रत्येक शाबासकी माझा आत्मविश्वास वाढवते.

तुमच्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींना हा लेख वाचुन स्वप्नं पुर्ण करण्याची उर्जा मिळेल असा विश्वास असल्यास शेअर करा.

प्रबळ इच्छाशक्ती आणि परमेश्वराच्या आशिर्वादाने, तुमची सारी, अवघड आणि अशक्य वाटणारी स्वप्ने पुर्ण व्हावीत, अशा मनःपुर्वक शुभेच्छा!

मनःपुर्वक आभार आणि धन्यवाद!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “रॉबर्ट मॅनरी – स्वप्नांच्या सफारीवरचा खराखुरा खलाशी ! एक प्रेरणादायी कहाणी”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय