वेळीच ओळखा मानसिक आजार

सामाजिक जीवनात वावरत असताना सामाजिक प्रश्नाच्या बाबतीत विचार केला असता, समाजाचं शारीरिक आरोग्यापेक्षा मानसिक आरोग्य जास्त बिघडलेलं दिसतं. बहुतांश व्यक्ती मानसिक आजाराने पछाडलेला आहेत. जगात मानसिक आजारास आजार म्हणून मान्यता आहे. भारतातील बहुतांश व्यक्ती हा आजार लपवताना पावला पावलाला दिसतात.

हे मात्र मला भारतीय मनाचं मानसिक मागासलेपण वाटतं. मानसिक आजारातून उद्भवलेल्या आजारासाठी तो जनरल फिजिशीयनकडे जातो पण प्रथम तो मानसोपचार तज्ज्ञाकडे जात नाही. तो मानसिक आजार म्हणजे वेडेपणाचा किंवा पागलपणाचा आजार असे समजतो. खरंच समाज मला पागल म्हणेल म्हणून तो तसाच मानसिक आजार ग्रस्थ राहतो. मग शेवटी समाजातून ऐकावे लागते ह्या व्यक्तीस वेड्याच्या इस्पितळात जबरीने दाखल करण्यात आले किंवा करावे लागले.

मी दोन वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुशंगाने घेतलेला परामर्श. त्या प्रश्नांना प्रतिक्रिया, प्रतिसाद सहसंबंधात्मक निर्णयापर्यंत नेऊन पोहोचवतो. ते दोन्ही प्रश्न सह संबंध दर्शवणारे आहेत. दोहोचा मतितार्थ-

१] मानसिक आजार हा मनाचा आजार मग त्यात सामाजाचा वाटा किती?

२]मानसिक आजार कमी करण्यासाठी कार्यमग्न राहणे हा एक मार्ग होऊ शकतो का? ”

मानसिक आजार हा मनाचा आजार. मन आणि मनोव्यापार यात मनोवृत्ती दडलेली असते याचं इप्सित हे संस्कार व भूतकाळातील जीवन ह्यात पेरलेलं किंवा दडलेलं असतं. लहानपणी जे संस्कार मनावर पेरलेले किंवा परिसर निरिक्षणातून मनावर कोरलेले असतात ते मानसिक आजारास आमंत्रण देतात किंवा कशाही परिस्थितीत कणखर राहाण्याचे बळ देतात.

मन चंचल आहे. त्यास ज्या पद्धतीने हवा दिली जाते व ते हलते. हवा नेहमी देत राहिल्याने ते चांगल्या किंवा वाईट मार्गात प्रवाहित होत राहाते. मग बालमनावर कौटुंबिक पकड कमी झाली की मित्र किंवा समाजिक घटकांचा पगडा वाढू लागतो. वाईट गोष्टींकडे कल निर्माण झाला की तो वाटेवर येणे अवघड जाते. वाईट गोष्टीचे परिणाम घरापर्यंत पोहचले की आई वडील जागृत होतात. त्यावेळेस सुधारण्यासाठी वेगवेगळे हतखंडे वापरतात. तोपर्यंत गाडी तर रुळावरून खाली घसरलेली असते. यामध्ये आई, वडील आणि मुल यांचे मानसिक आरोग्य बिघडतं. ही खरी सुरुवात आहे. यात समाजाचा वाटा आहे पण आपली चुक ही त्यापेक्षा मोठी आहे.

कधीकधी आई वडील यांनी मुलांच्यावर लादलेले अपेक्षेचे ओझे त्याने पूर्ण नकरणे. त्यास त्याविषयी नेहमी टोमने मारणे, त्यामुळे तो त्या मानसिक आजारचा बळी पडू शकतो. नापास विद्यार्थ्यांवर मित्र व समाज यांच्याकडून नेहमी अपयशाचे टोमने त्यातून आत्मविश्वास ढासाळतो व मानसिक आजार जडतो. त्या वयात त्यास या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी तेवढी मनाची वैचारिकता नसते. येथे मार्गदर्शनाची गरज असते. हे सामाजिक टोमने म्हणजे समाजाची अनियंत्रित शक्ती त्यास कोणताच आत्मिक चेहरामोहरा नसतो. सामाजिक दुर्गुण असला तरी यातून मार्ग काढण्यासाठीचे संस्कार त्यांच्या ठायी पेरणे गरजेचे होते.

पती, पत्नी यांच्यातील कलह व एकमेकांतील असमजंसपणा दोघांना ही मानसिक आजारी बनवतो. घर उध्वस्त होतं. यात पती किंवा पत्नी यांच्या चारित्र्य अथवा पतीच्या व्यसनाधीनता यांचा मोठा वाटा असतो यास थोडीफार सामाजिक झालर असते. सामाजिक टोमणे मानसिक आजाराचे कारण बनू शकते. हे आणि असे मानसिक आजार कार्यमग्नतेने कमी होणारे नाहीत. समंजसपणा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन हाच उपाय यावर कारगर होऊ शकतो.

सुखी आयुष्यात अचानक आलेल्या आरीष्टाने मनुष्य खचून जातो. आपली प्रिय व्यक्ती आपणास सोडून जाण्याने आयुष्य नकोसे वाटु लागले. ती हानी कधिच भरून निघणार नाही असे वाटते. त्यावेळेस ती व्यक्ती मानसिक आजारी बनतो. अशा वेळी मार्गदर्शनची व कार्यमग्न राहण्याची गरज असते. आलेले संकट विसरण्यात कार्यमग्न राहणे सहाय्यक ठरते. आयुष्यात पुन्हा एकदा जगण्याचे बळ मिळवण्यासाठी कार्यमग्नता सहाय्यक ठरू शकते.

मानसिक आजारी व्यक्ती कार्यमग्न होऊ शकतो का? नेहमी कार्यमग्न राहणे म्हणजे हा ही एक मानसिक आजार आहे. अति कार्यमग्नतेने पुन्हा मानसिक आजार बळावू शकतो असेही काहीजनांचे मत होऊ शकते.

आजार कोणत्या प्रकारचा आहे. आजार कामवासना, उग्रकोपीष्टपणा, लोभीपणा, खोडसाळपणा म्हणजे जितके रिपू तितके आजार. असे आजार कमी करण्यासाठी मार्गदर्शन व औषध उपचार कामी येऊ शकतो.

आपणास आवडत नसलेल्या गोष्टी टाळणे. जेथे मान मिळत नाही व मानसिक हणन होते, अशा ठिकाणी जायायचे नाही. तशा मित्रांची संगत टाळायची.

मी खरोखरच आजारी आहे असे त्या व्यक्तीला वाटणे. म्हणजे खरंतर उपचाराची सुरूवात. इतरांनी आजारी ठरवले तर उपचाराचे स्वरूप बदलते. येथे सामाजिक निकष येतात. ती व्यक्ती खरंच आजारी आहे पण समाजापासून आजार लपवते आहे. किंवा काही सामाजिक घटकांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आजार पण बिंबवले असते. तशा स्वार्थी व्यक्ती शिक्षेस पात्र होऊ शकतो. ज्या रोग्याला सामाजिक वाली कोणीही नाही अशा रुग्णांना वेडा ठरवूनच आपला उद्देश साध्य करून घेणार्‍या व्यक्ती समाजात आहेत.

जो व्यक्ती इलाज करून ठिक होत नसेल तर त्यास मानसिक अपंगत्वाच्या चाचणी द्वारे दिव्यांग घोषित करून नोकरी व ईतर ठिकाणी तीन टक्के आरक्षण मिळते.

व्यायाम, अनुलोम विलोम, योगा व मेडिटेशन केल्याने मानसिक आजार दूर पळू शकतो. मनाची भक्कम स्थिती. घाईगडबड, त्रागा, अहंकार, हुकूम अती ध्येयवादीपणा ह्या गोष्टी टाळणे हे मानसिक आजार टाळण्यासाठी योग्य राहील.

मनी ते ध्यानी हे रत्न दुर्गुणी. मनात चांगले सात्विक विचार, चांगले संस्कार मोती हे गुण म्हणजे जसे पेराल तसे उगवते. खंबिर व खऱ्या व्यक्तीत मानसिक आजार घर करत नाही. त्यास नक्कीच चांगल्या कामात आवड असते. मग आपोआप कार्यमग्न राहतो. सामाजिक दुर्गुण त्रासदायक ठरू शकत नाही.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय