बलात्कारातून जन्मलेल्या मुलाने २७ वर्षांनंतर शोधली आई, आईवरच्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात घेतली धाव,आईला मिळवून दिला न्याय.
प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक मुलीनं यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली पाहिजे.
की कहाणी सुरू होते उत्तर प्रदेशच्या शाहजहापूर शहरात.
तिथल्या एका अल्पवयीन मुलीवर १९९४ साली दोन भावांनी बलात्कार केला.
शहाजहांपूरला ही मुलगी स्वतःच्या बहिणीकडे शिक्षणासाठी आली होती.
बहीण आणि तिचे मिस्टर नोकरीसाठी घराबाहेर पडले की ही दोन मुलं घरात घुसून त्या मुलीला त्रास द्यायचे.
यातून ही मुलगी गर्भवती झाली. जेव्हा तिची बहीण आणि बहिणीच्या नवऱ्याने त्या मुलांच्या घरी जाऊन तक्रार केली तेंव्हा बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला प्रचंड मारहाण करण्यात आली.
डॉक्टरांकडे जाऊन जेंव्हा गर्भपाताचा विषय निघाला तेव्हा मुलीचं वय लक्षात घेता हा गर्भपात करणं तिच्या जीवासाठी धोकादायक होतं.
बहिण आणि तिच्या नव-यानं बदली करून घेऊन ते शहरच सोडलं.
शेवटी त्या मुलींनं रामपूरमध्ये एका मुलाला जन्म दिला.
समाजाच भय आणि आणि नातेवाइकांचा दबाव यामुळे त्या मुलीचा मुलगा नातेवाईकांनाच दत्तक देण्यात आला.
बाकीच्या नातेवाईकांना ही गोष्ट माहिती होती.
जसजसा हा मुलगा मोठा होत गेला तसतसा आजूबाजूचे लोक त्याला टोमणे मारायला लागले.
त्याला त्रास द्यायला लागले, तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की हे आपले खरे आई-वडील नाहीत.
तेव्हा त्याने आपल्या खऱ्या आईचा शोध घेतला.
यासाठी ३२० किलोमीटरचा प्रवास करून रामपूर वरून लखनौला गेला.
बारा वर्षाची मुलगी आता मोठी होऊन लखनौला स्थिर झाली होती.
जेव्हा मुलांने आईला सगळी माहिती विचारली, वडिलांविषयी पुन्हापुन्हा विचारलं तेव्हा त्या महिलेनं आपली वेदनादायी कहाणी कथन केली.
त्यानंतर मुलाने आपल्या आईला न्याय मिळवून देण्याचा ठाम निर्णय घेतला.
या दोघांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र हे प्रकरण फारच जुनं आहे असं सांगून पोलिसांनी टाळाटाळ केली.
मग मात्र मुलाने थेट न्यायालयात धाव घेतली ,आणि ४ मार्च.२०२१ ला न्यायालयाच्या आदेशाने पुढची सूत्र मात्र भराभरा हलली.
त्या महिलेच्या तक्रारीनुसार दोन भावांना अटक करण्यात आली.
सुरुवातीला तर दोघांनी साफ नकारच दिला.
मात्र पोलिसांनी जेव्हा DNA टेस्ट केली तेंव्हा मोठ्या भावाचा DNA मँच झाला.
दरम्यान २००२ साली त्या मुलीचं लग्न होऊन तिला एक मुलगाही झाला होता.
मात्र जेव्हा महिलेच्या नवऱ्याला महिलेच्या पूर्वायुष्याबद्दल कळलं तेंव्हा त्यांच्यातले संबंध ताणले केले आणि ते वेगळे झाले.
त्या महिलेचा मुलगा परत आल्यानंतर ना नव-यानं. तिला मदत केली ना माहेरच्या कोणीही तिला मदत केली.
फक्त आई आणि मुलगा या दोघांनी ही लढाई लढली.
आपल्या भारतामध्ये अतिशय दुःखद चित्र असं आहे एका सर्वेक्षणानुसार ९९% बलात्काराच्या गोष्टी या पुढे येतच नाही.
९४% केसेस मध्ये हा बलात्कार ओळखीच्या लोकांकडून होत असतो
यावेळी समाज आणि नातेवाईकांचा मोठा विरोध असतो.
अशा वातावरणात एका महिलेने २७ वर्षानंतर स्वतःच्या मुलाच्या मदतीने आपल्यावरचा अन्यायावर दाद मागितली ही खूपमोठे धैर्याची गोष्ट आहे
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.