FD आणि SIP मध्ये कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी निवडावा?

FD आणि SIP मध्ये कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी निवडावा

जेव्हा आपण गुंतवणूकीचा विचार करतो तेव्हा नेहमीच द्विधा मनस्थिती होते की गुंतवणूक कुठे करावी, जेणेकरून चांगल्या परताव्याची हमी असेल. आणि आपला पैसा गरज पडेल तेव्हा सुरक्षितपणे काढता येईल.

कोणाचा असा विचार असतो की बँकेत FD करावी आणि निश्चिन्त राहावे, तर कोणी थोडे रिस्क घ्यायला सुद्धा तयार असतात. पण वाढीव रिटर्न्स मिळावेत म्हणून SIP करण्याकडे त्यांचा कल असतो.

FD म्हणजे काय? FD चे काम कसे चालते?

FD मध्ये एखादया बँकेत काही ठराविक कालावधी साठी तुम्ही पैसे गुंतवता. आणि जेव्हा याची मॅच्युरिटी येते तेव्हा ठराविक व्याज दराने तुम्हाला तुमचे पैसे मिळतात.

हा पर्याय बरेचदा लोक निवृत्ती नंतर स्वीकारतात. कारण तेव्हा गुंतवणूकीमध्ये धोका पत्करण्याची त्यांची क्षमता कमी असते.

यातून एक ठराविक रक्कम नियमितपणे मिळवणे सुद्धा शक्य असते. शिवाय आपल्या गरजे नुसार शेवटी व्याजाची रक्कम एकाच वेळी घेण्याचा पर्याय सुद्धा स्वीकारता येतो. किंवा व्याज सुद्धा मासिक पध्दतीने घेता येते.

SIP म्हणजे काय? SIP चे काम कसे चालते?

Systematic Investment Plan म्हणजे SIP हा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचाच एक पर्याय आहे.

यामध्ये प्रत्येक महिन्याला तुम्ही ठराविक गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणूक करताना गुणवणुकीचे ध्येय ठरवून, ठराविक रक्कम, कालावधी याची निवड तुम्ही करू शकता.

उदाहरणार्थ, ५ वर्षांनंतर घर घ्यायचं, किंवा ३ वर्षात मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा करायचा असं ठराविक ध्येय ठेवून त्यानुसार SIP ची निवड करता येते.

तुम्ही कितपत रिस्क घेऊ शकता यानुसार फंड ची निवड तुम्ही करू शकता. योग्य तो सल्ला घेऊन किंवा स्वतः अभ्यास करून इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रीड फंड अशी निवड तुम्ही करू शकता.

आपली रिस्क घेण्याची क्षमता किती, गुंतवणूकीचं ध्येय काय याचा विचार करून SIP किंवा FD यांची निवड तुम्ही करू शकता.

कमीत कमी गुंतवणूक किती असावी?

SIP मध्ये ५०० रुपये महिना कमीत कमी अशी गुंतवणूक तुम्ही सुरू करू शकता.

FD मध्ये कमीत कमी १ हजार ते १ लाख अशी गुंतवणूक करता येते. FD एकरकमी असल्याने एका वेळी जास्त रक्कम जवळ आली आणि ती सुरक्षित आणि रिस्क न घेता गुंतवायची असेल तर लोक FD चा पर्याय स्वीकारतात.

गुंतवणुकीचा कालावधी किती?

FD शोर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्हीही कालावधी साठी असते. कमीत कमी 7 दिवस, ४५ दिवस, दीड वर्षे आणि जास्तीत जास्त म्हणजे १० वर्षे कालावधी साठी सुद्धा FD करता येते.

याउलट SIP हा लॉंग टर्म साठी चांगले रिटन्स देणारा पर्याय आहे.

रिटर्न्स किती मिळतील?

गुंतवणूक म्हंटल की सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की रिटर्न्स किती मिळतील?

FD चे रिटर्न्स तर ठरलेले असतात पण SIP चे रिटर्न्स मात्र त्या ठराविक म्युच्युअल फंड चा परफॉर्मन्स आणि शेअर बाजाराचा चढ उतार यावर अवलंबून असतो.

SIP मध्ये गुंतवणूक करताना त्या फंडाचा हिस्ट्री परफॉर्मन्स बघून गुंतवणूक केली जाते. SIP मध्ये दर महिन्याला गुंतवणूक केली जात असल्याने शेअर बाजारच्या चढ उतारात सरासरी मूल्य मिळवून गुंतवणूक करता येते. शिवाय कालावधी जास्त असल्याने शेअर बाजाराच्या मोठ्या काळानंतर चढणाऱ्या भावाचा फायदा सुद्धा मिळवता येतो.

SIP मध्ये बचतीची आणि गुंतवणुकीची सवय किंवा शिस्त लागते. शिवाय यापासून मिळणारे रिटर्न्स हे कंपाऊंडिंग पद्धतीचे असतात.

याबद्दल ची विस्तारित माहिती सांगणारे लेख मनाचेTalks वर इतरत्र वाचायला मिळतील.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हो मैत्रिणींनो हे आम्ही भर देऊन का सांगतोय कारण, गुंतवणुकीचा किल्ला लढवणं हे बाईचं काम नाही हा आपल्याकडचा पारंपरिक समज असतो किंवा स्त्रिया स्वतःच यात भाग घेत नाहीत. म्हणून हि सर्व सोप्या भाषेत सांगितलेली माहिती घेऊन, सर्व बाजूंनी विचार करून तुमच्यासाठी योग्य अशी गुंतवणूक कोणती हे तुम्ही ठरवू शकता.

लेख कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगा. आपल्या मित्र मैत्रिणींना, उपलब्ध करून दिलेले पर्याय वापरून लेख शेअर करा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

9 Responses

 1. SD says:

  बाई चे काम नाही …असा वाक्याचा उपयोग करू नये. स्त्रियांना कमी लेखून तुम्ही अपमान कर आहात.नको ते वाक्य वापरण्याची लेखाची गरज नाही वाटत.

 2. जयंतराव हरिभाऊ घाटोळ says:

  आ. सर स.न.वि.वि.
  एका वर्षाने मी शासकीय सेवेतून निवृत्त होईन.माझ्या मुलांच्या आईला मात्र अजून सहा वर्षे वेळ आहे. तेव्हा वरील दोनपैकी कोणता पर्याय योग्य राहील हे कृपया कळवावे.

 3. Pratibha kature says:

  Chan mahiti aahe aankhi lekh taka karan baryach goshti guntvanukit aahe te kalayla have. Vishesh ledies karta.

 4. Sanjay Appasaheb Ghongadi says:

  अतिशय त्रोटक माहिती अजून विश्लेषण करणारी माहिती हवी.

 5. प्रमोद रा. नाईक says:

  FD, PPF व SIP या गुंतवणुकी विषयी सोप्या भाषेत समजेल अश्या पद्धतीने त्याचे फायदे, तोटे या बाबत सुरेख माहिती लेखात दिली आहे.
  मनाचे talks टीम चे मनापासून धन्यवाद.

 6. Popat Kurle says:

  Khup chan mahiti dili dhanyavad

 7. Kiran Shrikhande says:

  अशीच माहिती देत रहा म्हणजे आम्ही चुकीच्या मार्गांनी जाणार नाहीत

 8. PRAVIN KHANDEL says:

  Good suggestion for investment.

 9. संजय पवार says:

  मी मागील ३२ महिन्यापासून sip सुरू केली आहे, दरमहा रुपये ५०००/-हफ्ता आहे, आतापर्यंत चांगलें रिटर्न्स मिळत आहे.माझे माहितीनुसार भ.नि.नि.पेक्षा यात गुंतवणूक केली तर निश्चितच फायदा होईल.नोकरदार वर्गाचे जी.पी.एफ.वर आता काही निर्बंध घातले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!