रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे

मित्रांनो तंत्रज्ञानामुळे बरीच माहिती आपल्याला सहज मिळते. आरोग्याच्या टिप्स आपल्याला घर बसल्या मिळतात.

आता हेच पहा ना थंडीच्या दिवसात घसा बसला तर आपण पटकन पाणी गरम करून पितो आणि घसा शेकतो.

या गोष्टी तर पूर्वापार चालत आलेल्या असतात, पण या इंटरनेट मुळे आपल्याला नव्याने माहिती होतात.

वजन कमी करण्यासाठीसुद्धा गरम पाणी पिण्याचा फायदा होतो हेही आपल्याला माहिती आहे.

पण या गरम पाण्याचे तापमान नेमकं किती असावं जेणेकरून आपल्याला फायदा होईल हे आज आपण जाणून घेऊया.

त्याचबरोबर रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यामुळे काय फायदा होतो किंवा काय नुकसान होतं याबद्दलही माहिती जाणून घेऊया.

आपल्या शरीराचा 70 % भाग पाण्याने व्यापलेला असतो हे तर तुम्हाला माहितीच आहे.

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी, हायड्रेटेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी वेळोवेळी पिणं जरुरीचं असतं.

काही व्यक्ती बारा महिने बर्फ घातलेलं पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी पितात तर काहीजण नॉर्मल पाणी पिणं पसंत करतात. काही व्यक्तींना पाणी नेहमीच गरम करून प्यायची सवय असते.

ज्या व्यक्ती गरम पाणी नियमित पितात त्यांची पचनशक्ती सुधारते बद्धकोष्ठतेपासून त्यांची सुटका होते.

आयुर्वेदातही गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत.

रोजच्या रोज पुरेसं पाणी प्यायल्यामुळं त्वचा सांधे, पेशी यांचं आरोग्य चांगलं राहतं.

नियमित गरम पाणी प्यायलात तर आरोग्याच्या दृष्टीने ते खूपच फायदेशीर ठरतं.

मित्रांनो, हे गरम पाणी पिण्यापूर्वी ते किती गरम असायला हवं यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे.

साधारण 55 ते 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत पिण्याच्या पाण्याचे तापमान असायला हवं.

आता तुम्ही म्हणाल रोज कोण पाण्याचं तापमान मोजत बसणार? तर एवढं लक्षात ठेवा, गरम पाणी पिऊन तोंड, जीभ, गळा हे भाजून निघणार नाहीत इतपतच ते गरम ठेवायचं.

गरम पाणी अनशापोटी म्हणजे सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी, काहीही खाण्याच्या आत प्यायलात तर त्याचे जास्त फायदे मिळतात.

हजारो वर्षापासून कित्येक लोक अशा गरम पाण्याच्या फायद्याचा लाभ घेतात.

1) नाक मोकळं होतं

पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात कफानं नाक जाम होतं. श्वास घ्यायला अडचण येते.

गरम पाणी प्यायल्यामुळे कफानं घसा बसला असेल तर तो मोकळा होतोच मात्र चोंदलेलं नाकही मोकळं होतं.

ज्यांना सायनसचा त्रास असतो त्यांनी प्यायला गरम पाणी वापरलं तर त्यांची डोकेदुखी कमी व्हायला मदत होते.

2) पचनशक्ती सुधारते

दिवसभरात पुरेसं पाणी प्यायला नाहीत तर छोटी आतडी अन्नपदार्थातील सगळे पाणी शोषून घेतात त्यामुळे डीहायड्रेशन होतं.

ही प्रक्रिया जर सतत चालू राहिली तर लवकरच बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. त्यातून अनेक त्रासदायक आजार उद्भवतात.

रिकाम्या पोटी गरम पाणी पिऊन पचनशक्‍ती सुधारता येते आणि या त्रासदायक, वेदनादायक आजारांना दूर ठेवता येतं.

3) वजन कमी करणं

वजन कमी करण्यासाठी जे लोक सोपा उपाय शोधत असतात त्यांच्यासमोर नेहमी गरम पाण्याचा पर्याय येतोच.

जेवणा अगोदर अर्धा तास गरम पाणी प्यायलामुळं मेटाबॉलिजम रेटमध्ये 30 % वाढ होऊन वजन झपाट्याने कमी व्हायला मदत होते.

4) बॉडी डीटॉक्स होते.

गरम पाण्यामुळे शरीरातील विषद्रव्य पटकन बाहेर टाकली जातात, आणि शरीर साफ होऊन तुम्ही फ्रेश होता.

गरम पाणी जर कडकडीत असेल तर तुमच्या शरीराचे तापमान वाढून एंडोक्राइन सिस्टिम ऍक्टिव्हेट होते आणि घाम यायला लागतो.

या घामातून उरलीसुरली विषद्रव्ये बाहेर पडून त्वचेची छिद्र साफ होतात.

नियमित गरम पाणी प्यायल्यामुळे गाऊट सारख्या आजारातही आराम मिळतो

5) रक्तप्रवाह नियमित होतो

रक्तप्रवाह नियमित राहणं किती महत्त्वाचं असतं हे तर तुम्हाला माहिती आहेच.

रक्तप्रवाहात गडबड झाली, अडथळा आला तर हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

गरम पाण्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात त्यामुळे रक्तप्रवाहातील अडथळे दूर होतात.

गरम पाण्याने अंघोळ केल्यावर नसा जशा मोकळ्या झाल्यासारखे वाटतात, तसंच रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायलामुळं आतून शिरा मोकळ्या होतात आणि रक्त प्रवाह सुरळीत होतो.

6) ताण कमी करा

चिंता आणि तणाव यांनी तुम्ही ग्रासलेले असाल तर गरम पाणी तुम्हाला खूप मदत करू शकेल.

प्रचंड थकल्यानंतर एक कप चहा किंवा एक कप गरम कॉफी हवी असं तुम्हांला वाटतं. आणि तो गरमागरम चहा जेव्हा तुम्ही पिता तेव्हा घशातून गरमगरम घोट खाली गेल्यावर त्या चहाच्या गरम स्पर्शांनं सुद्धा बरं वाटतं, असा अनुभव तुम्ही घेतला असेल.

तर मित्रांनो चहा कॉफीचं विष टाळून फक्त गरम पाण्यानं तुम्ही तुमचा मूड चांगला ठेवा आणि ताणतणावांना Bye करा.

7) तारुण्य जपा

मनाने तुम्ही एव्हरग्रीन असालच पण शारीरिक दृष्ट्या तारुण्य जपायचं असेल तर गरम पाणी अवश्य प्या.

गरम पाण्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. पेशींची पुनर्रचना होते आणि वृद्धत्वाच्या खुणा दूर निघून जातात.

8) शांत झोप मिळवा

रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याची सवय जर तुम्हाला असेल तर लाभ भरपूर होतातच.

त्याचबरोबर रात्रीच्या जेवणाच्या वेळी जेवताना मध्ये मध्ये थोडंसं गरम पाणी प्यायल्यामुळे किंवा रात्री झोपायच्या अगोदर गरम पाणी प्यायलामुळं नसा रिलॅक्स होऊन तुम्हाला शांत झोप लागेल.

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे अर्ध्या रात्री लागणारी भूक कमी होते.

शांत झोपेमुळं तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेंव्हा अगदी ताजेतवाने असता.

गरम पाण्यानं होणारं नुकसान

तसं पाहायला गेलं तर गरम पाण्याचे फायदेच खूप आहेत नुकसान जवळजवळ नाही.

मात्र चुकीच्या पद्धतीने गरम पाणी प्यायलात तर मात्र त्रास होऊ शकतो.

तर गरम पाण्याचे बरेच फायदे आपण जाणून घेतले. तुम्ही पण गरम पाण्याचा नियमित वापर करा आणि आरोग्याशी हातमिळवणी करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय