या दिवाळीत हटके लूक मिळवण्यासाठी अशी करा बांगड्यांची निवड

दिवाळी हा दिव्यांचा सण, तेजाचा सण यावेळी सौंदर्याची ही लयलूट होत असते.

आपण वर्षभर आतुरतेने या सणाची वाट पहात असतो.

या चैतन्यदायी वातावरणामध्ये प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की तिचं सौंदर्य तिच्या दागिन्यांमुळे खुलून दिसावं.

नवी कोरी साडी, हलकासा मेकअप याच बरोबर हातातल्या बांगड्यांची निवड परफेक्ट असेल तर तुमचा फेस्टिवल लूक उजळून निघणार, यात शंकाच नाही.

महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये हिरव्या चुड्याचं महत्व आपल्याला माहिती आहेच. पाटल्या बांगड्या यांच्याबरोबर रुणझुणणा-या काचेच्या बांगड्या सुद्धा महत्त्वाच्या असतात.

पारंपरिक सोन्याचांदीच्या बांगड्यांबरोबरच लेटेस्ट फॅशनच्या असंख्य बांगड्यांची व्हरायटी आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

दिवाळीसाठी घेतलेल्या खास साडीला किंवा ड्रेसला साजेशा बांगड्या नसतील तर मात्र तुमच्या सौंदर्याला ग्रहण लागलंच म्हणून समजा.

नरकचतुर्दशी, पाडवा, आणि भाऊबीजेसाठी निवडलेल्या खास ड्रेसवर कोणत्या स्टायलिश बांगड्या कशा निवडायच्या आणि आपलं सौंदर्य कसं उजळवून टाकायचं याच्या छोट्या आणि सोप्या टिप्स आज आपण जाणून घेऊया.

१) राजस्थानी बांगड्या

सध्या राजस्थानी बांगड्याची फॅशन आहे. या बांगड्या रॉयल लुक बहाल करतात.

या बांगड्यांचा पूर्ण सेटच असतो. त्यामुळे पुन्हा वेगळ्या बांगड्यांची गरजच भासत नाही.

वजनाला अगदी हलक्या आणि हातभर दिसणाऱ्या या राजस्थानी बांगड्या निवडून यावर्षी तुम्ही तुमच्या सौंदर्याला चार चाँद लावू शकता.

राजस्थानी बांगड्या

2) कलरफुल बांगड्या

या बांगड्या कोणत्याही साडीसाठी आपण निवडू शकतो.

मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकाराच्या रंगीबेरंगी बांगड्या उपलब्ध असतात.

आपल्या आवडीनुसार या कलरफुल बांगड्यांचे कॉम्बिनेशन आपण निवडू शकतो

दिवाळीच्या सणांचा आनंद या रंगीबेरंगी बांगड्यातून अतिशय सुंदर पद्धतीने प्रतिबिंबित सुद्धा होत असतो.

साडी किंवा ड्रेसवर आपण या रंगीबेरंगी बांगड्या वापरून दिवाळीचा फेस्टिव्ह लूक जपू शकतो.

3) मेटलच्या चकाकत्या बांगड्या

विवाहित महिलांना बरोबरच अविवाहित मुलींना सुद्धा या दिवाळी सणाला नटून-थटून तयार व्हायचं असतं.

त्यांच्यासाठी मेटलच्या चकाकत्या बांगड्यां खास ठरतात.

पारंपारिक पोषाखाबरोबरच साडीवर ही या मेटलच्या बांगड्या शोभून दिसतात.

गोल्डन आणि ब्लॅक मेटल पैकी एक कलर तुम्ही तुमच्या आवडीने निवडू शकता आणि यावर्षीच्या दिवाळीचा स्टायलिश लुक मिळवू शकता.

4) लाल बांगड्या

काही ठिकाणी लाल बांगड्यांना पारंपारिक महत्वं आहे.

दिवाळीसारख्या सणाला ही या लाल बांगड्या आणखीनच आकर्षक वाटतात.

काचेच्या किंवा वेगवेगळ्या टेक्स्चरच्या लाल बांगड्या तुमच्या पेहरावाला उठाव देतात.

गोल्डन कलरच्या बांगड्या बरोबर लाल बांगड्यांचा सेट सुद्धा छान दिसतो.

5) कॉइन बंँगल्स

सध्या आपण लहान मोठ्या कॉइनच्या आकारांचे दागिने बघतो.

त्यामध्ये बांगड्या सुद्धा फार सुंदर दिसतात.

गोल्डनकलर कॉईन बांगड्या साडीवर किंवा चुडीदार वरती सुद्धा सूट होतात.

हि एक एक बांगडी सुद्धा सुंदर दिसते.

Coin bangles

6) गोल्ड प्लेटेड फ्लोरल बॅगल्स:

गोल्ड प्लेटेड फ्लोरल बांगड्या नेहमीच आकर्षक दिसतात.

साडीऐवजी गाऊनची निवड केली असेल तर सिंगल लाइन गोल्ड प्लेटेड फ्लोरल बांगड्या तुम्ही घालू शकता.

गोल्ड प्लेटेड फ्लोरल बांगड्या वजनाला हलक्या आणि ब्रेसलेटसारखा लुक देणा-या असतात.

7) मोत्यांच्या बांगड्या

पारंपरिक डिझाईन्सबरोबरच आज मोत्यांच्या बांगड्यामध्ये असंख्य मॉडर्न नाजुक डिझाइन ही उपलब्ध आहेत.

कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर मोत्यांच्या बांगड्या वापरून तुम्ही परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालू शकता.

याचबरोबर रेशमी दो-यापासून तयार केलेल्या थ्रेड ज्वेलरीच्या बांगड्या, खणाच्या बांगड्या असे अनेक प्रकार सणसमारंभात शोभून दिसतात.

साडी, लेहंगा, वन पीस किंवा गाऊन, प्रत्येक पेहरावावर बांगड्यांचं सुंदर कलेक्शन तयार केलं तर दिवाळीच्या सणात तुमचं व्यक्तीमत्वाचा ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय