शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु…

असं म्हणतातं, की शिवाजी जन्माला यावा, पण दुसऱ्याच्या घरात…..असं म्हणणं म्हणजे खरचं करंटेपणा आहे.

शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करुन त्यांचे थोडे गुण जरी आत्मसात केले तर आपल्यातच पुन्हा पुन्हा महान शिवाजीचा जन्म होईल.

एकोणीस फेब्रुवारी…. एकोणीस फेब्रुवारी खुप वजनदार दिवस आहे.

ह्या दिवसाने भारताचा इतिहास बदलवला. शिवाजी महाराजांचे चरित्र अतिशय उत्तुंग आहे.

शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेतलं, त्यांचं नुसतं आयुष्य आठवलं, की आपल्या अंगावर काटा उभा राहतो.

अशा अनोख्या महापुरुषाचा जन्मदिवस शिवजयंती. हा दिवस एकदम उत्सवाचा.

आज सगळ्या महाराष्ट्रात चौकाचौकात जल्लोष सुरु असेल. (नक्कीच कोविड च्या संकटामुळे जयंती साजरी करण्यावर बंधन असणार. सुरक्षित राहून सर्वांनी जयंती साजरी करायची आहे)

गल्लीबोळात, खांद्यावर आणि वाहनां-वाहनांवर भगवे झेंडे अभिमानाने मिरवले जातील, हे पाहुन कुणाही शिवप्रेमीचा उर अभिमानाने भरुन येईल.

हा भव्य वारसा जपण्यासाठी, त्यांचं गुणगाण जेवढं आवश्यक आहे, तितका त्यांच्या चरीत्राचा अभ्यास करुन त्यांचे चांगले गुण आत्मसात करणंही आवश्यक आहे.

शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं अवलोकन करताना, आपली मान थिटी पडते, इतकं उत्तुंग ते चरित्र आहे.

पण यशस्वी लोकांच्या आयुष्यात आपल्यासाठी प्रेरणा लपलेल्या असतात. आपल्या या जगावेगळ्या जाणत्या राजाचं वेगळेपण शोधण्याचा आणि त्यातुन शिकण्याचा, आपण सर्वांनी वेळोवेळी, नक्कीच प्रयत्न करायला हवा!..

1) जीवनात निश्चित उद्दिष्ट्ये गाठण्याची इच्छा, आकांक्षा

रोहिडेश्वराच्या पायथ्याशी घेतलेली ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’. ही शपथ कोण विसरेल? हेच महाराजांचं जीवनध्येय होतं.

बालपणीच आऊसाहेबांनी त्यांच्या डोळ्यात स्वप्न जागवलं होतं. स्वराज्य साकारण्याचं, रयतेला गुलामगिरीच्या जोखडातुन मुक्त करुन मोकळा श्वास देण्याचं स्वप्न.

नाहीतर महाराजांपेक्षा शक्तिशाली अनेक सरदार तेव्हाही होते पण त्यातल्या एकाजवळही निश्चित असे ध्येय नव्हते. म्हणुन महाराजांचं नाव अजरामर झालं.

2) आत्मविश्वास

एक सतरा वर्षांचा, पोरसावदा, युवक, एक तरुण पोरांचं टोळकं घेऊन, तेव्हाच्या प्रचंड शक्तिशाली बादशाह आदिलशाहच्या तोरणागडावर स्वारी करतो, जिंकतो आणि सत्तेला आव्हान देतो.

असंख्य चढाया करतो, अनेकदा मृत्युच्या जबड्यातुन सहीसलामत बचावतो आणि जिंकतो, कशाच्या बळावर?

‘मी करु शकतो’ हा आत्मविश्वास. हाच आत्मविश्वास त्यांना हिंदवी स्वराज्याचे छत्रपती बनवतो.

आत्मविश्वासाच्या बळावर अशक्य गोष्टी सहज शक्य होतात.

3) पुढाकार

त्या काळात बहुसंख्य हिंदु सरदार बादशाहाचे गुलाम बनले होते, उरलेले असहाय बनुन असंतोषाने आतुन आक्रोशाने जळत होते पण प्रतिकार करायला कोणीही पुढे येत नव्हते.

महाराज एका मोठ्या वतनदाराचे राजपुत्र होते. ते ऐषौआरामाचं आयुष्य सहज जगु शकले असते.

काय गरज होती त्यांना इतरांसाठी इतकी उठाठेव करण्याची? इतर अनेक सामंत सरदार मिळेल तेवढं सत्तेचं सुख उपभोगत होतेच की!!

त्यातल्या काही जणांना ही गुलामगिरी आणि अन्याय खटकत असेलही, पण महाराजांनी निर्भयपणे सर्व क्रुर सत्ताधीशांना आव्हान दिले आणि खडे चारले.

4) दुरदृष्टी

एका ब्रिटीश पत्रव्यवहारात सापडलेली गोष्ट आहे.

जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक होता, तेव्हा रायगडाच्या माथ्यावर असलेल्या कमानीवर दोन हत्ती मुख्य दरवाज्यावर गुलाबपाणी शिंपडुन स्वागत करत होते.

हे पाहुन उपस्थित इंग्रज वकिलाला प्रश्न पडला की माणसाला चढायला प्रचंड अवघड असा हा रायगड, मग हे महाकाय हत्ती, इतक्या अवघड चढणीवर आणलेच कसे?

शेवटी न राहवुन त्याने महाराजांच्या पेशव्यांना हा प्रश्न विचारला.

तेव्हा पंतानी उत्तर दिले, ‘महाराजांच्या सांगण्यावरुन ही पिले छोटी असताना सात-आठ वर्षांपूर्वी गडावर महत्प्रयासाने आणली गेली होती, खरतरं तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले होते, कारण महाराजांच्या सैन्यात कधीही हत्ती नसायचे. पण महाराजांना त्यांचा उपयोग काय होणार आहे, ते माहीत होते.’ ज्याला दुरदृष्टी असते तोच खरा राजा….

5) उत्साह

तुम्हाला माहीती असेल, अनेक महीने प्लानिंग करुन संयमाने आणि आत्यंतिक परिश्रमानंतर अफजलखानाचा वध केला गेला होता.

खरतरं तो क्षण जल्लोषाचा होता. यश साजरं करण्याचा आणि शीण घालवण्याचा, कित्येक महीने, अविरत काम केल्यावर, आराम करण्याचा तो क्षण होता.

पण महाराजांचा उत्साह बघा. खानाला भेटण्यास गडावरुन निघालेले महाराज थेट मोहीमेवर गेले व सलग तेरा महीने चढाया करुन, विजयी बनुन ते पुढील वर्षीच राजगडावर परतले होते.

असा सळसळता उत्साहच माणसाला विजयी बनवतो.

6) स्व-नियंत्रण

कसल्याही संकटासमोर डगमगत नाही तोच खरा वीर.

महाराजांची आग्र्याची नजरकैद भयावह होती. आपल्या अनेक शत्रुंना औरंगजेबाने कपटाने, विष देऊन मारले होते.

सामना साक्षात सैतानाशी होता, पण महाराजांनी कधीही जगण्याची आशा सोडली नाही.

उलट असे काही शिताफीने निसटुन गेले, की पाताळयंत्री औरंगजेबानेच त्यांचा धसका घेतला, असं इतिहासकार सांगतात.

मृत्युच्या दाढेत असताना, कसा पराकोटीचा संयम त्यांनी बाळगला असेल, याचे खुप आश्चर्य वाटते. यशस्वी बनायचे असेल तर स्व-नियंत्रण असायलाच हवे.

7) अचुक निर्णयक्षमता

शाहिस्तेखानावर हल्ला असो किंवा पन्हाळगडावरुन सुटका. कूठलाही अवघड प्रसंग घ्या.

प्रत्येक बाक्या प्रसंगी योग्य वेळेची आणि योग्य संधीची प्रतिक्षा केली गेली. आजच्या भाषेत एकदम फुलप्रुफ प्लान बनविला गेला.

इतका जबरदस्त की, काहीही झाले तरी शत्रुला द्णका, आणि विजय सुनिश्चित. कठीण प्रसंगी, निर्णय घेऊन, योजना तडीस नेणे ही विजेत्यांची हातोटी असते.

8) साहचर्य

महाराजांनी प्रत्येक खात्यात महत्वाच्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट माणसे पेरली होती.

त्यांचा सरसेनापती धडाडीचा असायचा तसंच त्यांचा गडकिल्ल्यांची, जलदुर्गाची बांधणी करणारा मुख्य प्रधान अप्रतिम इंजिनिअर होता.

त्यांचं हेरखात्याचं जाळं खुप मजबुत होतं, म्हणुनच प्रत्येक वेळी त्यांचा गनिमी कावा यशस्वी झाला. आजही जो चांगल्या माणसांना एका ठिकाणी बांधुन ठेवतो तोच यशस्वी उद्योजक होतो.

आज मॅनेजमेंट मध्ये ‘टीमवर्क’ शिकवतात, ते महाराजांनी साडेतीनशे वर्षापुर्वी महाराष्ट्रात रुजवलं होतं.

त्यांनी एका शब्दाखातर, जीव देणारी लाखो माणसं उभी केली, ते केवळ प्रेमाच्या बळावर.

हे साहचर्य आपल्यालाही शिकता आलं तर समाजातले सर्वच प्रश्न सुटतील.

9) अपयशातुन लाभ

महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगासोबत तह केला होता. बहुतांश किल्ले देऊन टाकले होते.

पण महाराज नजरकैदेतुन सुटले आणि तात्काळ त्यांनी सुरतेवर स्वारी केली. ते अपयशाने खचुन गेले नाहीत की अडचणींना त्यांनी भीक घातली नाही.

विजेते अशाच पद्धतीने अपयशावर मात करतात.

10) सहिष्णुता

दुसर्‍याला समजुन घेणं, त्याचा आदर करणं, म्हणजे सहिष्णुता.

शिवाजी महाराजांनी अनेक मातब्बरांना, आपल्या जादुई व्यक्तीमत्वाने आपलसं करुन घेतलं.

गरज पडली तिथे सोयरीकी केल्या आणि ऐक्याची वज्रमुठ बांधली. अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात महाप्रचंड आयुष्य ते जगले.

असं म्हणतातं, की शिवाजी जन्माला यावा, पण दुसऱ्याच्या घरात…..असं म्हणणं म्हणजे खरचं करंटेपणा आहे.

शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करुन त्यांचे थोडे गुण जरी आत्मसात केले तर आपल्यातच पुन्हा पुन्हा महान शिवाजीचा जन्म होईल, आणि तिच शिवाजी महाराजांना खरी मानवंदना ठरेल. हा भव्य वारसा पुढे चालु राहील.

महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!… महाराज, आमच्या प्रत्येकामध्ये पुन्हा जन्माला या!…

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

7 thoughts on “शिवाजी – द ग्रेट मॅनेजमेंट गुरु…”

  1. संभाजीराजेंनी विषयी सांगा. ते शिवाजी महाराजांचा पेक्षाही दसपटीने पराक्रमी होते हे आपण सर्वजण जाणतो. कृपया त्यांच्याविषयी देखील लेख लिहावा त्यांनी कशाप्रकारे नऊ वर्षे सहा ते सात दुश्मनांना अंगावर घेतल्या आणि त्यांना धूळ चारली. सलग 128 लढाया त्यांनी जिंकल्या. एकाही लढाईमध्ये माघार नाही किंवा तह नाही.

    Reply
  2. अतिशय सुंदर विषय थोडक्यात पण महत्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत आपण प्रत्येकाने जीवनात उपयोगात आणूया आणि प्रगती करूया व यापुढे, यापेक्षाही उत्सहाने, जोमाने शिवजयंती साजरी करूया.
    जय शिवाजी महाराज, जय भवानी, जय शंभू महाराज, जय महाराष्ट्र 🙏.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय