रोज दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

तुम्ही रोजच्या जेवणात दही खाता का? नसाल खात तर हा लेख वाचा.

दह्याचे आपल्या आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत? आणि दही आपल्या रोजच्या आहाराचा एक महत्वाचा घटक का असला पाहिजे?

तसा तो नसला तर तो का असायला हवा हे सांगण्यासाठीच आजचा हा लेख आहे.

रोज दही खाण्याचे फायदे:

१. दही पचनासाठी चांगलं असतं

दुधाचं दही होण्याच्या क्रियेत ‘लॅक्टिक ऍसिड बॅक्टरीया’ म्हणजेच ‘लॅक्टोबॅसीलस’ हे बॅक्टरीया कारणीभूत असतात.

सगळेच बॅक्टरीया काही रोगराई पसरवत नाहीत तर काही बॅक्टरीया आपल्याला गरजेचे सुद्धा असतात.

दह्यात असणारे ‘लॅक्टोबॅसीलस’ हे याच प्रकारचे बॅक्टरीया आहेत.

हे ‘लॅक्टोबॅसीलस’ आपल्या आतड्यात एरवी सुद्धा असतात.

ते पचनासाठी मदत करतात, पण कधीतरी काही औषधांनी म्हणा किंवा इतर काही इन्फेक्शन असेल तर, आतड्यातल्या या बॅक्टरीयाची संख्या कमी होते आणि त्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.

म्हणून नियमितपणे दही खाल्लं तर हे आतड्यातले बॅक्टरीया कमी होत नाहीत, उलट वाढतात ज्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते.

२. दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते

आपण वर बघितलं आहेच की आपल्या आतड्यात लॅक्टोबॅसीलस असतात जे की दह्यात आढळतात.

पण यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती नेमकी कशी वाढते ते पण कसं इंटरेस्टिंग आहे बघा…

अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर समजा जर चुकून आपल्या खाण्यात काही वेडंवाकडं आलं.

आणि आपल्याला धोकादायक असे रोग पसरवणारे बॅक्टरीया आपल्या पोटात जरी गेले, तरी पचनाच्या वेळी आतड्यातले लॅक्टोबॅसीलस त्यांना मारून टाकतात.

रोज दही खाल्लं तर आपल्या आतड्यातल्या ‘लॅक्टोबॅसीलसची’ संख्या पुरेशी राहते त्यामुळे समजा एखादा रोगराई पसरवणारा बॅक्टरीया खाण्यातून आलाच,

तरीही आपल्याला तो आजारी पाडण्यात यशस्वी होऊ शकत नाही, म्हणजेच आपलं शरीर त्या रोगावर मात करतं.

३. निरोगी आणि तेजस्वी त्वचा

नियमित दही खाल्लं तर कोरडी, रखरखीत त्वचा नितळ होते.

दही चेहऱ्याला किंवा हातापायाला वरून जरी लावले तरी त्वचा मऊ होते.

केसांना सुद्धा दही लावलं तर कोंडा नाहीसा होतो.

दह्यातले लॅक्टोबॅसीलस ‘डेड स्किन सेल्स’ अलगदपणे काढून टाकतात ज्यामुळे त्वचा निखरते आणि त्वचेबद्दलच्या किरकोळ तक्रारी दूर होतात.

कपडे धुतल्या नंतर डिटर्जंट पावडर मुळे हाताला येणारा रखरखीतपणा नियमितपणे हाताला दही लावले तर कमी होतो.

५. दह्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो

नियमितपणे जेवणात थोडं दही खाल्लं तर त्याचा फायदा आपल्या हृदयावर सुद्धा होतो.

ज्यांना उच्चरक्तदाबाचा म्हणजे हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांना दह्याचा विशेष फायदा होतो.

फक्त अशा लोकांनी दही खाताना शक्यतो ते लो फॅट दुधापासून किंवा गाईच्या दुधापासून केलेलं आहे याची खबरदारी बाळगावी कारण म्हशीच्या दुधात किंवा फुल क्रीम दुधात फॅट जास्त असतात जे हायपरटेन्शन असलेल्या पेशन्ट्ससाठी चांगलं नसतं.

६. दह्यामुळे योनीमार्गात इन्फेक्शन होत नाही

योनीमार्गात लॅक्टोबॅसीलस तर असतोच पण त्याचबरोबर यीस्ट नावाची फंगस सुद्धा असते.

एरवी या ईस्टमुळे काही त्रास होत नाही पण जर एखाद्या डायबेटीस सारख्या आजारामुळे किंवा अस्वच्छतेमुळे कधी हे यीस्ट प्रमाणाबाहेर वाढले तर त्यामुळे वजायनल इन्फेक्शन होते.

मग दह्याचा इथे नेमका कसा फायदा होतो? बरोबर!

दह्यातले आपले लाडके लॅक्टोबॅसीलस या यीस्टची वाढ नैसर्गिकरित्या खुंटवतात आणि त्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

७. दही हाडांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं

हाडांच्या बळकटी साठी उपयुक्त असणारं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-१२ दह्यात भरपूर प्रमाणात असतं.

८. वजन कमी करण्यासाठी

American Dietetic Association च्या अभ्यासानुसार दही हे उत्तम ‘फॅट बर्नर’ असून त्यात असलेले कॅल्शिअम हे ‘बॉडी मास इंडेक्स’ संतुलित ठेऊन वजन नियंत्रणात ठेवायला आणि तरीही शरीराचे योग्य पोषण करायला मदत करते.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण रोजच अनेक पदार्थांतून किंवा अगदी नुसतं सुद्धा खात असलेल्या दह्याचे आज आपण अनेक फायदे बघितले.

पण अति तिथे माती ही म्हण आपल्याला माहीत आहेच.

त्यामुळे कोणत्याच गोष्टीत अति करून चालत नाही हे आपण दही खाताना सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. वरील फायदे हे दही योग्य प्रमाणात खाल्ल्याने होत असतात अन्यथा त्यातून नुकसानच होण्याची शक्यता जास्त आहे ही गोष्ट दह्याचा आपल्या आहारात समावेश करताना आपण लक्षात ठेवली पाहिजे .

या लेखामुळे तुम्हाला रोज दही खाण्याचे फायदे तर कळले पण त्याचबरोबर जर तुमचे दह्याबद्दल काही गैरसमज असतील तर ते सुद्धा दूर झाले असतीलच हो ना!

दह्याचे फायदे सांगणारा हा लेख तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी ह्यांच्याबरोबर शेयर करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय