तजेलदार, टवटवीत त्वचेसाठी हे घरगुती उपाय नक्की करून बघा

छान, तजेलदार, टवटवीत त्वचा असावी ही खरेतर प्रत्येकाची इच्छा असते. पण काही कारणाने चेहऱ्यावर पिंपल्स येतात, पुरळ येते आणि त्याचे डाग नेहमीसाठी ठेऊन जाते.

कधीकधी झोपेच्या अभावामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येतात तर कधी खाण्यात काही तेलकट जास्त आले तर त्वचा लगेच तेलकट आणि निस्तेज दिसू लागते.

कधी उन्हात जास्त हिंडल्यावर त्वचा काळपट पडू लागते. कधी कामाचा स्ट्रेस असतो तर कधी अति कामामुळे थकवा आलेला असतो.या सगळ्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचेचा पोत बिघडतो.

या सगळ्या गोष्टी तर आजकालच्या आपल्या जीवनशैलीमध्ये अपरिहार्य आहेत. काम, अभ्यास, घरकाम, बाहेर फिरणे हे सगळे टाळणे आपल्याला शक्य नसते.

पण या सगळ्याचा परिणाम आपल्या त्वचेवर का होऊ द्यावा? आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू म्हणून आपल्या त्वचेची निगा राखली पाहिजे.

चेहरा टवटवीत असेल तर समोरच्याला सुद्धा आपल्याकडे बघून प्रसन्न वाटते आणि आपल्याला स्वतःला सुद्धा वावरताना आत्मविश्वास जाणवतो.

यासाठी बाजारात अनेक क्रीम, फेस मास्क, फेस वाॅश उपलब्ध आहेत. त्या सगळ्याचा फायदा सुद्धा होत असेलच पण यापेक्षा सुद्धा परिणामकारक आणि स्वस्त उपाय हे खरेतर आपल्या स्वयंपाकघरात दडलेले असतात.

घरगुती उपाय करायला सोपे असतात, त्यांना कदाचित वेळ जास्त लागत असेल पण त्यातून होणारा फायदा सुद्धा मोठा असतो. शिवाय ते अत्यंत स्वस्त असतात आणि मुख्य म्हणजे त्यांचा कोणताही विपरीत परिणाम नसतो.

टवटवीत, उजळ त्वचेसाठी सुद्धा असे अनेक घरगुती उपाय आहेत. हे उपाय जर नियमितपणे केले तर त्वचेच्या तक्रारी नक्की दूर होतील.

आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे किंवा बाहेरच्या प्रदुषणामुळे, धुळीमुळे जो त्वचेचा पोत बिघडलेला असतो तो सुद्धा पुर्वव्रत व्हायला या घरगुती उपायांचा निश्चितच फायदा होतो.

या लेखात असे काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत जे तुम्ही घरी अगदी सहज करून टवटवीत, उजळ त्वचा मिळवू शकता.

१. हळद

हळदीत अँटी बॅक्टेरीअल गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवर आलेले पिंपल्स कमी होण्यास मदत होते. पिंपल्सचे डाग सुद्धा यामुळे कमी होतात.

हळदीमध्ये असणारे करक्यूमीन हे त्वचेला आलेली सूज कमी करते आणि त्यामुळे त्वचा टवटवीत दिसू लागते. चेहऱ्यावर आलेली लव सुद्धा हळदीमुळे कमी होते ज्यामुळे चेहरा उजळ दिसायला लागतो.

यामध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट हे त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी मदत करतात.

उजळ आणि टवटवीत त्वचेसाठी एक चमचा हळद एक वाटी बेसन पिठात पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची. त्यात थोडे गुलाब पाणी घालायचे.

ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेला एकसारखी लाऊन घ्यायची. सुकल्यावर पाण्याने चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा उपाय केल्यास त्वचेत फरक लगेच आढळून येतो.

२. मध

मध चेहऱ्याला नैसर्गिक ओलावा देते. ड्राय स्कीनसाठी मध हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. मधात सुद्धा अँटी बॅक्टेरीअल गुणधर्म असतात ज्यामुळे पिंपल्स कमी होण्यासाठी मदत होते, तसेच पिंपल्स फुटून, त्यामध्ये पस होण्याची शक्यता सुद्धा कमी होते.

मधामुळे चेहऱ्यावरचे डाग फिके होतात. मधाच्या नियमित वापराने चेहरा फक्त उजळतच नाही तर त्यावरचे डाग, वयोमानाप्रमाणे होणारे पिगमेनटेशन सुद्धा कमी व्हायला मदत होते.

चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर एक चमचा मध बोटांनी मसाज करत लावायचा. बोटांचा वरचा भाग गोलगोल फिरवत साधारण दहा मिनिटे चेहऱ्यावर आणि मानेवर मसाज करत राहायचा आणि नंतर कोमट पाण्याने चेहऱ धुवून घ्यायचा.

उजळ, डाग नसलेली त्वचा हवी असल्यास आठवड्यातून एक-दो वेळा हा उपाय सहज करता येतो.

३. ओलिव्ह ऑईल

ओलिव्ह ऑईल हे एक अँटिऑक्सिडंट असते. यामुळे त्वचेच्या पेशींवरचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि वयानुसार त्वचेवर होणारे बदल जसे की फाईन लाईन्स, सुरकुत्या कमी होतात.

चेहऱ्याच्या पेशींच्या आरोग्यासाठी सुद्धा ओलिव्ह ऑईल चांगले असते, स्कीन सेल रिपेअरचे काम करते. यामुळे त्वचा तजेलदार दिसायला लागते.

रात्री झोपण्यापूर्वी हातावर दोन ते तीन थेंब ओलिव्ह ऑईल घेऊन हाताने संपूर्ण चेहऱ्याला मसाज करावा. त्यानंतर एक स्वच्छ नॅपकीन कोमट पाण्यात बुडवून, व्यवस्थित पिळून घेऊन चेहऱ्यावर ठेवावा.

नंतर कोरड्या कपड्याने चेहरा पुसून घ्यावा.

४. दुध

आपल्या त्वचेला रंग देतो त्या द्रव्याचे नाव मेलॅनीन असते. जितके मेलॅनीन जास्त तितकी त्वचा जास्त काळी होते. टायरोसीन हे हार्मोन या मेलॅनीनची पातळी नियंत्रित करत असते.

दुध या टायरोसीनच्या पातळीवर नियंत्रण ठेवते जेणेकरून मेलॅनीनचे उत्पादन कमी होते. यामुळे त्वचेवर उन्हामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे आलेला काळपटपणा जाऊन नैर्सगिक ग्लो येतो.

हा उपाय करायला अतिशय सोपा असून यासाठी दिवसातून वेगळा वेळ सुद्धा काढायची गरज नसते. निरसे दुध फक्त रोज सकाळी उठल्यावर चेहऱ्याला चोळल्याने त्वचा उजळायला मदत होते.

५. बेसन

आपल्या भारतीय घरांमध्ये वर्षानुवर्षे वापरात असलेले बेसन हे त्वचेवरच्या डेड स्कीन सेल्स घालवायला मदत करते. त्याबरोबर धुळीचे किंवा प्रदुषणाचे कण जे त्वचेला चिकटलेले असतात ते सुद्धा निघून जातात.

यामुळे त्वचा जर डल दिसत असेल तर ती उजळते.

बेसन पाण्यात किंवा दुधात कालवून त्याचा लेप चेहऱ्यावर लावला तर त्वचा ताजीतवानी आणि उजळ व्हायला मदत होते.

६. काकडी

कोरडी, रुक्ष त्वचा, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे यावर रामबाण उपाय म्हणजे काकडी. यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो,त्वचेचा कोरडेपणा जातो आणि त्वचा टवटवीत दिसायला लागते.

डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असल्यास काकडीचे कप डोळ्यांवर ठेवल्याने किंवा काकडी किसून त्याचा रस डोळ्यांभोवती लावल्याने फरक पडतो.

काकडीचा रस पूर्ण चेहऱ्यावर सुद्धा लावला जाऊ शकतो.

७. पपई

पपई मध्ये एक पपईन नावाचे द्रव्य असते. यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग किंवा पिंपल्समुळे पडलेले डाग कमी व्हायला मदत होते. पपई चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरचे डेड स्कीन सेल्स सुद्धा निघून जायला मदत होते. यामुळे त्वचा टवटवीत व उजळ दिसते.

पपईच्या फोडींचा गर काढून घेऊन तो चेहऱ्यावर व्यवस्थित चोळून लावावा व थोड्यावेळाने धुवून टाकावा.

८. कोरफड

कोरफडीचे त्वचेच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यामध्ये विटामिन आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे त्वचा मऊ व उजळ होण्यास मदत होते.

उन्हामुळे काळपट पडलेल्या त्वचेवर सुद्धा कोरफड हा एक चांगला उपाय. कोरफडीमुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि तिच्या नियमित वापराने त्वचेला सुरकुत्या सुद्धा पडत नाहीत.

कोरफडीच्या पानांमधला गर काढून तो त्वचेवर १५ मिनिटे लाऊन ठेववा न नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

कोरफडीचे फायदे सांगणाऱ्या या लेखात तुम्हाला कोरफडीचे आजू उपयोग वाचायला मिळतील.

९. केळी

त्वचेच्या आरोग्यासाठी केळी अत्यंत उपयुक्त असतात. यामध्ये पोटाशीयम, व्हिटामिन ए आणि बी जास्त प्रमाणात असतात. यामुळे त्वचेला स्निग्धता मिळते.

त्वचेवर वायानुसार पडणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स सुद्धा कमी होतात.

पिंपल्स, पिगमेनटेशन सुद्धा कमी करण्यात केळी उपयुक्त असतात.

एक केळ मॅश करून चेहऱ्याला चोळून लावावे. १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यावा.

केळी गर, मध आणि लिंबाचा रस एकत्र करून फेसपॅक तयार करून तो सुद्धा चेहऱ्याला आणि मानेला लावल्यास फरक पडतो.

केळी त्वचेसाठी वापरायचा अजून एक सोपा मार्ग म्हणजे केळीची साल अलगद चेहऱ्यावर चोळावी यामुळे त्वचा उजळते व डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे सुद्धा नाहीशी होतात.

१०. केशर

त्वचा उजळ होण्यासाठी केशर हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे त्वचेवरचे डाग कमी होतात आणि त्वचा टवटवीत व उजळ दिसायला लागते. डार्क सर्कल्स साठी सुद्धा हा एक उत्तम उपाय आहे.

केशराच्या ती चार कड्या किंचित कोमट पाण्यात भिजवून ठेवाव्यात. नंतर हे पाणी हळद, मध, बेसन यामध्ये घालून फेसपॅक तयार करून घ्यावेत. वेगवेगळ्या फेसपॅकमध्ये हे केशर वापरता येते.

तुमच्या चेहरा या घरगुती उपायांनी नक्की टवटवीत व उजळ दिसेल. सुरकुत्या, फाईन लाईन्स, डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट यासारख्या अनेक तक्रारी सुद्धा नाहीशा होतात.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय