शीघ्रपतन– कारणे, लक्षणे आणि घरगुती, आयुर्वेदिक उपाय

सं_भो_ग किंवा से_क्स करणे हा मानवी जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे.

निरोगी आणि निकोप आयुष्य जगण्याचा तो एक मार्ग आहे. परंतु अनेक पुरुष सं_भो_ग करत असताना शीघ्रपतन (प्रीमॅचूअर इजॅक्युलेशन) ह्या समस्येने ग्रस्त असतात.

त्यामुळे ते निरोगी काम_जीवन जगू शकत नाहीत. शिवाय आपल्याकडे ह्या विषयावर चर्चा होत नसल्यामुळे ते फक्त मनात कुढत राहतात.

परंतु आयुर्वेदात ह्यावर अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

शीघ्रपतन म्हणजे काय

शीघ्रपतन ही पुरुषांमध्ये आढळणारी एक काम समस्या आहे. ह्यामध्ये सं_भो_ग करतेवेळी अगदी सुरुवातीलाच किंवा अगदी थोड्या वेळात वीर्यस्खलन होते.

त्यामुळे सं_भो_गाचा आनंद पूर्णपणे लुटता येत नाही. आणि त्या व्यक्तीचे काम_जीवन निराश होत जाते.

शीघ्रपतनाची लक्षणे

१. कामोत्तेजन झाल्यावर लगेचच किंवा काही सेकंदात वीर्यस्खलन होणे.

२. सं_भो_ग सुरु केल्यापासून ६० सेकंदाच्या आत वीर्य स्खलन होणे.

३. कामो_त्तेजन न होणे

४. सं_भो_ग सुरू करण्याआधीच वीर्य स्खलन होणे.

शीघ्रपतनाची कारणे

शीघ्रपतन होण्यामागे शारीरिक आणि मानसिक दोन्ही कारणे असतात.

प्रथम आपण मानसिक कारणे पाहूया

मानसिक ताण असल्यामुळे मनुष्याच्या शरीरात हार्मोनल बदल होतात, त्यामुळे कामजीवनावर परिणाम होतो.

मानसोपचार तज्ञांच्या मते शीघ्रपतन होण्यामागे खालील मानसिक कारणे आहेत.

  • मानसिक तणाव किंवा नैराश्य
  • पती पत्नी मधील संबंध तणावपूर्ण असणे
  • अतिविचार किंवा चिंता करणे
  • इरेक्टाईल डिसफंक्शन किंवा लिंग दोष
  • ह्याबाबतीत अननुभवी असणे

ह्या समस्येला काही शारीरिक कारणे देखील आहेत. ती खालीलप्रमाणे

  • शरीरात कामोत्तेजक हॉर्मोन्स (टेस्टेस्टेरोन) चे प्रमाण बिघडणे.
  • मूत्रमार्गात संसर्ग होणे
  • प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ होणे
  • अनुवांशिकता
  • एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया

शीघ्रपतन होण्याची आणखीही काही कारणे आहेत.

  • अति मद्यपान
  • अमली पदार्थांचे सेवन
  • धूम्रपान
  • जास्त प्रमाणात अँटिबायोटिक्स घेणे
  • खूप जास्त प्रमाणात जंक फूड खाणे

इरेक्टाईल डिसफंक्शन किंवा लिंग दोष होण्याची कारणे

  • हॉर्मोन्स चे संतुलन बिघडणे
  • उच्च रक्तदाब, मधुमेह
  • नैराश्य
  • मानसिक आघात

शीघ्रपतनावर घरगुती उपाय

१. अश्वगंधा- अश्वगंधा कामविकारावर अत्यंत गुणकारी आहे. हीच्या सेवनाने शरीरात ताकद येऊन शीघ्रपतन आणि नपुंसकतेवर उपयोग होतो.

२. इसबगोल– इसबगोल फक्त अपचनावर च नाही तर शीघ्रपतन सारख्या समस्येवर देखील उपयुक्त आहे. इसबगोल, पिठीसाखर आणि खसखस ह्यांचे मिश्रण दुधात मिसळून रोज रात्री घेण्यामुळे फायदा होतो

३. पांढरी मुसळी- एक चमचा पांढरी मुसळी पावडर रोज रात्री दुधात मिसळून घेतल्यामुळे शीघ्र पतन कमी होते आणि कामजीवन अधिक सुधारते.

४. वेलदोडा- रोज सकाळी ३ वेलदोडे केळ आणि गरम दूधाबरोबर घेण्यामुळे फायदा होतो.

५. एरंडेल तेल- लिंगावर एरंडेल तेलाने मालीश करण्याचा ह्या समस्येवर खूप उपयोग होतो.

६. बदाम- बदाम हे शक्तिवर्धक आहेत. त्यामुळे आहारात बदामाचा समावेश केला असता ह्या समस्येवर निश्चित फायदा होतो.

७. कांदा– कच्चा कांदा खाणे तसेच कांद्याचे बी पाण्यातून घेणे हे ह्या समस्येवर उपयोगी आहे.

८. भेंडी- एक चमचाभर भेंडीची पावडर एक ग्लास दुधात घालून रोज रात्री सेवन केले असता बराच फरक दिसून येतो.

९. आलं- मध घालून आल्याची पेस्ट घेतली असता शरीरात उष्णता वाढते, रक्ताभिसरण वाढते आणि परिणामी शीघ्रपतनावर मात करता येऊ शकते.

१०. तुळस- तुळशीची पाने चावून खाण्याचा ह्या समस्येवर लाभ होतो.

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे शरीरात वात दोष वाढला की ही समस्या उद्भवते. त्यामुळे वर सांगितलेले उपाय ह्यावर प्रभावी ठरतात.

शीघ्रपतन ह्या समस्येने ग्रस्त असताना आहार कसा असावा?

१. सकस आणि पचनास हलके अन्न खावे.

२. अति वातकारक अन्न खाऊ नये.

३. जंक फूड चा अतिरेक टाळावा .

४. तेलकट मसालेदार भोजन खाऊ नये

५. मानसिक स्वास्थ्य जपावे

६. धूम्रपान, मद्यपान करू नये.

अशी असावी जीवनशैली

१. नियमित योगासने व व्यायाम करावा.

२. मन शांत ठेवावे.

३. ह्याच समस्येचा सतत विचार करू नये.

४. थकव्यामुळे देखील असा त्रास होऊ शकतो, त्यामुळे रोज पुरेशी विश्रांती, झोप घ्यावी.

५. सं_भो_ग करताना मन आनंदी, उत्साही असावे.

तर हे आहेत शीघ्रपतन रोखण्याचे काही घरगुती उपाय. आपल्याकडे ह्या समस्येचा फार बाऊ केला जातो आणि ह्या बाबतीत कोणीच मोकळेपणाने बोलत नाही.

त्यातून मग रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भोंदू वैदूंकडून काहीतरी औषध घेतले जाते. परंतु असे करणे योग्य नाही.

त्यामुळे काही उपयोग होण्यापेक्षा शरीराला अपाय होण्याचीच जास्त शक्यता असते.

म्हणून तुम्ही जर ह्या समस्येने ग्रस्त असाल तर वर दिलेले घरगुती उपाय करून पहा. त्या उपायांचा लाभ घ्या आणि आनंदी कामजीवन जगा.

स्वस्थ रहा, आनंदी रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय