फ्यूचर्स (Future) संबधित व्यवहारातील शब्दावली
फ्यूचर्स हा मालमत्तेच्या देवाणघेवाण विषयीचा, आज केलेला भविष्यातील करार असून यासंबंधीची प्राथमिक माहिती आपण मागील लेखात करून घेतली. असे व्यवहार करीत असताना अनेक परिचित आणि अपरिचित शब्द वारंवार वापरले जातात. यातील काही शब्दांची ओळख आज येथे करून घेवूया.
- स्पॉट प्राईज : फ्यूचर मध्ये ट्रेड होणाऱ्या मालमत्तेचा नियमित बाजारात (cash market) चालू असलेला भाव म्हणजे स्पॉट प्राईज होय.
- ट्रेडिंग सायकल : ज्या काळात एखाद्या विशिष्ठ मालमत्तेच्या फ्युचरचे सौदे होवू शकतात तो कालावधी.
- एक्पायरी डेट : ज्या दिवशी फ्यूचरचा करार संपणार आहे ती त्या कराराची मुदत संपण्याची तारीख.
- कॉन्ट्राक्ट साईज : फ्यूचरच्या करारात नमूद केलेल्या मालमत्तेची एकूण संख्या.
- बेसीस : फ्यूचरचे चालू भावातून स्पॉट प्राईज वजा केली असता येणारी किंमत . ही किंमत साधारणतः स्पॉट प्राईजहून अधिक असते , एक्पायरी डेटच्या दिवशी ती जवळपास येते.
- कॅश टू कॅरी : फ्यूचर खरेदी करण्याकरिता आलेला खर्च.
- मार्जिन : फ्यूचरचा लॉट खरेदी / विक्री करण्यासाठी जी रक्कम एक्सचेंजकडे जमा करायला लागते त्याला मार्जिन असे म्हणतात .ही रक्कम किती असावी ते एक्सचेंज ठरवते .जी रक्कम प्रथम जमा केली जाते तीस इनिशियल मार्जिन असे म्हणतात . तर रोज होणाऱ्या भावातील फरकामुळे जी रक्कम कमी अधिक करण्यात येते त्यास मार्किंग टू मार्जिन म्हणतात तर अधिक रक्कम जमा करावी लागल्यास त्यास मेंटेनन्स मार्जिन असे म्हणतात.
- प्रिमियम / डिस्काउंट ऑफ फ्यूचर : स्पॉट किंमतीपेक्षा फ्युचरची किंमत जास्त असेल तर तो फ्यूचर प्रिमियम मध्ये आहे आणि कमी असेल तर डिस्काउंटमध्ये आहे असे म्हणतात.
- बीटा : ही एक अशी संख्या आहे जी फ्यूचरच्या भावात होणारी चढ / उताराची सर्वसाधारण बाजारात होणाऱ्या चढ / उतार यांचा एकमेकांशी संबंध दर्शवते . दोन बदलणाऱ्या भावांचा एकमेकांशी असलेला संख्याशास्त्रीय संबंध समजतो ही किंमत एकहून कमी असल्यास बाजारातील किंमत बदलांचा फ्यूचरचे किंमतीवर कमी परिणाम होतो तर एक किंवा त्याहून अधिक असेल तर जास्त फरक पडतो.
- ओपन इंटरेस्ट : आजारात अस्तित्वात असलेल्या फ्यूचरच्या करारांची एकूण संख्या.
- पी सी आर : हे एक गुणोत्तर असून एकूण विक्रेत्यांचे खरेदिदारांशी असलेले प्रमाण दाखवते . यावरून बाजार कोणत्या दिशेला जाईल याचा अंदाज बांधता येण्यास मदत होते.
सर्वसाधारण माहिती होण्यासाठी Reliance Industries Ltd या कंपनीचे maneycontrol वरील futures चे दोन स्क्रीनशॉट दिले आहेत. यातील पहिले चित्र हे सध्या अस्तित्वात असलेल्या २६ एप्रिल २०१८, ३१ मे २०१८, २८ जून २०१८ रोजी संपणाऱ्या फ्युचर्सचे ५ एप्रिलचे बंद भाव आहेत. तर दुसऱ्या चित्रात २६ एप्रिल २०१८ रोजी बंद होणाऱ्या फ्यूचर्स चे तपशील आहेत. ₹९०८.२० हा स्पॉट मार्केटमधील रिलायन्सचे शेअरचा बंद भाव असून त्याहून अधिक चढत्या क्रमाने फ्यूचर्सचे भाव आहेत. २६ एप्रिल रोजी बंद होणाऱ्या फ्यूचर्सचे डिटेल्स जसे बीड प्राईज, ऑफर प्राईज ओपन इंटरेस्ट, कालच्या तुलनेतील ओपन इंटरेस्टमधील फरक, एव्हेरेज प्राईज, ओपन /हाय / लो प्राईज, कालचा बंदभाव, मार्केट लॉट, टर्नओव्हर, सौद्यांची संख्या, आजचा आणि कालचा ओपन इंटरेस्ट पी. सी. आर. दाखवला आहे.

वाचण्यासारखे आणखी काही…..
वायद्यांचे व्यवहार (Forward Transactions)
भविष्यातील व्यवहार ( Futures Transactions)
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.