सुभेदार दरवान सिंह नेगी ह्यांची शौर्यगाथा

भारतीय सैन्याचा पराक्रम हा फक्त भारतापुरता मर्यादित नाही. भारतीय सेनेच्या सैनिकांनी आपल्या पराक्रमांनी पूर्ण जगात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे.

काळाच्या ओघात आपल्याच सैनिकांचे पराक्रम आज सर्व भारतीय विसरले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून ब्रिटीश राजवटीसाठी भारतीय सैनिकांनी जागतिक युद्धात आपल्या पराक्रमाने, आपल्या जीवाची पर्वा न करता ब्रिटीशांसाठी आपल्या जिवाचं बलिदान दिलं आहे.

पहिल्या महायुद्धाला आज जवळपास १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. पहिल्या महायुद्धात जगातील अनेक सेनांनी भाग घेतला होता. ह्या युद्धात ब्रिटीश सैन्याच्या बाजूने लढलेल्या भारतीय रजीमेंट ज्यात गढवाल रेजिमेंटच्या पराक्रमाची गाथा आजही इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिली जाते.

ह्यातील १/३९ गढवाल रेजिमेंट चं नेतृत्व सुभेदार दरवान सिंह नेगी ह्यांनी केलं होतं. ज्यांच्या अतुलनीय साहस आणि पराक्रमापुढे जर्मन सेनेने नांगी टाकली. जी जर्मन सेना ब्रिटीश फौजांना पुरून उरत होती त्या जर्मन सेनेला एका रात्रीत नमोहरम करण्याचा भिमपराक्रम त्यांनी फ्रांस मध्ये केला.

त्यांच्या ह्या अतुलनीय पराक्रमाने ब्रिटीश अधिकारी इतके स्तिमित झाले की तत्कालीन किंग जॉर्ज पंचम ह्यांनी युद्धभूमीवर जाऊन सुभेदार दरवान सिंह नेगी ह्यांना ब्रिटीश साम्राज्यात देण्यात येणारा सर्वोच्च सैनिकी पुरस्कार ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ प्रदान केला.

त्यांना झालेला आनंद इतका मोठा होता की पुरस्काराची घोषणा होण्याच्या दोन दिवस आधी त्यांना तो प्रदान करण्यात आला. ब्रिटीश साम्राज्याचा सर्वोच्च असा ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ सैनिकी पुरस्कार मिळवणारे सुभेदार दरवान सिंह नेगी हे पहिले भारतीय सैनिक आहेत.

सुभेदार दरवान सिंग नेगी ह्यांचा जन्म १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात उत्तराखंड राज्याच्या चमोली जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. शेतीत उदरनिर्वाह कठीण असल्यामुळे त्यांनी तत्कालीन ब्रिटीश सेनेत जायचा निर्णय घेतला.

वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी फर्स्ट बटालियन ३९ गढवाल रायफल मधून सैन्यात प्रवेश घेतला. जेव्हा पहिलं महायुद्ध सुरु झालं तेव्हा त्यांच्या रजीमेंट ला युरोपात ब्रिटीश सेनेकडून लढण्यासाठी नियुक्त केलं गेलं. ऑक्टोबर १९१४ ला जेव्हा सैनिक फ्रांस मध्ये पोहचले तेव्हा त्यांना भीषण थंडीचा सामना करावा लागला.

१/३९ आणि २/४९ ह्या गढवाल रायफल्स च्या रेजिमेंट ना फ्रांस मधील फ्रेसट्युबर्ट इथे जर्मन सेनेनी अडवून ठेवलेला भूभाग मोकळा करण्याची जबादारी दिली गेली. जर्मन सेनेमुळे ब्रिटीश सेनांना आपापसात ताळमेळ ठेवणं कठीण झालं होतं.

नायक दरवान सिंह नेगी ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी २३ – २४ नोव्हेंबर च्या मध्यरात्री जर्मन सेनेवर हल्ला केला. ज्या जर्मन सेनेला हुसकावून लावणं कित्येक दिवस कठीण जातं होतं त्या जर्मन सेनेला अवघ्या एका रात्रीत भारतीय सेनेनी धूळ चारली. सकाळ होण्याच्या आत जर्मन सेनेने त्या भागातून काढता पाय घेतला.

ह्या लढाईत नायक दरवान सिंह नेगी ह्यांनी जखमी अवस्थेत ही आपल्या सैनिकांचं नेतृत्व करत अशक्य वाटणारा विजय शक्य केला. किंग जॉर्ज पंचम ह्यांनी युद्धभूमीवर जाऊन पाच डिसेंबर १९१४ ला ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा सर्वोच्च ब्रिटीश सैनिकी पुरस्कार नायक दरवान सिंह नेगी ह्यांना प्रदान केला. नायक दरवान सिंह नेगी ह्यांच्या भिमपराक्रमा बद्दल ब्रिटीश गेझेट मध्ये लिहिलं आहे….

His Majesty the KING-EMPEROR has been graciously pleased to approve of the grant of the Victoria Cross to the undermentioned soldier of the Indian Army for conspicuous bravery whilst serving with the Indian Army Corps, British Expeditionary Force: —

1909, Naik Darwan Sing Negi, 1st Battalion, 39th Garhwal Rifles.

For great gallantry on the night of the 23rd–24th November, near Festubert, France, when the regiment was engaged in retaking and clearing the enemy out of our trenches, and, although wounded in two places in the head, and also in the arm, being one of the first to push around each successive traverse, in the face of severe fire from bombs and rifles at the closest range.

London Gazette, 7 December 1914

नायक दरवान सिंह नेगी ह्यांच्या पराक्रमाने ब्रिटीश अधिकारी इतके आनंदित झाले होते की त्यांनी नायक दरवान सिंह नेगी ह्यांना जे पाहिजे ते मागण्याची संधी दिली.

तेव्हा आपल्यासाठी पूर्ण एषोआरामाचं आयुष्य मागण्याची संधी असताना नायक दरवान सिंह नेगी ह्यांनी कर्णप्रयाग इकडे एक इंग्रजी शाळा उघडण्याची तसेच कर्णप्रयाग ते ऋषिकेश अशी रेल्वे उभारण्याची इंग्रज सरकारला विनंती केली.

त्यांच्या ह्या विनंतीचा मान ठेवत इंग्रज सरकारने प्रयाग मिडल शाळेची स्थापना केली ज्याला आज ‘वीरचक्र दरवान सिंह राजकीय इंटरमिडीयेट कॉलेज’ ह्या नावाने ओळखले जाते. १९१८ ते १९२४ पर्यंत इंग्रज सरकारने रेल्वे साठी पण प्रयत्न केले. पण हा प्रोजेक्ट जागेच्या अभावी पूर्ण होऊ शकला नाही. युद्धानंतर त्यांची बढती सुभेदार ह्या पदावर झाली होती.

सुभेदार दरवान सिंह नेगी
त्यांचे चिरंजीव बी.एस.नेगी ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ दाखवताना

आपल्या वडिलांच्या पावलावर पाउल ठेवत आज सुभेदार दरवान सिंह नेगी ह्यांची तिसरी पिढी भारतीय सेनेत कार्यरत आहे. त्यांचे चिरंजीव बी.एस.नेगी ह्यांनी १९६४ मध्ये भारतीय सेनेच्या गढवाल रायफल्स मधून भारतीय सेनेत प्रवेश केला कर्नल पदावरून ते निवृत्त झाले.

तर आज नायक दरवान सिंह नेगी ह्यांचे नातू कर्नल नितीन नेगी १९९४ पासून भारतीय सेनेच्या गढवाल रेजिमेंट मध्ये आपल्या देशाच्या सुरक्षितेसाठी भारतीय सेनेत कार्यरत आहेत. सुभेदार दरवान सिंह नेगी ह्यांची शौर्यगाथा आज काळाच्या ओघात भारतीय विसरले आहेत.

भारतीय सेनेत दाखल होणारा प्रत्येकजण धर्म, जात, उपजात ह्या सगळ्या पलीकडे भारतीय सेनेचा एक शूरवीर सैनिक असतो. आपल्या देशाची रक्षा, आपल्या सेनेंचा मान सन्मान उंचावर नेण्यासाठी प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती द्यायला तो मागे पुढे बघत नाही. मग तो प्रांत भारत असो वा फ्रांस.

आज त्याच भारतीय सेनेच राजकारण करून त्यात प्रवेश घेणाऱ्या सैनिकाची जात, धर्म विचारून आपण त्या शूरवीर सैनिकांचं कुठेतरी खच्चीकरण करत आहोत ह्याची जाणीव राजकारणी आणि प्रत्येक भारतीयाने ठेवायला हवी. निदान त्यांचं कर्तुत्व गाठण्याची आपली उंची नसेल तर ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असं करत आपल्या शब्दांनी ह्या थोर, पराक्रमी सैनिकांची, त्यांच्या पराक्रमची उंची तरी कमी करू नये ही एक अपेक्षा.

आज काळाच्या पडद्याआड गेलेल्या सुभेदार दरवान सिंह नेगी ह्यांनी आपल्या कर्तुत्वाने जी उंची गाठली तिला तोड नाही. त्यांच्या ह्या पराक्रमापुढे मी नतमस्तक. त्यांना माझा कडक सॅल्युट.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “सुभेदार दरवान सिंह नेगी ह्यांची शौर्यगाथा”

 1. Dear Mr Vinit Vartak,

  You have given historical references but these are factually incorrect. Sepoy Khudadat Khan and Naik Darwan Singh Negi were awarded Victoria Cross on the same day. However, if you refer to the page of Naik Darwan Singh Negi, it says:

  He was awarded the medal on the same day as Khudadad Khan VC, but the latter’s VC action was of earlier date so that he is regarded as the first Indian recipient. You may refer to the following:

  Link of the Wikipedia page of Sepoy Khudadat Khan: – https://en.wikipedia.org/wiki/Khudadad_Khan

  Link of the Wikipedia page of Naik Darwan Singh Negi: – https://en.wikipedia.org/wiki/Darwan_Singh_Negi

  Thanks,

  Dinesh Divekar
  +91-9900155394

  Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय