रताळे खाण्याचे आरोग्यासाठी फायदे

आपल्या आहारात काही अशा भाज्या आणि फळं असतात ज्या आपण नियमितपणे खात असतो, तर काही पदार्थ, फळं, भाज्या आपण फक्त काही निमित्ताने खातो.

मागच्या लेखात आपण अशाच एका केवळ उपासापुरत्या मर्यादित असलेल्या पदार्थाचे- भगरीचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते बघितले.

आणि ते फक्त उपासापुरते मर्यादित नसावे याबद्दल आपली खात्री पटली.

आता आपण अशाच एका दुसऱ्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत, ते म्हणजे रताळे….

रताळ्याचा समावेश आपल्या आहारात केला तर त्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

रताळे सुद्धा आपण सहसा उपासालाच खातो. इतर वेळी सहसा नाहीच..

पण हे गोडसर चवीचे कंदमूळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे.

रताळ्यात पोषक असं काय आहे आणि ते नियमितपणे का खाल्ले पाहिजे!

१. रताळे हे पौष्टिक कंदमूळ आहे

रताळ्यामधे खनिजे आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आढळतात.

निरोगी आयुष्यासाठी खजिने आणि व्हिटॅमिन्स ही जास्तीत जास्त आपल्या आहारातून मिळवायचा प्रयत्न करावा.

अन्यथा एखाद्या खनिजाची किंवा व्हिटॅमिनची कमरता होतो आणि मग त्यासाठी सप्लिमेंट्स घ्यावी लागतात.

रताळ्यामधे आयर्न, कॅल्शिअम यासारखी महत्वाची खनिजे जास्त प्रमाणात आढळतात.

आयर्नचा उपयोग हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होतो तर कॅल्शिअम हे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते.

रतळ्यामधे व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘सी’ जास्त प्रमाणात आढळतात.

बिटाकॅरोटीन नावाचे अँटिऑक्सिडेन्ट रताळ्यात जास्त प्रमाणात आढळते. बिटाकॅरोटीनचे आपल्या शरीरात आल्यावर व्हिटॅमिन ‘ए’ मध्ये रूपांतर होते.

२. कॅन्सरचा धोका कमी होतो

अँटिऑक्सिडंट्स हे आपल्या शरीरातल्या पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करत असतात.

फ्री रॅडिकल्स आपल्या पेशींच्या आरोग्यासाठी हानिकारक असते आणि कॅन्सर होण्यामागचे महत्वाचे कारण आहे.

आपल्या जेवणात रताळ्याचा वापर वाढवला तर आपल्याला अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात मिळतात आणि फ्री रॅडिकल्समुळे होणारे ऑक्सिडेशन कमी होते.

रताळ्याच्या सालींमध्ये ही अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळतात त्यामुळे शक्यतो रताळ्याचा वापर करताना सालीसकट केला तर फायद्याचे ठरते.

३. पचनक्रियेसाठी लाभदायक

आपल्या आहारात जर फायबरचे प्रमाण जास्त असेल तर ते आपल्या पचनसंस्थेच्या एकंदरीत आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

अपचनाच्या तक्रारी फायबरचे प्रमाण वाढवल्याने दूर होतात.

रताळ्यात फायबर जास्त प्रमाणात आढळतात म्हणून आपल्या आहारातले फायबर वाढवण्यासाठी रताळ्याचा वापर करता येतो.

आहारात फायबरचे जास्त असलेले प्रमाण हे कॉन्स्टिपेशनच्या तक्रारी दूर करण्यासाठी सुद्धा फायदेशीर असतात.

फायबरचा अजून एक फायदा म्हणजे, फायबर जास्त असलेले पदार्थ आहारात असतील तर पोट भरल्याची भावना सुद्धा लवकर होते, ज्यामुळे वजन आटोक्यात ठेवायला फायदा होतो.

फायबरमुळे आपला पचनक्रियेचा वेग कमी होतो ज्यामुळे पोट भरल्याची भावना जास्त काळ टिकून राहते आणि वारंवार भूक लागत नाही.

रताळ्याचा आपल्या पचनसंस्थेला होणार अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे रताळ्यात आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे आपल्या आतड्यात असणाऱ्या लॅक्टोबॅसिलस या बॅक्टरीयाची वाढ होते.

लॅक्टोबॅसिलस हा ‘गुड बॅक्टरीया’ पचनासाठी अत्यंत लाभदायक असतो.

४. डोळयांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

रताळ्यात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या ‘बीटा कॅरोटीन’ या अँटिऑक्सिडंटचे शरीरात गेल्यावर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होते.

व्हिटॅमिन ‘ए’ हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. व्हिटॅमिन ए च्या कमतरेतेमुळे रातांधळेपणाचा आजार होतो.

म्हणूनच रताळ्याच्या नियमित सेवनाने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात आणि रातांधळेपणाचा धोका कमी होतो.

५. मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी लाभदायक

रताळ्यामधे जास्त प्रमाणात आढळणारे ‘ऍन्थोसायनिन’ हे अँटिऑक्सिडंट मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते.

अँथोसायनिनचा आकलनशक्ती आणि समरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो तसेच विसरभोळेपणा सुद्धा कमी होतो.

६. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त

व्हिटॅमिन ‘ए’ आणि व्हिटॅमिन ‘सी’ हे दोन्ही व्हिटॅमिन्स आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतात.

आपल्या आहारात व्हिटॅमिन्सचे आणि मिनरल्सचे (खनिजे) प्रमाण जास्त असेल तर रोगांपासून तसाही आपला बचाव होतोच, पण रताळ्या मधून विशेषतः व्हिटॅमिन ‘ए’ आणि व्हिटॅमिन ‘सी’ हे जास्त प्रमाणात मिळतात.

याचसाठी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रताळी फायदेशीर आहेत.

उपास सोडून एरवी फारसे न खाल्ले जाणारे हे कंदमूळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे हा लेख वाचून आपल्या लक्षात आलेच असेल.

चवीला बटाट्यासारखी पण किंचित गोडसर असणारी रताळी सहसा सगळ्यांना आवडतातच.

आपण ज्या प्रकारे आहारात बटाट्याचा वापर करतो अगदी त्याच प्रकारे बटाट्याच्या ऐवजी काही पदार्थांमध्ये उपास नसताना सुद्धा रताळ्याचा उपयोग करून आपल्या आरोग्याला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळवून देऊ शकतो.

उपासाच्या दिवसात सुद्धा कमी जेवणातून आपल्याला जास्तीत जास्त पोषकद्रवे मिळावीत आणि न खाण्याने अशक्तपणा येऊ नये यासाठी रताळे हा अतिशय उत्तम पर्याय आहे.

उद्यापासून सुरू होणारे नवरात्रीचे उपवास जर तुम्ही करणार असाल, तर भगर, रताळे, भरपूर फळे, दूध आणि दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी, असा आपला आहार ठेवा… म्हणजे उपवास संपवून दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच नेहमीपेक्षा जास्त ताजे तवाने झालेले असाल.

नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

खजूर खाण्याचे फायदे

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय