अडखळत अडखळत आयुष्य घडवायचं कसं????

अडखळत अडखळत आयुष्य घडवायचं कसं

जगण्याच्या या रोलर कोस्टर ची भीती वाटते कि उत्कंठा वाढते, मजा येते??

ज्यांना स्वतःच्या आयुष्यावर प्रभुत्व मिळवायचं आहे, त्यांनी जर हे अनुभवलं तर आयुष्याची खरी गंम्मत कळेल आणि आयुष्य हा नितांत सुंदर प्रवास संपूच नये असं वाटेल!!

आयुष्य म्हणजे काय? खरं तर आयुष्य ही देवाने दिलेली एक उच्चतम देणगी आहे, जी अनमोल आहे.

परंतु, आयुष्य म्हणजे काय याचं उत्तर देव आपल्याला देत नाही, ते ज्याचं त्यालाच शोधावं लागतं.

प्रत्येक माणूस हे स्वतःच ठरवू शकतो की त्याने आयुष्य कसं जगायचं आहे.

महान तत्ववेत्त्यांनी बरंच लिहून ठेवलं आहे आयुष्याबद्दल.

पण या सगळ्याचं सार जे मला समजलं ते मी सांगते आहे या लेखात.

चला तर मग, तुम्हीही शोधा आणि बघा उत्तर मिळतं का, अडखळत अडखळत आयुष्य घडवायचं कसं ???

या एकाच मिळालेल्या दैवी देणगीत मला खूप हसायचं आहे, हसवायचं आहे.. पण रडायचंही आहे मोकळेपणाने.

फिरायचं आहे, आणि माझ्या जवळच्या लोकांना घेऊन फिरवायचंही आहे, परमेश्वराची प्रार्थना करायची आहे, तीर्थाटनाला जायचं आहे, एखाद्या टेकडी वर शांत बसून स्वतः मधला परमेश्वर शोधायचाही आहे.

कधी एकटंच स्वतःला घेऊन लांब कुठे जायचं आहे, तर कधी मित्र-मैत्रिणींसोबत दंगा मस्ती सुद्धा करायची आहे.

आयुष्याचे टक्के टोणपे खात खात एक दिवस स्वतःच स्वतःला घडवायचं आहे.. !!

समाजाचं देणं समजून काही गोष्टी सामान्य लोकांसाठी झटून करायच्या आहेत.

खरं तर या मनी बाळगलेल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय चांगलं हवं.

पण मग हे सगळं सांभाळायचं तरी कसं, जगरहाटी आणि चिंता माणसाची पाठ सोडत नाहीत.

आणि मग हि दुनियादारी सांभाळता सांभाळता मनाजोगं, आपलं ड्रीम लाईफ जगणं काही जमत नाही.

आता खाली दिलेल्या काही गोष्टी आपल्याला रोजच्या आयुष्यातले आनंद मिळवून देण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकतात.

१. आयुष्य नेहमी आपल्या सोबत असते पण आपण आयुष्याच्या सोबत असतो का?

हे अगदी सर्वसाधारण आहे. आपण आयुष्याची लय कुठेतरी हरवतो रोज.

आणि ही लय मोडण्यासाठी असंख्य गोष्टी कारण आहेत. अगदी छोट्या छोट्या. पण तसं होऊ न देता आपण आयुष्याच्या तालावर आपलाही ताल धरला तर काय मजा येईल? रोजचा दिवस वेगळा असेल, रोज नवीन जगणं असेल. आणि रोज आपण सुद्धा नवीनच असू.

२. आयुष्यात चांगली माणसं नक्की भेटतात पण त्यांना टिकवून ठेवणं आपल्याला जमतं का???

आपले हेवे दावे, अहंकार, संशय, ईर्षा हे दुर्गुण एवढे जास्त असतात की चांगली माणसं आपल्याला आयुष्यात भेटून काही काळ थांबून निघूनही जातात.

पण आपण आपल्या वाईट सवयींचे एवढे गुलाम असतो की बराच काळ लोटून जातो, टक्के टोणपे खाऊन आयुष्य स्थिरावतं आणि मग तेव्हा वेळ निघून गेलेली असते कारण आपण खूप पुढे आलेलो असतो आणि आणि ती कधी काळी भेटलेली खरी माणसं सुद्धा कालांतराने लांब गेलेली असतात.

मग म्हणून वेळीच थांबून माणसांना आयुष्यात जपता यायला पाहिजे खूप उशीर होण्याआधी !!!

पण हो माणसं जपणं हा केवळ याच एका न्यायाने अट्टहास मात्र होऊ द्यायचा नाही. काही माणसं मात्र आयुष्यातून वेळीच जाणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं.

म्हणून माणसं ओळखून त्यांना आयुष्यात स्थान देणं गरजेचं…

३. आयुष्य सकारात्मकच असते मग आपण ते नकारात्मक का करतो??

जसा चष्मा घालू तसं जग दिसतं म्हणतात. पण आपण रोज त्याच त्या रंगाचे चष्मे घालतो अगदी न चुकता…

डॉक्टर कडे जाऊन डोळ्यांचं आरोग्य नेहमी चेक करणारे आपण, अक्षर नीट दिसावीत म्हणून वारंवार चष्म्याच्या फ्रेम्स बदलणारे आपण..

माणसांना बघताना.. जगात वावरताना रोजचा चष्मा मात्र कधीच बदलत नाही.

तरुण पणा पासून वार्धक्याच्या खुणा दिसायला लागल्या तरी हे चष्मे बदलले जात नाहीत. आणि मग माणसातला चांगुल पणा सुद्धा अंधुक दिसायला लागतो.

स्वतः पासून दूर जातो आपण…. हे थांबवायचं असेल तर चष्मे बदलायला हवेत आपल्या दृष्टीकोनांचे…

साफ मन आणि साफ दृष्टीकोन असंख्य गोड नाती निर्माण करतो.

४. भयंकर आजार असणारी माणसं आनंदी असतात मग आपण निरोगी असताना दुःखी का????

आयुष्याचा सारांश समजला की सगळं सोपं वाटू लागतं.

आजारी माणसाची संवेदना एवढी जागृत झालेली असते की त्यांच्या मानसिक शक्ती अफाट असतात.

बरं होण्याची मानसिकता प्रचंड असते. डॉक्टर सुद्धा शोधू शकत नाहीत अशी आत्मिक ऊर्जा अशी माणसं स्वतः सोबत घेऊन फिरत असतात.

अशी माणसं जिथं जातात तिथं आनंदाची उधळण करतात. स्वतः बरे होतातच पण अनेक लोकांना आणि दुर्धर आजारांना बरं करण्याचं काम यांची लेखणी, हसणं आणि अनुभव करतात.

मग त्यांना हे जमत तर तुम्हा आम्हाला तर जमायलाच हवं. नाही का????

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या लेखात लिहिलेल्या काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, अनुभवल्या असतील.

ज्यांना स्वतःच्या आयुष्यावर प्रभुत्व मिळवायचं आहे, त्यांनी जर हे अनुभवलं तर आयुष्याची खरी गंम्मत कळेल आणि आयुष्य हा नितांत सुंदर प्रवास संपूच नये असं वाटेल.

धन्यवाद🌹

लेखन: वरदा आफळे

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

1 Response

  1. माधवी सोनावणे says:

    🙏
    हो, या लेखातील बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आहेत. काही माणसं खरच आपल्या पासुन लांब असलेलीच बरी. स्वार्थी माणसांचं काही खरं नसतं, आपल्या चांगुलपणाचा फायदा घेऊन काम झालं की ते विसरतात की “आज आपण कुणामुळे उभे आहोत”.
    छान आहे लेख .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!