आयुष्य क्षणभंगुर आहे.. अशी जाणीव होतीये..?? मग हा लेख वाचाच..

आयुष्य क्षणभंगुर आहे.. अशी जाणीव होतीये..?? मग हा लेख वाचा.. आणि यात गुंफलेल्या अन्ताक्षरीत भाग घ्या. जास्तीत जास्त शेअर करा, कारण आता घरात बसून चांगल्या गोष्टी व्हायरल करणं हे आपलं कर्तव्य… म्हणजे पोलीस आणि डॉक्टरांना त्यांचं कर्तव्य नीट पार पाडता येईल.

अपना हर दिन ऐसे जियो…
जैसे के आखरी हो..!!!
जियो तो इस पल ऐसे जियो..
जैसे के आखरी हो..!! 🤗🤗

हे गाणं मला खूपच सकारात्मकता देतं.. तुम्ही म्हणाल कसे काय..??

हे गाणं तर घाबरवतय.. डायरेक्ट शेवटचा पळभर, शेवटचा दिवस वगैरे किती भीतीदायक आहे??

अहो, पण खरंच हा दिवस, ही मोमेंट शेवटची असली तरी आपल्या हातात काय आहे..?? मग का नाही ती वेळ एन्जॉय करायची..??

रडत कुथत राहून आयुष्य वाढणार आहे का..?? नाहीच.. आयुष्य तर वाढणार नाहीच आणि ते दुःखात काढल्याची खंत नेहमीच राहील.. त्यापेक्षा आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहायला शिकूयात..

आपल्या हातात जे काही आयुष्य आहे.. जेवढा वेळ आहे त्याचा पुरेपूर आनंद घ्यायला आपल्याला का अवघड वाटते..??

आत्ताच्या घडीला जगभर काय अवस्था आहे पहा ना.. आयुष्याची क्षणभंगुरता आपण किती जवळून पहात आहोत.. नाही का..!!??

आज आहे तर उद्या नाही.. ह्या आयुष्याची कसली शाश्वतीच नाही.. असे असताना काही गोष्टी अद्भुत आहेतच..

आता पहा ना..

किती महामाऱ्या आल्या आणि गेल्या.. जग बदललं, लोक बदलले.. पण म्हणून कोणी जगणं सोडलं नाही..

आपल्याला जो कार्यभाग पूर्ण करायचा आहे, जी कर्तव्य आहेत ती शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करत राहायचे आहे..

मग त्यातल्याच काही घटका आपल्या आनंदासाठी का चोरू नये..??

मृत्यूचा अवतार मृत्यूची वेळ कोणालाच माहीत नसते.. आणि हे खरे तर आपापले उत्तम नशीब समजा.. उद्या चतुर माणूस त्याचाही शोध लावेल..

मात्र तेव्हा, मृत्यू पासून अनभिज्ञ राहून आयुष्य ‘जगण्याची’ कला तो विसरून जाईल.. तुम्हाला काय वाटते..??

आणि म्हणूनच मृत्यू समय माहीत असो वा नसो.. ही जीवन व्यतीत करण्याची कला जोपासली पाहिजे..

होय आयुष्य जगणे ही ‘कला’च आहे.. सगळ्यांना माहीत आहे एक दिवस आपला कार्यभाग शेवटाला जाणार..

आपला दाणापाणी ह्या भुतालावरून संपणार.. म्हणून तर हातात असलेले आयुष्य आपण वाया जाऊ द्यायचे नसते..

जन्म आणि मृत्यूच्या मधले ‘आयुष्य’ आपल्याला ऊन-पाऊस दाखवते.. धडे देते.. कित्येक स्वप्न दाखवते..

कित्येक स्वप्न हिरावून नेते.. सुख येते नंतर दुःख येते.. पण पुन्हा सुख येतेच.. त्यामुळे फक्त दिवस ढकलत जगणे हे ‘लूजर’ माणसाचे लक्षण आहे..

हा विषयच असा आहे कि हे लिहिताना मला खूप सारे फिल्म चे गाणे ‘Bolywood Songs’ आठवतायत…

ह्यावर सोनू निगमच्या या गाणाच्या ओळी सुद्धा अगदी चपखल बसतात..

हर घडी बदल राही है रूप जिंदगी.. छाव है कही, कही है धूप जिंदगी..
हर पल यहा जी भर जियो… जो है समा.. कल हो न हो…!!!

एकेक शब्द किती खरा आहे हा..

तिकडे वेळेची टिकटिक पुढे पळत असते.. (नम्बर १’ यासाठीचे गाणे तुम्ही कमेंट मध्ये सुचवा)

त्यामुळे आपण लवकर शहाणे झालो, लवकर जागे झालो तर उपयोगाचे आहे..

स्वप्न बघा, त्या साठी मेहनत घ्या, त्यांना खरे करा.. आनंद घ्या, आनंद लुटा..

दुःख येईल.. तेही अनुभवा आणि इतरांच्या दुःखातही सहभागी व्हा.. मात्र शोकात बुडून जाऊ नका.. परत उभारी घ्या.. (‘नम्बर २’ यासाठीचे गाणे कमेंट मध्ये सुचवा)

त्या फिनिक्स पक्षासारखी.. जो राखेतून उडून ऊंच भरारी घेतो.. आपले आयुष्य इतके लहान असते की आपल्यालाही कित्येक गोष्टींना एकाच वेळी कवेत घ्यायचे असते..

त्याला गेम्स च्या लेव्हल प्रमाणे एकेक लेव्हल जिंकत जाऊन समजून घ्यायचे असते..

शेवटी आपल्या आयुष्याचा अख्खा गेम सुद्धा आपणच जिंकायचा असतो.. म्हणूनच स्वतःला समजवायचे की, (‘नम्बर ३’ यासाठीचे गाणे कमेंट मध्ये सुचवा)आणि का नाही हा स्वतःवरचा विश्वासच तर आपल्याला जिंकून देणारही आहे..

हे खरे आहे की, आयुष्यात काही गोष्टी योग्य विचारांती कराव्यात.. घाई नेहमीच नडते.

पण अतिसंथपणा देखील तितकाच दुर्दैवी.. त्यामुळे आयुष्य जगण्यासाठी थोडा वेग ठेवणेही गरजेचे आहे..

त्यामुळे ज्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे त्यासाठी भरभरून जगा.. चुका होतील, पश्चाताप होईल पण त्याचे दडपण घेऊन जगू नका..

स्वतःला माफ करा आणि पुढे चला.. कदाचित आयुष्य एक नवीन दिशा तुम्हाला दाखवेल..

भले आयुष्य क्षणभंगुर असेल.. पण म्हणून काय ते वाया जाऊ देणार असेच..??

त्यापेक्षा प्रवाहाच्या उलट दिशेने फिरा.. असामान्य कर्तृत्व मिळवायच्या मागे लागा..

जगासाठी नसेल पण स्वतःसाठी, स्वतःच्या प्रेमाच्या माणसांसाठी काही तरी अचाट, अफाट करण्याचा प्रयत्न करा..

आयुष्यभर यश मिळो ना मिळो प्रयत्न कधीच सोडू नका.. आपण कर्म करत राहायचे तेही मजेत, आनंदात..

कारण (‘नम्बर ४’ यासाठीचे गाणे कमेंट मध्ये सुचवा).. उद्यासाठी आजचा मिळालेला क्षण का खराब करायचा..??

उद्या काय होईल ह्याची बेगमी असुद्यात पण चिंता नको.. उद्याचा घोर जीवाला आजच नको..

आपले प्लॅन ठरवा आणि कामाला लागा.. उद्या जे करणार ते आजच सुरू करा..

आज जे करणार ते आत्ताच सुरू करा.. लाडक्या माणसांना भरभरून प्रेम द्या.. रुसवे फुगवे क्षणिक असू द्या.. वर जाताना कोणताच वाद, कोणतेच हेवे दावे नेता येणार नाहीयेत.. त्यामुळे खळखळून हसा आणि उदंड प्रेम द्या आणि घ्या..

आयुष्य हे एक गिफ्ट आहे.. दुसऱ्या कोणाशी बरोबरी करण्यात ते घालवू नका..

आपले स्वतंत्र तत्व, आयुष्य जपा.. स्वतःवर विश्वास ठेवा.. जे आवडत नाहीये ते करणे थांबवा..

सोडून द्या ती गब्बर पगाराची नोकरी.. आणि करा ती फोटोग्राफी जी तुम्हाला खुणावतेय किंवा उघडा स्वतःचे छोटेसे हॉटेल..

पैसे सुरुवातीला कमी असेल पण मानसिक आनंदाला मोजमाप नसेल.. आयुष्यात तेच करा ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल..

स्वतःला सांगा की,

  • मी अतिशय शूर आहे,
  • माझ्यात आत्मविश्वास आहे,
  • सकारात्मक आहे,
  • मी मनाने खूप श्रीमंत आहे,
  • मनमिळावू आहे..
  • मी कष्ट करायला घाबरत नाही.. म्हणून यश माझेच आहे
  • मी माझी स्वप्न पूर्ण करणारच..
  • मी जिंकणारच..
  • मी विजेता ठरणारच..

स्वतःभोवती इतकी सकारात्मकता वाढवली तर ब्रह्मांडातल्या अदृश्य शक्तीही तुम्हाला मदतीस म्हणून येतील… हो विश्वास ठेवा अगदी खरं आहे हे… (‘नम्बर ५’ यासाठीचे गाणे/डायलॉग कमेंट मध्ये सुचवा)

तुमच्या अटी, शर्तींवर आयुष्य भरभरून जगा आणि पूर्णत्वास न्या..

आयुष्याच्या संध्याकाळी उर अभिमानाने भरून आलं पाहिजे.. कसलीच तक्रार उरता कामा नये..

म्हणून ‘Make most of every second..’ म्हणजेच प्रत्येक क्षणाचा फायदा करून घ्या.. तो उत्कटतेने जागा.. कारण शेवटी..

आने वाला पल…
जानेवाला है..
हो सके तो इसमे
जिंदगी बिता दो..
पल येभी जानेवाला है..!!!

https://www.manachetalks.com/11688/s-w-o-t-anslysis-marathi-personality-development/

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “आयुष्य क्षणभंगुर आहे.. अशी जाणीव होतीये..?? मग हा लेख वाचाच..”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय