सायकॉलॉजीचा एक प्रसिद्ध आणि इंट्रेस्टिंग सिद्धांत आहे,
“मिळालेल्या सुखाची किंवा वस्तुची तितकी किंमत माणसाला नसते, पण जर काही कारणाने ती वस्तु आपण गमावली तर होणारं दुःख मात्र मिळालेल्या आनंदापेक्षा कित्येक पटीने मोठ्ठं असतं.”
उदा. समजा, आपली एक हजार रुपयाची कमाई झाली, तर आपल्याला त्याचा आनंद होतो, पण इतरांकडे अगोदरपासुन असलेले लाखो-करोडो रुपये पाहुन आपला एक हजार रुपये मिळवल्याचा आनंद लवकरच विरतोही, …
आणि तेच जर एक हजार रुपये चोरीला गेले, हरवले किंवा कसल्याही प्रकारचं नुकसान होऊन गेले, तर मनाला खुप चुटपुट लागते, आपल्याकडुन ती गोष्ट सहजासहजी विसरली जात नाही, पुन्हा पुन्हा आठवत राहते.
जवळ गरजेपेक्षा जास्त, खुप सारा पैसा असला तर त्याने काही विशेष फरक पडत नाही…..पण आवश्यकता भागवण्याइतका, पुरेसा पैसा गाठीं नसेल तर मात्र माणुस सतत चिंतामग्न!….
छोट्याशा या आयुष्यामध्ये,
खूप काही हवं असतं..असंख्य चांदण्या भरूनसुद्धा,
आपलं आभाळ, रिकामं असतं..
स्वतःच्या मालकीचं सुंदर घर असतं, तेव्हा त्याचं तितकं अप्रुप कोणाला असतं.., पण हक्काचं घर नसणार्यांची कित्येक रात्रींची झोप का उडते?
लग्न झालं, सुंदर, प्रेमळ, सुस्वरुप जोडीदार मिळाला, तर काही दिवस ‘आनंदचे डोही आनंदी तरंग’ अशी स्थिती असते, आणि काही वर्षांतच नव्याची नवलाई विरुन जाते, पुन्हा सारं नॉर्मलच वाटतं…
पण समजा, एखाद्याने, एखाद्याने काही कारणाने जोडीदार गमवला तर मात्र दुःखाचा डोंगर कोसळतो..
मुलं होतात, तेव्हाही आनंद होते, पण तो ही क्षणिकच!, सगळ्यांनाच तर होतात, त्यात काय विशेष?……
पण जेव्हा एखाद्या जोडप्याला कित्येक वर्ष मुल होत नाही, तेव्हा त्यांना होणारं दुःख, कल्पनेपलिकडे असतं.
असंच आरोग्याचं….. जेव्हा आपण ठणठणीत असतो, तेव्हा स्वतःच्या निरोगी शरीराला गृहीतच धरतो, जसं की ते निरोगी असणं, आपला हक्कचं आहे जणु…..
तेच एखादा गंभीर आजार जडला की नशीबाला दोष देणे सुरु…
ज्याबद्द्ल आपण कृतज्ञ राहावं, अशा अगणित गोष्टी आपल्या आजुबाजुला आहेत, शुद्ध हवा, कोवळं उन, ताजं अन्न, स्वच्छ पाणी, आनंदी कुटुंब, प्रेमळ माणसं, निरोगी शरीर, प्रसन्न वातावरण, सुरक्षित समाज आणि अशा कित्येक गोष्टी…
मिळलेली प्रत्येक गोष्ट मग ती प्रत्येक श्वास असो किंवा प्रत्येक रुपया, तो भगवंताने पाठवलेला आशिर्वाद आहे, हे डोक्यात भिनायला हवं,
आयुष्यालाच भगवंताचा प्रसाद मानायला शिकलं की साऱ्या चिंता नष्ट होतात, आणि माणसाला समाधानाचा, तृप्तीचा ढेकर येतो. म्हणुन प्रत्येक माणसानं, आपल्याला मिळालेल्या वरदानांना आठवुन, देवाला रोज न चुकता, मनापासुन धन्यवाद द्यायलाच पाहीजे….
चला, आज आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीची आठवण करुन आनंदी होण्याची कारणे शोधुया आणि भगवंताचे आभार मानुया…
वाचण्यासारखे आणखी काही…..
व्हॅलेंटाईन्स डे साजरा करा… आजच नाही तर आयुष्यभर!!!
जाणीव
फोटोंचा बदलता जमाना आणि बदलत्या जमान्यातले आपण!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.