स्वप्नपुर्ती

मागच्या एक ऑक्टोबरला एका चार मजली इमारतीच्या मटेरीअल सहीत कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळले होते, चार तारखेला कामाला सुरुवात झाली होती, आणि आज बरोब्बर नऊ महीन्यांनी ती इमारत पुर्ण करुन बांधकाम मालकाच्या ताब्यात दिली आहे.

आज, त्या इमारतीकडे बघुन डोळ्यातुन आनंदश्रु येत आहेत.

काय योगायोग आहे?

नऊ महीन्यात आई आपल्या अपत्याला जन्म देते, आणि जणु ही इमारत म्हणजेही माझं अपत्यच आहे.

आज बाळाला जन्म दिलाय अशी फिलींग येतेय पण ह्या प्रसुतीवेदना सहन करणे निश्चितच सोपे नव्हते.

तसं तर मागच्या पाच वर्षांत कित्येक मटेरीअल कॉन्ट्रॅक्ट घेतली आणि सक्सेसफुली पुर्णही केली. अशी कामं करणं सोपं नसतचं मुळी, अनुभव दांडगा आहे, पण हा प्रोजेक्ट आगळावेगळा होता. याला एका कौंटुबिक वादाची पार्श्वभुमी होती.

हे फक्त बांधकाम नव्हतंचं, हा हिंमतीने दिलेला लढा होता. धनदांडग्या शक्तिंविरुद्ध, भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरुद्ध. अगदी रोज प्रचंड मानसिक तणावाचे प्रसंग यायचे, खरचं हा काळ परीक्षा घेणारा होता, त्यामुळे दिवसा अखंड पायाला भिंगरी लावल्यासारखं पळायला लागायचं, रोज नवी अडचण हजर असायची आणि म्हणुन बैचेन बनुन अनेक रात्री जागुन काढाव्या लागायच्या.

अगदी काम घेतल्यापासुनच वेगवेगळे फोन यायला लागले, कधी आपल्याच जवळच्या माणसांचे दबाव टाकणारे, कधी अप्रत्यक्ष धमक्या देणारे.

आम्ही बधलो नाही, मग वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरु झाले. वारंवार साईटवरुन बांधकाम साहीत्याची चोरी व्हायला लागली. त्यात नगरपालीकेने सात-आठ वेळा काम बंद पाडले. अनेकदा बांधकाम साहीत्यही जप्त केले. तिथल्या बनेल अधिकार्‍यांनी आमच्याशी अनेक उलटेसुलटे डाव खेळले.

पण आम्ही हार मानली नाही, आपल्या चिमुकल्या शक्तिसोबत पण जिद्दीने पाय रोवुन भक्कमपणे उभा राहीलो, सगळ्यांना चिवटपणे यशस्वी झुंज दिली आणि रेकॉर्डब्रेक वेळात सुंदर इमारत पुर्ण केली.

आज, आत्ता या क्षणी खुप आश्चर्य वाटतयं, हे अशक्य काम कसं साध्य झालं?

नो डाऊट! माझ्या साथीदारांमूळेच. आज ह्या आनंदाच्या क्षणी त्या सर्वांचे चेहरे पुन्हापुन्हा डोळ्यासमोर येत आहेत.

माझा सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर आणि नंतर जिवलग दोस्त बनलेला “शंकर कदम”. सतत हसतमुख, always calm & quite. कसलीही अडचण असु द्या, पहीला फोन यालाच जायचा, आणि हाही प्रत्येकवेळी हनुमानासरखा तात्काळ धावुन यायचा. मित्रा, लाज राखलीस!, तुला कितीही वेळा ‘थॅंक यु’ म्हण्टले तरी कमी आहे.

“मनोज सुर्यंवंशी” सर, तुम्ही वेळोवेळी डिझाईनमध्ये फेरफार होवुनही तात्काळ स्टील डिझाईन दिलीत तसंच प्रत्येक संघर्षाच्या वेळी असोसीएशनचे अध्यक्ष म्हणुन ठामपणे मागे उभा राहीलात, लढण्याची हिंमत दिलीत, मनापासुन आभार सर!…

माझा जिगरी दोस्त आणि थंड डोक्याचा, पण अतिशय तल्लख असा वकील-मित्र “नरेश उगीले”, याच्याशी बोललो की सारे टेंशन कुठल्याकुठे पळुन जायचे. मित्रा! आजच्या दिवसाचे श्रेय तुझेच आहे. कुठुन शिकलास ही कला?

फरशीकाम करणारा “चंद्रपाल शर्मा”, हा मुळचा राजस्थानी मिस्त्री, आणि तसं माझं हे याच्यासोबतचं पहीलचं काम, पण हाही इतका घनिष्ठ बनला की जणु याचे माझे मागच्या जन्मीचे ऋणानुबंध असावेत. रात्र-रात्र भर जागुन याच्या टिमने काम पुर्ण केले तेही अगदी उत्कृष्ट गुणवत्तेचं.

“सतीश कुलकर्णी”, “सचिन मोरे” आणि “सुरेश रणदिवे” हे फॅब्रिकेटर, प्रत्येकाने आपापली भुमिका चोख पार पाडली तर गुरुकृपा ग्लासच्या “कंजे” ग्रुपने सगळ्या काचेच्या दरवाजे-खिडक्या बसवण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली.

इलेक्ट्रीशिअन “राजु पताळे” आणि प्लंबर “भागवत गुब्बाळे” ही राम-लक्ष्मणाची जोडीच जणु. बोलावल्याबरोबर हजर व्हायची. पेंटर “धनराज” नाईकवडे आणि “लक्ष्मण बारोळे”, तुम्हीही तुमचे काम चोख बजावले.

माझे सप्लायर्स प्रमोद गुंडरे, मोरलवार, सय्यद, बनसोडे, बाहेती, नावंदर कंपनी आणि अनेक इतरजण, सर्वांचे मनःपुर्वक आभार!

भागवत बरुरे आणि सुधिर बिर्ले, तुम्ही तर मला भावासारखे आहात, तुमचे आभार कसे मानु?

आणि सर्वात महत्वाचे –

त्यांचे सर्वात मोठे आभार, ज्यांच्यामुळे हे सगळं झालं. “बांधकाम ओनर”, अगदी जुजबी ओळखीवर कोणी आयुष्यभराची कमाई दुसर्‍याच्या हाती सोपवतं का? पण तुम्ही सोपवलीत. आणि कामाचं पुर्ण स्वातंत्रय दिलंत, कसलीही ढवळाढवळ नाही की जाब विचारणं नाही, आणि पैसे मागण्याआधीच हजर, एकदम नियोजनबद्ध काम आणि एकदम चोख व्यवहार.
देव करो आणि मला यापुढचा प्रत्येक क्लायंट तुमच्यासारखाचं मिळु दे!…
ओके, मॉरल ऑफ द स्टोरी – कितीही अवघड संकट असु द्या, त्याला ठणकावुन सांगा, मी जिंकणारच…..
आज मीही अशीच एक अशक्य वाटणारी लढाई जिंकलोय आणि हा आनंद तुमच्याशी शेअर करतोय….

वाचण्यासारखे आणखी काही…..

Low Cost Housing – बांधकामाची किंमत कमी कशी कराल?
प्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७
गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!
गृहखरेदी करण्याआधी माहित असू द्या गृहकर्जाबद्दलचे गैरसमज


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय