एखादी वाईट आठवण मनातून काढून टाकण्याचे ८ सोपे मार्ग

आपले आयुष्य म्हणजे अनेक घटनांची साखळीच.

आपल्या मोकळ्या वेळात आपल्याला आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या अनेक आठवणी येत असतात.

काही आठवणींनी आपल्या चेहऱ्यावर छानसे हसू येते, काहींनी थोडा त्रास होतो तर काही अगदी चुकून सुद्धा आठवू नयेत अशा असतात.

खरेतर आपल्याला या आठवणी विसरून जायला जमले असते तर किती बरे झाले असते असा विचार सुद्धा आपल्या मनाला शिवून जातो.

मित्रांनो, तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना, व्यक्ती असतात ज्याच्याशी जोडलेल्या आठवणी त्यांना नको वाटतात.

जुन्या, घडून गेलेल्या गोष्टींमुळे वर्तमान का खराब करा?

असा साधा प्रश्न कधी कोणी आपल्याला विचारला तर आपले उत्तर काय असते?

“विसरता आले असते तर अजून काय हवे होते?” हो ना?

पण तुम्हाला माहितीये का? या वाईट आठवणी विसरणे शक्य आहे!

नको असलेल्या घटना मनातून कायमच्या काढून टाकण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात.

तुम्हाला ते जाणून घ्यायला आवडतील याची आम्हाला कल्पना आहे म्हणूनच हा लेख आम्ही घेऊन आलोय.

नको असलेल्या आठवणी मनातून कायमच्या पुसल्या जाण्यासाठी काय करावे :

१. वाईट आठवण एखाद्या स्थळाशी निगडित असेल तर, काही काळासाठी त्यापासून दूर राहा

आपल्या बऱ्याचशा आठवणी एखाद्या स्थळाशी किंवा वस्तूशी निगडित असतात.

एखादे स्थळ किंवा वस्तू बघितली की आपल्या मनात त्यासंबंधी आठवणींची मालिका सुरु होते.

समजण्यासाठी सोपे उदाहरण घ्यायचे झाले तर समजा लहानपणी मित्राबरोबर खेळायला ज्या बागेत जायचात त्याच बागेत मोठेपणी त्याच मित्राशी कडाक्याचे भांडण झाले,

इतके की आता तुम्ही भेटल्यावर बोलत सुद्धा नाही.

पण जेव्हा त्या बागेच्या रस्त्याने तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला या मित्राची हमखास आठवण येते.

आणि त्याबरोबर त्या भांडणांची सुद्धा. मग यावर उपाय काय?

काही काळासाठी तो रस्ता टाळणे?

कारण काळ सर्व गोष्टींवरचे रामबाण औषध आहे.

थोडा वेळ गेला की, आपोआप त्या घटनेकडे त्रयस्थपणे बघणे माणसाला जमायला लागते.

हे केवळ एक उदाहरण झाले. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या मनात वाईट आठवणी दाटून येतात?

याचा विचार करून त्या गोष्टी नजरेसमोर आणणे किंवा आपण त्या गोष्टींच्या वाट्याला जाणे टाळले पाहिजे.

यामुळे एकदम नाही पण हळूहळू त्या गोष्टीशी निगडित वाईट आठवणींचा आपल्याला आपोआप विसर पडेल.

२. ती आठवण विसरण्याचा खूप प्रयत्न करू नका

एखादी वाईट गोष्ट आपल्याला वारंवार आठवत असेल तर आपण हर प्रकारे आपल्याला त्या गोष्टीची आठवण येऊ नये म्हणून प्रयत्न करतो.

पण याचा फारसा उपयोग होतो का? तर नाही..

आपण एखादी गोष्ट जितकी जाणून बुजून विसरायचा प्रयत्न करतो तितकीच ती छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आठवत राहते.

म्हणूनच वाईट आठवणी न आठवायचा प्रयत्न न करता त्या येतील तशा येऊ द्याव्या.

सुरुवातीला आपल्याला नक्कीच त्रास होईल पण एक वेळ अशी येईल की या वाईट आठवणींचा आपल्या मनावर काहीच परिणाम होणार नाही.

आपण त्या आठवणींबद्दल एकदम तटस्थ होऊन जाऊ आणि त्या क्षणापासून या आठवणी आपली पाठ सोडतील.

३. त्या वाईट प्रसंगातून चांगले काय घडले ते आठवून बघा

आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना असतात ज्यांची आठवण सुद्धा आपल्याला नको वाटते.

पण तरी त्या घटना आपल्या आठवणीत जणू कोरलेल्याच असतात.

पण आपण जर या घटनांचा नीट अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की प्रत्येक वाईट घटनेमागे अगदी लहानशी का होईना चांगली गोष्ट घडली.

उदाहणार्थ, एखाद्या मित्राने तुमचा विश्वासघात केला असेल, फसवले असेल तर ही झाली तुमच्या आयुष्यातली वाईट घटना,

जिची आठवण सुद्धा तुम्हाला नकोशी झाली आहे.

पण जेव्हा केव्हा या घटनेची नकोनकोशी आठवण तुम्हाला येईल तेव्हा तेव्हा त्यात दडलेली चांगली गोष्ट स्वतःला सांगा..

म्हणजेच, “मी इतका विश्वास टाकून सुद्धा फसवलो गेलो” असे म्हणण्यापेक्षा

“बरेच झाले वेळेत लक्षात आले नाहीतर अजून फसलो असतो..”

असे म्हटल्याने तुम्हाला त्या गोष्टीचा जरी विसर पडला नाही तरी त्यातला वाईट आठवणीचा नक्की विसर पडेल आणि चांगले तेच लक्षात राहील.

४. सकारात्मक तेच जवळ बाळगा

सकारात्मक विचारांच्या अनेक फायद्यांपैकी अजून एक फायदा असा आहे की सकारात्मक विचार करून आपण वाईट आठवणी मनातून काढून टाकू शकतो.

कसे काय? ते बघायला आपण या वरच्याच उदाहरणाचा वापर करू.

एखाद्या मित्राकडून फसवले गेल्याची वाईट आठवण जर सतत तुमच्या मनात येत असेल, तर ती आठवण आल्या आल्या स्वतःला त्याबद्दल विचार करायला फारसा वेळ न देता तुमचेच इतर काही मित्र आठवून बघा ज्यांनी तुम्हाला फक्त प्रेम दिले आहे.

ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेऊ शकता. असा सकारात्मक विचार केल्याने हळूहळू त्या वाईट आठवणी मनात आल्या तरी जास्त काळ मनात राहत नाहीत.

वाईट आठवण मनातून काढून टाकण्याचे सोपे मार्ग

५. भूतकाळ किंवा भविष्याचा विचार न करता, छंद जोपासा

भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही काळात न अडकता आपण वर्तमान काळात राहायला शिकले पाहिजे.

आपल्या मनात आठवणी, मग त्या बऱ्या असुदे किंवा वाईट, कधी येतात?

एकतर जेव्हा आपण शांत बसलो असू, जसे की प्रवासात किंवा रात्रीच्या शांततेत सगळी निजानीज झाल्यावर किंवा मग आपली रोजची कामे करताना नकळतपणे आपण या आठवणींच्या भोवऱ्यात सापडतो.

यावरचा उपाय सोपा आहे, जर शांततेत आपल्या मनात या आठवणी दाटून येत असतील तर त्यासाठी फावल्या वेळचा सदुपयोग, मन सतत कशामध्ये तरी गुंतवून ठेवणे आणि मेडिटेशन या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.

पण जर रोजच्या कामाच्या धबडग्यात या आठवणी मनात येत असतील तर काय करायचे?

अशा वेळी आपण करतोय त्या कामात जास्त लक्ष केंद्रित करून त्यातले बारकावे शोधण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मनात इतर विचार येणार नाहीत.

आवडणारे छंद, तुमच्या बकेट लिस्ट मध्ये तशाच राहून गेलेल्या गोष्टी सारं-सारं बाहेर काढा…

६. काळ हे सगळ्या समस्यांवरचे रामबाण औषध असते

जसा वेळ जाईल तशा या त्रासदायक आठवणी आपल्या मनातून हळूहळू का होईना पण आपोआप विरून जाणार असतात.

पण तोवर आपण सतत त्या दुःखात जगणे बरोबर आहे का?

आपल्याबरोबर वाईट झाले म्हणून परत कधी चांगले होणारच नाही असे नाही.

म्हणून आनंदात राहणे, नवीन गोष्टी शिकणे, नवीन मित्र-मैत्रिणी जोडणे..

थोडक्यात नवीन आठवणी तयार करण्याचे काम आपण अविरतपणे सुरु ठेवले पाहिजे.

जुनीच दुःखे, जुन्याच आठवणी घेऊन बसलो तर नवीन आठवणी कशा तयार होणार, नाही का?

७. वाईट आठवणींना व्यक्त होऊ द्या

काही आठवणी अशा असतात की त्यांचा सल कायम राहतो.

आपण ती गोष्ट विसरून गेलो तरी ही मनात कुठेतरी ती असतेच आणि जेव्हा त्याच्याशी निगडित अगदी लहानसा सुद्धा संदर्भ येईल तेव्हा ती गोष्ट आपल्याला हटकून आठवेल.

इतर वेळेस नाही आठवली तरी काही प्रसंगात आठवणारच अशा अनेक वाईट आठवणी असतील.

अशावेळेस आपल्या मनातली ही सलणारी गोष्ट आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला बोलून दाखवली तर मन हलके होते आणि त्या आठवणींचा सल सुद्धा कमी होतो.

वाईट घटना नेहमीच व्यक्त करणे शक्य नसते. अशा वेळी डायरी लिहिण्याची सवय लावा.

एकदा मनातले कुठेतरी तरी बोलून झाल्यावर पुढच्या वेळेला त्या आठवणींचा इतका त्रास होत नाही.

८. स्वतः ला कामात गुंतवा

आपल्या मनात विचारांचे आणि आठवणींचे काहूर तेव्हाच माजते जेव्हा आपल्याकडे रिकामा वेळ असतो.

एखाद्या एकाकी संध्याकाळी सुद्धा आपल्या मनात विचार येत राहतात.

वाईट आठवणी सुद्धा या विचारांचाच एक भाग होऊन बसतात.

अशा वेळी एकामागोमाग एक अशा वाईट आठवणी येतच राहतात.

अशा वेळी स्वतःला कामात गुंतवून घेणे हा एक उत्तम पर्याय आहे.

आपले आयुष्य जर कामाने आणि रिकाम्या वेळात आपल्या छंदाने व्यापलेले असेल तर जुन्या, घडून गेलेल्या गोष्टी आठवत बसायला आपल्याला वेळच उरत नाही.

अशाने मग या नको वाटणाऱ्या आठवणी हळूहळू मनातून नाहीशा सुद्धा होतात.

आयुष्य म्हटले की चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आल्याच.

चांगल्या घटनांमधून आनंद घेणे आणि वाईट घटनांमधून धडे घेणे म्हणजेच आयुष्य..

त्यामुळे मित्रांनो, वाईट आठवणी यांना एखाद्या अनुभवासारखे समजून पुढे पुढे चालत राहिल्याने या आठवणी कधी मनातून पुसल्या जातील, कळणार सुद्धा नाही!

आहे ना सोपे?

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय