फेसबुक डेटा लीक…………

Facebook Data Breach

दोन तीन दिवसांपासून “फेसबुक डेटा लीक” (Facebook Data Breach) बद्दलच्या बातम्या आपण सगळ्याच चॅनल वरून तावा तवाने होत असतांना बघतोय. गेल्या तीन चार वर्षांपासून इलेकट्रोनिक माध्यमं असो किंवा सोशल मीडिया असो पब्लिकचा विचार एका विशिष्ठ दिशेने नेण्यासाठी खूपच महत्वाची भूमिका पार पडतोय.

न्यूज चॅनल्स वर चर्चा झडताहेत कि भारतीयांना बाजारपेठ म्हणून वापरलं जातये थोडक्यात म्हणजे डेटा विकला जातोय. आणि मुख्यतः पॉलिटिकल पार्ट्यांना तो विकला जातोय. तुम्ही आम्ही फेसबुकवर सहजच आपला वेळ घालवत असतांना बरेचदा काही स्पॉन्सरड पोस्ट बघतो.

उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या कम्पनीचं काही आरोग्याबद्दलचं प्रॉडक्ट आहे आणि त्यांना त्याची जाहिरात करायची आहे तर टीव्ही वर किंवा वर्तमानपत्रात कशी येते आणि आपण बघतो हे आता ओळखीचे झाले आहे. पण हीच जाहिरात जेव्हा सोशल मीडियावर होते तो प्रकार थोडा वेगळा असतो. जसं एखाद्या आयुर्वेदिक कम्पनीची जाहिरात करतांना ती जाहिरात सरसकट सगळ्यांना दाखवली जाण्यात अर्थ नाही म्हणून त्यासाठी एक टार्गेटेड ऑडियन्स असा निवडला जातो कि ज्याला आयुर्वेदात रस आहे, तो विशिष्ठ प्रॉडक्ट कुठल्या भागात म्हणजे देशात किंवा राज्यात विकायचा आहे वगैरे वगैरे. तर हा टार्गेटेड ऑडियन्स निवडण्याचा अधिकार किंवा सोय यालाच डेटा विकला असं म्हंटल जातय … तर तसं पाहिलं तर हि एक जाहिरात करण्याची एक नवीन पद्धत झाली.

परंतु आपल्या भारतातल्या किंवा कुठल्याही राजकारणात एक सज्ञान नागरिक म्हणजे एक मत असंच बघितलं जातं आणि तिथेच सुरुवात होते तुमची आमची माहिती अशी चुकीच्या पद्दतीने वापरायला कि ज्यामुळे एखाद्या विशिष्ठ राजकीय पक्षाला स्वतःचा फायदा करून घेता येईल किंवा त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे विरोधी लोकांना बदनाम करता येईल किंवा थोडक्यात दुष्प्रचार करता येईल. बरेचदा आमच्याकडे सोशल मीडिया मार्केटिंगसाठी राजकारणी येऊन त्यांना साध्य करून घ्यायचे इप्सित सांगतात तेव्हा खरतर भारीच करमणूक होते.

तर आपण आपल्या करमणुकीसाठी किंवा माहितीसाठी सोशल मीडिया वापरतांना एवढं नक्कीच बघावं कि एक निवडणुकीतलं मत मिळवण्यासाठी तर आपला उपयोग होत नाहीये ना!! कारण हे हत्यार वापरून विरोधकांना बदनाम करणं आणि मत मिळवणं हा येत्या काळातला मोठा धोकाच आहे.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!