Types Of Cancer : महिलांमध्ये आढळणारे कॅन्सरचे ५ प्रकार

‘कॅन्सर’ .. हा शब्द जरी ऐकला तरी आपण सगळेच घाबरून जातो. कॅन्सरवरती अतिशय गुणकारी असे उपचार नाहीतच अशीच सर्वांची समजूत असते. खरे तर लवकर लक्षात आले तर कॅन्सर हा आजार बरा होणे शक्‍य आहे. परंतु लोक विशेषतः महिला आपल्याला होत असलेल्या आजाराबद्दल, दुखण्याबद्दल कोणाशीही मोकळेपणाने बोलत नाहीत आणि त्यामुळे आजार वाढल्यानंतरच तो लक्षात येतो. मग त्यावर उपचार करून जीव वाचवणे अवघड होऊन बसते.

जगभरात महिलांना होणाऱ्या कॅन्सरबाबत भारत तिसऱ्या स्थानावर असून दर वर्षी हे प्रमाण वाढतच आहे. समाजात याबद्दलची जागरूकता होणे अतिशय आवश्यक आहे. तसे झाल्यास या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळवणे आपल्याला शक्य होईल.

आज आपण महिलांच्या बाबतीतल्या पाच प्रकारच्या कॅन्सरची माहिती जाणून घेणार आहोत तसेच त्याबद्दल चर्चा करणार आहोत. ह्या माहितीमुळे महिला आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल मोकळेपणाने बोलू शकतील आणि काही आजार असेलच तर त्यावर लवकरात लवकर उपचार करून घेऊ शकतील.

१. स्तनाचा कॅन्सर (ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे)

महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये या प्रकारच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्तनामध्ये अनियंत्रित पद्धतीने गाठी होणे, पेशींची अनियमित वाढ होणे हे या प्रकारच्या कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे.

२. गर्भाशयाच्या ग्रीवेचा कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सर

आधी साधारणपणे वयाच्या ३८,३९ व्या वर्षी अशा पद्धतीचा कॅन्सर होण्याची उदाहरणे समोर येत असत. परंतु आता हे वय १५ पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे या कॅन्सर बद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे अतिशय आवश्यक बनले आहे.

३. ओवेरियन कॅन्सर किंवा अंडाशयाचा कर्करोग

महिलांच्या ओव्हरी म्हणजेच अंडाशयात होणारी पेशींची अनियमित वाढ म्हणजेच हा कॅन्सर. याची लक्षणे सुरुवातीला लवकर दिसून येत नाहीत. महिलांकडून या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. पोट फुगलेले असणे, पोटात जड वाटणे अशा लक्षणांकडे दुसऱ्याच काही कारणांमुळे असे होत आहे असे वाटून दुर्लक्ष केले जाते.

४. गर्भाशयाचा कॅन्सर

गर्भाशयाच्या आतील अस्तरात जेव्हा पेशींची अनियंत्रित वाढ होऊ लागते तेव्हा अशा पद्धतीचा कॅन्सर झालेला असण्याची शक्यता असते. मासिक पाळी दरम्यान अतिशय जास्त प्रमाणात रक्तस्त्राव हे याचे प्रमुख लक्षण आहे. अगदी सुरुवातीला ह्या कॅन्सरचे निदान झाले तर शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय काढून टाकून या कॅन्सरवर सहजपणे मात करता येऊ शकते.

५. कोलोरेक्टल कॅन्सर किंवा आतड्याचा कॅन्सर

या पद्धतीचा कॅन्सर मोठे आतडे आणि गुदाशय येथील पेशींच्या अनियमित वाढीमुळे होऊ शकतो. शरीराचे हे दोन्ही भाग पचनाशी निगडित आहेत. या पद्धतीचा कॅन्सर होणे काही अंशी आनुवंशिक असले तरी बैठी जीवनशैली आणि वाढलेले वजन देखील त्यासाठी कारणीभूत होऊ शकते.

तर हे पाच प्रकारचे कॅन्सर आहेत ज्यांचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असते. प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरच्या निदानासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या असतात. त्या कोणत्या ते आपण आता जाणून घेऊया

१. स्तनाचा कॅन्सर

२० ते ४० वर्षे वयादरम्यानच्या महिला स्वतःची स्तनतपासणी स्वतःच करू शकतात. त्यासाठी आपल्या हातांचा उपयोग करून दर आठवड्याला दोन्ही स्तनांची तपासणी करून हाताला कोणत्या गाठी लागत नाहीत ना हे पहावे. शंका आल्यास स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांना जरूर दाखवावे.

४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी मात्र दरवर्षी स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी दर वर्षी मॅमोग्राफी म्हणजे यंत्राद्वारे स्तन तपासणी करून घ्यावी.

६० वर्षे वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी वर्षातून दोन वेळा मॅमोग्राफी करावी.

ज्या महिलांच्या कुटुंबात कॅन्सरची अनुवंशिकता किंवा फॅमिली हिस्ट्री आहे किंवा ज्या खूप स्थूल आहेत अशांनी दुर्लक्ष किंवा कंटाळा न करता सदर तपासण्या अवश्य करून घ्याव्यात.

२. ओवेरियन कॅन्सर

या कॅन्सरच्या तपासणीसाठी ३० वर्षापेक्षा अधिक वयाच्या महिलांनी ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाउंड तपासणी करून घ्यावी. त्याशिवाय सीए १२५ ही तपासणी देखील करता येते. त्याबद्दल तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ज्यांच्या परिवारात ओव्हेरियन कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री आहे अशा महिलांनी सदर तपासणे अवश्य करून घ्यावी.

३. सर्व्हायकल कॅन्सर

२१ वर्षापर्यंतच्या महिलांना या पद्धतीच्या कॅन्सरच्या तपासणीची तितकीशी आवश्यकता नसते. परंतु २१ ते २९ वयादरम्यान दर तीन वर्षांनी पॅप स्मिअर पद्धतीने पेशींची तपासणी करून घ्यावी. ३० ते ६५ वयादरम्यान दर पाच वर्षांनी पॅप स्मिअर पद्धतीची तपासणी करून घ्यावी.

६५ वर्षे वयानंतर आधी तपासणी करून झाली असेल आणि काही त्रास नसेल तर तपासणी करण्याची आवश्यकता नाही. तसेच ज्या महिलांची गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झाली आहे त्यांना ह्या तपासणीची आवश्यकता नाही. त्याशिवाय सर्व्हायकल कॅन्सरवर असणारी लस घेतली असल्यास अशा पद्धतीच्या तपासणीची आवश्यकता नाही. अशी लस आपल्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येते.

४. गर्भाशयाचा कॅन्सर

मासिक पाळी दरम्यान खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असणाऱ्या महिलांनी याबाबत स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. त्यांना आवश्यक वाटल्यास गर्भाशयाच्या आतील बाजूच्या अस्तराची तपासणी म्हणजेच बायोप्सी करून कॅन्सर आहे अथवा नाही याचे निदान करता येते.

५. कोलोरेक्टल किंवा आतड्याचा कॅन्सर

ज्या महिलांना बद्धकोष्ठता, मलावरोध अशा शारीरिक तक्रारी आहेत तसेच ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनी कोलोनोस्कोपी , कॉम्प्युटरच्या सहाय्याने कोलोनोग्राफी या तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव्यात. तसेच पॅथॉलॉजी लॅब मध्ये स्टूल टेस्ट दरवर्षी करावी.

अशा पद्धतीने महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरची तपासणी करून त्याचे लवकर निदान करणे शक्य आहे. कॅन्सर या आजाराचे जितक्या लवकर निदान होईल तितके त्यावरील उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि रुग्णाचा जीव वाचणे तसेच जास्तीत जास्त आयुष्य मिळणे या गोष्टी शक्य होतात.

तर महिलांनो, आपल्याला होणारे शारीरिक त्रास अंगावर काढू नका. त्यांचे योग्य त्या तपासण्या करून निदान करा. आवश्यकतेप्रमाणे योग्य उपचार घ्या आणि निरोगी राहा.

पुरुष मित्रांनो, आपल्या घरातील महिलांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे देखील तुमचे कर्तव्य आहे. लेखात दिलेल्या माहितीची आपल्या घरातील महिलांना कल्पना द्या. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करा.

कॅन्सर पेशन्ट्स साठी आहार आणि दिनचर्या कशी असावी

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय