मुलांना शिकवा, त्यांना मोठं होऊन जवाबदार बनवणारी ही पाच कौशल्ये

मुलांना शिकवा

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या मुलांचा मोठं होऊन बेजबाबदार ‘बबड्या’ होऊ नये म्हणून ही काही कौशल्ये त्यांच्यात रुजवण्याची काळजी त्यांच्या लहानपणापासून आई-बाबांनी घेतली तर मूलगा किंवा मुलगी मोठे होऊन जवाबदारी घ्यायला सक्षम होतील. त्याबद्दल आजचा हा लेख.

आपल्या मुलांना एक जवाबदार व्यक्ती म्हणून वाढवणं ही काही दिवस किंवा महिन्यांत साध्य होणारी गोष्ट नसते. लहानपणापासून आपला वेळ, प्रयत्न, त्या प्रयत्नांतलं सातत्य यातून मूल मोठं होता होता घरात आपली पण काही जवाबदारी आहे, या गोष्टीला समजून घेऊ शकतं.

हा प्रयत्न खरं तर लहानपणा पासूनच होणं गरजेचं आहे. जसं जसं त्यांचं वय वाढत जाईल तशी वाढत्या वयानुसार काही कौशल्ये त्यांच्यात कशी रुजत जातील इथून याची सुरुवात करायचं ‘स्किल’ आधी पालकांनी शिकून आणि समजून घेणं महत्त्वाचं. त्याच साठी आजचा हा लेख.

या गोष्टी एक काम म्हणून जर तुम्ही मुलांना सांगाल तर त्याचा कंटाळा केला जाणं, हे आपसूकचं होईल.

मुलांना जवाबदार बनवणारी पाच कौशल्ये

१) जेवण बनवण्याचं कौशल्य: मूल लहान असताना पालकांच्या छत्र छायेत असतं तेव्हा साहजिकच त्याला किंवा तिला जेवण बनवता आलं पाहिजे, याची आवश्यकता नसते.

पण जसं मूल मोठं होतं, शिक्षणासाठी किंवा इतर कारणाने घराबाहेर जाण्याची वेळ येते तेव्हा पोट भरण्यासाठी जंक फूड खाणं हा एकच मार्ग त्यांच्या समोर राहतो, हि सर्रास होणारी गोष्ट असते.

या कामाकडे लहान पणा पासून एक कौशल्य म्हणून जर त्यांनी पाहिलं असेल तर ते कंटाळवाणं त्यांना मुळीच वाटणार नाही.

हे कौशल्य म्हणून शिकवण्यासाठी प्रयत्न करताना. लहान पणा पासून त्यांना कोशिंबीर सारख्या गोष्टी करण्यात सहभागी करून घेणं…

पिझ्झा बद्दल मुलांना खूप क्रेझ असते, तर त्यांच्याकडून कणकेच्या बेसचा पिझ्झा बनवून घेणं, अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी करून जेवण बनवणं हे काम नसून एक स्किल आहे ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबवा.

ही काही एकदा किंवा दोनदा करण्याची गोष्ट नक्कीच नाही. ते मोठे होत जाताना याचं सातत्य ठेवत गेलं पाहिजे.

२) आर्थिक जवाबदारी घेण्याचं कौशल्य: घरात काही आर्थिक अडचणी असतील तर मुलांपासून त्या गोष्टी दूर ठेवणं, त्याची माहिती होऊ न देणं याकडे सहसा पालकांचा कल असतो.

मुलांना अडचणींची झळ बसू न देणं, हा त्यामागचा उद्देश असतो. पण त्यांना आर्थिक दृष्ट्या जवाबदार बनवण्यासाठी किंवा पैशांचं महत्त्व पटवून देण्यासाठी घरातील आर्थिक परिस्थिती बद्दल त्यांना अनभिज्ञ ठेऊन आपण स्वतःच त्यांना बेजबाबदार करत असतो हे पालकांना जाणवत सुद्धा नाही.

यासाठी घरातले खर्च काय असतात याची त्यांना माहिती होऊ द्या.

यामुळे अवाजवी खर्च न करण्याची समज त्यांच्यात आपोआपच येईल.

https://www.manachetalks.com/10450/how-to-tech-finance-to-kids/

३) संवाद कौशल्य: दोन अडीच वर्षांची झाली की मुलं बोलायला शिकतात. ते बोलायला, संवाद करायला शिकतात ते पालकांकडे पाहून.

मुलांना जवाबदार बनवण्याच्या प्रवासात गरजेचं ठरतं ते संवाद कौशल्य किंवा सोशल स्किल…

अनोळखी लोकांशी बोलणे कसे सुरू करायचे? अनोळखी लोकांशी बोलणं सूरु करून स्वतः ची ओळख निर्माण करणं जर त्यांना जमायला लागलं तर, त्यांच्यातला आत्मविश्वास वाढतो.

हा आत्मविश्वास आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना उपयोगी पडतो.

४) काही टार्गेट ठरवून ते पूर्ण करण्याचं कौशल्य: मुलांना मोठं होऊन जवाबदार व्यक्ती बनवायचं असेल तर काहीतरी ध्येय ठरवून ते पूर्ण करण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी भिवनवणं गरजेचं आहे.

आता नक्कीच मूल १० वर्षाचं असताना, त्याला किंवा तिला आयुष्याचं ध्येय ठरवायची गरज नाही…

पण अशा वेळी त्यांच्या वया नुसार छोटे-छोटे टास्क पूर्ण करण्यातून मिळणारा आनंद अनुभवण्याची सवय त्यांना मोठे होऊन आयुष्यात जवाबदारी घेऊन ध्येय पूर्ण करण्यासाठी तयार करेल.

५) स्वतः काहीतरी मिळवण्याची जिद्द: आपल्या देशात मुलांनी त्यांचं शिक्षण पूर्ण होण्याआधी काही काम करणे, हा विचार अजून तितकासा रुजलेला नाही.

पाश्चात्य देशांमध्ये किशोर वयात असताना किंवा कॉलेज शिक्षण घेताना छोटी छोटी कामं करून आपल्या गरजे पुरते पैसे कमावणं हे सामान्य मानलं जातं.

ती कामं नक्कीच त्यांच्या शिक्षणाला पूरक असू शकतात. यातून त्यांचं सोशल स्किल वाढवायला सुद्धा मदत होऊ शकते.

याने ते जसे जसे मोठे होतात तशी त्यांच्यातली क्षमता वाढत जाते. त्यांना जवाबदारीची जाणीव होते. कुठलेली काम छोटे नाही हे समजायला मदत होते.

शिवाय अगदी ग्रॅज्युएशन-पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही, या दुष्टचक्रात अडकण्याची वेळ त्यांच्यावर येत नाही. अशा पद्धतीने वाढवलेल्या मुलांना शिक्षण पूर्ण करून करियरसाठी स्ट्रगल करण्याची वेळ येत नाही.

मुलांना जवाबदार, सेल्फ मोटिव्हेटेड बनवणाऱ्या पालकत्त्वाची दहा सूत्र

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या मुलांचा मोठं होऊन बेजबाबदार ‘बबड्या’ होऊ नये म्हणून ही काही कौशल्ये त्यांच्यात रुजवण्याची काळजी त्यांच्या लहानपणापासून आई-बाबांनी घेतली तर मूलगा किंवा मुलगी मोठे होऊन जवाबदारी घ्यायला सक्षम होतील.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा /टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!