जेवण बनवणं इंटरेस्टिंग करणाऱ्या ४ टिप्स

एवढ्यातच आपण पेजवर #LetUsTalk मध्ये एक प्रश्न विचारला होता. प्रश्न होता तुम्हाला सर्वात जास्त कंटाळवाणं वाटणारं काम कोणतं?

त्यात दिलेल्या वेगवेगळ्या ४ पर्यायांमध्ये एक पर्याय हा जेवण/स्वयंपाक बनवणे हा ही होता…

उत्तरांमध्ये जवळजवळ ९०% उत्तर हे जेवण/ स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो हे आहे👩‍🍳

जेवण बनवणं इंटरेस्टिंग करणाऱ्या ४ टिप्स

त्यात गेल्या वर्षभरापासून लॉक डाऊन मुळे बाहेरील खाणे बंद झाले आणि सगळे पूर्णपणे घरात असल्याने घरातील मुख्यतः महिलांवर जेवण बनवण्याचा जास्तच भार पडला…

शिवाय ज्यांनी वर्क फ्रॉम होम केले त्यांच्यावर नक्कीच तुलनेपेक्षा जास्त काम येऊन पडले…

शिवाय दिवस उन्हाळ्याचे असल्याने इतक्या उकड्यात घामाने ओथंबून जाऊन, जेवण बनवणं आणखीनच नकोस झालं…

आणि म्हणूनच #LetUsTalk मध्ये आम्ही हा प्रश्न विचारला… आणि आमचा अंदाज होता तसंच उत्तर मिळालं…

म्हणूनच आजच्या या लेखात जेवण बनवणं इंटरेस्टिंग करणाऱ्या ४ टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

फक्त महिलांनीच नाही पुरुषांनी सुद्धा वाचा… आणि आपल्या टीनेज मुलांनाही वाचायला द्या🙋

१) जेवणासाठी थीम ठरवा:

आता तुम्ही म्हणाल, काहीतरीच काय सांगता! जेवणात कसली आली थीम…

मित्रांनो आणि मैत्रिणींनो जेवणातही थीम असू शकते बरंका…

कसं विचारता???

मंगळवारी जेवणात मशरूम बनवायचं, शनिवारच्या नाश्त्यात सँडविच ठेवायचं… मशरूम मंगळवार, सँडविच शनिवार, किंवा अगदी चमचमीत खाणारे खान्देशी तुम्ही असाल तर शेवभाजी शनिवार

अशा कित्येक थीम्स ठरवता येतील.

अशाच तुम्हाला सुचणाऱ्या थीम्स कंमेंट्स मध्ये लिहा…

२) जेवण बनवताना गाणे ऎका, संकोच न करता डान्स ही करा:

संगीत हे मूड फ्रेश करणारं रामबाण औषध आहे…

म्हणून स्वयंपाक करताना आवडीची गाणी लावणं डान्स करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं समजून, कुठलाही संकोच न ठेवता महिलांनी ते बिनधास्त केलं तर त्यांनाही या जेवण बनवण्याच्या मोनोटॉनियस कामाचा कंटाळा येणार नाही.

३) जेवण बनवण्यासाठी इंटरेस्टिंग, सुंदर एप्रन वापरा:

आपला मूड हा नुसता आजूबाजूच्या वातावरणावरच नाही तर आपण घालतो त्या कपड्यांवर सुद्धा ठरत असतो…

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे किचन एप्रन मिळत असतात.

नुसतं विकतच नाही, तर ते एप्रन घरी बनवायचे असतील तरी त्याचे डिझाइन अगदी सोपे असते… थोडं फार शिवता येत असेल आणि आवड असेल तर तुम्हालाही सुंदर एप्रन बनवता येतील…

मूड फ्रेश करणाऱ्या रंगांचे विकत आणलेले किंवा स्वतः बनवलेले एप्रन वापरा… थोडं नावीन्य येईल आणि कंटाळा दूर होईल…

४) घरातील सर्व सदस्यांचा जेवण बनवण्यात सहभाग ठेवा:

जेवण बनवताना मूड सकारात्मक आणि फ्रेश असेल तर त्या जेवणातही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात.

म्हणून आपल्यासाठी जेवण बनवणाऱ्या व्यक्तीचा मूड नेहमी फ्रेश राहावा याचा विचार, ज्यांच्यासाठी जेवण बनते त्यांनी ठेवला तर विशेषतः स्त्रियांना, जेवण बनवणं नकोस होणार नाही.

याशिवाय सुद्धा जेवण बनवण्याचे कंटाळवाणे काम इंटरेस्टिंग करण्याच्या काही कल्पना तुमच्याकडे असतील तर त्या कंमेंट्स मध्ये लिहा…

आणि हो पहिल्या पॉईंट् मध्ये लिहिल्या प्रमाणे थीम ब्रेकफास्ट, मिल, डिनर बनवण्याच्या तुमच्या कल्पना कंमेंट्स मध्ये लिहा…

आणि तुम्ही याप्रमाणे किचनमध्ये एकट्याने किंवा सहपरिवार काही प्रयोग करून जेवण बनवणं इंटरेस्टिंग केल्याचे व्हिडीओ आम्हाला पाठवा… निवडक व्हिडिओना आपण मनाचेTalks च्या पेजवर प्रसिद्धी देऊ…

Image Credit: Madhuras Recipe

https://www.manachetalks.com/2206/gruhini-aslyacha-nyungand-tumhala-aahe-ka-marathi-mahiti-manachetalks/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय