ऑफ सिझन बिजनेस प्रभावीपणे कसा करावा…..

काही बिझनेस, काही काय बरेच बिझनेस हे सिझनल असतात. मग बरेच जण म्हणतात आमच्या बिझनेचा स्लॅक सिझन चालू आहे ना…. म्हणून तंगी मध्ये दिवस चालले.

बऱ्याच बझनेस मध्ये पूर्णच सिझन ऑफ होतो, काहींमध्ये थोड्या फार प्रमाणात ऑफ म्हणता येईल असा असतो तर काही बिझनेस एव्हरग्रीन असतात.

तसा हा चढउतार सगळ्याच धंद्यात असतो. असं नाही कि फक्त आईस्क्रीम च्या धंद्यातच ऑफ सिझन असतो. इतर सुद्धा बरेच असे धंदे आहेत.

जसे कि शेतीविषयक धंदे खतं, बी-बियाणे, फरवारणीची औषधे हे बिझनेससुद्धा रब्बी आणि खरिफ यानुसारच चालतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा सिझन काय तर दिवाळी, दसरा, गुढीपाडवा असे सणांचे दिवस.

आईस्क्रीम, हॉस्पिटॅलिटी या साऱ्याच इंडस्ट्री काही ठराविक सिझन मध्ये कमालीचा धंदा ओढतात. इतर सिझनला त्यांच्या बिझनेमध्ये मंदी येते.

आता आपण अशा काही युक्त्या बघू ज्या वापरून आपल्या धंद्याचा सिझन वाढवता येईल आणि असलेल्या सीझनचा सुद्धा प्रभावी वापर करता येईल. आपला बिजनेस सिझनल असला तरी आपल्यातली काम करायची उर्मी सिझनल असायला नको.

सिझनल बिझनेस प्रभावीपणे करण्याच्या पाच युक्त्या –

१) तिथे जा जिथे सिझन आहे – आपला बिझनेस जर स्वेटर म्हणजे वूलन कपड्यांचा असेल आणि आपल्याकडे नोव्हेम्बर, डिसेम्बर, जानेवारी, फेब्रुवारी हा थंडीचा सिझन असेल तर आपल्याकडे पर्याय आहे पहाडी भागात आपला आपला व्यवसाय वाढवण्याचा तिथे मे मध्ये सुद्धा दिवस थंड असतात.

वूलन कपड्यांना मागणी तेव्हा सुद्धा असते. धंदा कुठलाही असो एकीकडे मंदी असली तरी दुसऱ्या कुठल्यातरी भागात त्याची मागणी असण्याची शक्यता भरपूर असते.

फक्त त्याचा जरा अभ्यास करावा. बरं कोणाला असाही प्रश्न पडू शकतो कि असे कसे कुठल्याही ठिकाणी पोहोचणार. तर आजच्या इंटरनेटच्या युगात ऑनलाईन सेल स्नॅपडील, फ्लिपकार्ट, शॉपक्लु वरून विक्री करून तुम्ही कुठल्याही प्रदेशात पोहोचू शकता.

(ऑनलाईन पोर्टलवर सेलर अकाउंट बनवायचे असल्यास येथे सम्पर्क करता येईल) जमत असेल तर त्या भागात आपला डिस्ट्रिब्युटर आपण नेमू शकतो. बिझनेस कुठलाही असो भॊगोलिक दृष्ट्या त्याचा सिझन कुठे असू शकेल याचा विचार करून बघावा.

२) आपला सिझन वाढवा – आपल्या प्रोडक्ट्चा किंवा धंद्याचा, दुकानाचा सिझन जर दिवाळी असेल तर दिवाळीच्या दोन महिने आधीच प्रिदिवाळी सिझन चालू करता येईल.

दिवाळीचे दिवस झाले कि काही काळ पोस्ट दिवाळी ऑफर आपण चालू करू शकतो. थन्डीच्या सिझन मधलं जर आपलं काही उत्पन्न असेल तर प्रिसिझन दोन महिने आणि पोस्टसीझन दोन महिने आणि थंडीचे चार महिने असा आठ महिने आपला सिझन आपण चालवू शकतो. त्यातही काही स्कीम आणून आपली विक्री वाढवता येईल.

३) कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग – आपण चालवत असलेली ब्रँड छोटी असेल तर सिझनचा परिणाम त्यावर होतो. पण मोठे काही ब्रँड असतात जे ऑफ सिझन मध्ये पण अशाच काही स्ट्रॅटेजी प्रभावीपणे वापरून २४ महिने चालतात.

तर आपण अशा कम्पनीला सम्पर्क करून त्यांच्यासाठी माल बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो.

४) ऑफ सिझन मध्ये काहीतरी वेगळी सेवा देणे – ऑफ सीझनमध्ये नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी सेवा जसं कि फ्री घरपोच सेवा देणे, नेहमीपेक्षा जास्त वॉरंटी आपल्या जवाबदारीवर देऊन ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यास मदत होऊ शकते.

५) ऑफ सीझनमध्ये कामाची पद्धत बदला, तयारी करा – जेव्हा सिझन नसेल तेव्हा प्रभावी इन्फ्रास्टक्चर तयार करा म्हणजे माल खरेदी करण्याचे किफायतशीर मार्ग किंवा विक्रेते शोधा. वेबसाईट किंवा डिजिटल पद्धतीने विक्रीचे मार्ग तयार करा.

चला तर मग करा तयारी जोमात आपल्या आवडीचे काम हातात घेण्याची.

वाचण्यासारखे आणखी काही…..

मुद्रा कर्ज योजना- १ (Mudra Loan-How it Works?- Part 1)
मुद्रा कर्ज योजना- २ (Mudra Loan-How it Works?- Part 2)
व्यवसाय मार्गदर्शन -१ (आकर्षक कापडी पिशव्या बनविणे)

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय