जगभर सध्या करोनाने थैमान घातले आहे. ह्या रोगाची सर्व देशांना अक्षरशः दहशत बसली आहे.
त्याचे मुख्य कारण म्हणजे करोना विषाणूचे वेळोवेळी बदलणारे स्वरूप. करोनाच्या प्रत्येक लाटेबरोबर ह्या विषाणूचे नवे स्वरूप समोर येत आहे.
त्यामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांपूढे दरवेळी नवे आव्हान उभे रहात आहे.
आज आम्ही तुम्हाला करोनाच्या नव्या व्हेरियंट डेल्टा प्लसची संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
ह्या नव्या व्हेरियंटची लक्षणे, कारणे, घ्यावयाची काळजी आणि उपचार ह्याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा लेख नीट वाचा.
काय आहे डेल्टा प्लस व्हेरियंट?
मुळ कोविड १९ सार्स विषाणूमुळे करोना पसरण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर त्याने स्वतःचे स्वरूप थोडे बदलले. ह्याला विषाणूचे म्युटेशन असे म्हणतात.
नवीन व्हेरियंटला अल्फा असे नाव दिले गेले. त्यानंतर भारतात ह्या विषाणूचा आणखी वेगळा व्हेरियंट सापडला जो अधिक वेगाने पसरतो.
तो आहे डेल्टा व्हेरियंट आणि ह्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही ५० ते ६० टक्के अधिक वेगाने पसरणारा आणि घातक असणारा व्हेरियंट म्हणजे डेल्टा प्लस.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त लोक डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचे शिकार झाले आहेत. तसेच करोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही.
मित्रांनो, ही माहिती देऊन तुम्हाला घाबरवण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही. उलट सध्या भारतात वेगाने पसरणाऱ्या साथीची आपल्याला पूर्ण कल्पना असावी आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी हे समजावे म्हणून हा लेख लिहीत आहोत.
काय आहेत ह्या नव्या करोनाची लक्षणे
करोनाची लक्षणे श्वसनाशी निगडीत आहेत. करोनाचा संसर्ग होताना नाक, घसा आणि श्वसनमार्ग बाधित होतो. त्यानंतर इन्फेक्शन वाढले की ते फुफ्फुसांपर्यंत पोचते.
कमी स्वरूपात इन्फेक्शन झालेले असताना दिसणारी सुरुवातीची लक्षणे
- डोकेदुखी
- नाक गळणे
- कोरडा खोकला
- ताप
इन्फेक्शन वाढल्यावर दिसणारी लक्षणे
- दम लागणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- पोटदुखी
- शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी होणे.
- हृदयगती (हार्ट रेट) वाढणे
हयाव्यतिरिक्त पायांच्या बोटांचा रंग बदलणे, चव आणि वास जाणे, उलट्या, जुलाब अशी लक्षणे देखील काही प्रमाणात दिसु शकतात.
ह्या नव्या व्हेरियंटची लागण झाली की इन्फेक्शन जास्त वेगाने पसरते हाच ह्याचा सर्वात मोठा धोका आहे.
तसेच करोना होऊन गेलेल्या लोकांना देखील डेल्टा प्लस व्हेरियंटचे इन्फेक्शन झाल्याचे आढळून आले आहे.
डेल्टा प्लस व्हेरियंटवरील उपचार
कोविडवर थेट प्रभावी औषध अजून आलेलं नसलं तरी अँटिबायोटिक्सची ट्रीटमेंट ह्यावर काही प्रमाणात लागू पडते. ती लवकर सुरु करणे आवश्यक आहे.
जितक्या लवकर ट्रीटमेंट सुरु होईल तितका इन्फेक्शन शरीरात पसरण्याचा धोका कमी होतो.
घरच्याघरी उपचार घेत बसून वेळ न घालवता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वरील लक्षणांपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट सुरु करावी. कोविड झाल्याच्या पहिल्या आठवड्यात ट्रीटमेंट घेतली तर धोका बऱ्याच अंशी कमी होतो.
लसीकरण
सध्या भारतात कोविड लसीकरण मोहीम अगदी धडाक्यात सुरु आहे. लवकरात लवकर लस घेणे हा कोविडपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा महत्वाचा उपाय आहे.
लस घेतलेली असेल तर कोविडमुळे होणारी हानी बऱ्याच प्रमाणात कमी होते हे सिद्ध झाले आहे.
कोविशिल्ड, कोवॅक्सिन, फायझर आणि स्पुटनिक ह्या लसी सध्या उपलब्ध आहेत.
डेल्टा प्लस व्हेरियंटपासून स्वतःचा बचाव कसा करावा?
गर्दीत जाणे टाळणे हा करोनापासून स्वतःला वाचवण्याचा एकमेव उपाय आहे.
मोकळ्या जागेत करोना पसरण्याचा धोका कमी असतो. कमी जागेत जास्त लोक सामावले गेले की करोना झपाट्याने पसरतो हे वारंवार सिद्ध झाले आहे.
खालील उपायांनी आपण स्वतःचा करोनापासून बचाव करू शकतो.
१. विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.
२. कोणत्याही परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
३. सर्व सरकारी नियमांचे पालन करावे.
४. कधीही बाहेर जावे लागले तरी मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये.
५. सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन करावे.
६. उत्तम दर्जाच्या सॅनीटायजरने सतत हात स्वच्छ करावे.
७. बाहेर पडल्यावर कोणत्याही जागेला, वस्तूला स्पर्श करू नये.
८. लिफ्टचा वापर शक्यतो टाळावा.
९. लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे.
ह्या उपायांनी करोनापासून स्वतःचे संरक्षण करणे काही प्रमाणात शक्य आहे.
तर मित्रांनो, करोना महामारीचा आपणा सर्वांना सामना करावा लागत आहे आणि ही महामारी काही इतक्यात संपणार नाही हे एव्हाना सर्वांना कळलेच आहे.
तेव्हा घाबरून न जाता आहे त्या परिस्थितीचा सामना करणे हेच आपल्या हातात आहे.
ह्या आजाराची तसेच त्यावरील उपाय आणि लसींची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत असतोच.
ती माहिती संपूर्ण वाचा, आपल्या मित्र, नातेवाईकांबरोबर शेअर करा. तुम्हाला काही शंका असतील तर त्या जरूर विचारा.
ह्या रोगाची सर्वांना जितकी माहिती मिळेल तितका त्याचा प्रसार रोखण्यास यश येईल. यावर एक साकारात्मक गोष्ट अशी कि मुंबईत झालेल्या सेरो सर्व्हे नुसार मुंबईतील ५०% पेक्षा जास्त लहान मुलांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत.
भारत करोनामुक्त होण्यासाठी लस अवश्य घ्या. सुरक्षित रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very nice info