जीवनाच्या प्रवासातून शिका जीवनाचे २३ धडे : Art of Living

या पृथ्वीवरचा सर्वात अवघड प्रवास म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर करणे? नर्मदा परिक्रमा की आणखी काही? नाही..नाही. यापैकी काही नाही. आपले जीवनच सर्वात खडतर प्रवास आहे.

या जीवनातून नेमके कोणते धडे आपण घ्यायला हवेत? वाचा आजच्या लेखात.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास सारखा नाही. कोणाचा मखमली तर कोणाचा काटेरी प्रवास असतोच. जीवन एक प्रवास आहे.

पण, तो कसा करायचा? हे शिकवणारी कोणतीच शाळा जगाच्या पाठीवर नाही. पण, आपण यासाठी तयार होतो. ते कसे बरे? इतरांच्या आणि स्वतःच्या अनुभवातून शिकत जातो.

जीवनात अचानक येणारी अनेक प्रकारची संकटे आपण टाळू शकत नाही. त्यातून खूप काही धडे घेतो. इतरांच्या वेदनादायी कहाण्या ऐकून किंवा स्वतः बरोबर घडणाऱ्या अनुभवून हृदय पिळवटून जाते.

म्हणून, अनेकांना आत्मकथा आणि स्वयं-प्रेरणादायी पुस्तके वाचायला जास्त आवडतात. या आयुष्याच्या प्रवासातून आपल्याला मिळणार्‍या धड्यांची उजळणी कधी करतो का आपण? ती नेहमी करायलाच हवी.

आज तुम्हाला या लेखातून जीवनाच्या प्रवासातील 23 धड्यांची माहिती मिळणार आहे. कदाचित, तुम्हीही याचे साक्षीदार झाला असाल.

1) पूर्ण करू शकणार नाही अशी वचने देऊ नका.

आपण बर्‍याचदा भावनेच्या भरात काही वचने आपल्या नातेवाईकांना, पत्नीला, आई-वडिलांना देतो. मात्र, ती पूर्ण नाही करू शकलो तर, दोषाचे धनी होतो. त्यामुळे, भावनेच्या भरात जाऊन कोणतीही अशी वचने देण्याचा मोह टाळा. जी, तुम्ही कधीच पूर्ण करू शकणार नाही.

2) तुम्हाला चुका करण्याचा अधिकार आहे.

ज्याला भावना, आत्मा आहे, शरीर आहे अशी व्यक्ति म्हणजे ‘मनुष्य प्राणी’. तुम्ही माणूस आहात हे आधी लक्षात घ्या. तुमच्या हातून चुका होणारच. सर्वांच्या हातून त्या होतात. त्याला कोणीही अपवाद नाही. त्यामुळे चुका झाल्याच तर त्यातून धडा घ्या. त्या सुधारण्याचा प्रयत्न जरूर करा.

3) कोणत्याही महत्वाच्या निर्णयात मनाचे ऐका.

कोणताही निर्णय घेताना ‘मन की बात’ जरूर ऐका. कधी द्विधा मन:स्थिति असते; तेंव्हा तुमच्या अंत:करणाचा आवाज ऐका. तोच योग्य निर्णय देईल. सकारात्मक मनाचा आवाज नेहमी प्रगतीकडे नेणारा असतो.

4) लोक काय म्हणतील? हा विचार करू नका.

‘सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग?’. बर्‍याचदा लोक काय म्हणतील? या भीतीनेच आपण निर्णय घेत नाही. आपली जीवनशैली बदलत नाही. समाजाला खूप घाबरतो. लोकनिंदेला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. लोक दोन्ही बाजूने बोलतात. त्यांचा विचार न करता, तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा.

5) मागे पाहू नका, पुढे चालत रहा.

भूतकाळात काय घडले? कोणत्या अडचणी आल्या? याचा नाहक विचार करण्यात वेळ न घालवता तुम्ही तुमच्या वर्तमानाचा आणि भविष्यकाळचा विचार करा आणि त्यानुसार कृती करा.. “छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, नये सिरेसे लिखो, मिलकर नई कहानी….

6) तुम्हाला मूर्ख बनवण्याचा कोणालाही अधिकार नाही.

तुम्ही आयुष्याचा मार्ग स्वतः निवडल्यावर तुम्हाला त्याबाबत चिडवण्याचा, तुम्हाला मूर्ख बनवण्याचा अधिकार कोणालाही देऊ नका. भलेही तुम्ही त्यात खडतर प्रवास करत असला आणि सध्या काहीही करत नसला तरी. तो तुमचा निर्णय आहे. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा अधिकार कोणालाही देवू नका.

7) चिडखोर होऊ नका.

आपण खूपदा आपल्या मनासारखे नाही झाले की चिडतो. लोकांवर रागावतो. त्यांना वाट्टेल तसे बोलतो, वागवतो. अनेक लोकांकडून तशी वागणूकही आपल्याला कधी कधी मिळते. पण,असे वागण्याने नुकसान होते. त्यामुळे अशा चिडखोर लोकांकडून लांब रहा. तसे वागू नका.

8) तुम्हाला तुमची आवड आहे.

लोक जे सांगतील त्या गोष्टी आपण करायला जातो आणि बर्‍याचदा फसतो. लोक काहीही सांगतील पण, ‘ऐका जनाचे आणि करा मनाचे” लोकांना तुमच्या मनावर, जीवनावर अधिराज्य गाजवण्याची संधी देवू नका. तुम्ही तुमची आवड जपा.

9) कोणताही वेळ फुकट जात नाही.

तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळात काहीतरी ज्ञान घ्या. पुस्तके वाचा, गाणी ऐका, एखादी कला शिका. तुम्ही घेतलेल्या ज्ञानाचा कधीं ना कधी, कुठेतरी फायदा होतोच. कोणतीच वेळ वाया जात नाही. ती काहीं ना काहीतरी शिकवतेच.

10) हार मानू नका.

जोपर्यंत तुम्ही मनात आणत नाही तोपर्यंत, तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. तुमच्यातील ‘स्व’ जागृत ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. मनापासून एखादी गोष्ट करायला घेतलीत की ती पूर्ण करा.

11) तुमच्या वैयक्तिक सुखाला नेहमी प्राधान्य द्या.

तुम्ही जगासाठी काहीही करा, कोणीही असा पण तुम्हाला त्यातून काय मिळाले? तुम्ही काय गमावणार आहात? याचा वैयक्तिक विचार प्रथम करा. तुमच्या वैयक्तिक सुखाला नेहमी प्राधान्य द्या.

12) एक दार बंद झाले तर दुसरे नक्की उघडणार.

आयुष्यात अनेक चढ-उतार होतात. कधी नोकरी जाते, व्यवसाय बंद पडतो. एक दार बंद झाले म्हणून काय झाले? ईश्वराने दूसरा दरवाजा कुठेतरी उघडलेला असतोच. पण, तो शोधण्यासाठी तुम्हाला खूप दारे ठोटवावी लागतात. त्यासाठी कायम प्रयत्न करा.

13) तुमच्या यशाच्या मर्यादा ठरवा.

आयुष्यात कुठे थांबायचे हे ठरवता आले पाहिजे. तुम्ही आयुष्यात सत्ता, संपत्ति मिळवलीत तरी त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. तुम्ही ध्येय ठरवताना ते पूर्ण झाल्यावर, तुमच्या वचनपूर्तीनंतर कुठे विराम घ्यायचा हे ठरवा.

14) आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बना.

कुठलीही परिस्थिति आली तरी कोणासमोर पैशासाठी हात पसरायची वेळ तुमच्यावर येऊ देवू नका. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या सधन रहा. पैसा कमवा. त्याची योग्य बचत आणि गुंतवणूक करा.

15) तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करू नका.

तुम्ही कितीही चांगले काम करत असला तरी तुमच्या कामाची पोचपावती मिळत नसेल, तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न होत असेल, तुम्हाला नुसतेच राबवून घेतले जात असेल तर ते अजिबात सहन करू नका. खुपकाळ गप्प राहून सगळं सहन करू नका. बंडखोर व्हा.

16) रस्ता सोडू नका.

अडचणीचे पर्वत ओलांडून, संकटांच्या खळग्यातून तुम्ही 90% यश मिळवत आलात. पण, अगदी यशाच्या शिखरावर विराजमान होण्यावेळी कोणतेही मोठे संकट आले तर माघार घेऊ नका. त्याचा सामना करा. तुम्ही बर्‍याचदा माघार घ्यायचा प्रयत्न करता; पण तसे होत नाही. तुम्ही त्यात अडकता. पण अशावेळी धीर सोडू नका. ती गोष्ट सोडू नका.

17) अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे.

अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. चुका होतील, पण त्यातून नवीन ज्ञान मिळेल. ठेच लागून पडलात तरी उठून उभे राहायची जिद्द असेल तर काहीच अवघड नाही. अपयश आले तर खचू नका. प्रयत्नशील रहा.

18) तुमच्यासाठी योग्य असेल तेच निवडा.

आपण खूप सुरक्षित कोशात राहतो. कुठेही काम करण्यास घाबरतो. सुरक्षित गोष्ट करणे निवडण्यापेक्षा जे तुमच्यासाठी योग्य आहे ते निवडा.

तुम्हाला जर तुमच्या घरच्या जवळपास अगदी टुकार पगारची नोकरी मिळाली. त्याचवेळी त्याहीपेक्षा चांगल्या पगारची पण गावापासुन लांब नोकरी मिळाली तर तुम्ही काय निवडाल? बरोबर…चांगल्या पगाराची नोकरी.

तीच तुमच्यासाठी योग्य आहे. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते निवडा.

19) तुमच्यातील धाडसीपणा हाच सच्चा साथी.

संकटातून मार्ग काढायला तुम्ही स्वतःच स्वतःला मदत करू शकता. प्रत्येकवेळी कोणी ‘मसीहा’ बनून येणार नाही प्रत्येकवेळी तुम्हाला वाचवायला नातेवाईक, मित्र येणार नाहीत.

तुमच्यातील ‘धाडसीपणा’ मुळे तुम्ही त्याच्यावर मात करू शकता धाडस’ हाच सच्चा साथी आहे, हे लक्षात घ्या. धाडसीपणा’ वाढवा.

20) एकांतात राहाल तेंव्हा म्हणा ’आय ऍम बेस्ट’

तुमच्या कामाचे मूल्यांकन आणि निरीक्षण तुमच्याइतके चांगले दुसरे कोणीच करू शकत नाही. त्यामुळे अडचणीच्या काळात कधीतरी एकटे राहिलात तर याचा विचार जरूर करा.

तुमच्याइतके ‘बेस्ट’ तुम्हीच आहात, हे स्वतःला समजावा. तुम्ही एकटे असला तरी त्या संकटातून सहीसलामत निघण्याचा मार्ग शोधू शकता.

21) इतरांना प्रोत्साहन द्या.

तुम्ही जे काही स्वत:साठी करता, जे चांगले सकारात्मक विचार करता ते इतरांना सांगा. इतरांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन द्या. तुमच्यातील सकारात्मकता त्यांच्यातही येऊ दे.

22) जीवनात धोका पत्करा.

जेवणात सगळ्याच चवी हव्यात, तरच जेवणाची लज्जत वाढते. शरीराला पुष्टता मिळते. जीवनात काहीवेळा ‘धोका’ पत्करून काही कामे करावी लागतात.

त्याच्याशिवाय जीवन जगण्याची खरी मजा येत नाही. उडी मारायलाच घाबरलात तर आयुष्यात कधीच उडी नाही मारू शकणार.

पण, उडी मारण्याचा प्रयत्न केलात तर जिंकाल. उडी मारताना पडलात तर, उडी कशी मारायची? हे शिकाल. उडी मारायला घाबरण्यापेक्षा ती मारायला शिकणे कधीही चांगलेच.

23) स्वतःचा जिवलग मित्र किंवा शत्रू तुम्हीच असता.

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे आपण जाणतोच. तुम्ही स्वतःला तुमच्या आयुष्यात येणार्‍या संकटाशी सामना करण्यासाठी आत्मिक बळ देऊ शकता.

तुम्हीचा तुमचं सच्चा मित्र बनू शकता. तुमच्या मनातील भावना, सकारात्मक विचार यांच्याशी तुमची घट्ट मैत्री करा. तुमच्या नकारात्मक विचारांच्या शत्रूला तुमच्यावर विजय मिळवू देऊ नका. नकारात्मक विचार हाच सर्वात मोठा शत्रू आहे.

हे आहेत जीवनाच्या अनंत आणि अथांग प्रवासात आपण शिकलेले धडे. याहीपेक्षा तुमचे अनुभव वेगळे असू शकतील. काही लोकांचे असेच असतील किंवा याहूनही वेगळे असतील.

मित्रांनो, जन्म कुठे व्हावा, मृत्यू कुठे व्हावा, कोणत्या धर्मात व्हावा, आईवडील कोण असावेत हे तुम्ही ठरवू शकत नाही. त्यासाठी तक्रार करत बसण्यापेक्षा तुम्हाला जे ईश्वराने सुंदर जीवन दिले आहे ते आनंदाने जगायचे की निराशेत हे मात्र तुम्ही ठरवू शकता.

निसर्गाने दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून तुम्ही जीवनाचा प्रवास सुखी करू शकता. हे सर्वस्वी तुमच्या विचारात आहे. तुमच्या जीवनाचा प्रवास सुखकर होवो, हीच सदिच्छा!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा .

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “जीवनाच्या प्रवासातून शिका जीवनाचे २३ धडे : Art of Living”

  1. जीवनाच्या प्रवासातून शिकण्यासाठी आजच्या लेखात २३ धडे सांगितले आहे तिचा नक्कीच खुप फायदा होईल जर त्याकडे मनापासून लक्ष्य दिले व अंमलात आणले तर असे मला वाटते
    मनाचे talks team चे मनापासून धन्यवाद.

    Reply
  2. खूप छान मन अगदी अलगद झालय ,,खूप छान वाटतंय तुमचे असे मनापर्यंत पोहोचणारे विचार आणि काही महत्व पूर्ण गोष्टी मी नेहमी वाचत राहीन आणि दुसऱ्यांना पण सांगेन ,,मला अस वाटत आहे मला विचाराची तिजोरी भेटली की काय ,,😃 आनंद जिकडे तिकडे ☺️ thank you so much

    Reply
    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय