द सिक्रेट मध्ये सांगितलेला लॉ ऑफ अट्रॅक्शन; किती खरा? किती खोटा?

नमस्कार मित्रांनौ, कसे आहात सगळे?

मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे,

‘आपलं मानसशास्त्र’ नावाच्या माझ्या आवडत्या फेसबुक ग्रुपवर मी आकर्षणाच्या सिद्धांताविषयी अनेक लेख लिहले. त्यातला एका पोस्टवर मला एका अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेच्या कार्यकर्त्याने गाठले.

त्याने मला काही प्रश्न विचारले, आणि शंका उपस्थित केल्या, उत्तरे द्या नाहीतर पोस्ट डिलीट करा असे आव्हानही दिले. त्याचे प्रश्न काहीसे असे होते.

१. ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ खरचं ‘लॉ’ आहे का? मग तो सिद्ध करता येतो का?
२. फक्त वस्तुंची कल्पना केल्याने त्यांची निर्मीती करता येते का?
३. फक्त विचार करुन सगळे मिळत असेल, तर काम का करायचे?
४. तुम्ही हे थोतांड सांगुन लोकांना आळशी बनवत नाही का?

तसं बघितलं, तर त्याचे सारे प्रश्न आणि तर्क लॉजिकल होते. ‘आकर्षणाचा सिद्धांत’ ही टर्म खुप वादग्रस्त आहे.

त्याची काही कारणे अशी आहेत

• लॉ ऑफ अट्रॅक्शन फाटक्या माणसाला स्वप्ने दाखवतो.

• कल्पना केल्याने वस्तुंची निर्मीती करता येते का?

• विचारांमध्ये ताकत असेल तर प्रत्येक जण हवे ते, का आकर्षित करु शकत नाही?

• खरोखर विचारांनिशी बदल घडु लागले तर किती गोंधळ उडाला असता?

• लोकांनी विचार करुन करुन पेट्रोल, डिझेल, भाजीपाल्यांचे भाव नियंत्रित केले नसते का?

• आयातदार लोकांना रुपया वरचढ हवा, तर निर्यातदार लोकांना रुपया जास्तीत जास्त खाली पडलेला हवा, दोघांनी तीव्र इच्छा केल्या, तर मग कोणाचे खरे होईल?

• द सिक्रेट मध्ये सांगितलेला लॉ ऑफ अट्रॅक्शन खरा आहे का? का पुर्णपणे फेकाफेकी आहे? का पुस्तके, मुव्ही सुपरहीट करण्यासाठी वापरलेली चलाख खेळी आहे?

• लॉ ऑफ अट्रेक्शन वर प्रवचन देणारे, आपले यशाचे ढोल वाजवतात, मग ते हा सिद्धांत वापरुन मिळालेल्या प्रत्येक अपयशाबद्द्ल का बोलत नाहीत?

• गौतम बुद्ध म्हणतात, ‘इच्छा’ सर्व दुःखाचे मुळ आहे, मग आकर्षणाचा सिद्धांत तीव्र इच्छांना जन्म देऊन, दिवसेंदिवस, दुःखे वाढवतोय का?

• गीतेमध्ये भगवान सांगतात, ‘कर्म कर, फळाची इच्छा करु नकोस’ मग फळाच्या आसक्तीवर भर देणारा सिद्धांत, प्रत्यक्ष भगवंतनी गायलेल्या गीतेच्या विचारांना छेद देत नाही का?

आधी ‘द सिक्रेट’ वर मी माझं मत सांगतो

द सिक्रेट मध्ये जे सांगितलेलं आहे, Ask, Believe, Receipt ते खरं ही नाही, पुर्णपणे खोटंही नाही.

ते ‘अर्धसत्य’ आहे.

फक्त कल्पना करुन आयूष्याची वस्तुस्थिती बदलत नाही. ह्या साखळीमध्ये एक महत्वाचा शब्द मिसिंग आहे. Action!

अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर मला ‘लॉ ऑफ अट्रेक्शन’ चा एक नवाच अर्थ गवसला. हा नियम माणसाच्या मनात कळत नकळत चांगल्या ध्येयांची पेरणी करतो.

• प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात येण्याआधी कल्पनेत जन्म घेते.

• आकर्षणाचा नियम वापरुन आपल्या आयुष्याची ‘ब्लु प्रिंट’ बनवु शकतो. ती जितकी दर्जेदार, तितकी आयुष्याची इमारत भव्य, दिव्य, देखणी!

• ‘आकर्षणाचा सिद्धांत’ म्हणजे विचारांना आपल्या बाजुने वळवणं आहे.

• हा ‘लॉ’ माणसाला ‘आळशी’ बनवत नाही, उलट अधिक झपाटुन काम करण्यासाठी प्रेरणा देतो.

• हा ‘लॉ’ माणसाला स्वतःला, स्वतःशी स्पष्टपणे बोलायला शिकवतो.

• प्रत्येक अपयश ही प्रत्येक नवी संधी आहे.

• दुःख उगाळत बसण्यपेक्षा आम्हाला यश साजरे करायला आवडते, तर निराशवादी लोकांच्या पोटात का दुखावे?

• इच्छा पुर्ण झाल्या नाही तर हा लॉ मला दुःखी बनवत नाही, तर येणाऱ्या उद्यासाठी अधिक उत्साहाने, ‘प्रार्थना’ आणि ‘श्रद्धा’ करायला शिकवतो.

• गीता वाचणारा माणुस भगवंतावर अतूट विश्वास ठेवतो, आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनही ‘विश्वास’ ह्या एकाच अतिमहत्वाच्या शब्दावर टिकुन आहे. ही दोघांमधली समानता पुरेशी आहे.

• स्वामी विवेकानंदांच्या भाषेत, उतिष्ठ, जाग्रत, प्राप्यवरान निबोधत, म्हणजे, उठ, जागा हो, आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत स्वतःला झोकुन दे, हा प्रयत्नवाद मला प्रचंड आवडतो.

• निश्चित ध्येयाने, ‘आफलोदयकर्मणात’ म्हणजे इच्छित फळ मिळेपर्यंत, दृढपणे, काम करत रहा, असे सांगणारी आपली संस्कृती आहे.

सर्वात महत्वाचे हा लॉ माणसाला कृतज्ञ रहायला शिकवतो. आनंदी आणि उत्साही रहायच्या सोप्या कृती सांगतो.

भगवतगीतेमध्ये कृष्ण भगवान सांगतात, माझ्या भक्तांचा विनाश होत नाही! तसंच लॉ ऑफ अट्रेक्शनचा जीवंत आशावाद मला आवडतो.

ज्याला संशय आहे त्यांनी आक्षेप घेत रहावेत पण एक मात्र मला इतकं कळुन चुकलं आहे,

निराश होऊन, रडत पडत, नशीबाला दोष देत जगणाऱ्यांपेक्षा, ‘खोटा असेल तर खोटा’ पण ‘आशेचा किरण’ हृदयात बाळगत जगणारे आशावादी लोक हे त्या ‘निराशवादी’ आणि ‘संशयवादी’ लोकांपेक्षा माझ्या दृष्टीने करोडपटीने चांगले आहेत.

असे लोक जगाला हवेहवेसे वाटतात, असे लोक जगावर राज्य करतात.

आणि हे एक ओपन सिक्रेट आहे.

लॉ ऑफ अट्रेक्शनला तुमचा विरोध असेल तर तो का आहे, ते मला आवर्जुन सांगा.

आकर्षणाच्या सिद्धांतावर विश्वास असेल तर लाईक करा.

तुमचे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे अनुभव मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

लॉ ऑफ अट्रॅक्शन एक हजार एक टक्के खरा आहे, आणि तो योगायोग नाही, तुम्ही तो अनुभवला आहे, असे ठाम मत असल्यास अभिमानाने हा लेख आपल्या फेसबुक वॉलवर शेअर करा.

तुम्ही करत असलेल्या प्रेमाबद्द्ल मी तुमचा कायम ऋणी आहे.

धन्यवाद आणि शुभरात्री!

लेखक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोर्स घेतात अधिक माहितीसाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स एप नम्बर वर ‘LOA UPDATES’ असा मेसेज पाठवा.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप किंवाटेलिग्रामवर मिळवण्यासाठी८३०८२४७४८०या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप / टेलिग्राम मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय