लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मी!…

Law Of Attraction

रोजच्या बोलण्यात आपण खुप सारे शब्द वापरतो, जसं की नशीब फळफळलं, फुटकं नशीब, बोलाफुलाची गाठ, कावळा बसायला आणि फांदी तुटायला, निव्वळ योगायोग वगैरे वगैरे, लक्षात घ्या, ह्या जगात उगाच गोष्टी घडत नाहीत, ह्या जगात असेच योगायोग होत नाहीत.

आकर्षणाचा नियम थोडक्यात सांगायचा म्हणजे, आपल्याला जे जे काही मनापासुन हवं आहे, ते सारं काही, सहजरीत्या आपण मिळवु शकतो. पहील्यांदा असलं काही ऐकलं की धक्काच बसतो. कष्ट करा, मेहनतीला शॉर्टकट नाही, असं मोठेमोठे ज्ञानी लोक सांगुन गेलेत, मग ते खरे का लॉ ऑफ अट्रॅक्शन असा उगाच काही लोकांचा गोंधळ उडतो. मला समजलेला आकर्षणाचा नियम आणि तो वापरुन मला आलेले काही अनुभव, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

१) लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? – हे जग काही भौतिक नियमांच्या आधारे चालतं, जसं की गुरुत्वाकर्षणाचा नियम, गतीचा नियम इत्यादी. तुम्ही ह्या नियमांवर विश्वास ठेवा अथवा ठेवु नका पण हे नियम काम करतातच, अगदी तसचं तुम्ही आकर्षणाच्या नियमावर विश्वास ठेवा अथवा ठेवु नका, तो तुमच्या आयुष्याला प्रभावित करतच राहणार. ह्या नियमांना कोणी नियंत्रित करु शकत नाही, पण ह्या नियमांमुळे कित्येक लोकांचे आयुष्य नकळत उद्ध्वस्त होते तर जे लोक हा नियम समजुन घेतात, नियमित साधेसोप्या कृती करतात, ते खुप कमी वेळात लांबचा पल्ला गाठतात.

हा नियम सांगतो की आपण सर्वजण मानवी चुंबक आहोत, आपल्या जीवनात घडणार्‍या ९० टक्के घटनांना आपण आकर्षित केलेलं आहे, त्यांना आपल्या जीवनात आपण स्वतः आमंत्रित केलेलं आहे. (दहा टक्के घटनांना अपवाद मानुन सोडुन देऊया.) व्यवसायातल्या बर्‍या वाईट घटना, परीक्षेत येणारे चांगले किंवा अत्यंत वाईट निकाल, नातेसंबंधातलं यश-अपयश, नौकरीच्या ठिकाणी असणारं आनंददायी वातावरण किंवा रोजचे नकोसे वाटणारे ताणतणाव, यातली प्रत्येक गोष्ट आणि अशीच इतर कोणतीही गोष्ट आपण स्वतः कळत नकळत आकर्षित करत असतो.

रोजच्या बोलण्यात आपण खुप सारे शब्द वापरतो, जसं की नशीब फळफळलं, फुटकं नशीब, बोलाफुलाची गाठ, कावळा बसायला आणि फांदी तुटायला, निव्वळ योगायोग वगैरे वगैरे, लक्षात घ्या, ह्या जगात उगाच गोष्टी घडत नाहीत, ह्या जगात असेच योगायोग होत नाहीत, प्रत्येक घटनेला आयुष्यात आपण स्वतः निमंत्रण दिलेलं असतं. प्रत्येक चांगली वाईट घटना प्रत्यक्षात घडण्यासाठी आपले विचार आणि आपल्या भावना कारणीभुत असतात. प्रत्येक विचारासोबत एक भावना जुडलेली असते, समजा, तुम्ही विचार केला, की लवकरच माझं प्रमोशन होणार आहे, तर नकळतच तुम्हाला आनंद व्हायला लागतो आणि तुम्ही पॉझीटीव्ह व्हायब्रेशन सोडायला लागता.

२) वैज्ञानिक तथ्य – विज्ञान मानतं, की जेव्हा आपण एखादा विचार करतो, तेव्हा आपल्या मेंदुतुन एक इलेक्ट्रोमॅग्नेटीक इंप्लस बाहेर पडते, त्याला ब्रेनव्हेव किंवा थॉटव्हेव असेही म्हणतात. तुम्ही एखाद्या डॉक्टर, वैज्ञानिक किंवा भौतिकशास्त्रज्ञाला हे विचारु शकता, ते याची पुष्टी करतील. प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते, तो विचार त्या समान फ्रिक्वेन्सी असणार्‍या वस्तुला आपल्याकडे खेचुन आणतो, आकर्षित करतो.

हे तंत्रज्ञान वापरुन टोयोटाने एक व्हील चेअर तयार केलीय, त्या चेअरवर बसुन, फक्त विचार केल्याने आपण तिला नियंत्रित करु शकतो, म्हणजे फक्त विचार केला, उजवीकडे वळतोय आणि कसलेही बटन न दाबता चेअर उजवीकडे टर्न घेते.

असचं इमोटीव्ह लाईफसायंस नावाच्या कंपनीने एक इपिओसी न्युरोलॅंग्वेज हेडफोन बनवलाय, ह्याचा वापर करुन कॉम्पुटरवर फक्त विचारांच्या सहाय्याने गेम्स खेळता येतात, पुर्ण कॉम्प्युटर ऑपरेट करता येऊ शकते, कसलेही बटन न दाबता, फक्त विचार करुन खोलीतल्या लाईट ऑन ऑफ करता येतात, पडदे बंद चालु करता येतात, आहे की नाही गंमत!..

तर आपण करत असलेला प्रत्येक विचार त्या वस्तुला आणि परीस्थीतीला आपल्यासमोर दत्त म्हणुन हजर करतो आणि आपण त्याला योगायोगाचं नाव देतो. “तुम्हालाच फोन करणार होतो, आणि तुमचाच फोन आला”, “अरे, यार, हाच प्रश्न वाचुन गेलो होतो, आणि परीक्षेत तोच प्रश्न आला”, “सकाळी तुमच्याबद्दलच विचार करत होतो आणि तुम्ही मार्केटमध्ये भेटलात” “शिट यार, ज्या गोष्टीची भिती वाटत होती, तेच घडलं”…. ही वाक्य बोलल्यासारखी, ऐकल्यासारखी वाटतायतं का?..हे निव्वळ को-इन्सिडन्स नाहीत, हे व्हायब्रेशनल मॅच आहेत.

आणि म्हणुन जर तुम्ही सकारात्मक विचार केला, तर तुम्ही आपोआप आनंदी बनता, तुम्ही पॉझीटीव्ह व्हाईब निर्माण करता, आणि हव्या त्या वस्तुला खेचुन घेता. अगदी याच्या उलटही होवु शकतं, लाईफ बकवास आहे, माझा मुड नाहीये, आज उदासवाणं, कंटाळवाणं वाटत आहे, असल्या विचारांना थारा दिलात की पनौती दारावर येऊन ठेपते, आणि आपण म्हणतो, बघ, मी म्हंटल नव्ह्तं, काहीतरी वाईट घडणार आहे म्हणुन!..

Manache Talks

३) स्वतःचे अनुभव – मी लग्नासाठी मुली शोधत होतो तेव्हाची गोष्ट आहे, खुप प्रयत्न करुनही लग्न जमत नव्हतं, असं का होतयं तेही समजत नव्हतं, नेपोलियन हिलचं विचार करा आणि श्रीमंत व्हा, पुस्तक वाचलं आणि त्यांनी सांगीतलेली ट्रिक अंमलात आणायची ठरवली. मी रोज अर्धातास डोळे बंद करुन कल्पना करायचो की माझं लग्न होत आहे, मंगलकार्यालय, मूंडावळ्या बांधलेला मी, डेकोरेट केलेलं स्टेज, अगदी सगळं सगळं मी स्पष्ट डोळ्यासमोर आणायचो, ती कल्पना मनात घोळवायचो, रुजवायचो आणि तीन महीन्यांच्या आत माझं लग्न जमलं.

२०११ मध्ये जेव्हा मी एकही लेख लिहला नव्हता, तेव्हा मला उगीच वाटायचं, मी लेख लिहले तर ते वर्तमानपत्रात छापुन येतील, हा विचार पुन्हा पुन्हा डोकावत राहीला आणि २०१५ मध्ये मी माझा पहीला लेख फेसबुकवरच लिहला, त्यानंतर थोडे लेख लिहल्यावर मी तीनचार वर्तमानपत्रांच्या ऑफीसात गेलो आणि माझे लेख दिले, सगळीकडे “बघु”,… “वाचु”… “कळवु”… अशी टिपीकल उत्तरे मिळाली, आणि हा प्रतिसाद पाहुन मी खट्टु झालो, पण आता मला आकर्षणाचा नियम माहीत झाला होता, आता मी रोज कल्पना करायचो की माझे लेख वर्तमानपत्रात छापुन येतात, लोकांना आवडतात, माझे लेख वाचुन लोक प्रसन्न होतात, त्यांच्या चेहर्‍यावर हसु फुलते, संकटांशी झगडण्याची जिद्द निर्माण होते. काही महीने मी नियमित ही कल्पना केली आणि ३१ डिसेंबर २०१७ च्या रात्री दहा वाजता पुण्यनगरी लातुर आवृत्तीच्या संपादकांचा फोन आला, आता माझे लेख संपुर्ण मराठवाड्यात प्रकाशित होणार होते आणि त्या बदल्यात मला मानधनही दिलं जाणार होतं. हा आकर्षणाचा नियम नाहीतर काय आहे?

मला शिकवण्याची आवड आहे, मी कल्पना करायचो की मी एका क्लासरुमध्ये शिकवत आहे, मुलांना बिल्डींग डिझाईन अाणि वेगवेगळ्या गोष्टी समजावुन सांगत आहे, ते ही मन लावुन ऐकत आहेत आणि मला खुप छान वाटत आहे. माझी ही ही कल्पना काही महीन्यात खरीखुरी झाली, प्रत्यक्षात आली.

४) हा नियम कसा वापरावा – हा नियम वापरण्यासाठी तुमच्याजवळ खालील कृती करणं, अत्यावश्यक आहे.
अत्यंत सुस्पष्ट ध्येय लिहुन काढा. – जोपर्यंत आपल्याला काय हवयं ते आपल्याला माहीतच नसेल तर ते आपल्याला कसं मिळेल? उदा. स्वतःचा अलिशान बंगला, एक करोड रुपये, कार, बाईकवरुन हिमालयाची सफर, देशविदेशातील भटकंती, निरोगी जीवन, परीवारतुन अखंड प्रेम, निखळ मैत्री..

आता ही ध्येयं, नेहमी नजरेसमोर राहतील अशा ठिकाणी चिटकावुन टाका, मोबाईल, कॉम्प्युटरच्या वॉलपेपरवर सेट करा. आपलं मन भयंकर विसरभोळं असतं, आज पक्कं ठरवतं, उद्या पुन्हा कोरं होतं. त्याच्यावर ध्येय बिंबवली पाहीजेत. रोजरोज घोकल्यानेच हे शक्य होतं. सुप्त मनाला मुकपाठ होईपर्यंत ध्येयांची मोठमोठ्याने उजळणी करीत रहा.

आता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत अशी कल्पना दररोज कमीत कमी दहा मिनीटे मनातल्या मनात घोळवा. त्या वस्तु, घटना फिल करा. स्वतः चुंबक असल्याचा अनुभव करा. ती वस्तु मिळाल्यानंतर जसा आनंद झाला असता तशा तृप्तभावनेचा अनुभव करा. आता निर्धास्तपणे कामाला लागा.
लक्षात ठेवा, ATTRACTION ह्या शब्दाची शेवटची सहा अक्षरे ACTION अशी आहेत. कृती केल्याशिवाय स्वप्नपुर्ती होत नाही, वर्तमान आणि भविष्य ह्या दोन डोंगरामधला रस्ता कृतीच्या पुलावर चढुनच पार करता येतो. फक्त फरक इतकाच त्या कृती आता आनंदाने होवु लागतात, त्याचे ओझे वाटत नाही, चिंतेचे गाठोडे हलके होते आणि प्रवासाचा वेग आणि आनंद वाढतो.

५) जमल्यास हे टाळा – गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगीतलेले आहे, “संशयात्मा विनश्यती” संशय घेणार्‍या व्यक्तीचा नाश होतो, काही लोक सकाळी व्हिज्वलायझेशन करतात आणि दिवसभर शंका घेतात, हे होईल का नाही? अश्या लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन फळ देणार नाही. स्वप्नांवर शंभर टक्के विश्वास ठेऊन झपाटुन काम करणार्‍यांची स्वप्ने प्रत्यक्षात यायला जास्त वेळ लागत नाही हे नक्की!…

प्रतिक्रीया आवर्जुन कळवा!..तुमचेही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे अनुभव असतील, तर ऐकायला मला आवडेल.

वाचण्यासारखे आणखी काही…..

अंटार्क्टिकाच्या जमिनीवर..
मानवी जीवनाचा कल्पतरु – जीवनातला आकर्षणाचा नियम
आकर्षणाचा सिद्धांत


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

5 Responses

  1. vivek jadhav says:

    खुपच सुंदर
    आणि धन्यवाद हे लिहल्या बदद्ल
    बरचं काही कळालं law of attraction बदद्ल
    नक्की ह्याचा वापर करेन…

  2. Malu Sachin says:

    Hello Pankaj ji,
    Very Nice Article.
    You have really explained Law Of Attraction Very Nicely.
    Congratulations.

  3. Chetan says:

    Very nice info

  4. पंकज कोटलवार

    तसेच ते मोटिव्हेशन संदर्भात व्हाट्सअप वरती काही कोर्सेस घेतात. त्यासाठी अभिप्रायातून त्यांना सम्पर्क करता येईल.

  5. Anita Rathod says:

    मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे.माझ्या मुलांनाही सांगते…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!