सकाळी लवकर उठवत नसेल तर या लेखात सांगितलेल्या ट्रिक्स आजमावून बघा

सकाळी लवकर उठण्याची नुसती कल्पना सुद्धा खूप लोकांना अशक्य कोटीची वाटते.

अनेकांना सकाळी लवकर उठणे अजिबातच जमत नाही, कितीही प्रयत्न केले तरी.

अशा लोकांचा अलार्म सारखा आपला स्नूजवरच जात असतो.

अगदी मनाचा निर्धार केला तरीही त्यांचे लवकर उठणे हे काही तीन चार दिवसांच्या वर टिकत नाही.
हे असे का होते?

याला फक्त आळशीपणा जबाबदार असतो का?

तर नाही.

साधारणतः जी लोकं सकाळी लवकर उठत नाहीत त्यांच्याबद्दल आपला असाच एक समज झालेला असतो.

आळशीपणा हे एक कारण असूच शकते पण, जर सकाळी जास्त वेळ झोपून रहावेसे वाटत असेल तर त्यामागे काही वेगळी कारणे सुद्धा असू शकतात.

या कारणांचा संबंध आपल्या जीवनशैली, आपल्या सवयी, आपण घेत असलेली औषधे यांच्याशी असतो.

रात्री नीट झोप न लागणे, सलग झोप न येणे, म्हणजे एकदा झोप लागली तरी मध्ये मध्ये जाग येऊन अपुरी झोप होणे, विचित्र स्वप्ने पडून झोपमोड होऊन अर्धवट झोप होणे, काही औषधांचा परिणाम, बिघडलेले मानसिक स्वास्थ्य जसे की डीप्रेशन किंवा एनझायटी यासारखी अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात ज्यामुळे रात्री वेळेत झोपल्यावर सुद्धा सकाळी सहजासहजी जाग येत नाही.

डिप्रेशन सारख्या आजारात तर दिवसभर सारखे झोपूनच रहावेसे वाटते.

कधी कधी कामाच्या निमित्ताने जर रात्री जागे राहावे लागत असेल तर आपल्या शरीराचे घड्याळच बदलून जाते आणि आपल्याला रात्रीची झोप लवकर लागेनाशी होते ज्यामुळे सकाळी उठणे अवघड होते.

पण सकाळी वेळेत उठण्याचे अनेक फायदे आहेत. काहींना तर कामाच्या व्यापामुळे सकाळी लवकर उठणे अनिवार्य असते.

अशा वेळी तर सकाळची सुरुवात अपुऱ्या झोपेमुळे जड झालेल्या डोळ्यांनी आणि त्यामुळे आलेल्या थकव्याने झाली तर अख्खा दिवस वाईट जातो.

दिवसभर आपण पेंगत राहतो ज्यामुळे कामात लक्ष लागत नाही आणि कामे मनासारखी होत नाहीत.

दिवसाची सुरुवात ताजीतवानी झाली पाहिजे आणि त्यासाठी आपली झोप व्यवस्थित पूर्ण होऊन आपल्याला नैसर्गिक रित्त्या जाग यायला हवी.

आणि कोणी बळजबरी न करता आपण बिछान्यातून उठून आवराआवरी करायला सुरुवात केली पाहिजे.

हे सगळे कसे शक्य आहे? हा प्रश्न पडला ना? सोपे आहे यासाठी स्वतःला फक्त काही सवयी लाऊन घ्यायच्या आहेत.

ज्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठणे शक्य होईल. यासाठी काही सोप्या टिप्स आहेत.

१. झोपेचे वेळापत्रक ठेवा

आपल्याला रोज रात्री सलग ८ तास तरी झोप हवी असते, हे गृहीत धरून आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा ठरवून ठेवा.

काहींना कामामुळे निश्चित वेळा ठरवणे अवघड जाईल पण अशावेळी साधारण वेळ ठरवून ठेवायची.

ज्यांना ठरविक वेळ ठरवणे शक्य आहे त्यांनी मात्र झोपायची आणि उठायची एक वेळ फिक्स करून ठेवायची.

म्हणजे रात्री १० ही जर झोपायची वेळ ठरवली तर सकाळी ६ ही वेळ उठण्यासाठी ठरवायची.

रात्री झोपण्याची वेळ आपण जितकी लवकर ठेऊ जितके ताजेतवाने आपल्याला सकाळी उठल्यावर वाटेल.

आपल्या या वेळापत्रकात शक्यतो बदल करायचा नाही.

अगदी सुटीच्या दिवशी सुद्धा. पण जर कधी काही कारणाने आपली झोपायची वेळ चुकली तरी आपल्या नियोजित वेळेलाच उठायचे म्हणजे हे वेळापत्रक बिघडत नाही.

सुरुवातीला कठीण वाटले तरी आपल्या शरीराला एकदा याची सवय झाली की अपोआप आपल्याला नियोजित वेळेला झोप येते आणि त्यामुळे सकाळी जाग आल्यावर आपली झोप पूर्ण होऊन आपण फ्रेश झालेलो असतो.

२. शांत झोपेसाठी काही सवयी बदला

आपल्या काही सवयी आपल्या अगदी नकळत आपल्या झोपेवर परिणाम करत असतात.

आपण एकदा आपली झोपण्याची नियोजित वेळ ठरवली की या सवयी बदलणे आपल्याला सोपे जाते.

संध्याकाळी जर चहा, कॉफी या सारखी उत्तेजक पेये घेतली तर त्याचा आपल्या झोपेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

म्हणून ही पेये संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळेला शक्यतो टाळावीत.

शांत झोप लागण्यासाठी झोपायला बेडरूममध्ये गेल्यावर शांत वाटेल असे वातावरण करण्याचा प्रयत्न करावा.

यासाठी एक कमी उजेडाचा लाईट तुम्ही लाऊ शकता.

झोपायच्या आधी किमान अर्धा तास, फोन, मोबाईलचा वापर टाळावा, कारण स्क्रीनटाईमचा आपल्या झोपेवर विपरीत परिणाम होत असतो.

झोपायला जाण्याच्या अगोदर थोडे वाचन केल्याने सुद्धा शांत झोप लागायला मदत होते. पण हे मात्र प्रत्येकाच्या आवडीनुसार असू शकते.

कुणाला झोपण्यापूर्वी संगीत ऐकण्याने सुद्धा फायदा होऊ शकतो.

शांत झोप लागली की अपोआप झोप पूर्ण झाल्यावर आपल्याला सकाळी विनासायास लवकर जाग येते.

३. गजर लांब ठेवा

“फक्त पाचच मिनिटे” असे म्हणून जर तुम्ही तुमच्या अलार्मच्या स्नुज बटनाचा वारंवार वापर करत असाल तर ते धोकादायक आहे.

फक्त पाच मिनिटे असे म्हणून दर पाच मिनिटांनी अलार्म बंद करणे असे आपण दोन चार वेळा तरी करतो.

पण एकदा जग आल्यावर परत जर आपण झोपत असू तर त्यामुळे आळशीपणा येतो.

यामुळे दिवसभर आपण पेंगत राहण्याची शक्यता असते.

त्यामुळे कितीही अवघड वाटले, डोळे उघडत नसले तरी एकदा जाग आली की परत झोपायचे नाही, अगदी पाच किंवा दोन मिनिटांसाठी सुद्धा.

मग यावर उपाय म्हणून आपण आपला गजर आपल्या बेडपासून लांब ठेऊ शकतो जेणेकरून तो बंद करण्यासाठी आपल्याला उठावेच लागेल.

यामुळे जाग आल्यावर सुद्धा पाच मिनिटे झोपण्याचा मोह आपल्याला होणार नाही.

परंतु फोन लांब ठेऊन सुद्धा उठून तो जवळ घेऊन पुन्हा स्नुझ करणं ही खोड सुध्दा आपल्या पैकी बरेच जणांना असते.

चक्क मलाच ती सवय होती. यासाठी मी एक हास्यास्पद पण खरंच जालीम उपाय केला, तो असा की,

अलार्म वाजनारा मोबाईल पाच दिवस झोपण्यापूर्वी उंचावर ठेवला. मग उंचावरून तो काढण्याची कसरत करता करता, उशिरापर्यंत राहणारी निद्रादेवी छुमंतर व्हायला जी सुरुवात झाली ती पाच दिवसात सवयच होऊन गेली.

आणि आता अलार्म दूर ठेवायची गरजच राहिली नाही.

४. जंक फूड टाळा

व्यवस्थित पोटभर सकस अन्न खाल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते.

पण जर जंक फूड खाल्ले तर दिवसभर सुस्ती आल्यासारखी वाटते.

प्रमाणाबाहेर जेवण झाले, इकडचे तिकडचे अरबट चरबट खाणे झाले तरी आपल्याला उत्साह वाटत नाही.

म्हणून आहारात शक्य तितक्या ताज्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करावा म्हणजे आपल्याला दिवसभर उत्साह वाटेल.

५. खोलीत सकाळी सूर्यप्रकाश येउद्या

आपल्या शरीराचे स्वतःचे एक घड्याळ असते ज्याला circadian rhythms असे म्हणतात.

यामुळे आपण दिवसा जागे राहतो आणि रात्री झोपतो.

काही कारणाने ही सायकल बिघडली की आपले झोपेचे तंत्र बिघडते.

सूर्यप्रकाश या सायकलला नियंत्रित करतो. म्हणूनच आपल्या खोलीत भरपूर नैसर्गिक उजेड यावा अशी सोय करावी.

सकाळी उठल्यावर ताबडतोब खिडक्या उघडून सूर्यप्रकाश खोलीत शिरू द्यावा किंवा आपण घराबाहेर अंगण असेल तर अंगणात किंवा बाल्कनीत थोड्यावेळ बसावे.

यामुळे आपल्या शरीराला ‘सकाळ’ झाल्याचा सिग्नल मिळेल आणि आपण फ्रेश होऊ.

सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे आणि झोप पूर्ण होणे या दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत.

व्यवस्थित झोप लागावी यासाठी काही उपाय आपण बघितले, याचबरोबर सकाळी जाग आल्यावर काय केल्याने आपण आपला, आळशीपणा, थकवा घालवू शकतो आणि दिवसाची सुरुवात उत्साहात करू शकतो हे सुद्धा आपण पाहिले.

या काही सोप्या सवयी आहेत ज्या स्वतःला लाऊन घेतल्या तर सकाळी लवकर उठणे, आणि लवकर उठल्यावर सुद्धा ताजेतवाने वाटणे, दिवसभर न पेंगता तो उत्साह टिकवून ठेवणे हे काही अवघड वाटणार नाही.

पण याचबरोर या सगळ्या उपायांनी सुद्धा काही फरक पडत नसेल तर आपल्याला सकाळी जास्त झोप का येते, रात्री झोप का लागत नाही, उत्साह का वाटत नाही यामागची कारणे शोधली पाहिजेत.

यासाठी कारणीभूत असणाऱ्या निद्रानाश किंवा तत्सम आजारांवर योग्य ते उपचार घेतले पाहिजेत.

https://www.manachetalks.com/13185/tips-to-get-dip-sleep-marathi/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “सकाळी लवकर उठवत नसेल तर या लेखात सांगितलेल्या ट्रिक्स आजमावून बघा”

  1. फारच छान माहिती दिली…
    धन्यवाद…

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय