स्त्रियांना योनीमार्गात होणारे फंगल इन्फेक्शन म्हणजे यीस्ट इन्फेक्शन होय. कॅंडीडा एल्बिंकास नावाच्या फंगस पासून ते होते. योनीमार्गात फंगस आणि बॅक्टेरिया यांचा प्रादुर्भाव झाला की अशा प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.
यीस्ट इन्फेक्शन म्हणजे काय?
स्त्रियांच्या योनीमार्गात थोड्याफार प्रमाणात यीस्ट असणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु एखाद्या संसर्गाने किंवा सॅनिटरी पॅड, टॅम्पून्स यांच्या वारंवार वापरामुळे यीस्टच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. असे होणे स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. योनीमार्गात येणारा घाम, अस्वच्छ आतील कपडे , डिओडरंट यामुळेदेखील असे इन्फेक्शन होऊ शकते. जास्त ऍसिडीक साबण वरल्यामुळे देखील असे इन्फेक्शन होऊ शकते. तसेच गरोदर स्त्रियांमध्ये अशा प्रकारचे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण जास्त असते. वेळेवर याचा उपाय केला नाही ही तर बाळाच्या जन्माच्या वेळी त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो.
योनीमार्गातील यीस्टच्या इन्फेक्शनची लक्षणे
१. योनीमार्गातून घट्ट आणि पांढरा स्त्राव बाहेर येणे.
२. योनीमार्गात आणि आजूबाजूच्या त्वचेला खूप खाज येणे.
३. योनीमार्ग आणि आजूबाजूची त्वचा लाल होणे.
४. लघवी करताना वेदना होणे.
५. संभोग करताना वेदना होणे.
६. योनीमार्गातून होणाऱ्या स्त्रावाला दुर्गंधी येणे.
७. योनीमार्गात वेदना होणे.
ही आहेत योनीमार्गातील यीस्टच्या इन्फेक्शनची लक्षणे. अशा प्रकारचा संसर्ग पुरुषांना देखील होऊ शकतो परंतु स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
योनीमार्गातील यीस्टचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी
शारीरिक स्वच्छता न राखणे हे या इन्फेक्शनचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे गुप्तांगाची स्वच्छता राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.
१. स्वच्छ आणि सुती अंतर्वस्त्रे वापरावीत.
२. नायलॉन, रेयॉन इत्यादी सिंथेटिक कापडाची अंतर्वस्त्रे वापरणे टाळावे. असे कपडे ओले झाल्यानंतर लवकर वाळत नाहीत त्यामुळे इन्फेक्शन मध्ये वाढ होते.
३. वजन आटोक्यात ठेवावे. अशा प्रकारचे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण स्थूल लोकांमध्ये जास्त आहे.
४. रासायनिक पदार्थांनी युक्त असणारे सॅनिटरी पॅड, टेम्पून्स वापरू नयेत.
५. योनिमार्गाच्या स्वच्छतेसाठी खूप तीव्र ऍसिडीक साबण वापरू नये.
६. कोणत्याही संसर्गापासून वाचण्यासाठी आहार चांगला असणे अतिशय आवश्यक आहे त्यामुळे पौष्टिक आणि संतुलित आहार नियमित घ्यावा.
योनीमार्गातील इन्फेक्शन वर करण्याचे घरगुती उपाय
१. नारळाचे तेल
नारळाचे तेल/ खोबरेल तेल संसर्गावर विशेष गुणकारी असते. योनिमार्गाच्या आजूबाजूच्या संसर्ग झालेल्या भागात सलग दोन-तीन दिवस खोबरेल तेल लावावे. इन्फेक्शन कमी होते तसेच लालसरपणा आणि खाज येणे कमी होते.
२. दही
दही त्वचेचे पीएच बॅलन्स मेंटेन करण्यास मदत करते. एक ते दोन चमचे दही कापसाच्या मदतीने इन्फेक्शन झालेल्या भागात लावून ठेवावे. एक ते दोन तास ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. हा उपाय प्रभावी आहे. परंतु दह्यामध्ये काहीही मिसळू नये. शुद्ध स्वरूपाचे दही वापरावे.
३. तुळस
योनीमार्गातील इन्फेक्शनसाठी तुळस खूप गुणकारी आहे. पाच-सहा तुळशीची ताजी पाने संसर्ग झालेल्या भागावर रगडून लावावीत. तसेच तुळशीची पाने घालून केलेला चहा देखील कापसाच्या सहाय्याने त्या भागावर लावता येतो. तसे करण्याने इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
४. ॲपल साइडर विनेगर
योनीमार्गातील इन्फेक्शनसाठी ॲपल साइडर विनेगर खूपच गुणकारी आहे. दोन चमचे ॲपल साइडर विनेगर एक कप गरम पाण्यात मिसळून दररोज प्यावे. त्याशिवाय आंघोळीच्या टबमध्ये पाणी भरून त्यात एक कप ॲपल साइडर विनेगर घालून त्या पाण्यात एक तास बसावे. त्यानंतर नेहमीसारखी आंघोळ करावी. इन्फेक्शन कमी होण्यास खूप मदत होते.
५. टी. ट्री. ऑइल
योनीमार्गातील इन्फेक्शनसाठी टी ट्री ऑइल देखील गुणकारी आहे. बदामाच्या तेलात मिसळून टी ट्री ऑइल इन्फेक्शन झालेल्या भागावर मसाज करून लावावे. इन्फेक्शन कमी होण्यास खूप मदत होते.
तर हे आहेत योनीमार्गातील इन्फेक्शन वर करण्याचे घरगुती प्रभावी उपाय. या उपायांचा जरूर वापर करा.
परंतु हे उपाय वापरुनही इन्फेक्शन बरे झाले नाही अथवा सलग तीन दिवसांपेक्षा जास्त इन्फेक्शन होत राहिले तर स्त्रीरोगतज्ञ यांचा सल्ला अवश्य घ्या.
वर दिलेले उपाय वापरून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला जरूर सांगा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.