असामान्य, यशस्वी लोकांच्या या सवयी तुमच्यात आहेत का?

ज्या लोकांनी उद्योग-धंदा, नोकरी यांमध्ये चांगली मजल गाठलेली असते, पैसा ज्यांच्यासाठी बाय प्रोडक्ट असतो, अशा यश्यस्वी लोकांनी स्वतःमध्ये काही सवयी भिनवलेल्या असतात त्या आपल्या आहेत का?

नसतील तर त्या सवयी लावून घेण्यासाठी काय करायला पाहिजे ते वाचा या लेखात.

तुम्ही बघितलं असेल, काही लोक म्हणजे, जे लोक आपले रोजचे व्यवहार नियमित करतात. पण एखादे वेळी नाही काही केलं तरी काही फरक पडत नाही त्यांच्या आयुष्यात.

उगाच जास्त कष्ट करायची धडपड नाही करत. आपली सुखानं मिळणारी रोजी रोटी पदरात पडली की ते खुश असतात.

सरळ साधं आयुष्य जगणं त्यांना आवडतं. ते कसलीही जोखीम घेत नाहीत. थोडक्यात उद्याची चिंता करत नाहीत. अशा लोकांपेक्षा ज्या लोकांनी उद्योग-धंदा, नोकरी यांमध्ये चांगली मजल गाठलेली असते, पैसा ज्यांच्यासाठी बाय प्रोडक्ट असतो, एकूणच ज्यांच्याकडे पाहून इतरांना त्यांचा हेवा वाटतो.

‘भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी?’ असा विचार मनाच्या एका कोपऱ्यात चमकून जातोच.

असे लोक वेगळे कसे असतात ते ह्या लेखात आपण पाहणार आहोत.

सगळ्याच माणसांना असं वेगळेपण मिळालं असतं तर?? सगळेच यशस्वी, नावाजलेले म्हणून ओळखले गेले असते ना!!

पण तसं नाही होत म्हणून हा फरक आपल्याला दिसतो. पण मग त्यांच्यात जास्त काही विशेष गुण असतात का?

गुण म्हणता येणार नाही पण त्यांची काम करायची पद्धत, काही साध्या सवयी सर्व सामान्य माणसांपेक्षा वेगळीच असते. जर आपण पण ती पद्धत आत्मसात केली तर आपल्याला सुद्धा त्यांच्या बरोबरीला जाता येईल की नाही? मग ते बघायला काय हरकत आहे? थोडा वेळ खर्च होईल, पण जमलंच तर?????

मग बघाच जमतंय का…

१:-पहिलं काम काय करायचं ते, रोज उद्या आपल्याला काय पाहिजे/करायचं ह्याची लिस्ट बनवायची.

अशी लिस्ट बनवली की लगेच तुम्ही रॉकेटमध्ये बसून आकाशाला हात लावू शकणार नाही, पण तुम्ही जो काही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल तर आजचं काम पूर्ण झाल्यावर आपल्याला उद्या काय काय पाहिजे, उद्या काय काय काम करायचं त्याची रोज संध्याकाळी ऑफिस सोडायच्या आधी लिस्ट बनवायची.

म्हणजे उद्याचं काम आजच पक्कं ठरवून ठेवायचं. ज्या गोष्टी उद्यासाठी लागणार आहेत ना त्या आजच तुमच्या समोर ठेवल्या गेल्या पाहिजेत.

ह्या लिस्ट मुळे होईल काय? तुमच्या डोक्यात उद्याच्या कामांची उजळणी झालेली असेल.

त्याची सगळी तयारी तुम्ही आजच केली असेल, तर त्या तयारीत उद्याचा वेळ जाणार नाही.

आणि त्यासाठी आणखी काही गोष्टींची जरुरी असेल, म्हणजे काही कमी असेल तर ते आजच कळेल.

त्याची तरतूद आजच्या आजच होईल, आणि उद्या लगेच काम सुरू होईल. तुमचा भरपूर वेळ वाचेल. म्हणजे जे तुम्हाला मिळवायचंय ते लवकर मिळवता येईल. यशाकडे जाणारी ही पहिली पायरी तुम्ही सहज चढाल.

२:- आपल्या डोक्यात कुठलाही निगेटिव्ह कचरा साठवायचा नाही.

आपण कोणतंही काम करत असतो त्या वेळी आपल्या आजूबाजूला अनेक टीकाकार असतात. चांगलं त्यांना बघवत नाही.

ते आपल्याशी सतत काहीतरी निगेटिव्ह बोलतात, नकारात्मक गोष्टी सांगतात, असे तुम्हालाही बरेच अनुभव आले असतील.

तुम्हाला आजपर्यंत आलेल्या कुठल्याच निगेटिव्ह अनुभवला कवटाळून बसायचं नाही. किंवा असल्या सतत निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांच्या बोलण्याने गोंधळून जायचं नाही.

तर आत्ता आपल्याला कशाची गरज आहे, अपल्याला आत्ता काय शिकायला मिळेल, आत्ता जे काही करायचं आहे, त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं. आपल्यातल्या, आणि आपल्या आजूबाजूच्या “निगेटिव्ह” कचऱ्याला स्वच्छ करून टाकायचं.

तुम्ही सतत सावध राहायचं. तुमचा हा ‘सावधपणा’ म्हणजे, लोकांची जहरी टीका, किंवा नकारात्मक भावना ह्या गोष्टींवरचं उत्तम औषध आहे हे लक्षात ठेवा. “आपण सावध असलं की सगळे सरळ असतात.”

३:- जोखीम उचला…

आपल्याकडे व्यवसाय धंद्यात आपण लोक मोठी जोखीम उचलायला घाबरतो. मनात भीती वाटते. किंवा आपल्याच लोकांकडून आपल्याला भीती दाखवली जाते.

जोखीम पत्करली आणि खड्डयात गेला तर ??? आपण गोंधळून जाऊन माघार घेतो.

पण यशच मिळवायचंय ना मग फेल झालो तरी विचार असा करा की आपण अयशस्वी होण्याची काय करणं होती?

त्याचा पुन्हा विचार करून ती चूक, किंवा ते कारण शोधून त्याला वेगळी वाट करून द्यायची. त्याच्यातून काहीतरी शिकायलाच मिळतं, ते शिकायचं आणि परत धडक मारून यशाला खेचूनच आणायचं.

४:- यश मिळवायचंच हाच ध्यास घेतल्यामुळे तुम्ही पूर्ण माहिती मिळाली नाही तरी यशस्वी होऊ शकता.

एखाद्या व्यवसायाची पूर्ण माहीती जरी तुम्हाला मिळाली नाही तरी असलेल्या माहितीच्या आधारावर सुद्धा तुम्ही यश मिळवू शकता.

कारण तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवून पुढे जाता येईल.

हे कसं काय होतं? तर सगळी जबाबदारी स्वतःकडे घेऊन त्या कामात स्वतःला झोकून दिलं आणि मन लावून ते काम केलं तर यश हमखास मिळतंच, हा विश्वास तुम्हाला असलाच पाहिजे.

५:- तुम्हाला सर्वात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही उदार सुद्धा असायला पाहिजे.

कोणतही काम मन लावून केलं तर त्यात आपण यशस्वी तर होतोच, पण त्यातून आपल्याला आनंद सुद्धा मिळतो.

हा आनंद मिळणं म्हणजे चांगलं कर्म केल्याचं समाधान. तुम्ही जे काही काम करत असाल ते चांगलंच असेल.

आणि त्या कामात समाधानी असाल तर दुसऱ्याला सुद्धा मदत करायला तत्पर व्हाल. कारण दुसऱ्याला मदत करण्यात पण आनंद मिळत जातो.

आणि असे आनंदी लोकच उदार बनू शकतात.

६:- यश मिळवण्या बरोबर स्वतःच्या आरोग्याची पण नीट काळजी घ्या.

सतत कार्यरत राहण्यासाठी शरीर सुदृढ असणं सुद्धा गरजेचं असतं ना? म्हणून रोज व्यायाम करून स्वतःला फिट ठेवा.

त्यामुळे तुमची स्मरण शक्ती चांगली राहील. शरीर लवकर थकणार नाही, आळस येणार नाही.

तुमची कार्यशक्ती वाढत जाईल, आणि निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा चांगली राहील. त्यामुळे यशाची वाटचाल अगदी सहज करू शकाल.

७:- सकारात्मक विचार करण्यामुळे तुम्ही नेहमी सगळीकडे चांगल्याच घटना घडतील अशी अपेक्षा ठेवा.

निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायची सवय नसल्यामुळे, सतत जे काही घडेल ते चांगलंच असेल असा विचार किंवा अपेक्षा तुम्ही ठेवाल. त्यामुळे तसंच घडत जाईल. तुम्ही जे काही काम करता ते त्याच अपेक्षेने करत चला. चांगलं यश मिळवायला हा सकारात्मक विचार खूप उपयोगी पडेल.

८:- तुम्ही रोज आपल्यासाठी एक शांत वेळ ठरवून स्वतःसाठी तो वेळ राखून ठेवा.

मेडिटेशन असो किंवा प्रार्थना किंवा पूजा पाठ. मनाच्या शांतते साठी तुम्ही स्वतः साठी दिवसातला काही वेळ राखून ठेवा.

मनाची शांतता किंवा ताण तणाव ह्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ह्या वेळेचा सदुपयोग करता येईल. त्यामुळे प्रसन्न मनाने आणि आत्मविश्वासाने दिवसाची सुरुवात होईल.

९:- तक्रारी करणं सोडून जबाबदारी घेण्याची सवय ठेवा!

सतत तक्रारी करणारे, कटकट करणारे लोक कधीच विनर होत नाहीत. आयुष्यभर ते कटकटींनाच सामोरं जात राहतात.

हे बऱ्याच लोकांना अनुभवायला मिळालं असेल. अशा लोकांना कोणी चांगलं म्हणत नाही. त्यांची एक तशीच प्रतिमा बनलेली असते.

अशी माणसं समोर आली की आपण मनात तरी म्हणत असतो “आला कटकट्या” . अशा माणसांना घरातच काय पण समाजात सुद्धा मान नसतो. म्हणून असे लोक मोठं यश मिळवू शकत नाहीत.

त्याच्या उलट यशस्वी लोकांचं असतं… स्वतःच्या कष्टाने यश मिळवल्याचा एक प्रकारचा रुबाब असतो, मान असतो. आणि म्हणूनच सर्वांना त्यांचा हेवा वाटतो.

आपल्याला आपल्या शांत आणि संयमी बोलण्याने आणि प्रेमळ वागणुकीने सगळ्यांची मनं जिंकता येतात. त्यामुळे आपोआपच आपल्याला लोकप्रियता मिळते.

लोकप्रिय माणसांना नेहमी समाजाकडून आदराने सन्मान मिळतो. सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी असतात, आणि ते वाढतंच जातात, त्याची जाणीव ठेवून तुम्ही पुढची वाटचाल करत राहायची. लोक तुमच्याकडून चांगल्या कामाचीच अपेक्षा करतात.

१०:- स्वतःला स्मार्ट बनवण्यासाठी सुद्धा काहीतरी काम सतत करत राहिलं पाहिजे.

स्वतःला स्मार्ट बनवायचं म्हणजे नक्की काय करायचं हे कित्येकांना माहीत नसतं किंवा कळत नसतं…. स्मार्ट होण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं तुम्ही नेहमी वाचा. त्यातून भरपूर माहिती मिळवता येईल. इंटरनेटवरून माहिती घेऊन स्वतःला नेहमी उपडेट ठेवत जा.

स्वतःकडे माहिती असली तर तो आत्मविश्वास काही औरच असतो. काही ऑडिओ किंवा व्हिडीओ ऐकून किंवा बघून आपलं ज्ञान वाढवता येईल.

इथेच सर्वसामान्य लोक चूक करतात. माहिती ठेवायचा कंटाळा…. हे अगदी साधं कारण असतं, पण हेच कारण तुम्हाला मागे खेचायला पुरेसं असतं.

मग स्मार्ट कसे होणार? आज ज्ञान मिळवायच्या कितीतरी सोयी आपल्याला उपलब्ध आहेत. इंटरनेट, गुगल, सुद्धा तुम्हाला स्मार्ट बनवू शकतं. रोजचा दीड GB डेटा नीट वापरायला शिका. जेवढी जास्त माहिती तुमच्याकडे असेल तेवढ्या जास्त कल्पना तुम्हाला सुचत जातील.

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी जेवढ्या संधी उपलब्ध होत्या त्यापेक्षा आज खूप मार्ग आपल्यापुढे खुले झालेले आहेत. फक्त गरज आहे ती स्मार्ट होऊन संधीला कॅच करण्याची.

नवीन योजना, नवीन उद्योग, काही सुधारणा, अगदी परदेशातल्या लोकांचं सहकार्य सुद्धा आपल्याला मिळवता येतं. त्यांच्या सल्ल्याने आपण आपली प्रगती करू शकतो. स्मार्ट होणं सुद्धा आता अवघड नाही.

आपल्याला पाहिजे तीच माहिती देणारी पुस्तकं किंवा ऑडिओ व्हिडीओ साठी पैसा खर्च करायला आपण कचरतो म्हणून मागे राहतो. पण सर्वात यशस्वी व्हायचं तर निदान वाचन तरी करायला पाहिजे ना? जेवढी माहिती अपल्याकडे जास्त असेल तेवढी आपली जास्त प्रगती व्हायला मदत होते. स्मार्ट व्हायला आणखी काय लागतं? आवश्यक माहितीचा खजिना… बस.

११:- भरपूर नाती जोडणं ह्यात जास्तीतजास्त गुंतवणूक करा.

एखाद्या ७५, ८० वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीच्या वाढदिवसाला गेल्यावर आपण त्या व्यक्तीला विचारतो की तुमच्या नॉन स्टॉप ८० मागचं रहस्य काय आहे? तेंव्हा ती व्यक्ती आपल्याला हसत हसत सांगते, की उत्तम आरोग्य आणि आनंदी जीवन.

तसंच जर तुम्ही एखाद्या सर्वात यशस्वी माणसाकडे बघितलं तर त्याच्या त्या मोठ्ठया यशाचा महत्वाचा घटक काय असू शकेल? तर तो म्हणतो त्याने निर्माण केलेली, जोडलेली नाती. ह्या लोकांचा परिवार फक्त घरापुरताच मर्यादित नसतो. तर प्रचंड मोठा नात्यांचा गोतावळा हा त्यांच्या यशाचं गमक म्हणता येईल.

प्रत्येक जोडलेलं नातं आपल्याला काही न काही मदत करून आपल्याला हे मोठं यश मिळवून देतं.

कोणी आर्थिक तर कोणी वैचारिक, तर कोणी परिश्रम, तर कोणी मानसिक उभारी देत असतं.

म्हणून ह्या नात्यांमध्ये मोठी गुंतवणूक करणं खूप उपयोगी ठरतं. म्हणून आपल्याच व्यवसायतले एक्स्पर्ट लोक, आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असलेले लोक, आपल्याला अडचणीत मदत केलेले मित्र, कायदे माहिती असलेले मित्र, कष्टाची मदत करणारे, असे सगळे मित्र, तयार करा आणि जोडून ठेवा. हीच तुमची मोठी गुंतवणूक ठरेल.

ह्या सगळ्या प्रवासासाठी आपल्याला फक्त ह्या ११ गोष्टीच करायच्या आहेत. कुठेही अवास्तव पैसा खर्च करायचा नाही.

फक्त जे काही करायचं ते अगदी मनापासून करायचं. मित्रांनो मग तुम्हीच सांगा की….. काय अवघड आहे ह्याच्यात????

विचार करा, कोणीही होऊ शकतो असा ‘सर्वात यशस्वी माणूस’ तुम्ही सुद्धा……. ज्याचा सर्वांना हेवा वाटेल!!

म्हणूनच तुमच्या यशस्वी होण्याला आमच्या लाख लाख शुभेच्छा.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “असामान्य, यशस्वी लोकांच्या या सवयी तुमच्यात आहेत का?”

  1. खुप सुंदर लेख, मनाला उभारी देणारा, एक नवी दिशा दाखवणारा म्हणून याचा उल्लेख करता येईल.
    मनाचे talks टीम ला मनापासून धन्यवाद आणि या अनोख्या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय