भारतातल्या पहिल्या महिला वैमानिक ठरलेल्या प्रेम माथूर आणि सरला ठकराल

भारतातल्या पहिल्या कमर्शिअल पायलट ठरलेल्या प्रेम माथूर आणि घरगुती जवाबदाऱ्यांमुळे अगदी स्वातंत्रपूर्व काळात एव्हिएशन पायलटचे लायसन्स घेऊनसुद्धा कला क्षेत्राकडे वळणाऱ्या सरला ठकराल यांची हि कहाणी आजसुद्धा प्रेरणा देऊन जाते.

कुठल्याही महत्वाच्या पदावर आलेल्या पहिल्या भारतीय स्त्रीचे कायम कौतुक होत आले आहे. त्याला कारणच तसे आहे.

भले आत्ताच्या काळात स्त्रिया ह्या अगदी स्पेस क्राफ्ट पासून हाय स्पीड बाईक्स पर्यंत सगळी वाहनं चालवतात.

पण एक काळ असा होता, ज्या काळात स्त्रियांना असली कोणतीही कामं करायची परवानगी त्यांच्या घरातून मिळत नव्हती.

स्त्रियांनी घरात राहावे आणि लग्नानंतर संसार सांभाळावा इतकेच आयुष्य स्त्रियांच्या वाटेला येत असे.

कुठलेही काम पुरुषांच्या बरोबरीने करणे वर्ज्य होते. इतकेच काय घराबाहेर पडून पैसे कमावण्याचे कोणतेही काम स्वप्नातही करण्यासाठी परवानगी नसे.

आज ही अतिशयोक्ती वाटत असली तरी हे एके काळचे सत्य होते. अर्थात काही ठिकाणी आजही ऊंच भरारी मारू पाहणाऱ्या स्त्रीचे पंख कापण्यात धन्यता मानणारे अनेक भेटतील..!!

पण स्त्रियांच्या जिद्दीपुढे त्यांचा टिकाव लागणे हल्ली अंमळ अवघडच झाले आहे.

अशाच एके काळी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडणे अवघड होते त्याच काळात प्रेम माथूर ह्या महिलेनं मात्र एक मोठी झेप घेतली.

इतकी मोठी झेप घेतली की ती एका स्त्रियांसाठी दुर्मिळ असलेल्या क्षेत्रात जाऊन पोहोचली.

ती चक्क एक महिला वैमानिक झाली. तिच्या सांघर्षाचीच कहाणी आज आपण जाणून घेऊयात..

तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच कोतूहला पोटी प्रश्न पडला असेल की कोण हाती ही प्रेम माथूर?

उत्तर प्रदेशातल्या अलिगढ मध्ये १९२४ साली जन्मलेली एक तडफदार मुलगी. हिचं शालेय शिक्षण अलिगढ मधल्याच ऍनि बेझंट स्कूल मध्ये झालं

आणि कॉलेजचं शिक्षण इविंग ख्रिश्चन कॉलेज मध्ये झालं. नंतर वडिलांची बदली झाली म्हणून ते कुटुंब अलाहाबादला आलं.

ही एकूण ५ भावंडं. त्यातली सगळ्यात लहान मुलगी म्हणजे ‘प्रेम माथूर’.

लहानपणापासून हुशार, त्यामुळे सगळ्यांची लाडकी. घरात लाडक्या मुलांना जरा जास्तच मोकळीक मिळते.

तशी प्रेम माथूरला सुद्धा मुभा मिळाली होती. तिला तिच्या मनाप्रमाणे काम करायची परवानगी होती.

प्रेम ला दोन भाऊ होते, एक होता मोठा बिझिनेसमन, आणि दुसरा होता पायलट ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर.

दुसऱ्या महायुद्धा नंतर युद्धात वापरलेली काही विमानं प्रेम च्या बिझिनेसमन भावाने खरेदी केली होती. आणि ती श्रीलंकेला विकली.

ती विमानं श्रीलंकेला पोचवायची जबाबदारी त्याने कॅप्टन अटल ह्यांना दिली. कॅप्टन अटल बरोबर प्रेम ने पण काम करायची इच्छा व्यक्त केली. आणि ती मान्यही झाली.

कॅप्टन अटल ह्यांनी प्रेम चा उत्साह, आवड बघून “तू सुद्धा एक चांगली पायलट बनू शकतेस” अशी तिला जणू प्रेरणाच दिली.

प्रेम ने सुद्धा त्या प्रेरणेचा सन्मान केला आणि जबरदस्त इच्छा शक्तीच्या जोरावर शिकायला सुरुवात केली. १९४७ मध्ये ‘अलाहाबाद फ्लाईंग क्लब’ कडून फ्लाईंग लायसन्स सुद्धा मिळवलं.

आणि पायलट च्या नोकरी साठी प्रयत्न सुरू केले.

प्रेम ने एअर लाईन्सला पायलट पदासाठी अर्ज केला. पण त्यावेळी एकही स्त्री पायलट नसल्यामुळे प्रेम ला एअरलाईन्स कडून नकार आला.

स्त्री पायलटला आम्ही नोकरी देऊ शकत नाही, असं उत्तर आलं. तिने महिला पायलट ला नोकरी देत नाहीत म्हणून कोर्टात अपील केलं. आणि आपले प्रयत्न चालूच ठेवले.

काही कंपन्यांनी तर कळवलं की स्त्रियांना आम्ही पायलट ची नोकरी देऊ शकत नाही.

कारण पुरुषांप्रमाणे स्त्रिया अचानक आलेल्या संकटांना तोंड देऊ शकत नाहीत. स्त्री पायलट असेल तर आमचे ग्राहक घाबरून आमची सेवा नाकारतील अशी काही कंपन्यांनी भीती व्यक्त केली.

कॉकपिट मध्ये स्त्री पायलट हे अशक्य आहे. आम्ही हे चुकीचे काम करणार नाही असं एका कंपनीने कळवलं. म्हणजे सगळीकडूनच नकार येत होते.

अनेक एअर लाईन्स ला अर्ज पाठवले. पण फक्त प्रेम हि ‘एक स्त्री’ आहे म्हणून त्यांनी आपली असमर्थता कळवली. पण शेवटी धडपड करणाऱ्याला यश हे मिळतंच.

डेक्कन एअरवेज, ह्या हैद्राबाद च्या निजामाच्या कंपनीतून होकार मिळाला. मुलाखत झाली.

अनेक प्रश्न विचारले गेले, परीक्षा घेतली गेली. ट्रायल सुद्धा घेतली गेली. आणि प्रेम सगळ्या परीक्षेत उत्तीर्ण झाली.

असे असंख्य प्रयत्न केल्या नंतर मोठं यश मिळालं. ती फायनली महिला पायलट झालीच.

अशा क्षेत्रात तिने यश मिळवले जिथे स्त्रियांसाठी तसूभरही जागा नव्हती. किंबहुना स्त्रीयांना गृहीतच धरले गेले होते की विमान चालक असणे हे स्त्रीचे काम नव्हे..!!

हे उत्तुंग यश प्रेम च्या एकटीचं नव्हतं, असंच म्हणावं लागेल.

कारण तिच्या प्रयत्नांनी सगळ्याच स्त्रियांना यापुढे योग्यतेनुसार नोकऱ्या मिळायला अडचण येणार नाही अशी मान्यताच मिळवली.

म्हणजे प्रेम माथूरने सगळ्याच स्त्रियांना भरारी घेण्यासाठी आकाशाचेच दरवाजे उघडून दिले. ह्या पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात महिलांना पाऊल ठेवण्याची संधी मिळाली.

सध्याच्या युगात एक मुलगी, एखादी महिला सुद्धा पायलट बनायची स्वप्ने पाहते. आणि त्या दिशेने प्रयत्न करून उत्तम पायलट बनतेही.

हे श्रेय प्रेम माथूर ह्यांचेच म्हणावे लागेल. नाहीतर कदाचित अजूनही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने ह्या क्षेत्रात येणे म्हणजे एक दिव्यच ठरले असते.

अशी ही धाडसी, स्वप्नांचा पाठलाग करून यश मिळवणारी प्रेम माथूर उत्तम पायलट म्हणून नावाजली गेली.

भारताचे अनेक पंतप्रधान आणि अनेक व्ही. आय. पी. यांना प्रेमने उत्तम विमान चालक बनून सेवा दिली आणि त्या लोकांची शाबासकी मिळवली. एका स्त्रीच्या असामान्य कर्तुत्वाला मिळालेली ही पावतीच जणू.

२ ऑक्टोबर १९५३ ला प्रेम ने जुनी नोकरी सोडली आणि ती इंडियन एअरलाईन्स मध्ये नोकरीला लागली.

२२ डिसेंबर १९९२ ह्या दिवशी ‘प्रेम माथूर’ ने जगाचा निरोप घेतला. मात्र असे असामान्य व्यक्तिमत्व आपण विसरता कामा नये.

कारण मोठंमोठ्या कामांमध्ये खारीचा वाटाही मोललाचा असतो. प्रेम माथूर ने स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता करताना समस्त महिला वर्गालाही करियरचे एक नवीन दालन उघडून दिले.

तिच्याच मुळे, आपली योग्यता, आपल्यातले हे भन्नाट कौशल्य दाखवून देण्यासाठी स्त्रियांना आयते क्षेत्र चालून आले. तिच्या ह्या उत्तम कार्याला मनाचेtalks टीम कडून सलाम..!!

भारतीय स्त्री पायलट बद्दलची माहिती घेताना आणखी एक रंजक गोष्ट समोर आली. ती आहे सरला ठकराल यांच्या बद्दलची.

प्रेम जशी पहिला महिला कमर्शिअल पायलट ठरली तशीच पहिली महिला पायलट होण्याच्या प्रयत्नात सरला ठकराल यांचे नाव सुद्धा खूप महत्त्वाचे.

१९१४ साली जन्मलेल्या सरला यांनी वयाच्या २१ व्य्या वर्षी म्हणजे १९३६ साली एव्हिएशन पायलटचे लायसन्स घेतले.

१६ व्य वर्षी लग्न झालेल्या सरला यांना वैमानिक बनण्याची प्रेरणा हि त्यांचे पती पी. डी. शर्मा यांच्या कडून मिळाली होती.

पण दुर्दैवाने १९३९ साली एका विमान अपघातात पी. डी. शर्मा शर्मा यांचा मृत्यू झाला. आणि पतिनिधना नंतर लहान मुलांचे संगोपन आणि घरातील जवाबदाऱ्या यामुळे त्या कला क्षेत्राकडे वळल्या. आणि पुढे वस्त्रोद्योग आणि ज्वेलरी डिझाईन मध्ये यशस्वी उद्योजिका म्हणून सुद्धा नावारूपाला आल्या.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय