कॅपिटलगेन अकाउंट स्कीम 1988 CGAS 1988

विविध मालमत्तेच्या विक्रीतून होणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर द्यावा लागतो हे आपल्याला माहीत आहेच. यामधून विशिष्ठ अशा कॅपिटल गेन बॉण्ड मध्ये जास्तीत जास्त 50 लाख रुपयांची गुंतवणूक करून किंवा नवीन घरांत (2कोटी रुपये जास्तीतजास्त 2 घरे) अथवा शेतजमिनीत गुंतवणूक करून करसवलत मिळू शकते. घर, शेतजमीन विकत घेण्यासाठी 2 वर्षाचा तर नवीन घर बांधण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. कारण हे व्यवहार करताना अनेक बारीक बारीक गोष्टींचा जसे, घराचे स्थान, किंमत इ विचार करावा लागतो. तेव्हा असा व्यवहार पक्का होऊन पैसे देईपर्यंत किंवा नवीन घर बांधेपर्यंत भांडवली नफा करदात्यास स्वतःकडे फार काळ ठेवता येत नाही. त्यावर्षीचे आयकर विवरणपत्र भरण्यापूर्वी म्हणजेच साधारणपणे पुढील

वर्षाच्या 31 जुलैपर्यंत capital gain accunt scheme 1988 (CGAS-1988) या योजनेत मर्यादित काळाकरिता ही रक्कम ठेवता येते. अशा प्रकारे या योजनेत गुंतवणूक केल्याचे जाहीर केल्यावर आपणास झालेल्या भांडवली नफ्यावर त्यावर्षी कर भरावा लागत नाही. हे खाते निवडक राष्ट्रीयीकृत बँकांत काढता येते. यासाठीचा ‘A’ फॉर्म भरून त्यासोबत फोटो, पॅन, आधार आणि गुंतवणुकीची रक्कम द्यावी लागते. भांडवली नफा हा अनेक प्रकारे होऊ शकतो. विविध प्रकारानुसार झालेल्या भांडवली नफ्यावरील कर वाचवण्यासाठी त्याच्या प्रकारानुसार एकाहून अधिक खाती काढावी लागतात. पैसे एकरकमी किंवा टप्याटप्याने भरता येतात. सध्या बँकेत 2 प्रकारात कॅपिटल गेन अकाउंट उघडता येते.

टाईप A सेव्हिंग खाते : याची मुदत 2 ते 3 वर्ष यावर सेव्हिंग खात्याप्रमाणे व्याज मिळते. यातील रक्कम काढून घेणे तुलनेने सोपे आहे. आपल्या गरजेप्रमाणे यातून दिलेल्या मुदतीत पैसे काढून नियोजित मालमत्तेत त्याची गुंतवणूक करता येते. ही पूर्ण गुंतवणूक जेव्हा करून होईल तेव्हा हे खाते बंद करता येते.

टाईप B टर्म डिपॉझिट खाते : याची मुदतही 2 ते 3 वर्ष असून त्यावर मुदतठेवींवरील व्याजदाराप्रमाणे व्याज मिळेल. या खात्याचे प्रमाणपत्र त्यास देण्यात येईल. त्यावरील व्याज ठराविक काळाने अथवा मुदतपूर्तीच्या वेळी मिळेल. दोन्हीही प्रकारच्या खात्यावर मिळणारे व्याज करपात्र आहे. या खात्यावर कोणतेही कर्ज मिळत नाही. करदात्याने त्याला भविष्यात रक्कम कधी लागू शकेल याचा अंदाज घेवून कोणत्या प्रकारचे खाते काढावे ते ठरवावे.

या पूर्वी सांगितल्याप्रमाणे टाईप A खात्यातून पैसे काढणे सहज शक्य आहे मात्र टाईप B मधून पैसे काढताना ही मुदत ठेव मोडण्यात येऊन त्यावर दंड लागेल आणि रक्कम टाईप A खात्यात वर्ग करण्यात येईल आणि तेथून ती काढून घेता येईल. प्रथम पैसे काढण्यासाठी C फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर प्रत्येक वेळी D फॉर्म भरून द्यावा लागेल. काढून घेतलेले पैसे 60 दिवसात वापरावे लागतील नाहीतर पुन्हा टाईप A खात्यात जमा करावे लागतील. यातील खात्याच्या बदलासाठी B फॉर्म वापरावा लागेल. खाते त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेत बदलून घेता येईल, दुसऱ्या बँकेत बदलता येणार नाही. दोन्ही प्रकारची खाती बंद करण्यासाठी G प्रकारचा फॉर्म भरून ठेवून त्यावर आपल्या आयकर छाननी अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. खाते चालू असताना खातेदाराचा मृत्यू झाल्यास आणि त्याने वारासदारांची नेमणूक केली नसल्यास H फार्म भरून यातील रक्कम वारसदारांच्या नावे वर्ग करता येईल. तर वारसनोंद असल्यास वारसांना E फॉर्म भरून या खात्यातील रकमेची मागणी करता येईल. F प्रकारचा फॉर्म भरून खातेदारास वारस नोंदीत बदल करता येईल. जास्तीतजास्त 3 वारसांची नेमणूक करता येईल. वारस नेमणूक फक्त वैयक्तिक खातेदाराना करता येईल. AOP, HUF आणि फर्म यांना त्यांच्या खात्याचा वारसदार नेमता येणार नाही.

या खात्यात गुंतवणूक करून आयकरात सूट घेण्याऱ्या करदात्यास आयकर खात्याने मागणी केल्यास गुंतवणूक केल्याचा पुरावा द्यावा लागेल. खात्यातून काढलेली आणि 60 दिवसात न वापरलेली तसेच मुदत पूर्ण होऊन शिल्लक असलेली किंवा अजिबात न वापरता पूर्णपणे तशीच राहिलेली रक्कम नियमानुसार त्यावर्षात करपात्र आहे.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।