कोणाचाही माॅरल सपोर्ट नसताना आयुष्यात यशस्वी होण्याची ५ सूत्रे

तुम्हाला असे कधी जाणवले आहे का की आयुष्यात यशस्वी व्हायला जे एक प्रोत्साहन लागते ते तुम्हाला मिळत नाही?

एखादी चांगली गोष्ट केल्यावर तुम्हाला अपेक्षित असलेली पाठीवरची कौतुकाची थाप द्यायला आणि जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे एखादी गोष्ट घडत नसेल तर तुम्हाला थोडेसे ‘पुश’ करून पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करायला आजूबाजूला कोणी नाही?

हे असे वाटणे सोपे नक्कीच नाही.

आपण धडपडत असताना, यशस्वी होण्याची खटपट करत असताना, आपल्याला एका खंबीर आधाराची गरज असते.

आपण पडलो, तरी त्या आधारामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याची उभारी आपल्याला मिळत असते.

खरेतर आपल्या मेहनती इतकाच हा आधार सुद्धा मोलाचा असतो आणि आपल्या यशामध्ये त्याचा सुद्धा तितकाच वाटा असतो.

पण तुम्हाला माहीत आहे का?

बहुतांश यशस्वी लोकांना हे मार्गदर्शन किंवा सपोर्ट तर नसतोच, वर त्यांना तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही हे देखील एकेकाळी ऐकवले गेले असते.

पण तरी सुद्धा ती लोकं यशस्वी होतात.

मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला असा सपोर्ट नसेल, तुम्हाला सुद्धा, तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही असे सांगणारी लोकं आजूबाजूला असतील तर काळजी करू नका.

आणि खात्री बाळगा, आपल्या स्वतःच्या जोरावर, हिंमतीवर आपण यश संपादन करू शकतो.

खरेतर, हे तुम्हाला सुद्धा पटेल की इतर कोणाचाही सपोर्ट नसताना मिळवलेल्या यशाची किंमत जरा जास्तच असेल.

या लेखात आपण कोणाचाही सपोर्ट नसताना, आपल्या यशाबद्दल कोणीही खात्री देत नसताना, आपल्याला कोणाचेही प्रोत्साहन नसताना यशस्वी कसे व्हायचे यासाठी काही सूत्रे दिली आहेत.

तुम्ही जर ही सूत्रे व्यवस्थित वाचून ती प्रामाणिकपणे आचरणात आणली तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.

१. नियोजन करा

आपल्याला नक्की काय हवे आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.

आपले नियोजन सुरु होते ते, या प्रश्नापासून. एकदा आपल्याला काय हवे आहे, म्हणजेच आपले ध्येय काय आहे?

याचे उत्तर मिळाले, की मग आपली नियोजनाची खरी सुरुवात होते.

आपले ध्येय कसे साध्य करायचे, त्यासाठी काय प्रयत्न करायचे?

आपल्या आयुष्यात कोणते बदल करायचे? या सगळ्या गोष्टी बसून ठरवल्या पाहिजेत.

आपल्या मनाशी या गोष्टी पक्क्या झाल्या की त्या कागदावर रीतसर उतरवून ठेवल्या पाहिजेत.

तुम्हाला कदाचित हे काम कंटाळवाणे वाटेल, डोक्यात असताना कागदावर लिहून ठेवायची काय गरज असेही वाटेल पण हे नियोजन करणे, ते लिहून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

कारण यामुळे आपल्याला ध्येयापर्यत जायला एक निश्चित मार्ग मिळणार असतो.

कागदावर लिहिल्यामुळे तुम्ही ठरवलेल्या गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर सतत दिसण्याची सोय होते ज्यामुळे तुमच्या नकळत सुद्धा तुम्हाला प्रेरणा मिळत असते.

नियोजन केल्याने वेळ सुद्धा पुष्कळ प्रमाणात वाचतो. कारण तुम्हाला काय करायचे आहे आणि कधी करायचे आहे हे गणित पक्के साधले असते.

एखाद्या गोष्टीचे नियोजन न करता ती गोष्ट करायला सुरुवात केली तर त्यात वेळेचा अपव्यय होतो पण नियोजनामुळे सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो.

आणि तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायला सोपे जाते आणि ते करताना वेळेची सुद्धा बचत होते.

२. सतत शिकत राहा

तुमचे शाळा, कॉलेज हे शिक्षण संपले असले तरी आयुष्याकडे तुम्हाला शिकवायला भरपूर असते.

त्यामुळे आपण कितीही शिकलो तरी आयुष्याचे आपण नेहमी विद्यार्थीच राहतो.

ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.

वेगवेगळ्या अनुभवातून आणि चुकांमधून तुम्ही सतत शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे.

आयुष्यात चुका होणे स्वाभाविक आहे न एक चूक झाली, तर त्यातून शिकून पुढे जाता आले पाहिजे.

आयुष्यात प्रगती करायची असेल तर सतत धडपड करायला हवी.

एकसंथ आयुष्य असेल तर त्यात प्रगती करणे शक्य होत नाही.

त्यामुळे वेगेवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून, शक्य त्या ठिकाणांहून माहिती गोळा करणे या गोष्टी सतत केल्या पाहिजेत.

तुम्ही जर यशस्वी लोकांचे नीट निरीक्षण केले असेल तर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की अशी लोकं सतत आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलत असतात.

त्यांची नेहमी नवीन शिकण्याची तयारी असते, जुन्यातच अडकून बसणे त्यांना मान्य नसते.

या लोकांकडून हा धडा घेण्यासारखा आहे. आयुष्यात प्रगती करायची असेल, यशस्वी व्हायचे असेल तर नवीन गोष्टी शिकून पुढे जात राहणेच हिताचे असते.

३. तुमचे लक्ष विचलित होईल अशा गोष्टींपासून लांब राहा

वर म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर काटेकोर नियोजन गरजेचे असते.

यात वेळेला प्रचंड महत्व दिले पाहिजे. वेळ वाया जात असेल तर आपण आपल्या ध्येयापासून एकेक पाऊल मागे जात असतो.

म्हणूनच तुमचा वेळ कशामुळे जातो या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे.

सोशल मिडिया, टीव्ही की अजून काही?

हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे.

आणि तुम्हाला समजले की अमुक गोष्टीमुळे तुमचा वेळ जातो, तर जाणीवपूर्वक ती गोष्ट कमी करा.

उदाहरण द्यायचे झाले तर, जर तुम्ही दिवसातला खूप वेळ टीव्ही बघण्यात घालवत असाल तर असे समजा की टीव्ही हा तुमच्या आणि तुमच्या यशाच्या मधला अडथळा आहे.

यामुळे तुमचा टीव्ही बघण्याचा वेळ कमी होईल.

लक्षात घ्या यशस्वी लोक टीव्ही बघण्यात अति वेळ घालवत नाही.

म्हणून टीव्हीवर आपण जास्त जाहिराती बघतो त्या, सामान्य वापराच्या वस्तूंच्या… ऑडी, मर्सिडीज च्या नाही!!

एखादी व्यक्ती सुद्धा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकते.

जास्त आणि विनाकारण बोलणारी, गॉसिप करून वेळ वाया घालवणारी, भांडण्याला आपला जन्मसिद्ध अधिकार समजणारी अनेक माणसे असतात.

पण या माणसांमुळे तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता कामा नये.

४. प्रेरणादायी लेख वाचा

एकदा तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टीमुळे तुमचा वेळ वाया जात होता ती गोष्ट ओळखून कमी केली तर तो वेळ तुम्ही इतर चांगल्या गोष्टीत घालवू शकता.

आयुष्यात सगळ्यांनाच प्रेरणेची गरज असते. त्यासाठी वेगवेगळे प्रेरणादायी लेख वाचणे, सक्सेस स्टोरी वाचणे, त्याबद्दल व्हिडीओ बघणे या गोष्टी तुम्ही करू शकता.

चांगल्या विचारांच्या लोकांना आपल्या जवळ स्थान द्या.

यामुळे तुमचा वेळ नक्कीच वाया जाणार नाही.

दिवसातला काही रिकामा वेळ असतो त्यावेळी तुम्ही या गोष्टी करू शकता.

निखळ मनोरंजनाला आपल्या दिवसातला काही वेळ नक्की द्या.

जर काही कारणाने तुम्हाला हताश, निराश वाटत असेल तर यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल.

तुमच्यात जर काही नकारात्मकता आली असेलच तर ती सुद्धा निघून जाईल आणि तुमचे उदिष्ट्य साध्य करायला तुम्हाला भरपूर प्रमाणात उर्जा मिळेल.

५. सतत प्रयत्नशील राहा

हा मुद्दा वाचून तुम्हाला कदाचित वाटेल की यशस्वी व्हायचे असेल तर हे साहजिक आहेच.

यात काय सांगण्यासारखे आहे?

पण सतत प्रयत्न करत राहा असे सांगणे काहीवेळा अपरिहार्य असते.

प्रगतीपथावर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

यश असे सहजपणे मिळत नाही.

त्यासाठी अनेकदा अपयश पचवावे लागते. हे करताना बऱ्याचदा तुमचा धीर जाऊ शकतो, उत्साह कमी पडू शकतो.

विशेषतः तुम्हाला इतर कोणाचा आधार नसेल तर.

त्यामुळे जरी सुरुवातीला यश मिळाले नाही तरी तुम्ही खचून जाता कामा नये.

तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल आणि यात भरीस भर म्हणून जर तुम्हाला जमणार नाही असे सांगून तुम्हाला खाली खेचू पाहणारी लोकं आजूबाजूला असली, तरी प्रयत्न सोडता कामा नये.

अनेक अडचणींचा सामना करून यश मिळणार असते, त्यामुळे अडचणी आहेत म्हणू प्रयत्न सोडून चालणार नसते.

मित्रांनो, यश मिळवणे सोपे नक्कीच नाही..

जर तुम्हाला कोणाचा सपोर्ट नसेल आणि तुम्हाला खाली खेचणारी लोकंच जर आजूबाजूला जास्त असतील तर नाहीच नाही..

पण प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतात ते याचसाठी.

आणि म्हणूनच या परिस्थितीतुन तुम्ही जात असाल तर, समजून घ्या त्या काही मोजक्या आणि भाग्यवान लोकांमधले तुम्ही आहात, ज्यांनी असंख्य अडचणी पार करत यशाला कवेत घेतलं….

या लेखात दिलेल्या या सूत्रांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.. मग आजच नियोजनाला सुरुवात करा, पण त्याआधी हा लेख तुमच्या मित्रमैत्रिणींना शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “कोणाचाही माॅरल सपोर्ट नसताना आयुष्यात यशस्वी होण्याची ५ सूत्रे”

  1. मला ही पाच सुत्रे खुप आवडली व ती, मी डायरी मध्ये नोट सुद्धा केली, मी यावर नक्की काम करेल
    धन्यवाद.

    Reply
  2. कोणत्याही कामात एकाग्रता राहत नाही . सतत धरसोड वृत्ती असेल तर काय करावे याबद्दल एखादा लेख असेल तर कृपया त्याची लिंक पाठवावी

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय