कुरळे केस सरळ करण्याचे (स्ट्रेटनिंगचे) घरगुती उपाय

मैत्रिणींनो, लांबसडक, मऊशार, मुलायम केस कोणाला आवडत नाहीत? परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्यापैकी बहुतेकींचे केस रुक्ष आणि कोरडे झालेले असतात.. कुरळे केस असलेल्या महिलांना तर केसांची निगा राखणे असह्य होऊन जाते.

केस मुलायम आणि सरळ करण्यासाठी पार्लरमध्ये स्ट्रेटनिंग म्हणजेच केस सरळ करून घेणे हा उपाय करता येतो. परंतु अर्थातच तो उपाय कृत्रिम रसायने वापरून केलेला असतो. त्याचा केसांवर घातक परिणाम होऊ शकतो. केसांची मुळे कायमस्वरूपी डॅमेज होऊ शकतात. हा उपाय खर्चिक देखील असतो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे नाही.

त्यासाठी आज आपण घरच्या घरी केस सरळ आणि मऊ मुलायम कसे करू शकू ते पाहणार आहोत?

१. दूध आणि मध

दूध आणि मध एकत्र मिसळून केसांना मुळांपासून टोकापर्यंत लावावे. अर्धा तास तसेच ठेवून त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. केस मुलायम आणि सरळ होतात.

२. कोरफडीचा गर

ताजा कोरफडीचा गर केसांना लावून ठेवल्यास केस सरळ होण्यास मदत होते. कोरफडीचा गर दररोज केसांना लावावा.

३. कोमट तेल

केसांना मुळापासून टोकापर्यंत कोमट तेलाने मालिश करावी. त्यानंतर गरम पाण्यात भिजवून घट्ट पिळलेला पंचा अथवा टॉवेल केसांना बांधून ठेवावा. अर्ध्या ते एक तासाने केस धुवून टाकावेत. असे नियमित केल्याने केस मऊ आणि सरळ होतात.

तर हे आहेत केस सरळ करण्याचे घरगुती उपाय. बाजारातील कृत्रिम उपायांपेक्षा हे उपाय कितीतरी सोपे, सहज शक्य असणारे आणि कमी खर्चाचे आहेत. हे उपाय जरूर करून पाहा आणि तुमचे अनुभव आम्हाला कळवा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय