कांदे खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

तुम्ही जेवणात कांदा खाता? मग त्यातून तुम्हाला काय काय फायदे होतात हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

आपल्या जेवणात कांद्याचा वापर भरपूर प्रमाणात असतो.

जवळजवळ सगळ्या भाज्यांमध्ये आपण कांदा चिरून तरी घालतो किंवा तो वाटून त्याचा मसाल्यात, ग्रेव्हीसाठी वापर करतो.

काही ठराविक जेवणाबरोबर तर कच्चा कांदा सुद्धा आपल्याला लागतोच.

काही लोकं श्रावणात तर काही पूर्ण चातुर्मासात कांदा आणि कांद्याचे पदार्थ खात नाहीत, पण हे काही महिने वगळले तर बहुतेक घरात कांदा खाल्ला जातोच पण ती एक सवय किंवा चवीची आवड म्हणून.

कांद्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे असतात, त्यातून आपल्याला काय काय आवश्यक पदार्थ मिळतात याबद्दल आपल्याला माहिती नसते.

पण आपल्या आहारातल्या प्रत्येक पदार्थाबद्दल अगदी सखोल नाही तरी थोडी माहिती आपल्या सगळ्यांनाच असलीच पाहिजे हो ना?

जेणेकरून आरोग्यासाठी या नैसर्गिक औषधांचा पुरेपुर वापर आपल्याला करता येईल.

आम्ही अशा वेगवेगळ्या पदार्थांबद्दल शास्त्रीय माहिती तुमच्यासमोर घेऊन येत असतोच त्यातून काय खावं, काय खाऊ नये आणि काय किती प्रमाणात खावं याचा अंदाज येतो.

जसं मागील एका लेखात दही म्हटलं की, ‘लॅक्टोबॅसिलस’ आपल्यासाठी काय काय करायला सज्ज असतं, हे आपण वाचलं होतं.

https://www.manachetalks.com/12782/benefits-of-eating-curd-marathi/

आज या लेखातून आम्ही अशीच आगळीवेगळी माहिती घेऊन आलो आहोत आणि ती म्हणजे कांदे खाण्याचे फायदे!

तुम्ही कांदे खात असाल तरी आणि खात नसाल तरी हे फायदे तुम्ही वाचलेच पाहिजेत!

१. कांद्यामध्ये भरपूर पोषणद्रव्य असतात

पोषणद्रव्य म्हणजेच ज्याला आपण ‘न्यूट्रीएन्ट्स’ म्हणतो ती खरंतर सगळ्याच भाज्यांमधे आणि फळांमधे आढळतात.

पण कांदा ही एक अशी फळभाजी आहे जी ‘न्यूट्रीएन्ट डेन्स’ आहे, म्हणजे काय?

तर कांद्यात कॅलरी कमी आणि व्हिटॅमिन्स व मिनरल्स अधिक प्रमाणात असतात.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की एका मध्यम आकाराच्या कांद्यात फक्त ४४ कॅलरीज असतात.

कांद्यात व्हिटॅमिन ‘सी’ हे भरपूर प्रमाणात आढळतं.

व्हिटॅमिन ‘सी’ आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी उपयोगाचं असतं आणि त्याचबरोबर ते एक उत्तम अँटीऑक्सिडन्ट असतं.

अँटीऑक्सिडन्ट आपल्या शरीरातील ‘फ्री रॅडीकल्स’ पासून आपल्या इतर पेशींचं संरक्षण करतं.

हे जे फ्री रॅडीकल्स असतात, हे आपल्या शरीरातील इतर पेशींसाठी हानिकारक असतात त्यामुळे कांदा आपल्यासाठी किती फायदेशीर असतो, हे आपल्या लक्षात आलंच असेल.

पण तरी कांद्याचं महत्व पटावं म्हणून पुढे वाचा!

कांद्यामध्ये व्हिटॅमिन ‘बी’ सुद्धा जास्त प्रमाणात आढळतं ज्यामुळे पचनासाठी फायदा होतो.

कांद्यात जास्त प्रमाणात आढळणारे पोटॅशिअम हे, मसल्स, नर्व्हस सिस्टम, किडनी या सगळ्याला फायदेशीर असतं.

२. कांद्यामुळे ह्रदयविकारासारखे आजार दूर राहतात

कांद्यात आढळणाऱ्या अँटीऑक्सिडंन्ट्सचा अजून एक फायदा असा की त्यामुळे रक्ताततल्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते त्यामुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.

कांद्यामुळे हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशरचा त्रास सुद्धा कमी होतो.

जेवणात कांद्याचं प्रमाण वाढवल्याने रक्तात गुठळ्या होत नाहीत ज्यामुळे ह्रदयाचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

कांद्याचा लाल रंग हे त्यात असणाऱ्या एन्थोसायनिन या द्रव्यामुळे असतो. एन्थोसायनिनमुळे ह्रदयविकाराचा त्रास होत नाही.

३. कांद्यात अँटीऑक्सिडन्टचं प्रमाण जास्त असतं

ऑक्सिडेशन ही आपल्या शरीरात होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे.

ज्यामुळे आपल्या शरीरातल्या पेशींना नुकसान पोहोचते आणि त्यामुळे कॅन्सर, डायबेटीस आणि ह्रदयविकारासारखे आजार होतात.

कांद्यात असलेले अँटीऑक्सिडंन्ट्स हे अशा ऑक्सिडेशन प्रक्रियेपासून आपल्या पेशींचं संरक्षण करतात ज्यामुळे असे आजार लांब राहतात.

४. कांद्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो

कांदा, लसूण या एलीअम या फॅमिलीमधल्या भाज्यांमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

हे होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे या फॅमिलीमधल्या भाज्यांमध्ये मिळणारं ‘सल्फर’.

सल्फरमुळे शरीरात ट्युमर फॉर्मेशन होत नाही. कांद्यामुळे विशेषतः ओव्हरीचा आणि फुफुसचा कॅन्सर शरीरात जास्त पसरत नाही ज्यामुळे उपचार करणं सोपं जातं.

५. कांद्यामुळे डायबेटीस नियंत्रणात राहतो

कांद्यात आढळणाऱ्या सल्फरमुळे रक्तात अतिरिक्त वाढणारी साखर कमी व्हायला मदत होते.

याचा डायबेटीस असणाऱ्या पेशन्ट्सना विशेष फायदा होतो.

डायबेटीसच्या पेशंट्सनी त्यांच्या आहारात कांद्याचा वापर वाढवला तर त्यांची वाढलेली शुगर कमी होते.

६. हाडांच्या आरोग्यासाठी कांदा फायदेशीर

आपण हे तर नेहमीच ऐकतो, की हाडांच्या आरोग्यासाठी दूध आणि दुधाचे पदार्थ सर्वोत्तम कारण त्यात कॅल्शिअम अधिक प्रमाणात आढळतं.

पण दुधाव्यतिरिक्त सुद्धा असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्या हाडांच्या एकूण आरोग्यासाठी, हाडांना बळकट करण्यासाठी उपयुक्त असतात.

आणि कांदा सुद्धा अशाच अनेक पदार्थांपैकी एक आहे. कांद्यात अधिक प्रमाणात आढळणाऱ्या अँटीऑक्सिडंन्ट्समुळे हाडांची झीज कमी होते.

आणि त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडं झिजून ठिसूळ होण्याचं प्रमाण कमी होतं.

साधारण वयाच्या चाळीशीनंतर हाडांची झीज जास्त व्हायला लागते, अशा वेळेला जेवणात जर कांद्याचा वापर वाढवला तर फायदा होऊ शकतो.

७. कांदा जंतुनाशक असतो

कांद्याच्या रसात अँटीबॅक्टेरिअल प्रॉपर्टीज असतात, म्हणजेच कांदा जंतूनाशक असतो.

कांद्यात आढळणाऱ्या केसर्टिन या द्रव्यामुळे कांद्याला या अँटी-बॅक्टेरियल प्रॉपर्टीज मिळतात.

पोट बिघडवणारे अनेक बॅक्टरीया कांद्याच्या रसात जिवंत राहू शकत नाहीत.

हे ऐकून आश्चर्य वाटेल की कॉलरासारखा भयंकर आजार पसरवणारे बॅक्टरीया सुद्धा जिवंत राहत नाहीत.

कांद्यात प्रीबायोटिक्स जास्त प्रमाणात असतात.

प्रीबायोटिक्स म्हणजे आपल्याला न पचणारा पण आपल्या पोटात (आतड्यात) असणाऱ्या ‘गुड बॅक्टेरीया’चं अन्न असलेला एक पदार्थ.

प्रीबायोटिक्समुळे, आतड्यात या ‘गुड बॅक्टेरीयाची’ संख्या वाढते आणि त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते.

याच बॅक्टेरीयामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते ज्यामुळे सारखे अपचनाचे त्रास होत नाहीत. पोटाच्या किरकोळ तक्रारी असतील, अपचन असेल तर कांदा खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण जवळजवळ रोज खत असलेल्या या कांद्याचे इतके फायदे असतात हे तुम्हाला नवीनच कळलं ना?

इतके फायदे असणाऱ्या या कांद्याचा अजून एक फायदा म्हणजे हे खायला अतिशय सोपे असतात ज्यामुळे यांचा वापर आपण आपल्या रोजच्या जेवणात अगदी सहजपणे करू शकतो.

कांदा कोणत्याही भाजीत किंवा आमटीत पटकन चिरून घालता येतो किंवा अगदी कच्चा सुद्धा आवडीने खाल्ला जातो.

एखाद्या दिवशी भाजी करायचा कंटाळा आला तर पटकन कांदा टोमॅटो चिरून मस्तपैकी कोशिंबीर करता येते.

याशिवाय आपण उत्तप्पा, आम्लेट, टोमॅटो आम्लेट या सारख्या पदार्थात सुद्धा कांदा घालू शकतो.

कोणतंही सूप करताना सुद्धा त्यात कांदा घातला तर चव सुधारते आणि कांद्याचा रस पोटात जाऊन त्याचे फायदे होतात ते वेगळेच.

आपण किती प्रकारे कांदा खाऊ शकतो याची ही केवळ उदाहरणं आहेत.

तुम्ही अजून कोणत्या प्रकारे कोणकोणत्या पदार्थात कांदा वापरता हे आम्हाला कॉमेंटमध्ये पटापट कळवा आणि हा लेख तुमच्या मित्रांबरोबर शेयर करून त्यांना सुद्धा कांद्याचे हे फायदे सांगा.

मनाचे श्लोक

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “कांदे खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय