थायरॉईडचे आजार कशामुळे होतात, त्यात घेण्याची काळजी आणि घरगुती उपाय

थायरॉईड कशामुळे होतो, त्याचे कोणते प्रकार असतात आणि त्यात कोणती काळजी घ्यायची हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा

आपल्या शरीरात होणाऱ्या चयापचय क्रियेला लागणाऱ्या थायरॉक्सीन या होर्मोनची निर्मिती आपल्या थायरॉईड या ग्रंथीमध्ये होते.

थायरॉईड ग्रंथी आपल्या गळ्याच्या खालच्या बाजूला असते.

दोन भिवयांच्या मध्ये असलेली पिटयुटरी ग्रंथी ही थायरॉईड स्टीम्यूलेटिंग हार्मोनचे (TSH) उत्पादन करते.

ज्यामुळे आपल्या थायरॉईड ग्राठी थायरॉक्सीन या हार्मोनचे उत्पादन होते.

सर्वसाधारणपणे या ग्रंथीत आपल्या शरीराला लागेल, गरज असेल तेवढेच हार्मोन निर्माण केले जाते ज्यामुळे आपली चयापचय क्रिया, म्हणजेच मेटाबॉलीझम योग्य तऱ्हेने पार पडते.

कधीकधी काही कारणाने थायरॉईड ग्रंथी द्वारा होर्मोन्स खूप जास्त प्रमाणात स्त्रवली जातात तर कधी गरजेपेक्षा कमी प्रमाणात.

यामुळे थायरॉईड ग्रंथीच्या समस्या सुरु होतात.

याची विभागणी मुख्यत: दोन प्रकारात केली जाते.

१. हायपरथायरॉईडीझम – या प्रकारात थायरॉईड ग्रंथी ही होर्मोनचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त प्रमाणात करते.

थायरॉईडचे निदान हे रक्त चाचणी करून होतो.

या प्रकारच्या थायरॉईडमध्ये रक्तात थायरॉईड स्टीम्यूलेटिंग हार्मोनचे प्रमाण कमी आणि थायरॉक्सीनचे प्रमाण जास्त असते.

या प्रकारच्या थायरॉईडमध्ये वजन खूप प्रमाणात कमी होते.

अस्वस्थ वाटणे, खूप घाम येणे, झोप न लागणे, केस गळणे ही हायपरथायरॉईडीझमची लक्षणे आहेत.

यावर उपचार करून अँटीथायरॉईड औषधे दिली जातात.

२. हायपोथायरॉईडीझम – यामध्ये बरोबर उलटे होते. आपल्या शरीराला जेवढी गरज असते त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात थायरॉक्सीन हार्मोनचे उत्पादन होते.

यामध्ये वजनात खूप प्रमाणात वाढ होते.

थकवा, कोरडी त्वचा, थंडी वाजणे, अशक्तपणा ही हायपोथायरॉईडीझमची लक्षणे आहेत.

याचे निदान सुद्धा रक्ताची तपासणी करून होते.

यामध्ये रक्तात थायरॉईड स्टीम्यूलेटिंग हार्मोनचे प्रमाण जास्त आणि थायरॉक्सीनचे प्रमाण कमी आढळले तर याचे निदान होते.

याचा उपचार म्हणजे औषधाद्वारे थायरॉईड हार्मोन घेणे हाच आहे.

थायरॉईडशी निगडीत अजून दोन आजार आहेत.

हाशीमोटो थायरॉईडीझम – ज्यामध्ये आपल्या शरीराच्या रक्षक पेशी जेव्हा आपल्या थायरॉईड ग्रंथीच्या पेशींवरच चुकून हल्ला करतात, यामुळे थायरॉईड ग्रंथीच्या पेशी खराब होतात आणि यामुळे थायरॉईड ग्रंथी हार्मोनचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात करते.

हे वाचून लक्षात आलेच असेल की हायपोथायरॉईडीझम होण्यामागचे हे एक महत्वाचे कारण आहे.

यावर काही ठोस उपाय नाही, त्यामुळे औषधे देऊन हार्मोनचे प्रमाण वाढवणे किंवा ऑपरेशन करून ग्रंथीचा खराब झालेला भाग काढून टाकणे हा उपाय असतो.

ग्रेव्ह्स डीजीज – यामध्ये आपल्या थायरॉईड ग्रंथीवर आपल्या शरीरातील रक्षक पेशी चुकू हल्ला करतात पण यामुळे थायरॉईड ग्रंथी खराब न होता हार्मोनचे उत्पादन जास्त प्रमाणात करतात.

म्हणजेच याची लक्षणे ही हायपरथायरॉईडीझम सारखी असतात.

यामध्ये डोळे खूप मोठे होतात आणि मान सुजते, ज्याला गोईटर म्हणतात.

थायरॉईड ग्रंथीचे आजार कशामुळे होतात त्यात घेण्याची काळजी घ्यावी आणि घरगुती उपाय

आयोडीनच्या कमतरतेमुळे गोईटर होतो.

यामध्ये जर अँटीथायरॉईड औषधांचा परिणाम होत नसेल तर ऑपरेशन करून थायरॉईड ग्रंथी काढून टाकावी लागते.

आपल्याला ही लक्षणे जाणवल्यास वेळेतच डॉक्टरांकडे जाऊन, रक्ताची तपासणी घेऊन त्यावर उपचार घेतले तर यातून गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होत नाहीत.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो.

थायरॉईडचे विकार होऊ नयेत साठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तपासण्या हे गरजेचे आहे.

हिरव्या पालेभाज्यांबरोबर लोह आणि आयोडीन युक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

थायरॉईडचे विकार, त्याचे प्रकार, निदान, त्यावरचे उपलब्ध असलेले वैद्यकीय उपचार, थायरॉईडचे विकार होऊ नयेत त्यासाठी घ्यायची काळजी हे आपण बघितले.

पण आता थायरॉईडचे विकार असल्यास काय घरगुती उपाय आपल्याला करता येतात ते थोडक्यात बघूया.

थायरॉईड ग्रंथीतून स्त्रवल्या जाणाऱ्या हार्मोनची पातळी योग्य प्रमाणात राहावी यासाठी हे उपाय केले जाऊ शकतात.

१. खोबरेल तेल

खोबरेल तेल हे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यक्षमतेमध्ये नियमितपणा आणते.

आहारात खोबरेल तेलाचा योग्य प्रमाणात वापर केल्याने चयापचय क्रिया सुधारते.

खोबरेल तेल हे थायरॉईड ग्रंथींसाठी फायदेशीर असते त्यामुळे रोज चमचाभर खोबरेल तेलाचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे.

२. आले

सहजपणे उपलब्ध असणारे, आपल्या घरी नेहमी असणारे आले थायरॉईडच्या विकारांसाठी सोपा उपाय आहे.

आल्यामध्ये पोटाशीयम, माग्नेशीयम ही खनिजे मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीवर आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

थायरॉईडवर आलेली सूज हे थायरॉईडच्या विकारांमागचे महत्वाचे कारण आहे म्हणून आल्याचा वापर फायदेशीर ठरतो.

आल्याचा आपल्या आहारात वापर करायची सोपी पद्धत म्हणजे आल्याचा चहा पिणे.

३. ‘बी’ व्हिटामिन

व्हिटामिन ‘बी’ चे सगळे प्रकार हे थायरॉईडच्या कार्यक्षमतेत नियमितपणा आणतात.

थायरॉईडच्या विकारांमध्ये व्हिटामिन ‘बी’ चे सेवन म्हणूनच फायदेशीर ठरते.

हायपरथायरॉईडीझमच्या त्रासात व्हिटामिन ‘बी-12’ हे फायदेशीर असते.

अंडी, चिकन, मासे, कडधान्ये, दुध, ड्रायफ्रुट यामध्ये व्हिटामिन ‘बी’ जास्त प्रमाणात असतात त्यामुळे या पदार्थांचा समावेश आहारात केल्याने ते थायरॉईड ग्रंथीच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर असते.

४. व्हिटामिन ‘डी’ 

आपल्या शरीरात जर व्हिटामिन ‘डी’ ची कमतरता असेल तर थायरॉईडच्या विकारांना सुरुवात होण्याची शक्यता असते.

कोवळे ऊन हे व्हिटामिन ‘डी’ मिळवण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे.

यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते.

पण दर वेळेला कोवळे ऊन मिळेलच असे नाही. त्यामुळे आपल्या आहारातून सुद्धा व्हिटामिन ‘डी’ मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

मासे, अंड्याचे बलक, दुध यामधून आपण ते मिळवू शकतो.

आपल्या शरीरात व्हिटामिन ‘डी’ ची पातळी कमी असेल तर त्यासाठी गोळ्या सुद्धा उपलब्ध असतात ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येऊ शकतात.

५. बदाम

सगळ्या ड्रायफ्रुटच्या वापर जर आपण योग्य प्रमाणात केला तर तो आपल्या शरीरासाठी या ना त्या प्रकारे फायदेशीर असतोच.

बदाम हे थायरॉईड साठी फायदेशीर असतात कारण त्यामध्ये सेलेनीयम हे खनिज भरपूर प्रमाणात असते.

जे थायरॉईडसाठी चांगले असते. याचबरोबर बदामामध्ये जास्त प्रमाणात असणाऱ्या मॅग्नेशीयममुळे सुद्धा बदाम थायरॉईडच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतो.

६. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ

दुध, दही, चीज या सगळ्यामध्ये आयोडीन हे जास्त प्रमाणात असतात.

आयोडीन या खनिजाच्या कमतरते मुळे गोईटर हा थायरॉईडचा विकार होतो त्यामुळे या पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन हे फायदेशीर ठरते.

दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून आपल्याला इतर व्हिटामिन सुद्धा जास्त प्रमाणात मिळतात जे थायरॉईड ग्रंथींसाठी लाभदायक असते.

७. जवस

जवसामध्ये मॅग्नेशीयम आणि व्हिटामिन ‘बी-12’ भरपूर जास्त प्रमाणात असतात.

याशिवाय यामध्ये आढळणारे फॅट हे सुद्धा गुड फॅट असतात जे थायरॉईड ग्रंथींच्या आणि ह्रदयाच्या आरोग्यास्ठी फायदेशीर असतात.

जवसामुळे थायरॉईडची कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे थायरॉईडमधून हार्मोन जास्त प्रमाणात स्त्रवते. म्हणूनच हायपोथायरॉईडीझम कमी होण्यासाठी मदत होते.

८. नियमित व्यायाम

आपल्या सगळ्याच शारीरिक आणि मानसिक व्याधींवर नियमित व्यायाम करणे हा रामबाण उपाय आहे.

व्यायामामुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.

औषधे किंवा घरगुती उपायांचा परिणाम योग्य पद्धतीने व्हावा यासाठी व्यायाम अतिशय महत्वाचा आहे.

व्यायामामुळे शरीरातील हार्मोनचे प्रमाण संतुलित राहते, वजन आटोक्यात राहते जे थायरॉईडच्या कार्यक्षमतेत नियंत्रण आणते.

व्यायामामुळे शरीरातील रक्तपुरवठा सुधारतो.

यामुळे थायरॉईड ग्रंथीतून स्त्रवणारे हार्मोन हे आपल्या शरीरातील सगळ्या पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते.

९. आयोडीन

आयोडीन या खानिजामुळे थायरॉईडची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे त्यातून स्त्रवणाऱ्या हार्मोनचे प्रमाण वाढते.

म्हणूनच शरीरात थायरॉईड हार्मोनचे प्रमाण कमी असेल, म्हणजेच हायपोथायरॉईडीझम असेल तर आयोडीन युक्त मीठ खाल्ले पाहिजे.

याच्या उलट जर हायपरथायरॉईडीझमचा त्रास असेल, म्हणजेच रक्तात थायरॉईड हार्मोनची पातळी जास्त असेल तर आहारात नॉन-आयोडाईझ्ड मिठाचा वापर केला पाहिजे.

थायरॉईडविषयी माहिती, लक्षणे आणि त्यावर घरगुती उपाय आपण या लेखात पाहिले. थायरॉईडची लक्षणे जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन, थायरॉईडचे निदान झाल्यास डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेत घेऊन त्याचबरोबर हे घरगुती उपाय केले तर त्याचा निश्चित फायदा होईल.

https://manachetalks.com/13371/precautions-for-bone-health-marathi/

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “थायरॉईडचे आजार कशामुळे होतात, त्यात घेण्याची काळजी आणि घरगुती उपाय”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।