पहिलं भारतीय समलैंगिक जोडपं म्हणजे समीर आणि अमित यांच्या लग्नाला नुकतीच दहा वर्ष पुर्ण झाली आहेत.
समीरने आपल्या भावना सोशल मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केल्या .
त्यातून त्या दोघांचा संघर्ष दिसून येतो.
80 च्या दशकात पुण्यासारख्या शहरात शिकणा-या सागरच्या शाळेतचं लक्षात आलेलं होतं की आपण समलैंगिक आहोत.
मात्र ते व्यक्त करण्याचं धाडस त्याच्याकडे नव्हतं. प्रचंड घुसमट मात्र होती.
शेवटी वयाच्या 25 व्या वर्षी अमेरिकेत गेल्यावर त्याच्या मनावरचं दडपण थोडं कमी झालं.
वयाच्या 28 व्या वर्षी समीरची अमेरिकेमध्ये अमितशी ऑनलाइन भेट झाली.
अमित एक विद्यार्थी होता. मात्र एक नकली नाव धारण करून अमित सागरशी ऑनलाइन बोलत होता.
तीन महिन्यानं जेंव्हा आपलं खरं रूप अमितनं प्रकट केलं तेंव्हा समीरची एवढीच प्रतिक्रिया होती “अरे आपण इतके दिवस मराठीत बोललो असतो ना!”
2003 पासून अमित आणि समीरने डेटिंग करायला सुरुवात केली.
दोन वर्षानंतर ते एकत्र राहायला लागले.
त्याच वर्षी समीरचे आई वडील त्याला भेटायला अमेरिकेत गेले.
अमित हा समिरचा रूममेट आहे असं त्याच्या आई वडिलांना वाटत होतं.
समीरच्या आईने अमितला सांगितलं होतं की समीरला समजावून सांग आणि लग्नाला तयार कर.
एके दिवशी किचन मध्ये पुन्हा एकदा लग्नाच्या गोष्टी उकरल्या गेल्या तेव्हा सहन न होऊन समीरनं सांगितलं की “आई मी समलैंगिक आहे”
समीरच्या आईसाठी तो एक मोठा धक्का होता.
आईनं घाबरून समीरला विचारलं की “तू छक्का आहेस का?” समीरकडं याचं उत्तर नव्हतं.
अश्रू भरल्या नयनांनी आईने वडिलांना सगळी कहाणी सांगितली.
त्या क्षणी बाबांनी समीरला धीर दिला की काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे.
आईनं मात्र हे वास्तव लवकर स्वीकारलं नाही.
आईने मग समीरला घेऊन ज्योतिषी आणि डॉक्टर गाठले. मात्र यातून आईच्या मनासारखं काहीही घडलं नाही.
सप्टेंबर 2010 ला अमित आणि समीरने विधिवत पारंपरिक पद्धतीने अमेरिकेत लग्न केलं.
जगभरात ही बातमी पसरली.
मात्र दोघांच्या घरून कोणीही लग्नासाठी आलं नाही.
फक्त समीरच्या बहिणींनं पाठिंबा देत लग्नाला उपस्थित राहून सपोर्ट ही केलं.
समीर आणि अमितच्या लग्नाची थीम ‘समानता’ ही होती. दोघांनीही एकमेकांना मंगळसूत्र घातलं आणि कन्यादान ही केलं.
समीर अमितच्या लग्नानंतर चार वर्षांनी अमेरिकेच्या इंडियाना स्टेटने समलैंगिक विवाहाला मान्यता दिली.
समीर आणि अमितच्या लग्नाची गोष्ट व्हायरल झाल्यानंतर अभूतपूर्व द्वेषाचा सामना त्यांना करावा लागला.
“तुम्ही देशाची मान झुकवली” इथंपासून “मुलगी सापडली नाही म्हणून समलैंगिक बनला का?” इथपर्यंतचे असंख्य प्रश्न त्यांना विचारले गेले.
या काळात दोघांनाही त्यांच्या जीविताची काळजी होती.
पण कायद्याचं ज्ञानही त्यांच्याकडे होतं.
समीरच्या आईने 10 वर्षांनं वास्तवाचा स्वीकार केला आणि अमितला स्वीकारलं.
एका दशकानंतर दोघांच्या परिवारांने त्यांच्या नात्याला संमती दिली.
दहा वर्षांपूर्वी या लग्नात सामील झालो नाही याची खंत नातेवाईकांना आजही वाटते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.