इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थीवर मात करण्यासाठी हे करा

काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व् निर्माण करतात, कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही. छोट्या-छोट्या अडचणी असो नाहीतर मोठं संकट असो, त्यातून बाहेर येऊन राजहंसाच्या चाली प्रमाणे पुन्हा डौलात ते आपलं आयुष्य जगायला सुरुवात करतात. या मार्गात फक्त तीन गोष्टी त्यांनी पाळलेल्या असतात… कोणत्या? ते वाचा या लेखात

आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्रकारचे लोक दिसतात.

काहीजण प्रचंड यशस्वी असतात तर काहीजण अयशस्वी. काहीजण शून्यातून विश्व निर्माण करतात तर काहीजण लाखाचे बारा हजार करतात….

बऱ्याच वेळा आपण अशा लोकांबद्दल बोलताना “त्याचे नशीब चांगल आहे” किंवा “त्याचे नशीबच खराब आहे” असे म्हणतो.

पण खरी गोष्ट मात्र वेगळीच असते. कुणाचेही यश आणि अपयश ह्याच्या मागे नशिबापेक्षा त्याच्या कामाचा जास्त हात असतो.

आपल्याला आपले काम, वैयक्तिक आयुष्य, शारीरिक आरोग्य, आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्यात कायम मोठे यश मिळवायचे असते सर्वात पुढे राहायचे असते पण ते कसे साध्य करायचे हे आपल्याला माहित नसते.

ह्यासाठी आजच्या लेखात आपण हमखास यश मिळवण्याचे, यश म्हणण्यापेक्षा कुठल्याही प्रतिकूल परिस्थितून आपली गाडी रुळावर आणण्याचे अगदी साधे सोपे ३ उपाय शिकणार आहोत.

परिस्थिती प्रतिकूल असेल तर लक्षात घ्या, आता तुमचं विमान टेक ऑफ करणार आहे… पण त्यासाठी या तीन गोष्टी आपल्याला लक्षपूर्वकपणे कराव्या लागतील.

ह्या तीन गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण परिस्थिती आवाक्यात आणून नक्कीच यश संपादन करू शकतो

१. तुम्हाला जे साध्य करायचे त्याची होकारार्थी कथा रचा

आपल्याजवळ प्रत्येक गोष्टीसाठी एक कथा तयार असते. आपल्याला एखादे काम सांगितले की ते करायचे की नाही, हे एकदा का आपण मनात ठरवले की त्या उत्तराला बरोबर ठरवणारी कथा आपले मन तयार करते….

लहान मुले शाळेत जायचे नसले की वेगवेगळी कारणे शोधून काढतात अगदी तसेच आपल्या मनाचे सुद्धा असते.

आपल्याला नविन धंदा सुरु करायचा असतो पण मनातून आपण त्यासाठी तयार नसू तर आपण तो धंदा न करण्यासाठी वेगवेगळ्या कथा तयार करायला लागतो.

त्यात कसा धोका आहे, त्यातून कसे उत्पन्न कमी मिळेल, सुरवातीचा खर्च कसा जास्त आहे असली अनेक कारणे आपले मन शोधते आणि आपण कसे बरोबर आहोत ह्याची कथा तयार करते.

पण हेच जर आपल्या मनात धंदा करायचे असेल तर त्यातून मिळणारे उत्पन्न कसे जास्त आहे, कष्ट कसे कमी आहेत असा विचार आपले मन करायला लागते आणि तशीच कथा रचायला लागते.

त्यामुळे आपल्या मनात एखादी गोष्ट करण्याची इच्छा असणे सगळ्यात महत्वाचे आहे तेव्हाच आपली पूर्ण क्षमता त्या कामात लावली जाते आणि ते काम आपण सर्वोत्कृष्ट करतो. त्यामुळे कोणतेही काम सुरु करण्याआधी त्याबद्दल मनात असलेल्या सगळ्या शंका काढून टाकून मगच त्या कामाला सुरवात करणे गरजेचे आहे.

२. निश्चित योजना आखून तिची अंमलबजावणी करा

कुठलीही गोष्ट व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट करावी लागते ती म्हणजे त्या गोष्टीची योजना तयार करणे.

अगदी लहानात लहान गोष्ट सुद्धा कोणताही अडथळा न येता करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे एक सुसंगत योजना असावी लागते.

आपल्याला जे काम करायचे आहे ते करायची योग्य पद्धत कुठली, त्या कामासाठी लागणारा वेळ किती असेल, ते काम करताना काय चुका होऊ शकतात इत्यादी सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला त्यासाठी योजना बनवावी लागते.

पण आपली योजना बनवून झाली की मग खरी कसोटी लागते कारण बऱ्याचवेळा योजना बनवणे हे फार सोपे काम असते पण त्याची अंमलबजावणी सगळ्यात कठीण असते.

हे समजून घेण्यासाठी आपण एक साधे उदाहरण बघू….

एखाद्या पोस्टरवर कुठल्यातरी हिरोची सिक्स पॅक वाली बॉडी बघून आपण सुद्धा तशीच बॉडी बनवायचे स्वप्न बघायला लागतो. त्यासाठी लगेच आपण एक योजना सुद्धा बनवून टाकतो.

एखाद्या चांगल्या जिमला नाव नोंदवतो, रोज काय खायचे, किती खायचे, काय काय नाही खायचे ह्या सगळ्याची यादी बनवून घेतो.

जिममध्ये रोज कसा व्यायाम करायचा किती व्यायाम करायचा, किती महिन्यात काय प्रगती होईल सगळं ठरवतो पण पुढे, मजा सुरु होते.

दुसऱ्या दिवशी ठरवलेल्या योजनेप्रमाणे आपण सकाळी ६ वाजता उठायचा प्रयत्न करतो आणि आळस करून योजना बदलतो…. किती वेळा होतं बरं असं??

असेच आपल्या आवडत्या खाण्याबद्दल होते जे आपण न खायची योजना बनवलेली असते आणि शेवटी आपली अगदी परिपूर्ण योजना असून सुद्धा त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आपल्याला हवे तसे यश मिळत नाही.

त्यामुळे फक्त चांगली योजना असणे महत्वाचे नाही तर त्याची अगदी काटेकोर अंबलबजावणी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. योजना व्यवस्थित नसेल किंवा त्याची अंबलबजावणी नीट केली नसेल तर अपेक्षित यश मिळणे शक्य नसते.

आखलेल्या योजनेची अंमलबजावणी नीट होण्यासाठी गुरु किंवा मेंटॉर म्हणून योग्य व्यक्ती कोणी असेल तर त्यांना ते हक्क द्या…

तसे नसल्यास तुमची इच्छाशक्ती हीच तुमची मेंटॉर ठरू शकते हे कधीही विसरू नका.

३. शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपा

कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाची असते ती एकाग्रता. कोणतेही काम करताना, त्याची योजना बनवताना आपले मन जेवढे एकाग्र असेल तेवढेच त्या कामात आपली पूर्ण शारीरिक आणि मानसिक ताकद लागते आणि त्या कामात आपल्याला यश मिळण्याची शक्यता वाढते.

मात्र आपले मन एकाग्र होण्यासाठी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले असणे फार गरजेचे असते. जर आपण आजारी असू तर अशावेळी आपले मन आपल्याला हवे तसे काम करणार नाही आणि आपण आपले धेय्य प्राप्त करू शकणार नाही.

ह्यासाठी रोज नियमित व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप ह्या सगळ्याची फार गरज आहे. आपले शरीर जर आपण निरोगी ठेवले तर आपला कामाचा उत्साह वाढेल आणि आपण हवे ते काम पूर्ण करू शकू. शरीराबरोबरच मनाचे सुद्धा स्वास्थ्य फार महत्वाचे आहे.

नैराश्य, ताण ह्यासारख्या समस्यांनी जर आपले मन ग्रासलेले असेल तर त्यावर आपल्याला उपाय करणे गरजेचे आहे कारण मनाचे स्वास्थ हे आपल्या कामासाठी सगळ्यात महत्वाचे आहे.

प्राणायाम, दीर्घ श्वास, ध्यान अशा उपायांनी आपण मनाचा ताण कमी करू शकतो आणि मनाचे आरोग्य सुधारू शकतो. सुदृढ शरीर आणि निरोगी मन ह्यांच्या जोडीने आपण अगदी अशक्य वाटणारी कामे सुद्धा अगदी सहज पूर्ण करू शकतो.

शरीरी, मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी, इतकेच नाही तर तुमची फायनान्शिअल एम्म्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा मनाचेTalks वरचे वेगवेगळे लेख तुम्हाला मदत करतील.

ह्या तीन सोप्या गोष्टींवर जर आपण पुरेसे लक्ष दिले आणि त्यानुसार काम केले तर आपण आयुष्यात हवे त्या गोष्टीत यश मिळवू शकतो.

मनाचे श्लोक

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थीवर मात करण्यासाठी हे करा”

  1. खुप छान उपाय सांगितले आहेत. त्याची जाणीव ठेवून योग्य वेळी, योग्य प्रसंगी वापर केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल.
    मनाचे talks टीम चे मनापासून आभार व शुभेच्छा.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय