केसातील कोंड्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्यापैकी सगळ्यांनीच आत्तापर्यंत एकदा तरी डॅन्डरफ म्हणजेच केसातील कोंड्याचा त्रास अनुभवला असेलच. केसातील कोंडा जाण्यासाठी उपाय

डोक्यात प्रचंड खाज येणे, डोक्याची त्वचा, म्हणजेच स्कॅल्प कोरडे पडणे आणि पांढऱ्या रंगाचा कोंडा सगळ्या कपड्यांवर पडणे ही कोंड्याची मुख्य लक्षणे.

कोंड्याचा त्रास कधीही होऊ शकतो पण सहसा वातावरणात गारवा वाढला आणि हवेतील आर्द्रता कमी झाली की कोंड्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते.

खरेतर कोंडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे स्काल्पला पुरेसे मोइश्च्रर न मिळून तिथली त्वचा कोरडी पडणे.

स्काल्पची त्वचा कोरडी, रुक्ष होण्यामागे बरीच कारणे असतात.

जसे की केस नीट न विंचरणे, स्ट्रेस घेणे किंवा चुकीचे शॅम्पू आणि कंडीशनर वापरणे.

कोंडा होतो म्हणजे नक्की काय होते? खरेतर कोंडा हे एक फंगस आहे.

हे वरील दिलेल्या कारणांचा परिणाम म्हणून हे पांढऱ्या रंगाचे फंगस आपल्या स्काल्पवर वाढायला लागते.

आणि मग हळूहळू स्काल्पपासून सुटून आपल्या केसात दिसू लागते.

यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो.

कोंडा कपड्यांवर पडेल म्हणून आपण काळे किवा डार्क रंगाचे कपडे घालणे टाळतो.

कोंड्यावर वेळीच उपचार घेतले नाहीत तर त्यात खूप प्रमाणात वाढ होऊन इन्फेक्शन्स व्हायची शक्यता असते.

कोंड्यासाठी बाजारात अनेक शॅम्पू उपलब्ध असतात पण आपल्यापैकी सगळ्यांनाच ते सूट होतील असे नाही.

काही विकारांवर घरगुती उपाय हे करायला सोपे आणि अधिक प्रभावशाली असतात.

या घरगुती उपायांचा अजून एक फायदा म्हणजे यात सगळे नैसर्गिक घटकच असल्याने त्याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या केसांना व त्वचेला होत नाही.

या उपचारांसाठी काही प्रमाणात पूर्वतयारी मात्र लागते.

पण जर आपल्याला आपल्या मनासारखे रिझल्ट्स मिळणार असतील तर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ही तयारी करायचे एक जास्तीचे काम आपण सहज स्वीकारू शकतो.

केसातील कोंडा घालवण्यासाठी घरगूती उपाय:

१. खोबरेल तेल आणि लिंबू

खोबरेल तेलाने आपल्या स्काल्पला योग्य प्रमाणात मोइश्च्रर मिळते.

त्यामुळे तिथली त्वचा कोरडी व रुक्ष पडत नाही.

लिंबामुळे स्काल्पवरची फंगसची वाढ थांबते.

कोंडा घालवण्यासाठीचा हा एकदम सोपा आणि हमखास घरगुती उपाय आहे.

दोन चमचे खोबरेल तेल किंचित गार करून त्यात दोन चमचे लिंबाचा रस घालून आधी मिश्रण तयार करून घ्यायचे.

नंतर हे मिश्रण आपल्या डोक्याला अलगद हाताने चोळायचे आणि वीस मिनिटे तसेच ठेऊन मग व्यवस्थित नेहमीचा शॅम्पू वापरून केस धुवायचे.

दर वेळेला केस धुताना हा उपाय करता येतो.

२. मेथीच्या बिया

डोक्यावरचा कोंडा कमी झाला की तो परत वाढू नये यासाठी सहसा हा उपाय करतात.

मेथीच्या बिया (मेथ्या) रात्रभर पाण्यात भिजत ठेवायच्या.

सकाळी तेच भिजत ठेवलेले पाणी वापरून मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करून घ्यायची.

या पेस्टमध्ये थोडा लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग स्काल्पला हलक्या हाताने चोळून अर्ध्या तासासाठी ठेवायचे.

नंतर नेहमीप्रमाणे केस धुवायचे. आठवड्यातून एकदा हा उपाय करून बघावा.

३. दही

केसांना दही लावताना आणि नंतर ते व्यवस्थित धुताना वेळ भरपूर जातो.

काहींना हा उपाय याच कारणासाठी त्रासदायक वाटत असेल.

पण कोंडा घालवण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे.

यासाठी ताजे दही घेऊन स्काल्पला आणि संपूर्ण केसांना एक तासभर तरी लाऊन ठेवावे.

साधारण एक तास झाला की केसांना लावलेले दही सुकायला लागेल.

ते पूर्ण सुकल्यावर केस नेहमीप्रमाणे धुवून घ्यावेत.यामुळे स्काल्पचा कोरडेपणा दूर होतो.

४. कडुलिंबाचा रस

कडुलिंब अनेक शाम्पू, कंडीशनर यामध्ये वापरला जातो तो याच कारणासाठी.

कोंडा घालवायला कडुलिंब अतिशय उपयोगी आहे.

हा उपाय करायला सुद्धा सोपा आहे. आठवड्यातून एकदा वेळ काढून सहज करता येण्यासारखा.

ताजी कडुलिंबाची पाने घेऊन ती व्यवस्थित वाटून घ्यावीत.

वाटलेल्या पानांचा रस स्काल्पला आणि केसांना दहा ते पंधरा मिनिटांसाठी चोळून ठेवावा.

लावलेला रस सुकत आला की नेहमीच्या वापरातल्या शाम्पूने केस व्यवस्थित धुवून घ्यावेत.

५. संत्र्याची साले

संत्र्याच्या सालीत काल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन ‘ए’ हे जास्त प्रमाणात आढळतात.

ही दोन्ही खनिजे आणि व्हिटामिन :ए’ हे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

या उपायासाठी जास्तीची पूर्वतयारी लागत असली आणि करायला देखील काहीसा किचकट असला तरी याचा फायदा लगेच जाणवतो.

संत्र्याची साली आणि थोडा लिंबाचा रस हे मिक्सरमधून पेस्ट होईपर्यत नीट वाटून घ्यायचे.

ही पेस्ट मग स्काल्पला सगळीकडे चोळून लावायची.

साधारण अर्धा तासाने ही पेस्ट सुकायला सुरुवात होते. पूर्णपणे सुकल्यावर मग नेहमीच्या शाम्पूने केस धुवून घ्यायचे.

६. व्हिनेगर

व्हिनेगरने फंगसच्या वाढीला आळा बसतो आणि ती फंगस सुद्धा नष्ट होते.

यामुळे कोरड्या त्वचेमुळे होणारे इतर विकार, जसे की डोक्याला खाज येणे, फोड येणे सुद्धा दूर होतात.

दोन कप व्हिनेगर उकळून घेऊन त्यात एक कप पाणी घालून घ्यायचे.

केस धुताना केसांना शॅम्पू लावण्या आधी या मिश्रणाने स्कॅल्प स्वच्छ करून घ्यायचा आणि मग नेहमीप्रमाणे डोक्यावरून अंघोळ करायची.

आठवड्यातून एकदा केस धुवायच्या आधी हा उपाय केला जाऊ शकतो.

७. अंड्याचे बलक

अंड्याच्या बलकामध्ये बायोटीन हे व्हिटामिन जास्त प्रमाणात आढळते.

यामुळे केसांना कंडीशनिंग होते आणि स्काल्पचा कोरडेपणा सुद्धा दूर होतो.

त्यामुळे असलेला कोंडा जाऊन नवीन कोंडा होत नाही.

यासाठी पूर्णपणे कोरड्या केसांना आणि स्काल्पला अंड्याचे बलक लाऊन तासभर तरी ठेवायचे.

अंड्याचे बलक लावल्यावर केसांना एक प्लास्टिक पिशवी लाऊन ठेवली तर बलक कपड्यांवर किंवा अजून कुठे लागत नाही.

तासाभराने थंड पाण्याने केस धुवून घ्यायचे. अंड्याचा उग्र वास घालवण्यासाठी कधीकधी दोनदा सुद्धा केस धुवावे लागतात.

८. ग्रीन टी

दोन ग्रीन टीचे बॅग्स गरम पाण्यात बुडवू ठेवायच्या. स्ट्रॉंग ग्रीन टी तयार झाली की ते केसांना आणि स्काल्पला लाऊन ठेवायचे.

केस पूर्णपणे सुकल्यावर नेहमीसारखे धुवून घ्यायचे. ग्रीन टी केसांवर सुकायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे हा सोपा उपाय नेहमी डोक्यावरून अंघोळ करताना अगदी घाईच्या वेळेत सुद्धा करता येतो.

८. तुळशीची पाने

हा अगदी सहज करता येण्यासारखा उपाय आहे. तुळशीमध्ये antifungal आणि antibacterial गुणधर्म असतात.

त्यामुळे कोंड्यावरचा हा एक हमखास उपाय आहे. या साठी तुळशीची काही पाने, एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा पाणी हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे.

हे मिश्रण स्काल्पला अर्धा तास लाऊन ठेवायचे. सुकल्यावर नेहमीप्रमाणे केस धुवून घ्यायचे.

८. लसूण

लसणीत अनेक अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे कोंड्याच्या वाढीला आळा बसतो आणि नवीन कोंड्याची वाढ सुद्धा होत नाही.

यासाठी लसणीच्या सात ते आठ पाकळ्या आणि एक चमचा मध याची पेस्ट करून घ्यायची आणि ती केसांना अर्ध्यातासासाठी लाऊन ठेऊन मग धुवून टाकायची.

लसणीमुळे फंगसची वाढ थांबते तर मधामुळे केसांना मोइश्च्रर मिळते.

९. स्ट्रेस कमी करा

स्ट्रेसचे परिणाम आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे होत असतात.

स्ट्रेसमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती कमी होते.

स्ट्रेस वाढल्याने कोंडा वाढत नसून त्यामुळे स्कॅल्पचा कोरडेपणा वाढतो ज्यामुळे कोंडा होण्याची शक्यता वाढते.

म्हणूनच शक्य त्या पद्धतीने आपल्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

10. डिस्प्रिनची गोळी

डिस्प्रिन, म्हणजेच ऍस्पिरिनची गोळीतले (जी रक्त पातळ करण्यासाठी वापरतात) महत्वाचे घटक म्हणजे सालीसायलीक ऍसिड.

हेच सालीसायलीक ऍसिड बहुतेक अँटी- डॅन्डरफ शॅम्पूमध्ये वापरले असते.

हे त्वचेचा कोरडेपणा कमी करून, कोंड्यामुळे त्वचेवर झालेल्या जखमा मोकळ्या करण्यासाठी मदत करते.

आपल्या नेहमीच्या शॅम्पूमध्ये दोन डिस्प्रिनच्या गोळ्या चुरून त्याची पावडर टाकून केसाला लावल्याने कोंडा कमी होतो.

कोंड्यामुळे खाज आली की इतर काही कामे सुचेनाशी होतात.

हे सोपे उपाय आपल्या कामाच्या गडबडीत सुद्धा सहज करून बघता येण्यासारखे आहेत.

नियमितपणे हे उपाय करत राहिल्याने कोंडा नक्कीच कमी होईल.

याचबरोबर नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार हे देखील महत्वाचे आहे.

केसांचे आरोग्य राखण्यासाठी चांगल्या ब्रँडचा शॅम्पू आणि कण्डिशनर वापरला पाहिजे.

केस विंचरायला नेहमी स्वच्छ कंगवा वापरणे, केसांना वारंवार ड्रायरने सुकवणे तसेच बाहेर जाताना केस नेहमी बांधून जायला हवे जेणेकरून त्यावर धुळीचे किंवा प्रदूषणाचे कण बसणार नाहीत.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय